मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहायता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक योजना आहे.
योजनेअंतर्गत राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी 10 लाख ते 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरूप वाव देणारी सर्वसमावेशक योजना सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) या केंद्र शासनाच्या स्वयंरोजगार प्रोत्साहन योजनेचे मर्यादित उद्दिष्ट, होतकरु युवक-युवतींचे स्वयंरोजगार उभारणीसाठी प्राप्त होणारे मोठया प्रमाणातील प्रस्ताव विचारात घेऊन तसेच राज्याचे नैसर्गिक साधन संपत्ती व अंगभूत क्षमता विचारात घेऊन राज्याची महत्वाकांक्षी अशी स्वतंत्र “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम” (Chief Minister Employment Generation Scheme) योजना सन 2019 या आर्थिक वर्षापासून राज्यात सुरु करण्यात आली.
या कार्यक्रमाद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात येत असून कार्यक्रम कालावधीत एकूण 1 लाख घटक स्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे.
एकूण उद्दिष्टांच्या 30 टक्के उद्दिष्ट महिला प्रवर्गासाठी व 20 टक्के उद्दिष्ट अनुसूचित जाती / जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखून ठेवण्यात येईल.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम चा मुख्य उद्देश राज्यातील युवक-युवतींना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आहे.
योजनेचे नाव | Mukhyamantri Rojgar Nirmiti Yojana |
लाभार्थी | राज्यातील युवक-युवती |
लाभ | 35 टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्य |
उद्देश्य | युवक-युवतींना स्वरोजगार सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन |
Cmegp Scheme In Marathi चे उद्दिष्ट
- राज्यातील युवक-युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी, त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून सुलभतेने स्थापित होऊन पुढील 5 वर्षात सुमारे 1 लाख सूक्ष्म, लघु उपक्रम स्थापित होणे व त्या माध्यमातून एकूण 10 लाख रोजगार संधी राज्यात उपलब्ध होणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.
- राज्यातील युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे जेणेकरून ते स्वरोजगार सुरु करू शकतील.
- राज्यातील सुशिक्षित बेरोजगार व उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या तरुणांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करता यावा या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- राज्यात रोजगाराच्या नवं-नवीन संधी उपलब्ध करून देणे आणि राज्यातील बेरोजगार कमी करणे.
- युवक-युवतींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये.
योजनेचे वैशिष्ट्य:
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) योजना ही राज्यस्तरीय योजना म्हणून तसेच कार्यक्रमा अंतर्गत (Scheme) म्हणून अंमलबजावणी करण्यात आली आहे.
- राज्यस्तरावर उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, मुंबई हे योजनेचे प्रमुख अंमलबजावणी संस्था म्हणून कार्यवाही करतात.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना महाराष्ट्र राज्यातील लघु ग्रामोद्योग भवन यांच्यामार्फत राबविण्यात येते.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदान राशी लाभार्थी युवक-युवतींच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
- राज्यातील युवक-युवतींना आत्मनिर्भर बनविणारा एक महत्वपूर्ण कार्यक्रम आहे.
- या योजनेअंतर्गत महिलांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे व महिलांसाठी या योजनेत 30 टक्के आरक्षित देण्यात आले आहे.
cmegp maharashtra udyog list:
- हाताने बनविलेले चॉकलेट
- टॉफी आणि साखर मिठाई बनवित आहे
- थ्रेड बॉल आणि वूलन बॉलिंग लॅचि बनविणे
- फॅब्रिक्स उत्पादन
- लॉन्ड्री
- कुकीज आणि बिस्किटे बनविणे
- बारबर
- साबण, तेल इत्यादी म्हणून हर्बल वस्तू बनविणे
- कॅन केलेला लोणी, तूप आणि चीज बनविणे आणि शिजविणे
- प्लंबिंग
- डिझेल इंजिन पंप्स दुरुस्ती
- स्प्रेयर्ससाठी टायर व्हॅलसीनीझिंग युनिट ऍग्रीकल्चर सर्व्हिसेस
- बॅटरी चार्जिंग
- आर्ट बोर्ड पेन्टिंग/स्प्रे पेन्टिंग
- मेणबत्त्या आणि धूप काठी बनविणे
- सोडा आणि विविध स्वादयुक्त पेय तयार करणे
- सायकल दुरुस्तीची दुकाने
- बॅन्ड पथक
- मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती
- इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती
- ऑफिस प्रिंटिंग आणि बुक बायनडिंग
- काटेरी तारांचे उत्पादन
- इमिटेशन ज्वेलरी (बांगड्या) उत्पादन
- स्कू उत्पादन
- ENGG
- वर्कशॉप
- स्टोरेज बॅटरी उत्पादन
- जर्मन भांडी उत्पादन
- रेडिओ उत्पादन
- व्होल्टेज स्टॅबिलिझरचे उत्पादन
- कोरीव वूड आणि आर्टस्टिक फर्निचर बनविणे
- ट्रंक आणि पेटी उत्पादन
- ट्रान्सफॉर्म मोटार पंप/जनरेटर उत्पादन
- कॉम्प्यूटर असेंम्बली, वेल्डिंग वर्क
- वजन काटा उत्पादन
- सिमेंट प्रॉडक्ट
- विविध भौतिक हाताळणी उपकरणे तयार करणे
- मशीनरीचे सुटे भाग उत्पादन
- मिक्सर ग्रिडर आणि इतर घरगुती वस्तू बनविणे
- प्रिंटिंग प्रेस/स्क्रीन प्रिंटिंग
- बॅग उत्पादन
- मंडप डेकोरेशन
- गादी कारखाना
- कॉटन टेक्सटाईल फॅब्रिक्समध्ये स्क्रीन प्रिंटिंग
- झेरॉक्स सेंटर
- चहा स्टॉल
- मिठाईचे उत्पादन
- होजीअरी उत्पादन
- रेडीमेड गारमेंट्सचे टेलरिंग /उत्पादन
- खेळणी आणि बाहुली बनविणे
- फोटोग्राफी
- डिझेल इंजिन पंप संचाची दुरुस्ती
- फळांचा लगदा काढणे व विक्री करणे
- मोटार रिविंडिंग
- वायर नेट बनविणे
- हाऊसहोल्ड एल्युमिनियम युटेंसिल्सचे मॅन्युफॅक्चर
- पेपर पिन उत्पादन
- सजावटीच्या बल्बांचे उत्पादन
- हर्बल सुंदर पार्लर/आयुर्वेदिक हार्बल उत्पादने
- केबल टीव्ही नेटवर्क। संगणक केंद्र
- पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा रुरल ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस
- सिल्क साड्यांचे उत्पादन
- रसवंती
- मॅट बनविणे
- फायबर आयटम उत्पादन
- पिठाची गिरणी
- कप बनविणे
- वूड वर्क
- स्टील ग्रिलचे मॅन्युफॅक्चर
- जिम सर्विसेस
- आयुर्वेदिक औषध उत्पादन
- फोटो फ्रेम
- पेप्सी युनिट/कोल्ड/सॉफ्ट ड्रिंक
- खवा व चक्का युनिट
- घराचा वापर कूलर बनवा
- गुळ तयार करणे
- फळ आणि व्हिजिटेबल प्रक्रिया
- घाणी तेल उद्योग
- कॅटल फीड
- फॅन्सी ज्वेलरी बनविणे
- डिस्पोजेबल कप-प्लेट बनविणे
- दाळ मिल
- क्लाऊड किचन – स्विगी / झोमाटो येथे अन्न विक्री
- राईस मिल
- कॅन्डल उत्पादन
- तेल उत्पादन
- शैम्पू उत्पादन
- केसांच्या तेलाची निर्मिती
- पापड मसाला उदयोग
- बर्फ उत्पादन
- बेकरी प्रॉडक्ट्स
- पोहा उत्पादन
- बेदाना/मनुका उद्योग
- सोन्याचे दागिने उत्पादन (ज्वेलरी वर्क)
- भांडींसारख्या अॅल्युमिनियम वस्तू बनवित आहेत
- हॉस्पिटलमध्ये वापरलेला स्ट्रेचर बनविणे
- सद्य मोजमाप वर मीटर किंवा व्होल्ट मीटर बनवा
- कार हेडलाइट
- कपड्यांची पिशवी
- पर्स आणि हँडबॅग बनविणे
- मसाले
- काटेरी तार बनवणे (कुंपण)
- बास्केट बनविणे
- चामड्याचा पट्टा
- शू पॉलिश पॉलिश
- कपडा बॉक्स
- प्लेट आणि वाटी तयार करणे
- स्वीप
- पारंपारिक औषधे बनविणे
- कागदी पिशव्या आणि लिफाफे तयार करणे
- साइन बोर्ड
- सर्व प्रकारचे सुती डस्टर
- कागदी पिशव्या, लिफाफे, आइस्क्रीम कप,
- रुग्णवाहिका स्ट्रेचर बनविणे (रूग्णांना रुग्णवाहिकेत बसवण्यासाठी वापरले जाते)
- विद्युत मीटर अर्थात वोल्ट मीटर बनविणे
- सुतार काम
- 1200 मिमी पर्यंत आरसीसी पाईप बनविणे
- आरसीसी दरवाजे खिडक्या बनविणे
- चिनी मातीची भांडी
- सर्व प्रकारचे वॉटर प्रूफ कव्हर
- पॅकिंग बॉक्स बनविणे
- मधुमक्षिका पालन
- कुकुट पालन
- चांदीचे काम,
- स्टोन क्रशर व्यापार,
- स्टोन कटिंग पॉलिशिंग,
- मिरची कांडप
प्रकल्प किंमत:
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा मध्ये पात्र उद्योग / व्यवसायांतर्गत प्रकल्प किंमत कमाल मर्यादा सेवा उद्योग तसेच कृषी पूरक उद्योग / व्यवसायांसाठी 10 लाख रुपये व उत्पादन प्रकाराच्या प्रवर्गातील प्रकल्पासाठी प्रकल्प किंमत मर्यादा रुपये 50 लाख रुपये राहील.
प्रकल्प खर्चाचे वर्गीकरण:
घटकाचा प्रवर्ग / प्रभाग | घटकाची स्वागुंतवणूक | घटकाचा प्रवर्ग / प्रभाग घटकाची स्वागुंतवणूक | बँक कर्ज | ||
घटकाचा प्रभाग | शहरी | ग्रामीण | शहरी | ग्रामीण | |
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक, तर मागास प्रवर्ग, विमुक्त व हलक्या जमातीचे, अल्पांसंख्याक | 5% | 25% | 35% | 70% | 60% |
उर्वरित प्रवर्ग | 10% | 15% | 25% | 75% | 65% |
अनुदान (मार्जिन मनी) व घटकांचे स्वगुंतवणूकीचे प्रमाण खालीलप्रमाणे राहील:
सेवा उद्योग व कृषी पूरक उपक्रमांसाठी व उत्पादन प्रकारातील उपक्रमांसाठी प्रकल्प किंमतीअंतर्गत इमारत खर्च 20 टक्के च्या मर्यादेत असेल तसेच खेळते भांडवल प्रकल्प खर्चाच्या 30 टक्के मर्यादेत असेल.
नोडल संस्था (प्रमुख अंमलबजावणी संस्था)
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंमलबजावणीसाठी प्रमुख अंमलबजावणी संस्था (नोडल संस्था) म्हणून उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय, मुंबई असेल.
कार्यक्रम अंमलबजावणी संस्था
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कार्यक्रम अंमलबजावणी संस्था उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालयाच्या अंतर्गत कार्यरत जिल्हा उद्योग केंद्र तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळ यांचे अंतर्गत कार्यरत जिल्हा खादी व ग्रामाद्योग कार्यालय कार्यक्रम अंमलबजावणी संस्था म्हणून कामकाज करतील.
- ग्रामीण भागासाठी (20000 लोकसंख्याच्या आतील क्षेत्रासाठी / गावासाठी) खादी ग्रामोद्योग मंडळ व उर्वरित भागासाठी जिल्हा उद्योग केंद्र हे कार्यक्रम अंमलबजावणी संस्था म्हणून कामकाज करतील.
सहयोगी संस्था
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत बँका, नोडल बँक, उद्योजकीय प्रशिक्षण संस्था, ऑनलाईन प्रक्रियेसाठी सहाय्यभूत संस्था, अंमलबजावणी संस्था, केंद्र शासनाच्या संस्था यांचे सहाय्य घेण्यात येईल.
योजनेअंतर्गत विविध संस्थांचा तपशील व कामकाज पुढीलप्रमाणे असेल:
- वित्तीय संस्था (बँक) :- “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यबल समितीच्या मंजुरीने संबंधित बँकाकडे कर्ज मंजुरीसाठी शिफारस करण्यात येतील. सरकारी बँका, तसेच खाजगी क्षेत्रातील शेडयुलड बँका- येस बँक, एचडीफसी बँक, आयसीआयसीआय बँक इ. प्रमुख बँका सहयोगी संस्था म्हणून कार्यरत राहतील. सदर बँकामार्फत जिल्हा कार्यबल समितीकडून शिफारस करण्यात आलेल्या कर्ज प्रस्तावांवर कार्यक्रमाचे निकष विचारात घेऊन कर्ज मंजूरीबाबत निर्णय घेण्यात येईल. कर्ज मंजूरी अंती निश्चित केलेल्या प्रकल्प किंमतीच्या अनुषंगाने कार्यक्रमातील तरतूदीप्रमाणे राज्य शासनाचे अनुदान (मार्जिन मनी) दावे (क्लेम) संबंधित बँक शाखा सादर करेल. सादर क्लेमची आवश्यक छाननी करुन उद्योग संचालनालया अंतर्गत विशेष CMEGP कक्षामार्फत राज्य शासनाचे अनुदान संबंधित बँक शाखेस नोडल बँकेच्या द्वारे जमा होईल.
- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) :- “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची” सुलभ अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने कर्ज प्रस्तावापासून अनुदान वितरणापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. यासाठी उद्योग संचालनालयाच्या सनियंत्रणाखाली महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) या संस्थेच्या सहयोगातून उद्योग संचालनालयांतर्गत विशेष आयटी व समन्वय कक्ष स्थापन करण्यात येईल. सदर कक्षामार्फत या कार्यक्रमाच्या पोर्टलचे निर्माण, देखरेख व दुरुस्ती, डेटा बेस व MIS सादरीकरण, मार्जिन मनी दावे व तत्संबंधी ताळमेळ, राज्यातील सर्व बँक शाखा व नोडल बँक, अंमलबजावणी संस्था यांच्यामध्ये समन्वय, वेळोवेळी प्रगती अहवाल व आढावा संनियंत्रण समितींना सादर करणे इ. कामकाज करेल. सदर कक्षासाठीचा खर्च योजने अंतर्गत उपलब्ध तरतुदीच्या अंतर्गत प्रशासकीय कारणासाठी राखून ठेवण्यात येणा-या (एकूण तरतुदीच्या २% प्रमाणे) तरतुदीतून अदा करण्यात येईल.
- खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) :- “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या धर्तीवर अंमलात येत असल्याने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमासाठी नोडल संस्था म्हणून यशस्वीपणे कामकाज करणारी केंद्र शासनाच्या अखत्यारितील कार्यरत खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) या संस्थेचे ऑनलाईन प्रक्रिया, पोर्टल व प्रशासकीय कामकाजातील अनुभव विचारात घेऊन व्हीआयसी संस्था ही CMEGP योजनेसाठी मार्गदर्शक संस्था म्हणून सहयोग देईल.
- नोडल बँक (Nodal Bank):- “प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) * अंतर्गत Nodal Bank म्हणून कार्यरत असलेली कार्पोरेशन बँक ही “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) * अंतर्गत राज्याची मुख्य समन्वयक बँक (नोडल बँक) म्हणून कामकाज करेल.
- प्रशिक्षण संस्था :- “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या उत्कृष्ट उपलब्धीसाठी कर्ज मंजूर झालेल्या उमेदवारांसाठी निवासी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राज्यात उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम देणाऱ्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, अथवा राज्यातील नामवंत संस्थाच्या सहयोगाने आयोजित करण्यात येईल. सदर प्रशिक्षण उत्पादन प्रवर्गातील उद्योग घटकांसाठी दोन आठवडे मुदतीचे व सेवा व कृषी पूरक उद्योगांसाठी 1 आठवडे मुदतीचे असेल.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना अंतर्गत निवासी उद्योजकता प्रशिक्षण:
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या अंतर्गत उत्कृष्ट उपलब्धी होणेच्या दृष्टीने कर्ज प्रस्ताव मंजूर झालेल्या प्रकरणामध्ये लाभार्थीचे दोन आठवडे कालावधीचे निवासी उद्योजकीय प्रशिक्षण अनिवार्य असून यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अर्जदारांनाच कर्ज वितरण अनुदान सहाय्य वितरणासाठी पात्र ठरविण्यांत येईल.सदर प्रशिक्षणासाठीचा खर्च CMEGP योजनेसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या तरतुदीतून करण्यात येईल. एकूण तरतुदीच्या 5% इतकी रक्कम प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राखून ठेवण्यात येईल. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी उद्योजकीय प्रशिक्षणात कार्यरत असणाऱ्या राज्य पुरस्कृत संस्था – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, तसेच राज्य स्तरीय संनियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या, राज्यातील इतर नामवंत संस्था मार्फत आयोजित करण्यात येईल.
मुख्यमंत्री रोजगार योजना अंतर्गत पात्र घटक:
कायदेशीररित्या पात्र असणारे उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय, एकाच नाममुद्रेवर (ब्रॅण्ड आधारित संघटित साखळी विक्री केंद्रे, फिरते विक्री केंद्र /खादयान्न केंद्र इत्यादी घटक कार्यक्रमातंर्गत पात्र असतील. व या विषयी गठीत राज्यस्तरीय संनियंत्रण समिती आवश्यकते नुसार पात्र व अपात्र घटकांची यादी (Negative list) जाहीर करेल.
योजनेचे लाभार्थी:
- व्यक्तिगत उद्योजक
- संस्था
- सहकारी संस्था
- स्वयं सहायता गट
- ट्रस्ट
योजनेचा फायदा:
- स्वतःचा उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींना 10 लाख ते 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- युवक-युवती स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी पैशांसाठी आत्मनिर्भर बनतील व त्यामुळे त्यांना पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे कर्ज घेण्याची गरज देखील भासणार नाही.
- राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील व त्यामुळे राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
- या योजनेमुळे राज्याचा औद्योगिक विकास होईल.
- राज्यातील युवकांचे जीवनमान सुधारेल व त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
- या योजनेअंतर्गत महिलांना देखील स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
लाभार्थी पात्रता:
- अर्जदार युवक-युवती महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण आहे ते या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत
शैक्षणिक पात्रता:
- 10 लाखावरील प्रकल्पासाठी किमान 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- 25 लाखावरील प्रकल्पासाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील युवक-युवतींना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत लाभार्थ्याला फक्त महाराष्ट्र राज्यात स्वरोजगार सुरु करणे बंधनकारक आहे. तसेच लाभार्थ्याला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर उद्योग सुरु करता येणार नाही.
- योजनेअंतर्गत अधिकतम मर्यादा 45 वर्षे निर्धारित केली गेली आहे. (अनुसूचित जाती / जमाती / महिला /अपंग/माजी सैनिक यांच्यासाठी 5 वर्षे शिथिल)
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस कार्यक्रमाचा लाभ घेता येईल. कुटुंबाची व्याख्या ही पती, पत्नी अशी असेल.
- अर्जदार व्यक्तीने प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) अथवा तत्सम केंद्र अथवा राज्य शासनाच्या अन्य विभागाकडील/महामंडळाकडील अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा किंवा लाभ घेत असता कामा नये.
- अर्जदार एखाद्या बँकेचा थकबाकीदार असता कामा नये.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- डोमिसाईल प्रमाणपत्र
- पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- अपंग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- जातीचा दाखला
- बँकेचे पासबुक
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- अर्जदाराने REDP / EDP / SDP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्र
- अर्जदार जो व्यवसाय सुरु करणार आहे त्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
- हमीपत्र
- शपथपत्र / प्रतिज्ञापत्र
अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम च्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर व्यक्तीसाठी ऑनलाईन अर्ज वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम online form page उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती (वैयक्तिक माहिती, प्रकल्प खर्च, पसंतीची बँक, पर्यायी बँक, संदर्भ दस्तऐवज, दस्तऐवज तपशील) भरून सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील व सर्व माहिती भरून झाल्यावर जतन करा बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
लॉगिन करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर गेल्यावर नोंदणीकृत अर्जदारासाठी लॉगिन फॉर्म वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला वापरकर्त्याचे नाव, पासवर्ड व कॅप्टचा कोड टाकून लॉगिन करा बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.
अर्जाची स्थिती जाणून घेण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर गेल्यावर नोंदणीकृत अर्जदारासाठी लॉगिन फॉर्म वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला वापरकर्त्याचे नाव, पासवर्ड व कॅप्टचा कोड टाकून लॉगिन करा बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्जाची स्थिती पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल.
बँक लॉगिन करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर बँक लॉगिन वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला नोडल बँक लॉगिन, अधिकृत SLBC लॉगिन, बँक कंट्रोलिंग लॉगिन, अधिकृत LDM लॉगिन, शाखा लॉगिन यांपैकी योग्य पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर लॉगिन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा Username password Captcha code टाकून लॉगिन बटन वर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र अंतर्गत बँक लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Channel | Join |
CMEGP Scheme Online Application | Click Here |
Mukhyamantri Rojgar Yojana Contact Details | Click Here |
CMEGP Helpline Number Maharashtra | 18602332028 |
CMEGP योजना Email ID | maha[Dot]cmegp[At]gmail[Dot]com |
CMEGP Scheme PDF | Click Here |
CMEGP Maharashtra Udyog List PDF | Click Here |
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम PDF | Click Here |
cmegp business list in marathi pdf | Click Here |
cmegp gr | Click Here |
cmegp maharashtra gr | Click Here |
cmegp scheme in marathi pdf | Click Here |
cmegp scheme list | Click Here |
योजनेचे काही महत्वाचे मुद्दे:
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत लाभार्थी विविध प्रकारचे उद्योग सुरू करू शकतात, जसे की उत्पादन, सेवा, कृषी प्रक्रिया, हस्तकला, पर्यटन इत्यादी.
- लाभार्थ्यांना बँक कर्जावर 25% ते 35% सवलत मिळते.
- कर्जाची परतफेड 3 ते 7 वर्षांच्या कालावधीत करावी लागेल.
- अनुसूचित जाती/जमाती, विमुक्त जाती आणि इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांसाठी सवलत आहे.
- महिला उद्योजकांसाठी 30% आरक्षण आहे.
- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत अनेक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात.
यशस्वी उद्योजक कसे व्हावे:
- जो व्यवसाय सुरु करणार आहेत त्याची चांगली योजना तयार करा.
- तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक बाजारपेठेचा अभ्यास करा.
- कुशल व्यवस्थापन कौशल्ये विकसित करा.
- तुमच्या ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण करा.
- कठोर परिश्रम करा.