डिझेल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र 2024

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे त्यामुळे महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व्हावा तसेच शेती क्षेत्राला चालना मिळावी यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात देखील करत असते आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना शेत पिकांच्या सिंचनासाठी उपयुक्त अशा डिझेल पंपाची खरेदी करण्यासाठी अनुदान देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव डिझेल पंप सब्सिडी योजना महाराष्ट्र आहे.

डिझेल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या सिंचनासाठी डिझेल पंपाच्या खरेदीसाठी 50% अनुदान देण्यात येते.

महाराष्ट्र हे कृषिप्रधान राज्य आहे आणि येतील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय आहे त्यामुळे राज्यातील बहुतांश शेतकरी पिकांच्या सिंचनासाठी विद्युत पंपाचा वापर करतात परंतु दिवसा केल्या जाणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना पिकांचे सिंचन करता येत नाही तसेच शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी रात्री वीज उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री काळोखातून शेतात जावे लागते व काळोखाचा फायदा घेऊन दबा धरून बसलेले रानटी जनावरे शेतकऱ्यांवर हल्ला करतात व त्यांना जखमी करतात तसेच रात्री शेतातातील  विंचू, साप यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या दंशाचा सुद्धा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. परिणामी जंगली प्राण्यांच्या हल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू देखील होतो तसेच पावसाळ्यात विद्युत रोहित्रांवर झाड पडून तसेच एखाद्या तांत्रिक बिघाडामुळे ३ ते ४ दिवस विजेचा पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना ३ ते ४ दिवस पिकांना पाणी देता येत नाही व पाण्याअभावी हाथा तोंडाशी आलेल्या शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो.

त्यामुळे विदयुत पंपाला पर्याय म्हणून शेतकरी सौर कृषी पंपाकडे वळतो कारण सौर कृषी पंप खर्चाच्या दृष्टीने तसेच देखभाल खर्चाच्या दृष्टीने विद्युत पंपाच्या तुलनेने परवडण्यासारखे असतात. परंतु पावसाळ्यात तसेच ढगाळ वातावरणात सौर कृषी पंप विजेची निर्मिती करण्यासाठी सक्षम नसतात त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतपिकांना पाणी देणे शक्य होत नाही व परिणामी शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे विद्युत पंप व सौर कृषी पंपाला पर्याय म्हणून शेतकरी शेतात डिझेल पंप बसविण्यासाठी वळतो परंतु डिझेल पंपाची महागडी किंमत तसेच डिझेल पंपाचा आयात खर्च हे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नसते

राज्यात वाढत चाललेल्या लोडशेडींगमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देता येत नाही व त्यामुळे पिकांचे नुकसान होत असते व अशा प्रकारे कायम होत जाणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी शेती करण्याचे टाळतो आहे व तो शेती क्षेत्रापासून दूर जाताना दिसत आहे व अशीच परिस्थिती सुरु राहिली तर एक दिवस राज्यात शेतकरी शिल्लक उरणार नाही व राज्यात धान्याचा तुटवडा पडेल व धान्याची मोठी समस्या निर्माण होईल हे शासनाच्या निदर्शनास आले

राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असतो त्यामुळे तो स्वतःचे घर, शेतजमीन गहाण ठेवून व्याजाने  कर्ज घेतात व ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता शेती करतात परंतु अशा प्रकारे त्यांना शेती पिकांसाठी पाणी उपलब्ध न झाल्यामुळे हाथा तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना खूप साऱ्या समस्यांचा सामान करावा लागतो त्यांच्यासमोर घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता तसेच आपल्या कुटुंबाला सांभाळण्याची चिंता सतावू लागते कारण शेती व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून त्यांना पिकांच्या सिंचनासाठी डिझेल पंपाच्या खरेदीसाठी ५० टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून शेतकरी शेतात डिझेल पंप बसवून त्याच्या सहाय्याने शेतातील पिकांचे सिंचन करू शकतील व पाण्याअभावी त्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना डिझेल पंपाच्या खरेदीसाठी 50 टक्के आर्थिक अनुदान उपलब्ध करून देणे जेणेकरून ते लोडशेडिंग मध्ये सुद्धा डिझेल पंपाच्या सहाय्याने शेती पिकांसाठी पाण्याचा उपसा करू शकतील व सिंचनाअभावी होणारे पिकांचे नुकसान टाळू शकतील.

योजनेचे नावडिझेल पंप अनुदान योजना
विभागकृषी विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकरी
लाभडिझेल पंप बसविण्यासाठी 50 टक्के अनुदान
उद्देशशेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

उद्देश

 • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे सिंचन करता यावे यासाठी डिझेल पंप खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डिझेल पंप योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • पाण्याअभावी पिकांचे सततचे होणारे नुकसान टाळणे.
 • शेतात डिझेल पंप बसवून शेतकरी पिकांच्या सिंचनासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
 • सिंचनाअभावी पिकांचे नुकसान टाळून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • डिझेल पंप हे खर्चाच्या दृष्टीने महाग असतात जे शेतकऱ्यांना खरेदी करणे शक्य नसते त्यामुळे त्यांना डिझेल पंपाच्या खरेदीसाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता पडू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य सुधारणे.
 • विद्युत पंपासाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या विजेपासून तसेच वीज बिलापासून मुक्तता करणे.
 • शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे
 • राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
 • शेतकऱ्यांना विद्युत पंप तसेच सौर कृषी पंपापासून मुक्तता देणे.
 • शेतकऱ्यांना दिवस पिकांचे सिंचन करता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
Diesel Pump Subsidy

डिझेल पंप अनुदान योजनेची वैशिट्य

 • महाराष्ट्र शासनाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • राज्यातील शेतकऱ्यांना दिवस पिकांचे सिंचन करता यावे यासाठी डिझेल पंप खरेदीसाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली डिझेल पंप सब्सिडी योजना एक महत्वाची अशी योजना आहे.
 • अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांना तसेच ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विद्युत सेवा उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
 • राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी डिझेल पंप अनुदान योजना फायद्याची ठरणार आहे.
 • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून राज्यातील शेतकऱ्यांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे जेणेकरून अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकेल व त्याला कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही जेणेकरून त्याचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
 • या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल त्यामुळे या योजनेत पारदर्शकता बनून राहील व पैशांची अफरातफर होणार नाही.
 • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्ज केल्यापासून लाभ मिळवेपर्यंत अर्जदार वेळोवेळी अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकतो.

डिझेल पंप अनुदान योजनेचे लाभार्थी

 • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्टया गरीब शेतकरी त्यांच्या शेतात डिझेल पंप बसविण्यासाठी अनुदान मिळविण्यासाठी पात्र आहेत.
 • दुर्गम, अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकरी
 • ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विजेची जोडणी झाली नाही आहे असे शेतकरी
 • शेतात सिंचनासाठी विद्युत पंप वापरणारे शेतकरी
 • महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी
 • धडक सिंचन योजना अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी
 • महावितरणाकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरी अर्जदार
 • ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे आहे तसेच ज्याच्या शेताच्या शेजारी नदी, विहिर, बोअरवेल आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
 • यापुर्वी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या कुठल्याही योजनेअंतर्गत कृषीपंपाचा लाभ न मिळवलेले शेतकरी
 • वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विदयुतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी
 • शेतात विद्युत पंप, सौर कृषी पंप तसेच डिझेल पंप बसवण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेले शेतकरी

डिझेल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदान राशी

 • डिझेल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला शेतात डिझेल पंप बसविण्यासाठी राज्य शासनाकडून 50 टक्के रक्कम दिली जाते.

डिझेल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत लाभार्थ्याने भरावयाची रक्कम

 • डिझेल पंप सब्सिडी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला डिझेल पंपांच्या किमतीच्या 50 टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे.

अनुदानाचे प्रमाण:

 • अनुदानाचे प्रमाण डिझेल पंपच्या हॉर्सपॉवरवर अवलंबून असते.
 • सध्याच्या योजनेनुसार 5 HP पर्यंतच्या डिझेल पंपसाठी 15,000/- रुपये, 5 ते 10 HP पर्यंतच्या डिझेल पंपसाठी 20,000/- रुपये आणि 10 HP पेक्षा जास्त क्षमतेच्या डिझेल पंपसाठी 30,000/- रुपये अनुदान दिले जाते.

डिझेल पंप यो जनेचा लाभ

 • डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पिकांच्या सिंचनासाठी डिझेल पंप बसविण्यासाठी 50% अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
 • विजेच्या अनियमिततेपासून मुक्तता मिळेल.
 • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्यांना विद्युत कृषी पंपाच्या बिलापासून मुक्तता मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील  शेतकऱ्यांना डिझेल पंपाच्या खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिले जाईल त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
 • राज्यातील शेतकऱ्यांचा या योजनेअंतर्गत सामाजिक व आर्थिक विकास होईल.
 • राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना डिझेल पंप विकत घेण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकून पैसे उधार घेण्याची गरज सुद्धा भासणार नाही.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल बनेल.
 • राज्यातील शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होईल तसेच इतर नागरिक शेती करण्यासाठी आकर्षित होइल.
 • डिझेल पंप अनुदान योजनेच्या सहाय्याने प्रत्येक शेतात डिझेल पंपाच्या वापरामुळे शासनावरील विजेचा अतिरिक्त भार कमी होईल व विजेची बचत होईल.
 • डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या डिझेल पंपाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना दिवसा शेती सिंचन करणे शक्य होईल.
 • या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांची लोडशेडिंग पासून सुटका होईल.
 • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा पिकांना पाणी देणे शक्य होईल व त्यामुळे पाण्याअभावी होणारे पिकांचे नुकसान टाळता येईल.

डिझेल पंप अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता

 • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

डिझेल पंप अनुदान योजनेच्या अटी

 • फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच डिझेल पंप अनुदान योजनेचा लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • फक्त शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • राज्यातील ज्या शेजाऱ्यांच्या शेतात आधीच वीज जोडणी केली गेली आहे व ते विद्युत कृषी पंपाचा वापर करत आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • एका शेतकऱ्याला फक्त एकदाच आणि एकाच डिझेल पंपाच्या खरेदीसाठी असून देण्यात येईल.
 • शेतात डिझेल पंप बसविल्यानंतर त्या पंपाची दैनंदिन सुरक्षितता करण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थीची राहील. शासनाकडून कुठल्याच प्रकारचा देखभाल खर्च दिला जाणार नाही.
 • डिझेल पंप अनुदान योजनेची अंमलबजावणी करताना अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात विहिर, बोअरवेल, नदी, कालवा, शेततळे इत्यादी शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे याची राज्य शासनाकडून खात्री केली जाईल त्यानंतरच लाभार्थ्यांची निवड केली जाईल.
 • जर अर्जदार शेतकऱ्याने केंद्र सरकार किंवा राज्य शासनाद्वारे सुरु केलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत डिझेल पंपाचा लाभ मिळवला असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार शेतकरी ज्या शेतात डिझेल पंप बसविण्यासाठी अर्ज करत असेल आणि त्या जमिनीत सह हिस्सेदार असतील तर अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्यांना सह हिस्सेदाराचे सहमती पत्र/ना हरकत प्रमाण पत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
 • डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत डिझेल पंपासाठी शासनाकडून ५०% अनुदान राशी दिली जाते व उर्वरित ५०% टक्कम लाभार्थ्याला भरणे आवश्यक आहे.
 • जर अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात कुठल्याच प्रकारचा पाण्याचा स्रोत उपलब्ध नसेल तर अशा शेतकऱ्यांना डिझेल पंप अनुदान योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

डिझेल पंप अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • बँक खात्याचा तपशील
 • जमिनीचा 7/12 उतारा / 8अ
 • जमिनीत सह हिस्सेदार असल्यास हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाण पत्र
 • शपथ पत्र

डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

 • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
 • होम पेज वर आधार कार्ड किंवा Username च्या सहाय्याने लॉगिन करावे लागेल.
Diesel Pump anudna Yojana Home Page

 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला अर्ज करा वर क्लिक करावे लागेल.
Diesel Pump anudan Yojana application

 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण मध्ये बाबी निवडा बटनावर क्लिक करावे लागेल.
Diesel Pump anudan Yojana Krushi Yantrikikaran

 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला या योजनेचा अर्ज दिसेल त्यात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.सर्व माहिती भरून झाल्यावर तुम्हाला जतन करा या बटनावर क्लिक करावे लागेल.
Diesel Pump anudan Yojana Application Form

 • आता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन (Net Banking / Dabit Card / UPI / Wallet) च्या माध्यमातून 23/- रुपये भरावे लागतील.
 • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

 • अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल.
 • कृषी विभागात जाऊन डिझेल पंप अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
 • अशा प्रकारे तुमची डिझेल पंप अनुदान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupClick Here
Diesel Pump Anudan Yojana Official WebsiteClick Here
Diesel Pump Anudan Yojana Contact Number022-49150800

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!