राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात व त्यांच्याजवळ ग्रामीण भागात उत्पन्नाचे कुठल्याच प्रकारचे स्थायी साधन नसल्या कारणामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते त्यामुळे ते जेवण बनविण्यासाठी चुलीचा उपयोग करतात कारण गॅस कनेक्शन घेण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नसतात त्यामुळे जेवण बनविण्यासाठी चुलीचा उपयोग केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होतो व परिणामी वायू प्रदूषण होते तसेच चुलीवर जेवण बनवताना निर्माण झालेला धूर महिलांच्या आरोग्याला हानिकारक असतो ज्यामुळे महिलांना दम्या सारख्या आजारांना बळी पडावे लागते तसेच चुलीवर जेवण बनविण्यासाठी लाकडांची गरज असते त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबे लाकडासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करतात व जंगलतोड केल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो तसेच त्याचा पर्जन्यमानावर याचा विपरीत परिणाम होतो.
केंद्र शासनाच्या उज्वला योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील कुटुंबांना निशुल्क गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले जाते परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गॅस सिलेंडरच्या किमती आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना परवडण्यासारख्या नसतात त्यामुळे ग्रामीण भागातील कुटुंबे पुन्हा चुलीवर जेवण बनविण्यासाठी वळताना दिसून आले आहेत त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून तसेच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व होणाऱ्या वायू प्रदूषणाचा विचार करून राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात निर्धूर चूल योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला.
निर्धूर अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना निशुल्क निर्धूर चुलीचे वाटप करण्यात येते.
या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील अनुसूचित जातीतील कुटुंबांना मोफत निर्धूर चुलीचे वाटप करणे व त्यांची चुलीच्या धुरापासून होणाऱ्या श्वसनाच्या विविध आजारापासून मुक्तता करणे.
![Nirdhur Chul Vatap Yojana](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjHVUYFvCd3uWDkpRjL3526XDYQBo7ev6yXaHVlvZUzktpM2jYyn2mAURo7VpY3MQ2HbmssxNXd3_IxN1o8-1RuxMxpaJ-ilO3VCOAChhQr25XT9O-E92o1NZGwjicZ_fBO_OUg0DJCSz38yvO3icVRMY2e7Ax8NhkHIYO2IElrLFZlVq00ymdtdTWl/s709/Nirdhur-Chul-Yojana%20News.jpeg)
योजनेचे नाव | निर्धूर चूल योजना |
लाभार्थी | ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे |
लाभ | निर्धूर चुलीचा लाभ |
उद्देश | राज्यात वायू प्रदूषण तसेच जंगल तोड कमी करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
योजनेचे उद्दिष्ट
- निर्धूर चूल योजना ज्याला गोबर गॅस स्टोव्ह योजना आणि बायोमास स्टोव्ह योजना म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना स्वच्छ आणि आरोग्यदायी स्वयंपाक पर्याय प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे राबवत असलेले कार्यक्रम आहे. या योजनेचा उद्देश पारंपारिक लाकडाच्या चुलीमुळे होणाऱ्या प्रदूषण कमी करणे आणि महिलांच्या आरोग्याचे रक्षण करणे हा आहे.
योजनेचे लाभार्थी:
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील अनुसूचित जातीतील कुटुंबे निर्धूर चूल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
- ग्रामीण भागात राहणारे गरीब कुटुंबे.
- ज्यांच्याकडे एलपीजी गॅस कनेक्शन नाही.
- ज्यांच्याकडे बायोमास स्टोव्ह नाही.
योजनेचा फायदा:
- आरोग्य सुधारणे: पारंपारिक चूल्यांमुळे निघणाऱ्या धुरामुळे श्वसनाचे आजार, डोळे आणि त्वचेचे आजार आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. निर्धूर चूला धुरामुक्त स्वयंपाक करतात ज्यामुळे या आरोग्य समस्या कमी होण्यास मदत होते.
- पर्यावरण संरक्षण: पारंपारिक चूला मोठ्या प्रमाणात लाकूड आणि शेणखत जळवतात ज्यामुळे वनोन्मूलन आणि हवा प्रदूषण होते. निर्धूर चूला अधिक कार्यक्षम असतात आणि कमी इंधन वापरतात ज्यामुळे पर्यावरणावर होणारा भार कमी होतो.
- महिलांसाठी सशक्तीकरण: पारंपारिक चूल्यांवर स्वयंपाक करणे महिलांसाठी वेळखाऊ आणि कष्टाचे काम आहे. निर्धूर चूला स्वयंपाक वेळ कमी करतात आणि महिलांना इतर उपक्रमांसाठी अधिक वेळ देतात.
- सामाजिक-आर्थिक विकास: निर्धूर चूला स्वयंपाक खर्च कमी करतात आणि ग्रामीण कुटुंबांच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करतात.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त अनुसूचित जातीतील कुटुंबांनाच निर्धूर चूल योजनेचा लाभ दिला जाईल.
- फक्त महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार कुटुंब आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
- अर्जदार कुटुंबाने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे निर्धूर चुलीचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थिती त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- शपथ पत्र
अर्ज रद्द होण्याची काही कारणे:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार अनुसूचित जातीतील नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार ग्रामीण भागातील रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नसल्यास
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- निर्धूर चूल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर महाप्रीत वर क्लिक करावे लागेल.
![Nirdhur Chul Vatap Yojana Home Page](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhXjg7fzD9PhoXsguMxT7XJGIhuQAyxRIoEK0-BnwxSOCZz10JiUL3TbLU95KXQW9X8DGhjUkleFtGad1SDjvajbT5HCNR7C4FalvDqnfiYkbrb0WizQKkyMFVvoD_jZowFqxFeylvrXvWng9s8yNrm95WpI-Dc8FIBk81yR4uWcFdtiqCALcdrGrkT/s657/Nirdhur%20Chul%20Vatap%20Yojana%20Home%20Page.jpg)
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामंध्ये तुम्हाला Latest Notices मध्ये Clean Cooking Cookstoves Distribution वर क्लिक करायच आहे.
![Nirdhur Chul Vatap Yojana Notice](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjcN-_Paf01Rcs4Dz_fO0vpBCgjgJ31LTRuPuUyUbAt6DSNN4BGhkdYauyHTbV-P7Q04jjJv0ar8TCxHOJMS8JBE-kvZRTTka50ziFkIEzEwRRhmVSnRsM5bnvxrubE1BsTw72NhHgaDnaien-PXzkuxA1J-xr6mmJn_BuXF0-ml39a5hFVTsQtO3bI/s761/Nirdhur%20Chul%20Vatap%20Yojana%20Notice.jpg)
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या अटी वाचायच्या आहेत.
- आता तुम्हाला येथे क्लिक करायचे आहे आणि तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे.
![Nirdhur Chul Vatap Yojana Application Form](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEibU5VXrRJGPSC08-RGXcwhL_02XLMqChKZq2SM-nGdiFs3hVpAhryp_UEWgFNq2ix9KQujTifHU6gEnf2FCpDk0vlNAc3XY4YvDJD75MIfTb06O4tjn0gQET6nvYgzt78ztd1A6jcOMZG9BU70zvU84bxZgbHOzK2VQyhu6K1C_87s_CrZacduilFc/s461/Nirdhur%20Chul%20Vatap%20Yojana%20Application%20Form.jpg)
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join |
शासनाची अधिकृत वेबसाईट | Click Here |
Biomass Stove Yojana Online Form | Click Here |
पत्ता | ठाकरसी हाऊस , दुसरा मजला, जे . एन . हरडिया रोड , बॅलार्ड इस्टेट , मुंबई-400 001 जुहू सुप्रीम शॉपिंग कॉम्प्लेक्स, रोड क्रमांक 9, गुलमोहर क्रॉस रोड, जे व्ही पी डी, जुहू , मुंबई 49 |
दूरध्वनी क्रमांक | 022-22621934 022-26200351 022-26202852 |
regionofficemumbai21[at]gmail[dot]com |