मुख्यमंत्री सहायता निधी महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्वाची अशी योजना आहे.
पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत तातडीने अर्थसहाय्य पुरविले जाते. तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्लभ आजारांवर उपचार करण्यासाठी देखील या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते.
आजारपणात वैद्यकीय खर्च न परवडणाऱ्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी दिला जाणार आहे. विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना टवर्ती आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.
मुख्यमंत्री सहायता निधी मिळण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया हि अत्यंत किचकट आणि वेळ काढूपणा होती. त्यामुळे रुग्णांना वेळेवर आर्थिक सहाय्य उपलब्ध होत नव्हते व त्यामुळे अनेक गरजू नागरिक या निधीपासून वंचित राहत होते त्यामुळे रुग्णांना होणाऱ्या या सर्व समस्यांचा विचार करून त्यांना वेळेवर अर्थसहाय्य मिळावे यासाठी शासनाने याचा तोडगा काढला आहे. यासाठी शासनाने 8650567567 हा नंबर सुरु केला आहे ज्यावर आता फक्त एका मिस कॉल दिल्यावर तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागांसह राज्यातील इतर कानाकोपऱ्यांतून या सहायता निधीसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. तसेच, अर्ज करण्याची किचकट प्रक्रिया अत्यंत सुलभ होणार आहे.
या क्रमांकावर मिसकॉल देताच मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाईलवर उपब्लध करून दिला जाणार आहे.
राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना त्यांच्या आजाराच्या उपचारासाठी निधीमधून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेचे नाव | Mukhyamantri Sahayata Nidhi |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | आरोग्य विभाग |
लाभार्थी | राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे |
लाभ | औषोपचारासाठी 2 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य |
उद्देश्य | मोफत वैद्यकीय उपचार मिळवून देणे. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन |
मुख्यमंत्री सहायता निधी महाराष्ट्र चे उद्दिष्ट
- राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे.
- जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे आणि/ किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- रुग्णांना उपचार आणि / किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- अपघाती मरण पावलेल्या (मोटार / रेल्वे / विमान / जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
- शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत: आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
योजनेअंतर्गत समाविष्ट आजार:
- कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्षं 02 ते 06)
- हृदय प्रत्यारोपण
- यकृत प्रत्यारोपण
- किडणी प्रत्यारोपण
- फुफ्फुस प्रत्यारोपण
- बोन मॅरो प्रत्यारोपण
- हाताचे प्रत्यारोपण
- हिप रिप्लेसमेंट
- कर्करोग शस्त्रक्रिया
- अपघात शस्त्रक्रिया
- लहान बालकांचे शस्त्रक्रिया
- मेंदूचे आजार
- हृदयरोग
- डायलिसिस
- कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन)
- अपघात
- नवजात शिशुंचे आजार
- गुडघ्याचे प्रत्यारोपण
- बर्न रुग्ण
- विद्युत अपघात रुग्ण
योजनेअंतर्गत महत्वाच्या बाबी:
- रुग्णालयांची यादी मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
- अर्थसहाय्याची मागणी ई मेल द्वारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात पाठवून त्याच्या मूळ प्रति मुख्यमंत्री सहायता निधी कडे तापालाद्वारे तात्काळ पाठवावेत.
- रुग्ण महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना/आयुष्यामान भारत/राष्ट्रीय बालक स्वास्थ कार्यक्रम/धर्मदाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही एका योजनेत लाभ घेण्यास पात्र नसल्यास अशा रुगांना मुख्यमंत्री सहायता निधी मधून लाभ दिला जाईल.
योजनेअंतर्गत अर्थसहाय्य:
- मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार 25 हजार रुपये, 50 हजार रुपये, 1 लाख रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाखांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते.
योजनेअंतर्गत उपचाराकरिता देण्यात येणारे आर्थिक सहाय्य:
अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांकरिता येणाऱ्या खर्चासाठी मा. मुख्यमंत्री यांच्या कार्यालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षा मार्फत रुग्णांना आर्थिक मदत करण्यात येते. मुख्यमंत्री सचिवालयात यासंदर्भात मदत मिळण्यासाठी असंख्य अर्ज प्राप्त होतात. तथापि, या आजारांव्यतिरिक्तही जीवितास धोका असलेले आजार गंभीर अपघातातील अनेक रूग्ण असतात. या अनुषंगाने, राज्यातील अशा रूग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागू नये म्हणून उपचाराकरिता त्यांना तात्काळ सहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
खालीलप्रमाणे नमूद केलेल्या अर्जाकरिता पात्र ठरणाऱ्या नागरिकांना मदत करण्यात येईल.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे मिळण्यास पात्र व्यक्ती
मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रामुख्याने नैसर्गिक आपत्ती जसे पूर, चक्रीवादळ व भूकंप इत्यादी आणि मोठा अपघात आणि दंगली या वेळी बाधित झालेल्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून वापरण्यात येते . या व्यतिरिक्त , मुख्यमंत्री सहाय्यता निधी सरकारी इस्पितळांचे प्राधिकृत येथे मुख्य रोग उपचार साठी अत्यंत गरिब रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध आहे.
योजनेअंतर्गत कोणाला आर्थिक लाभ दिला जाणार नाही:
- मोटार, रेल्वे, विमान, जहाज अपघातात मरण पावलेल्यांना या मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून कुठल्याही स्वरूपाचा लाभ दिला जाणार नाही.
मुख्यमंत्री सहायता निधी माहिती:
विविध आपत्तीतील आपद्ग्रस्तांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याचा प्रमुख उद्देश असला तरी, नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त खालील विविध बाबींकरीता निधीचा विनियोग करण्यात येत असतो.
- नैसर्गिक आपत्ती (अतिवृष्टी, पूर व भूकंप इत्यादी)
नैसर्गिक आपत्ती प्रकरणी अर्थसहाय्य निकष
राज्यात तसेच देशात खालील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधीत झालेल्या नागरीकांच्या पूर्नवसनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाकरीता मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्यात येते.
- ढगफूटीमुळे उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती
- पूर परिस्थिती
- त्सुनामी भूकंप
- चक्रीवादळामुळे उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती
- अतिवृष्टी व पुरामुळे उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती
- तीव्र दुष्काळामुळे उद्भवलेली नैसर्गिक आपत्ती
- ढग स्फोट आणि भूस्खलनामुळे आलेला पूर
जातीय दंगल व बॉम्बस्फोट इत्यादी आपत्तीमध्ये शासनाच्या योजनेतून नियमानुसार देण्यात आलेल्या मदती व्यतिरिक्त अशा प्रकरणी मा. मुख्यमंत्री महोदंयानी अर्थसहाय्याची अनुकुलता दर्शविली असेल तर, आपदग्रस्तांना मदत होण्यासाठी संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणे
अपघातामुळे कुटुंबातील कर्ती व्यक्ती मृत पावल्यास
2. अपघातामुळे कुटुंबातील कर्ती व्यक्ती मृत पावल्यास
- अशा कुटुंबाचे पुनर्वसन होण्यासाठी मानवतावादी दृष्टीकोनातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्याचा विचार करण्यात येतो
- ज्यांना कोणत्याही प्रकारे विमा संरक्षण नाही तसेच शासनाकडून किंवा शासनाच्या अन्य योजनामधून आर्थिक मदत मिळालेली नाही अशा व्यक्तींना या निधीमधून आर्थिक सहाय्य दिले जाते.
- अशा प्रकरणांमध्ये संबंधीत जिल्हाधिकारी यांचेकडून त्यांच्या शिफारसीसह सविस्तर अहवाल व सोबत खालील नमूद कागदपत्रे आवश्यक असतात.
2. वित्तमालाचे नुकसान झाल्यास अर्थसहाय्य देण्यात येते
पंचनाम्यानुसार नुकसानीचे प्रमाण | मंजूर अर्थसहाय्य |
25,000/- रुपये पर्यंत | 3,000/- रुपये |
25,001/- रुपये ते 49,999/- रुपये पर्यंत | 5,000/- रुपये |
50,000/- रुपये ते 99,999/- रुपये पर्यंत | 10,000/- रुपये |
1,00,000/- रुपये ते 1,49,999/- रुपये पर्यत | 15,000/- रुपये |
1,50,000/- रुपये व त्यापेक्षा जास्त | 20,000/- रुपये |
- अशा प्रकरणामध्ये अर्थसहाय्य मंजूरीच्या रकमेमध्ये वाढ व घट करण्याचे सर्व अधिकार मा. मुख्यमंत्री महोदयांना आहेत.
- अशा प्रकरणामध्ये अर्थसहाय्य मंजूर करण्यापूर्वी संबंधीत जिल्हाधिकारी यांचेकडून पुढील कागदपत्रांची पूर्तत करुन घेण्यात येते.
- जिल्हाधिकारी यांचा स्वयंस्पष्ट अहवाल.
- नुकसानीचा पंचनामा (महसूल अधिकारी यांनी सांक्षाकित केलेला)
- बाधीत व्यक्तीचा आर्थिक स्थितीचा तपशील.
रुग्णालयास वैद्यकीय शस्त्रक्रिया / उपचार घेणाऱ्या आर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या रुग्णांना दिले जाणारे अर्थसहाय्य खालीलप्रमाणे आहे
अंदाजित खर्च | अर्थसहाय्य |
20,000/- रुपये पर्यंत | 10,000/- रुपये |
20,001/- रुपये ते 49,999/- रुपये पर्यंत | 15,000/- रुपये |
50,000/- रुपये ते 99,999/- रुपये पर्यंत | 20,000/- रुपये |
1,00,000/- रुपये ते 2,99,999/- रुपये पर्यंत | 30,000/- रुपये |
3,00,000/- रुपये ते रु.4,99,999/- रुपये पर्यंत | 40,000/- रुपये |
5,00,000/- रुपये व त्यापेक्षा जास्त | 50,000/- रुपये |
योजनेचा फायदा:
- मुख्यमंत्री सहायता निधी च्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या आजाराच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.
- नागरिकांना त्यांच्या उपचारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाहीत तसेच कोणाकडून पैसे कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.
- राज्यातील तथा देशातील नैसर्गिक आपत्तीतील आपग्रस्तांकरिता (शासकीय मदत ज्या आपत्तीत दिली जाते त्या आपत्ती वगळून) निकर्षाचे अधीन राहून आर्थिक आणि अन्य स्वरुपात मदत दिली जाते.
- जातीय दंगलीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना, जखमी झालेल्या व्यक्तींना आणि मालमत्तेचे नुकसान झालेल्या व्यक्तींना निकषाचे अधीन राहून आर्थिक व अन्य स्वरुपातील मदत दिली जाते.
- नक्षलवाद्याच्या हल्ल्यात हत्त्या झालेल्या व्यक्तींचे वारसांना व जखमी झालेल्या व्यक्तींना निकषाचे अधीन राहून आर्थिक वा अन्य स्वरुपातील मदत दिली जाते.
- ह्दयविकार, किडणी, मूत्रपिंडरोपण, मेंदू व कर्करोग इत्यादी गंभीर स्वरुपाच्या विकारगस्त रुग्णांना शस्त्रक्रिया/ उपचाराकरिता अंशत: अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
- अपघाती घटनांतील मृत व्यक्तींचे वारसांना व जखमी व्यक्तींना ((मोटार / रेल्वे / विमान / बोट अपघात वगळून)) निकषाचे अधीन राहून अर्थसहाय्य केले जाते.
- अपंगाच्या संस्थाना संस्थात्मक मदत दिली जाते.
- शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक स्वरुपाची संम्मेलने/परिषदा/चर्चासत्रे यांच्या आयोजनाकरिता संस्थात्मक स्वरुपाची देणगी दिली जाते.
- शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांच्या इमारतीचे बांधकामाकरिता अंशात्मक आर्थिक सहाय्य केले जाते.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:
- अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच मुख्यमंत्री सहायता निधी मधून आर्थिक सहाय्य दिले जाईल.
- राज्याबाहेरील रुग्णालयांवर महाराष्ट्र शासनाचे यंत्रणांचे नियंत्रण नसते. तसेच त्यांचेकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेरील रुग्णांलयाना या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य दिले जाणार नाही.
- डिस्चार्ज झालेल्या/उपचार पूर्ण झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती म्हणून अर्थसहाय्य दिले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज करण्यापूर्वी खालील शासकीय योजनांसाठी पात्र असल्यास लाभ घ्यावा.
- रुग्ण महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना/आयुष्यामान भारत/राष्ट्रीय बालक स्वास्थ कार्यक्रम/धर्मदाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही एका योजनेत लाभार्थी असल्यास अर्ज स्विकारण्यात येणार नाही.
- अर्जात दर्शविलेल्या माहितीशी संबंधीत कागदपत्रे / प्रमाणपत्रे अर्जदाराने स्व साक्षांकित (Self- Attested) करुन सोबत जोडणे अनिवार्य आहे.
- संशयास्पद अथवा खोटी / बनावट माहिती दिलेली आढळल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल तसेच कायदेशीर पोलीस कारवाई पात्र ठरेल.
- रुगणांनी अर्जात त्यांना झालेल्या आजाराची संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:
- विहित नमुन्यातील अर्ज
- रुग्णाचे आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक
- रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
- निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
- तहसिलदार यांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला (कुटुंबाचे सर्व स्रोतांचे मिळून मागिल आर्थिक वर्षाचे उत्पन्न 1.60 लाखापेक्षा कमी असलेबाबत)
- संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
- अपघात असल्यास, FIR किंवा MLC असणे आवश्यक आहे..
- प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC / शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
- ई-मेल आयडी
- मा. आमदार/खासदारांचे शिफारस पत्र
- मोबाईल नंबर
- संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे)
रुग्णालयास प्रदानाबाबत आवश्यक माहिती
- रुग्णालयाचे ज्या बॅकेत खाते आहे त्या बँकेचे नांव व शाखा व बँक खाते क्रमांक
- रुग्णालयाचे खाते ज्या नावाने आहे ते नांव
- आय एफ एस सी (IFSC) कोड नंबर
- रुग्णालयाचा ई-मेल
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महत्वपूर्ण सूचना
- रुग्ण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना / आयुष्यामान भारत / राष्ट्रीय बालक स्वास्थ्य कार्यक्रम/ धर्मदाय रुग्णालय इत्यादी कोणत्याही एका योजनेत लाभार्थी असल्यास अर्ज स्विकारण्यात येणार नाही.
- अर्जात दर्शविलेली माहितीशी संबंधित कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अर्जदाराने स्व साक्षांकित (Self Attest) करून सोबत जोडणे अनिवार्य आहे.
- संशयास्पद अथवा खोटी/बनावट माहिती दिलेली आढळल्यास तो अर्ज रद्द करण्यात येईल तसेच कायदेशीर कार्यवाहीस पात्र ठरेल.
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर फॉर्म मिळवण्यासाठी इथे क्लिक करा वर क्लिक करावे लागेल. [मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कागदपत्रे]
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यकता कागदपत्रे अपलोड करावी लागतील व Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
किंवा
अर्जदाराला अर्थसहाय्याची मागणी ई-मेलव्दारे देखील करता येईल व अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात पाठवून त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे टपालाव्दारे तात्काळ पाठवाव्यात.
CMRF Maharashtra Application Status
- अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर खाली अर्जाच्या सद्यस्थिती बाबत विचारणा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्जाचा संदर्भ क्रमांक, भ्रमणध्वनी, कॅप्टचा कोड टाकून दाखल करा बटनावर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्या स्क्रीनवर तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष
- अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर संपर्क पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला आपले संपूर्ण नाव, आपला इमेल, आपला मोबाईल क्रमांक, आपले प्रश्न टाकून स्वीकृत करा वर क्लिक करावे लागेल.
Telegram Group | Click Here |
मुख्यमंत्री सहायता निधी योजना अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा किंवा येथे क्लिक करा |
मुख्यमंत्री सहायता निधी हेल्पलाईन नंबर | 022-22026948 |
मुख्यमंत्री सहायता निधी टोल फ्री नंबर | 8650567567 |
Mukhyamantri Sahayata Nidhi Email Id | aao[Dot]cmrf-mh[At]gov[Dot]in |
Mukhyamantri Sahayata Nidhi Hospital List | येथे क्लिक करा |
मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज | येथे क्लिक करा |
संपर्क | मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री कार्यालय, 7 वा मजला, मंत्रालय मुख्य इमारत, मुंबई-400 032 |