योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 25 वर्ष वयोगटातील बेरोजगार युवकांना दरमहिना 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
राज्यातील युवक शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकरीच्या शोधात असतात कारण त्यांच्या खांद्यावर कुटुंबाला सांभाळण्याची महत्वपूर्ण अशी जबाबदारी असते परंतु राज्यात नोकऱ्या उपलब्ध नसल्या कारणामुळे बहुतांश युवक बेरोजगार आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा व कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या समस्येचा सामना करावा लागतो याचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो व काही बेरोजगार युवक नोकरी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात व स्वतःचे जीवन संपवतात त्यामुळे राज्यातील बेरोजगार युवकांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने बेरोजगारी भत्ता योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

योजनेचे नाव | Maharashtra Berojgari Bhatta Yojana |
उद्देश | बेरोजगार युवकांना दरमहा आर्थिक सहाय्य करणे |
लाभार्थी | राज्यातील बेरोजगार युवक |
लाभ | प्रतिमहिना 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
Maharashtra Berojgari Bhatta चा उद्देश
- राज्यातील बेरोजगार युवकांना दरमहा बेरोजगारी भत्ता देण्याचा मुख्य उद्देश त्यांना आर्थिक सहाय्य करणे आहे.
- राज्यातील बेरोजगार युवकांचे जीवनमान सुधारणे.
- राज्यातील बेरोजगार युवकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
- बेरोजगार युवकांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे.
- नोकरी शोधताना प्रवासासाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणाकडे पैसे मागण्याची गरज भासू नये.
- बेरोजगार युवकांना स्वतःच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज भासू नये.
- बेरोजगार युवकांच्या आत्महत्या रोखणे.

वैशिष्ट्ये
- महाराष्ट्र शासनाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- या योजनेनंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांचे जीवनमान सुधारण्यास तसेच ते सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी अर्थीक राशी लाभार्थी युवकाच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
- योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवकांच्या आत्महत्या रोखण्यास मदत होईल.
- या योजनेचा लाभ राज्यातील सर्व जाती धर्मातील बेरोजगार युवकांना दिला जाईल.
आर्थिक सहाय्य
- या योजनेअंतर्गत लाभार्थी बेरोजगार युवकास दरमहा 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र युवक
- राज्यातील 20 वर्ष ते 35 वर्ष वयोगटातील बेरोजगार युवक
फायदा
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा वापर करून बेरोजगार युवक स्वतःसाठी नोकरी शोधू शकतील.
- योजनेअंतर्गत युवकांना दरमहिना 5 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
- बेरोजगार युवकांच्या आत्महत्या रोखल्या जातील.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा वापर करून युवक स्वतःच्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील.
- राज्यातील बेरोजगार युवकांचे जीवनमान सुधारेल व त्यांचा आर्थिक विकास होईल त्यामुळे ते स्वतःच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- या योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य तो पर्यंत दिले जाईल जो पर्यंत युवकाला नोकरी मिळत नाही.
आवश्यक पात्रता
- अर्जदार युवक महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेचे नियम व अटी
- फक्त महाराष्ट्र राज्यातील युवकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील युवकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार युवक बेरोजगार असणे आवश्यक आहे व तो खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात कार्यरत असता कामा नये.
- अर्जदार युवकाचे वय 20 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.
- राज्यातील बेरोजगार मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार युवकाकडे कुठल्याच प्रकारचे आर्थिक मिळकतीचे साधन असता कामा नये.
- अर्जदार युवक कमीत कमी इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्जदार युवकाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त असता कामा नये.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्जदार युवकाचे बँकेत स्वतःच्या नावे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- युवकाला नोकरी मिळाल्यावर त्याला दिली जाणारी आर्थिक सहायता बंद करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- इयत्ता 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- बँक पासबुक झेरॉक्स
- वयाचा दाखला
- शपथपत्र
अर्ज रद्द होण्याची कारणे
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराचे वय 21 वर्ष ते 35 वर्ष दरम्यान असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार बेरोजगार नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराकडे आर्थिक उत्पन्नाचा स्रोत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत
पहिला टप्पा
- अर्जदार बेरोजगार युवकास शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर नोंदणी वर क्लिक करावे लागेल.

- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून Next बटनावर क्लिक करावे लागले.

- अशा प्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
दुसरा टप्पा
- आता तुम्हाला तुमच्या Username आणि पासवर्ड ने लॉगिन करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती तसेच कागदपत्रे जमा करावे लागेल
Telegram Group | Join |
Berojgari Bhatta Scheme Maharashtra Official Website | Click Here |