छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद योजना

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद 20 टक्के उपकरातून व 5 टक्के (दिव्यांग) उपकरातून सन 2024-25 या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तीक लाभ देणेकरीता ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी खालिल योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. सदरील योजना ह्या 100 टक्के शासकीय अनुदान व लाभार्थी हिस्सा 0 टक्के या तत्वावर राबविण्यात येत आहेत.

जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाच्या किमान 20 टक्के रक्कम अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौध्दांसाठी आणि 5 टक्के दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद योजना

२०% उपकरणातील योजनेचे नावप्रति लाभार्थी देय अनुदानउद्दिष्ट
मागासवर्गीयांना संगणक/लॅपटॉप पुरविणे42,000/- रुपये119
मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरविणे43,070/- रुपये92
मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरविणे43,070/- रुपये92
मागासवर्गीयांना कडबा कुट्टी यंत्र पुरविणे29,000/- रुपये86
मागासवर्गीय महिलांना पिको फॉल शिलाई मशीन पुरविणे9,300/- रुपये322
मागासवर्गीयांना दुग्ध व्यवसायासाठी
गाय/म्हैस पुरवठा करिता अर्थसहाय्य्य देणे.
40,000/- रुपये125
मागासवर्गीयांना मिरची कांपड यंत्र (पल्वलायजर) पुरविणे20,000/- रुपये100
मागासवर्गीयांना शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरविणे25,000/- रुपये200

सर्व साधारण अटी व शर्ती:

  • अर्जदार हा अनुसुचित जाती (S.C.), अनुसुचित जमाती (ST.), विमुक्त जाती व भटक्या जमाती (V.J-N. T), विशेष मागास प्रवर्ग (S.B.C.) व नवबौध्द या घटकांतीलच असावा.
  • संगणक योजनेचा अर्जदार १२ वी उत्तीर्ण व एम. एस. सी. आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्रधारक असावा.
  • पिको फॉल शिलाई मशीन या योजणेकरिता महिला शिवणकाम करत असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असावे.
  • प्रत्येक योजनेकरिता उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र तहसिल कार्यालयाचे असावे.
  • ज्या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरीता विद्युत पुरवटा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असावे.
योजनेचे नावप्रति लाभार्थी देय अनुदानउद्दिष्ट
दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल देण्याची योजना1,20,000/- रुपये41
निराधार/निरक्षीत अतितीव्र दिव्यांगांना विनाअट निर्वाह भत्ता10,000/- रुपये250
अस्थिव्यंग व्यक्तींना स्वयंचलित तीनचाकी सायकल
(स्कुटर विथ अँडापशन) डिव्हायसेस फॉर डेली लिविंग इत्यादी.
1,00,000/- रुपये35

सर्व साधारण अटी व शर्ती:

  • ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याबाबतचे यूडीआयडी प्रमाणपत्र
  • तहसिलदार यांनी दिलेले अधिवास / रहिवासी प्रमाणपत्र
  • पूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
  • आधार कार्डची झेरॉक्स
  • घरकुलासाठी ८ अ चा उतारा
  • अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा
  • तहसिलदार यांनी दिलेले वार्षीक उत्पन्न दाखला
  • स्कुटर विथ अडप्शन चालविणेकरिता लाभार्थीकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना / स्थायी ड्रायव्हींग अर्हक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

अर्ज कोठे करावा:

अर्जदारांनी आपले अर्ज १५ जुलै २०२४ या अंतिम तारखेच्या आत संबधीत पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावे.

Telegram GroupJoin
संपर्कजिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर.
खिंवसरा सिनेमागृहासमोर,
औरंगपुरा, छ
त्रपती संभाजीनगर. ४३१००१
Email IDdswozpaurangabad1[at]gmail.com
Contact Number२३२९७१४ , २३३५५७३
Official WebsiteClick Here

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद राबवत असलेल्या काही योजना:

शिक्षण:

  • शालेय विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सायकल वितरण योजना: ८वी आणि ९वीतील मुलींना शाळेत जाण्यासाठी मदत करण्यासाठी विनामूल्य सायकल वितरित केल्या जातात.
  • कनिष्ठ महाविद्यालयात मोफत शिक्षण: गरजू विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात मोफत शिक्षण मिळण्यासाठी योजना राबवली जाते.
  • समृद्धी विद्यालय योजना: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरवण्यासाठी समृद्धी विद्यालय योजना राबवली जाते.

आरोग्य:

  • आरोग्य विमा योजना: जिल्ह्यातील गरीब नागरिकांना आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवली जाते.
  • मोफत औषध वितरण योजना: गरजू रुग्णांना मोफत औषधे पुरवण्यासाठी योजना राबवली जाते.
  • ग्रामीण भागात आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा: ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी योजना राबवल्या जातात.

कृषी:

  • शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना: शेतकऱ्यांना कर्ज पुरवून त्यांना शेतीसाठी मदत करण्यासाठी योजना राबवल्या जातात.
  • पाणीपुरवठा योजना: शेतीसाठी पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवल्या जातात.
  • शेती तंत्रज्ञान प्रशिक्षण: शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान शिकवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.
  • जलसंधारण
    • विहिरी आणि तलावांची निर्मिती आणि दुरुस्ती
    • पाणीपुरवठा योजना
    • जलसंधारण तंत्रज्ञान प्रशिक्षण
  • ग्रामीण विकास:
    • रस्ते आणि पूल बांधणी
    • ग्रामीण विद्युतीकरण
    • रोजगार निर्मिती योजना
  • सामाजिक कल्याण:
    • गरीब आणि गरजू लोकांसाठी घरे
    • वृद्ध आणि अपंगांसाठी पेंशन योजना
    • अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना

इतर योजना:

  • महिला सशक्तीकरण योजना: महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवल्या जातात.
  • युवा रोजगार योजना: बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवण्यास मदत करण्यासाठी योजना राबवल्या जातात.
  • गृहनिर्माण योजना: गरीब कुटुंबांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत पुरवण्यासाठी योजना राबवल्या जातात.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज PDF
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
Gopinath Munde Apghat Vima Yojana Form
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना
Join WhatsApp Group!