स्वाधार योजना महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना दुसऱ्या शहरात मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे
दिवसेंदिवस वाढत असलेली व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या प्रमाणात, राज्यात शासकीय वसतीगृहांची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशास मर्यादा येत आहेत. शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह सुरू करून तेथे प्रवेश देण्यावर, जागेची उपलब्धता व बांधकामासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मर्यादा येतात. अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधीत अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी विद्यार्थ्यांना १०वी / १२वी / पदवी /पदवीका परिक्षेमध्ये ६० % पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ही मर्यादा 50% असेल.
या योजनेनुसार, विद्यार्थ्यांना दर महिन्याला भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी 2,275/- रुपये ते 4,500/- रुपये पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
योजनेचे फायदे:
- आर्थिक मदतीमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोपे होते.
- शिक्षणामुळे रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात.
- समाजात सामाजिक न्याय आणि समानता निर्माण होण्यास मदत होते.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Telegram Group | Join |
स्वाधार योजना शासन निर्णय | Click Here |
स्वाधार योजना अर्ज | Click Here |