अस्मिता योजना माहिती मराठी

महाराष्ट्र शासन राज्यातील महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा तसेच महिला सशक्त व आत्मनिर्भर व्हाव्यात व त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते. आज आपण राज्य शासनाद्वारे राज्यातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव अस्मिता योजना महाराष्ट्र आहे.

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येते.

राज्यातील ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुली तसेच जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे व त्यांना माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देण्याकरीता राज्यात Asmita Yojana राबविण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.

या योजनेचा उद्देश राज्यातील किशोरवयीन मुली तसेच महिलांना कमी दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव निर्माण करणे.

योजनेचे नावAsmita Yojana Maharashtra
राज्यमहाराष्ट्र
उद्देशमहिला आणि मुलींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे.
लाभकमी दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणे.
लाभार्थीराज्यातील महिला व जिल्हा परिषद शाळांमधील मुली

योजनेचे उद्दिष्ट

  • राज्यातील ग्रामीण भागातील महिला व किशोरवयीन मुली तसेच जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव जागृती करणे.
  • महिला तसेच मुलींना कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करणे.
अस्मिता योजना माहिती मराठी

योजनेचे वैशिष्ट्य:

  • महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना स्वच्छतेची जाणीव निर्माण होण्यास अस्मिता योजना महत्वाची ठरणार आहे.

योजनेचे लाभार्थी:

  • राज्यातील महिला व जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 18 वयोगटातील महिला

योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना व अस्मिता कार्डधारक जिल्हा परिषद शाळेतील मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिनची खरेदी व विक्री किंमत खालीलप्रमाणे राहील.

अ.क्र.लाभार्थीसॅनिटरी नॅपकिनचा
आकार
8 पॅडच्या एका पॅकेटची
स्वयंसहायता समूहाकडून
खरेदी किंमत
स्वयंसहायता समुहाचा
हाताळणी खर्च / नफा
विक्री किंमत
1ग्रामीण भागातील महिला240 मी.मी.19.20/- रुपये4.80/- रुपये24/- रुपये
2ग्रामीण भागातील महिला280 मी.मी.23.20/- रुपये5.80/- रुपये29/- रुपये
3जिल्हा परिषद शाळेतील
11 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन मुली
240 मी.मी.4/- रुपये1/- रुपये5/- रुपये

योजनेचा फायदा:

  • अस्मिता योजना अंतर्गत ग्रामीण भागातील महिला व जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींना कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येते.
  • महिलांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण होईल.

जिल्हा परिषद शाळांमधील 11 ते 19 या वयोटातील किशोरवयीन मुलींसाठी अस्मिता योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी करावयाची कार्यवाही

  • जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयीन मुलींसाठी ही योजना अनुदान तत्वावर राबविण्यात येणार असून त्यांना 8 नॅपकिन्सचे एक पॅकेट 5/- रुपये या सवलतीच्या दराने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
  • यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद शाळांमधील मुलींकडे अस्मिता कार्ड असणे आवश्यक आहे. याकरीता जिल्हा परिषद शाळेमध्ये नोंदविलेल्या 11 ते 19 वयोगटातील सर्व मुलींच्या यादीची प्रमाणित प्रत मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीने ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रात (ASSK) प्रत्येक शाळा जमा करेल.
  • शाळेतील सर्व पात्र मुलींची नोंदणी आपले सेवा केंद्राचे केंद्र प्रमुख गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन करतील. याकरीता मुलींकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. याकरीता प्रत्येक मुलीच्या नोंदणीकरीता 5/- रुपये प्रमाणे नोंदणी फी शासनाकडून अदा करण्यात येईल.
  • नोंदणी झालेल्या सर्व मुलींचे अस्मिता कार्ड तयार करण्यात येतील व उमेदमार्फत जिल्हा परिषद शाळेत पोहोचविण्यात येतील.
  • या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक शाळा पात्र मुलींची नोंदणी करतील.
  • अस्मिता कार्ड मिळाल्यानंतर स्वयंसहायता समूहांकडून मुलींनी 5/- रुपये या किंमतीत सॅनिटरी नॅपकिन विकत घेता येईल. विकत घेताना अस्मिता कार्ड दाखविणे गरजेचे राहील व या कार्डावरचा QR कोड read केल्याशिवाय स्वयंसहायता समूहांमार्फत ही विक्री होणार नाही.

योजनेअंतर्गत सॅनिटरी नॅपकिन मिळवण्याची पद्धत:

  • गावातील महिलांना स्वयंसहायता समूहाकडून 24/- रुपये व 29/- रुपयांमध्ये सॅनिटरी नॅपकिन मिळवता येईल.
Telegram GroupJoin

Leave a Comment