Bij Bhandval Yojana 2024 | बीज भांडवल कर्ज योजना फॉर्म

Bij Bhandval Yojana: राज्यातील नागरिकांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करता यावा या उद्देशाने राज्य शासनाद्वारे बीज भांडवल योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण/तरुणींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदराने 5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

राज्यातील बहुतांश तरुण हे सुशिक्षित आहेत परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी उपलब्ध नाही त्यामुळे तरुण बेरोजगार आहेत त्यामुळे तरुणांना नोकरीवर अवलंबून न रहाता स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करता यावा यासाठी तरुण / तरुणींना आर्थिक मदत करून देणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन राज्य शासनाने बीज भांडवल योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

या योजनेअंतर्गत 50 हजार ते 5 लाखांपर्यंत पर्यत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा सवलतीच्या दराने उपलब्ध करण्यांत येतो. [Bij Bhandval Yojana]

वाचकांना विनंती

आम्ही बीज भांडवल योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात जे कोणी सुशिक्षित तरुण व तरुणी असतील जे स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवून स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील.

bij bhandval yojna

योजनेचे नावBij Bhandwal Yojana
योजनेचे लाभार्थीराज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण व तरुणी
लाभ95 टक्के कर्ज
योजनेचा उद्देश्यउद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाईन

बीज भांडवल योजना चा उद्देश

  • राज्यातील तरुण/तरुणींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
  • अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान सुधारणे.
  • नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे तसेच त्यांना स्वतःचा स्वरोजगार सुरु करण्यासाठी सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे.
  • तरुण/तरुणींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे कर्ज घेण्याची गरज भासू नये.
  • राज्यातील बेरोजगारी कमी करणे.
  • राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे. [Bij Bhandval Yojana]

Bij Bhandval Yojana ची वैशिष्ट्ये

  • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे बीज भांडवल योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
  • योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे. [Bij Bhandval Yojana]
  • आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना राज्य सरकार देत आहे 3 लाखांची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना

Beej Bhandwal Yojana अंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप

  • 50 हजार ते 5 लाखांपर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा सवलतीच्या दराने उपलब्ध करण्यांत येतो.
  • या योजनेअंतर्गत 50 हजार ते 5 लाखांपर्यंत कर्ज पुरवठा द.सा.द.शे. 9.5 ते 12.5 टक्के व्याज दराने बँकेमार्फत करण्यांत येतो.
  • या योजनेअंतर्गत बँकेने मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेपैकी 75 टक्के कर्ज रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते. 5 टक्के रक्कम ही लाभार्थ्याने स्वतःचा सहभाग म्हणून बँकेकडे जमा करावयाची असते. उर्वरित 20 टक्के रक्कम ही महामंडळ बीज कर्ज म्हणून देते. त्या रक्कमेपैकी 10,000/- रुपये अनुदान म्हणून देण्यात येते तर उर्वरित रक्कम ही 4 टक्के व्याजदराने बीज कर्ज म्हणून देण्यांत येते. [Bij Bhandval Yojana]

बीज भांडवल योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची परतफेड

  • या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड ही राष्ट्रीयकृत बँकेस व महामंडळास 36 ते 60 मासिक हप्त्यांत एकाचवेळी करावयाची असते.

बीज भांडवल योजना चे लाभार्थी

  • अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्ती

बीज भांडवल योजना चा फायदा

  • योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे नागरिकांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ येणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • योजनेअंतर्गत राज्यात नवीन उद्योग सुरु झाल्यामुळे राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील तसेच राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.
  • नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
  • राज्यातील नागरिक स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी सशक्त तसेच आत्मनिर्भर बनतील.
  • योजनेअंतर्गत राज्यातील तरुण/तरुणींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल. [Bij Bhandval Yojana]

बीज भांडवल योजना साठी आवश्यक पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • राज्य सरकार पीडित महिला व बालकांना देत आहे 10 लाखांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा मनोधैर्य योजना

बीज भांडवल योजना चे नियम व अटी

  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदाराने कर्ज अर्ज संपूर्ण भरलेला असावा.
  • अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • अर्जदार महाराष्ट्राचा किमान 15 वर्षाचा रहिवासी असावा.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • अर्जदार व्यक्तीचे वय 18 वर्ष ते 50 वर्ष दरम्यान असावे.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98,000/- रुपये व शहरी भागासाठी 1.2 लाखांपर्यंत पर्यंत असावे.
  • राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा 1 लाखांपर्यंत पर्यंत असावे.
  • जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
  • अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
  • महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
  • अर्जदार व्यक्ती बँक तसेच वित्त संस्थेचा थकबाकीदार नसावा.
  • महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्‍या अटी अर्जदारास बंधनकारक राहतील.
  • लाभार्थ्याला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर स्वतःचा उद्योग सुरु करता येणार नाही.
  • एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल. [Bij Bhandval Yojana]

सूचना

  • अनुसूचति जाती प्रवर्गातील मांग आणि चांभार यांना सोडुन उरवरीत प्रवर्गातील लाभार्थांना लाभ दिले जातो. उदा. महार, होलीया, बुरुड, मेहत्तर, खाटीक, घसीया इत्यादी.
  • व्यवसकरीता कर्जाचे अर्ज कार्यालयातुन देण्यात येईल (Offline Application Form)
  • कार्यालयाचा पत्ता :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, आमगाव रोड, गोंदिया- 441601, दुरध्वनी क्रमांक. 07182-232947 [Bij Bhandval Yojana]

बीज भांडवल योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रहिवाशी दाखला (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी)
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की, मालाचे किंमतीपत्रक, आवश्यक असल्यास व्यवसायाच्या जागेचा पुरावा, गुमास्ता लायसन्स, व्यवसायानुरुप इतर कागदपत्रे वाहनाकरिता लायसन्स, गुमास्ता लायसन्स, परमिट, बॅच नंबर इत्यादी
  • आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल (रु. 2.00 लाखाच्या वर)
  • जातीचा दाखला
  • अर्जदाराने काही तांत्रिक प्रशिक्षण घेतले असल्‍यास प्रमाणपत्राची प्रत
  • अर्जदार ज्‍या जागेत व्‍यवसाय करणार आहे त्‍या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्‍काचा पुरावा.
  • अर्जदारास व्‍यवसायाचा पुर्वानुभव असल्‍यास त्‍याबद्दल पुरावा.
  • अपंगत्वाचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • उत्पन्नाचा दाखला
  • प्रतिज्ञापत्र

बीज भांडवल योजना अंतर्गत अर्ज करण्याची पध्दत

  • अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा लागेल.
  • विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.
  • अशा प्रकारे या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [Bij Bhandval Yojana]
Telegram GroupJoin
Bij Bhandval Yojna PortalClick Here
बीज भांडवल योजना अंतर्गत नोंदणीकृत कार्यालयठाकरसी  हाऊस
दुसरा  मजला
जे. एन. हरडिया  रोड
बॅलार्ड  इस्टेट
मुंबई – 400 001
बीज भांडवल योजना अंतर्गत मुख्य कार्यालयजुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर
गुलमोहर क्रॉस रोड नं. 9
जे.व्ही.पी.डी.स्कीम
जुहू, मुंबई – 400 049
दूरध्वनी क्रमांक022-22621934
Emailregionofficemumbai21[at]gmail[dot]com
बीज भांडवल कर्ज योजना फॉर्मClick Here
  • स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते आहे त्यासाठी वाचा प्रशिक्षण योजना

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला बीज भांडवल योजना ची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे या योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल. [Bij Bhandval Yojana]