छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद 20 टक्के उपकरातून व 5 टक्के (दिव्यांग) उपकरातून सन 2024-25 या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तीक लाभ देणेकरीता ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी खालिल योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत. सदरील योजना ह्या 100 टक्के शासकीय अनुदान व लाभार्थी हिस्सा 0 टक्के या तत्वावर राबविण्यात येत आहेत.
जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाच्या किमान 20 टक्के रक्कम अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व नवबौध्दांसाठी आणि 5 टक्के दिव्यांगासाठी खर्च करणे आवश्यक आहे.

२०% उपकरणातील योजनेचे नाव | प्रति लाभार्थी देय अनुदान | उद्दिष्ट |
मागासवर्गीयांना संगणक/लॅपटॉप पुरविणे | 42,000/- रुपये | 119 |
मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरविणे | 43,070/- रुपये | 92 |
मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरविणे | 43,070/- रुपये | 92 |
मागासवर्गीयांना कडबा कुट्टी यंत्र पुरविणे | 29,000/- रुपये | 86 |
मागासवर्गीय महिलांना पिको फॉल शिलाई मशीन पुरविणे | 9,300/- रुपये | 322 |
मागासवर्गीयांना दुग्ध व्यवसायासाठी गाय/म्हैस पुरवठा करिता अर्थसहाय्य्य देणे. | 40,000/- रुपये | 125 |
मागासवर्गीयांना मिरची कांपड यंत्र (पल्वलायजर) पुरविणे | 20,000/- रुपये | 100 |
मागासवर्गीयांना शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरविणे | 25,000/- रुपये | 200 |
सर्व साधारण अटी व शर्ती:
- अर्जदार हा अनुसुचित जाती (S.C.), अनुसुचित जमाती (ST.), विमुक्त जाती व भटक्या जमाती (V.J-N. T), विशेष मागास प्रवर्ग (S.B.C.) व नवबौध्द या घटकांतीलच असावा.
- संगणक योजनेचा अर्जदार १२ वी उत्तीर्ण व एम. एस. सी. आय टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्रधारक असावा.
- पिको फॉल शिलाई मशीन या योजणेकरिता महिला शिवणकाम करत असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असावे.
- प्रत्येक योजनेकरिता उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र तहसिल कार्यालयाचे असावे.
- ज्या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरीता विद्युत पुरवटा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असावे.
योजनेचे नाव | प्रति लाभार्थी देय अनुदान | उद्दिष्ट |
दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल देण्याची योजना | 1,20,000/- रुपये | 41 |
निराधार/निरक्षीत अतितीव्र दिव्यांगांना विनाअट निर्वाह भत्ता | 10,000/- रुपये | 250 |
अस्थिव्यंग व्यक्तींना स्वयंचलित तीनचाकी सायकल (स्कुटर विथ अँडापशन) डिव्हायसेस फॉर डेली लिविंग इत्यादी. | 1,00,000/- रुपये | 35 |
सर्व साधारण अटी व शर्ती:
- ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याबाबतचे यूडीआयडी प्रमाणपत्र
- तहसिलदार यांनी दिलेले अधिवास / रहिवासी प्रमाणपत्र
- पूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
- आधार कार्डची झेरॉक्स
- घरकुलासाठी ८ अ चा उतारा
- अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा
- तहसिलदार यांनी दिलेले वार्षीक उत्पन्न दाखला
- स्कुटर विथ अडप्शन चालविणेकरिता लाभार्थीकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना / स्थायी ड्रायव्हींग अर्हक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
अर्ज कोठे करावा:
अर्जदारांनी आपले अर्ज १५ जुलै २०२४ या अंतिम तारखेच्या आत संबधीत पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावे.
Telegram Group | Join |
संपर्क | जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. खिंवसरा सिनेमागृहासमोर, औरंगपुरा, छ त्रपती संभाजीनगर. ४३१००१ |
Email ID | dswozpaurangabad1[at]gmail.com |
Contact Number | २३२९७१४ , २३३५५७३ |
Official Website | Click Here |
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद राबवत असलेल्या काही योजना:
शिक्षण:
- शालेय विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य सायकल वितरण योजना: ८वी आणि ९वीतील मुलींना शाळेत जाण्यासाठी मदत करण्यासाठी विनामूल्य सायकल वितरित केल्या जातात.
- कनिष्ठ महाविद्यालयात मोफत शिक्षण: गरजू विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात मोफत शिक्षण मिळण्यासाठी योजना राबवली जाते.
- समृद्धी विद्यालय योजना: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरवण्यासाठी समृद्धी विद्यालय योजना राबवली जाते.
आरोग्य:
- आरोग्य विमा योजना: जिल्ह्यातील गरीब नागरिकांना आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवली जाते.
- मोफत औषध वितरण योजना: गरजू रुग्णांना मोफत औषधे पुरवण्यासाठी योजना राबवली जाते.
- ग्रामीण भागात आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा: ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी योजना राबवल्या जातात.
कृषी:
- शेतकऱ्यांसाठी कर्ज योजना: शेतकऱ्यांना कर्ज पुरवून त्यांना शेतीसाठी मदत करण्यासाठी योजना राबवल्या जातात.
- पाणीपुरवठा योजना: शेतीसाठी पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवल्या जातात.
- शेती तंत्रज्ञान प्रशिक्षण: शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान शिकवण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.
- जलसंधारण
- विहिरी आणि तलावांची निर्मिती आणि दुरुस्ती
- पाणीपुरवठा योजना
- जलसंधारण तंत्रज्ञान प्रशिक्षण
- ग्रामीण विकास:
- रस्ते आणि पूल बांधणी
- ग्रामीण विद्युतीकरण
- रोजगार निर्मिती योजना
- सामाजिक कल्याण:
- गरीब आणि गरजू लोकांसाठी घरे
- वृद्ध आणि अपंगांसाठी पेंशन योजना
- अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना
इतर योजना:
- महिला सशक्तीकरण योजना: महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबवल्या जातात.
- युवा रोजगार योजना: बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवण्यास मदत करण्यासाठी योजना राबवल्या जातात.
- गृहनिर्माण योजना: गरीब कुटुंबांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत पुरवण्यासाठी योजना राबवल्या जातात.