ई पीक पाहणी

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी हा दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतो व त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते शेती हा महाराष्ट्र राज्यातील बहुतांश नागरिकांचा पारंपारिक व्यवसाय आहे व त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामासाठी लागणारी अवजारे, बियाणे, खते, कीटकनाशके यांसाठी बँक, वित्त संस्था व साहुकारांकडून व्याजाने कर्ज घेतात व ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत करून शेती करतात परंतु अवकाळी पाऊस, वादळ, वारा, गारपीट, दुष्काळ, पूर तसेच इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान होते व यामुळे शेतकऱ्याला याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो.

राज्यातील बहुतांश कुटुंबांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असल्या कारणामुळे शेती च्या उत्पन्नावरच त्यांच्या परिवाराचे पालन पोषण सुरु असते परंतु नैसर्गिक व इतर कारणांमुळे एकाएकी पिकाचे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या परिवाराचे पालन पोषण करण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो तसेच शेतकरी कर्ज घेऊन शेती कार्य करत असतो त्यामुळे अशा नुकसानीमुळे त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असतो व वेळेवर कर्ज फेडू न शकल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात.

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी सदैव तत्पर असते परंतु परंतु राज्यात पिकांच्या पेरणीची नोंदणी कि वर्षानुवर्षे पारंपारिक पद्धतीने तलाठी मार्फत शासनाच्या नोंदवहीत केली जाते तसेच मागील काही वर्षात तलाठी यांच्याकडील वाढलेला कामाचा बोजा तसेच कमी तलाठी संख्या यामुळे त्यांना पीक पेरणीची अचूक नोंद करणे शक्य होत नाही व काही वेळा पिकांच्या नोंदी ह्या नोंदवहीत करण्यास खूप विलंब लागतो त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना पिकाचे नुकसान मिळण्यास विलंब लागतो त्यामुळे वेळेवर नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतो

शेती व्यवसायामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व वेळेवर नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे बहुतांश शेतकरी शेती व्यवसायाकडे पाठ फिरवतात त्यामुळे दिवसेंदिवस राज्यात शेतकऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे हि सर्व गोष्ट शासनाच्या निदर्शनास आली त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्यात शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची माहिती जलद गतीने नोंद व्हावी व एखाद्या नैसर्गिक किंवा इतर आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास त्यांना नुकसान भरपाई जलद गतीने व्हावी या उद्देशाने E Pik Pahani कार्यक्रम सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

शेतकऱ्यांनी केलेल्या पीक पेरणीची माहिती मोबाईल अँप च्या सहाय्याने गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांनी उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम राज्यात राबविण्यात आला आहे व त्यासाठी शासनानाद्वारे कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आली आहे त्यासाठी महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट त्यांच्यामधील करारान्वये पीक पाहणी हे अँप विकसित केले आहे या अँप चा वापर करून शेतकऱ्यांच्या सहभागाने मोबाईल अँप च्या सहाय्याने शेतकऱ्यांनी स्वतः त्यांच्या पीक पेरणीची माहिती तलाठ्याकडे ऑनलाईन पाठविण्यासाठी सदर कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची माहिती जलद गतीने नोंद व्हावी व एखाद्या नैसर्गिक किंवा इतर आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना जलद गतीने नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेचा उद्देश आहे.

प्रकल्पाचे नावE Pik Pahani
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभऑनलाईन पिकांच्या पेरणीची नोंदणी
उद्देश्यजलद गतीने पिकांची नोंदणी करणे व पिकाचे नुकसान झाल्यास
त्वरित लाभ उपलब्ध करून देणे.
नोंदणी पद्धतऑनलाईन नोंदणी (अँप च्या सहाय्याने)

ई पीक पाहणी चे उद्दिष्ट

 • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची नोंदणी जलद गतीने व्हावी तसेच त्यांच्या पिकांचे नैसर्गिक किंवा इतर कोणत्या कारणांमुळे नुकसान झाल्यास जलद गतीने नुकसान भरपाई मिळावी.
 • नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे
 • क्षेत्रीय स्तरावरुन पीक पेरणी अहवालाचा Real Time Crop Data संकलित होण्याच्या दृष्टीने तसेच सदर Data संकलित करताना पारदर्शकता आणणे.
 • शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई जलद गतीने उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना शेती व्यवसायाकडे आकर्षित करणे.
 • पीक पेरणी अहवाल प्रक्रीयेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे.
 • कृषी पतपुरवठा सुलभ करणे
 • शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.
 • पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे.
ई पीक पाहणी

योजनेचे वैशिष्ट्य:

 • महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना स्वतः मोबाईल च्या सहाय्याने पीक पेरणीची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेला एक महत्वपूर्ण असा कार्यक्रम आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने सदर योजना फायद्याची ठरणार आहे..
 • महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग व कृषी विभागाच्या एकत्रितकरणाने हा कार्यक्रम राबविला जात आहे.
 • योजनेअंतर्गत नोंदणी करण्याची पद्धत सोपी ठेवण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंदणी करण्यासाठी कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
 • नोंदणी प्रक्रिया अँप द्वारे ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे शेतकरी घरी बसून मोबाईल च्या सहाय्याने स्वतःच्या पिकाची नोंद करू शकतील ज्यामुळे त्यांना कुठल्याच सरकारी कार्यालयात जाण्याची गरज लागणार नाही व त्यांचा वेळ व पैशांची बचत होईल.
 • टाटा ट्रस्ट द्वारे अँप ची निर्मिती करण्यात आली आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्यात हा नोंदणी कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
 • अँप च्या सहाय्याने पिकाची रियल टाइम नोंदणी करणे शक्य होईल.
 • आतापर्यंत 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे व 70 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची 7/12 वर ई पीक नोंदणी पूर्ण केली गेली आहे.

प्रकल्प अंमलबजावणी चा कालावधी

 • सर्वसाधारणपणे प्रत्येक हंगामातील सुरुवातीची 2 महिने शेतकरी आपल्या शेतातील पिकाची पीक पाहणी मोबाईल अँप द्वारे अपलोड करतील व त्यानंतरचा 1 महिना तलाठी व कृषी सहाय्यक हे 10 टक्के नमुना पडताळणी करतील आणि त्यानंतर तलाठी आज्ञावलीद्वारे पीक पाहणीला अंतिम मान्यता देतील.

योजनेअंतर्गत पिकांच्या समाविष्ट अवस्था:

 • पीक पेरणी नंतर दोन आठवड्यात वाढलेले पीक
 • पिकाची पूर्ण वाढलेली अवस्था
 • कापणी (हंगाम) पूर्वीची अवस्थां

योजनेचे लाभार्थी:

 • महाराष्ट्र राज्यातील शेतकरी.

योजनेचा फायदा:

 • कार्यक्रमाच्या अंतर्गत शेतकरी शेतातील पीक पेरणीची माहिती स्वतः टाटा ट्रस्ट द्वारे सुरु करण्यात आलेल्या अँपद्वारे उपलब्ध करून देऊ शकतील ज्यामुळे एखाद्या कारणामुळे पिकाचे होणाऱ्या नुकसानाची नोंद जलद गतीने होईल व झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळेल.
 • तलाठ्यांच्या कामाचा बोजा कमी होईल.
 • पीक विमा आणि पीक पाहणी दावे लवकरात लवकर निकाली लागतील.
 • राज्यातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जोडला जाईल.
 • कृषी गणना अत्यंत सुलभ पद्धतीने व अचूकरीत्या पूर्ण करता येईल.
 • पिकाची नोंदणी ऑनलाईन अँप द्वारे केली गेली आहे त्यामुळे शेतकरी घर बसल्या मोबाईल च्या सहाय्याने स्वतःच्या पिकाची नोंदणी करू शकतील व त्यांना कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही व त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.

कार्यक्रमाच्या अटी व शर्ती:

 • केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकरी प्रकल्पात सहभागी होऊ शकतात.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकरी प्रकल्पात सहभागी होऊ शकत नाहीत.
 • फक्त अँप चा वापर करून पिकाची नोंदणी करता येईल.

शेतकऱ्यांसाठी पिकांचे स्वयं नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना:

 • नोंदणी प्रक्रियेसाठी स्मार्ट मोबाईल (Android) द्वारे गुगल प्ले स्टोर वरून ॲप डाऊनलोड करून स्थापित (Install) करावा.
 • खातेदाराने अँप मध्ये मोबाईल क्रमांकाची नोंद करावी.
 • 7/12 मधील नावाप्रमाणे खातेदाराने त्यांच्या नावाची अचूक पणे नोंदणी करावी.
 • ज्या खातेदाराचे एकाच महसुली गावात एका पेक्षा अधिक खाते क्रमांक आहेत,त्यांनी त्यांचे नाव नमूद केल्यास,त्या गावातील त्यांचे सर्व खाते क्रमांक व त्याखालील सर्व भूमापन/गट क्रमांक मोबाईल स्क्रीन वर नोंदणीसाठी उपलब्ध दिसतील.
 • शेतक-यांच्या नोंदणीकरिता त्यांचा खाते क्रमांक/भूमापन/गट क्रमांकाच्या माहितीसाठी संगणकीकृत 7/12 किंवा 8अ ची अद्ययावत प्रत सोबत ठेवावी.
 • सामायिक मालकीच्या जमिनीसाठी,ज्याचे नाव गाव न.नं. 7/12 मध्ये सामायिक खातेदार म्हणून नोंदले आहे,ते सर्व सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.
 • अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक (अज्ञान पालक कर्ता)नोंदणी करू शकतील.
 • खातेदाराने पीक पाहणी ची माहिती शेतामध्ये उभे राहून करायची असून पीक पाहणी भरून झाल्यावर त्या पिकाचा अक्षांश रेखांशासह फोटो (GPS enabled ) व सर्व माहिती अपलोड करायची आहे. जर मोबाईल इंटरनेट सुविधेत अडचण येत असल्यास गावातील ज्या परिसरात इंटरनेट कनेक्शन मिळेल त्या ठिकाणी जावून पीक पाहणीची माहिती अपलोड करता येईल.
 • नोंदणीकृत मोबाईलवर आलेला चार अंकी संकेतांक (पासवर्ड) कायमस्वरूपी वैध राहून वापरता येईल.
 • एखाद्या शेतकऱ्याकडे स्वतःचा स्मार्टफोन नसेल,तर सहजरीत्या उपलब्ध होणारा दुसरा स्मार्टफोन नोंदणीसाठी वापरू शकतात.
 • एका मोबाईल नंबरवरून एकूण 20 खातेदारांची नोंदणी करता येईल.

अँप च्या सहाय्याने पीक नोंदणी करण्याची प्रक्रिया:

 • शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या मोबाईल मधील Google Play Store App मध्ये जाऊन ई पीक पाहणी (E Peek Pahani) अँप सर्च करून ते डाउनलोड करायचे आहे.
ई पीक पाहणी

 • अँप डाउनलोड झाल्यावर त्याला ओपन करायचे आहे आणि तुमच्या महसूल विभागाची निवड करायची आहे.
ई पीक पाहणी

 • आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
 • आता तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, गाव याची निवड करायची आहे आणि पुढे जायचे आहे.
ई पीक पाहणी

 • आता तुम्हाला तुमचे पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक यांपैकी एखादी माहिती भरून शोधा बटनावर क्लिक करायचे आहे.
ई पीक पाहणी

 • आता तुम्हाला खातेदाराची निवड करायची आहे
 • आता तुम्हाला तुमचे खाते निवडून पुढे जायचे आहे.
 • आता तुम्हाला पीक पेरणी ची माहिती भरायची आहे.
ई पीक पाहणी

 • आता तुम्हाला तुमच्या पिकाची निवड करायची आहे.
ई पीक पाहणी

 • आता तुम्हाला पिकांसाठी सिंचन साधन आणि प्रकार निवडायचा आहे.
ई पीक पाहणी

 • आता तुम्हाला तुमच्या पिकांचे फोटो अपलोड करायचे आहेत.
 • आता तुम्हाला तुमच्या पिकांचे अक्षांश रेखांश सहित उभ्या पिकाचे छायाचित्र अपलोड करायचे आहेत.
ई पीक पाहणी

 • अशा प्रकारे तुमची अँप अंतर्गत पीक नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupClick Here
E Pik Pahani AppClick Here
E Pik Pahani Helpline Number02025712712

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज PDF
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
Gopinath Munde Apghat Vima Yojana Form
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

6 thoughts on “ई पीक पाहणी”

 1. शेतात विहीर साठी अजॅ केले आहे, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबी योजना दोन वर्ष झाली तरी कधी प्रयत्न लाभ मिळणार आहे लवकर मिळावे अशी विनंती.

  Reply
  • तुमच्या अर्जात किंवा कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत का ते पहा कारण अर्जदार अटी व शर्ती मध्ये बसत नसल्यास अर्ज रद्द केला जातो.
   त्यामुळे तुम्हाला या बाबत ई-मेल आला आहे का ते तपासून पहा.

   Reply

Leave a Comment

Join WhatsApp Group!