फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 : Free Sewing Machine Scheme Maharashtra

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरीबसुन स्वतःचा उद्योग सुरु करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे. जेणेकरून महिला शिलाई मशीन वर आपल्या परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून पैसे कमावू शकतील व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना घरबसल्या रोजगाराची एखादी संधी उपलब्ध व्हावी जेणेकरून ते स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक गरज पूर्ण करू शकतील या उद्देशाने मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.

Table of Contents

या योजनेअंतर्गत लाभार्थी महिला शिलाई मशीन च्या सहाय्याने घरी बसून परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून पैसे मिळवू शकतील त्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडीफार वाढ होईल.

राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू 5 हजार पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचा राज्य शासनाचा हेतू आहे.

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील पुष्कळ कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे महिलांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी पैशांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते. ग्रामीण भागात रोजगाराच्या स्थायी संधी उपलब्ध नसल्या कारणामुळे महिलांना रोजगार मिळवण्यासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे महिलांना आपल्या कुटुंबातील गरज पूर्ण करणे शक्य होत नाही.
महिला घरामधून केला जाणारा एखादा लघु उद्योग करण्यासाठी इच्छुक असतात त्यासाठी शिवणकाम हा एक योग्य पर्याय महिलांसाठी उपलब्ध असतो त्यामुळे राज्यातील महिला शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिवणकाम योजनेअंतर्गत शिवणकामाचा लाभ मिळवतात परंतु त्यांना शिलाई मशीन ची किंमत जास्त असल्याकारणामुळे खरेदी करणे शक्य नसते त्यामुळे त्यांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी इतरांकडून जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागते त्यामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील गरजू महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र शासनाने योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला

या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरबसल्या स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करता यावा जेणेकरून ते स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील. [शिलाई मशीन योजना महाराष्ट्र]

वाचकांना विनंती

आम्ही शिलाई मशीन योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवू शकतील.

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र

योजनेचे नावFree Sewing Machine Scheme Maharashtra
लाभाथीराज्यातील गरीब कुटुंबातील महिला
लाभमोफत शिलाई मशीन
उद्देशमहिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट

 • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरबसल्या स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करता यावा या उद्देशाने सदर योजना सुरु करण्यात आली आहे व या योजनेअंतर्गत गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.
 • राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे
 • राज्यातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे
 • गरीब कुटुंबातील महिलांचे मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत जीवनमान सुधारणे
 • महिलांचे जीवनस्तर सुधारणे
 • महिलांना स्वावलंबी बनविणे
 • महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सहाय्य करणे
 • महिलांना कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये
 • महिलांना शिलाई मशीन च्या खरेदीसाठी कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील आर्थिक उत्पन्नात थोड्याफार प्रमाणात वाढ करणे
 • महिलांचे भविष्य उज्वल बनविणे
 • महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी कमी करणे
 • बेरोजगार महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे
 • राज्याचा आर्थिक विकास करणे
 • महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहित करणे. [शिलाई मशीन योजना महाराष्ट्र]

Free Sewing Machine Scheme Maharashtra चे वैशिष्ट्य

 • केंद्र शासनाद्वारे मोफत शिलाई मशीन योजना सुरुवात करण्यात आली आहे
 • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून त्यांना घरबसल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने मोफत शिलाई मशीन योजना महत्वाची योजना ठरणार आहे.
 • राज्यातील 50 हजारांपेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचे लक्ष्य निर्धारित केले गेले आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ दिला जाईल.
 • मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.
 • मोफत शिलाई मशीन योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून महिलांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
 • महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासाठी सदर योजना एक महत्वाची भूमिका बजावणार आहे.
 • महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हि योजना उपयुक्त ठरणार आहे.
 • राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास तसेच राज्यात महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. [शिलाई मशीन योजना महाराष्ट्र]
 • राज्यातील 65 वर्षावरील नागरिकांना सरकार देत आहे दर महिना 1500/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा श्रावणबाळ योजना
 • सरकार गटई कामगारांना देत आहे मोफत पत्र्याचे स्टॉल त्यासाठी वाचा गटई स्टॉल योजना
 • मुलींचे आरोग्य, शिक्षण, मुलीचे लग्न तसेच मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक साहाय्य त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना
 • सरकार महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे त्यासाठी वाचा महिला बचत गट कर्ज योजना
 • देवदासी महिला व तिच्या मुलींना सरकार देते आहे 50 हजारांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा देवदासी कल्याण योजना

Free Silai Machine Yojana Maharashtra चे लाभार्थी

 • ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिला

Silai Machine Scheme Maharashtra चा फायदा

 • राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.
 • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही.
 • योजनेअंतर्गत प्राप्त शिलाई मशीन च्या सहाय्याने महिला परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून स्वतःसाठी रोजगार मिळवू शकतील ज्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्न थोड्या फार प्रमाणात वाढ होईल व महिला आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरज पूर्ण करू शकतील.
 • राज्यातील महिला स्वावलंबी बनतील
 • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील
 • राज्यातील बेरोजगार कमी होईल तसेच महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
 • या योजनेच्या सहाय्याने राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारेल
 • महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल
 • राज्यातील महिला या योजनेअंतर्गत सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • महिला आत्मनिर्भर बनतील.
 • राज्यात महिला सशक्तीकरणाला चालना मिळेल
 • महिलांचे भविष्य उज्वल बनेल
 • ग्रामीण भागात महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
 • महिलांचा आत्मविश्वास वाढेल. [शिलाई मशीन योजना महाराष्ट्र]

Silai Machine Yojana Maharashtra अंतर्गत दिला जाणारा लाभ

 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील निराधार महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते जेणेकरून महिला घरी बसून आपल्या परिसरातील नागरिकाचे कपडे शिवून पैसे कमावू शकतील व आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.

Sewing Machine Scheme Maharashtra अंतर्गत आवश्यक पात्रता

 • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र च्या अटी व शर्ती

 • केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच योजनेचा चा लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार महिला आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिला असणे आवश्यक आहे
 • अर्जदार महिलेचे वय 20 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
 • वय वर्षे 40 वरील वरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • शिलाई मशीन योजनेचा लाभ फक्त महिलांनाच देण्यात येईल.
 • राज्यातील पुरुषांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
 • अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपेक्षा जास्त नसावे.
 • अर्जदार महिलेकडे शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विधवा व अपंग महिलांना प्राधान्य देण्यात येईल.
 • केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या शिलाई मशीन वाटप योजनेअंतर्गत अर्जदार महिलेने लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • सरकारी नोकरीत कार्यरत महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार महिला विधवा असल्यास महिलेला अर्जासोबत पतीचे मृत्यू प्रमाण पत्र सादर करणे आवश्यक आहे.
 • अर्जदार महिला अपंग असल्यास अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
 • एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला मोफत शिलाई मशीन चा लाभ दिला जाईल
 • अर्जदार महिलेने खोटी माहिती देऊन अर्ज केला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेमधून रद्द केले जाईल. [शिलाई मशीन योजना महाराष्ट्र]
 • गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते आहे रोख रक्कम त्यासाठी वाचा जननी सुरक्षा योजना

Sewing Machine Yojana In Maharashtra अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी पुरावा
 • विजेचे बिल
 • मोबाईल क्रमांक
 • ई-मेल आयडी
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • बँक खात्याचा तपशील
 • महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
 • महिला अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
 • कुटुंबाचा उत्पन्न दाखला

Maharashtra Free Silai Machine Yojana अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

 • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जदार महिला आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नसल्यास
 • अर्जदार महिला सरकारी नोकरीत कार्यरत असल्यास
 • अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न १.२ लाखांपेक्षा जास्त असल्यास [शिलाई मशीन योजना महाराष्ट्र]

Maharashtra Silai Machine Yojana अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

 • अर्जदार महिला जर ग्रामीण भागातील रहिवाशी असेल तर आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात महिला सशक्तीकरण विभागात जावे लागेल तसेच महिला शहरी भागातील रहिवाशी असल्यास आपली जवळच्या महानगर पालिका कार्यालयात महिला सशक्तीकरण विभागात जाऊन शिलाई मशीन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज डाउनलोड करावा लागेल.
 • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.
 • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Free Sewing Machine Scheme Online Apply Maharashtra

Mofat Silai Machine Yojana Maharashtra अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अजून पोर्टल सुरु करण्यात आलेले नाही त्यामुळे आमची अर्जदारांना विनंती आहे कि तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.

Telegram GroupJoin
Silai Machine Government Yojana Maharashtra FormClick Here

Free Sewing Machine Scheme In Maharashtra अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

शिलाई मशीन योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे

शिलाई मशीन योजना कोणाद्वारे सुरु करण्यात आली आहे?

शिलाई मशीन योजना केंद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र चे लाभार्थी कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिला शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत

शिलाई मशीन योजनेचा लाभ काय आहे?

शिलाई मशीन योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते

फ्री शिलाई मशीन योजनेचा उद्देश काय आहे?

राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे

मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जातो

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 ची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे शिलाई मशीन योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल.

2 thoughts on “फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 : Free Sewing Machine Scheme Maharashtra”

  • जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर जिल्हा कार्यालयात महिला व बालकल्याण विकास विभाग तसेच जर तुम्ही शहरी भागात राहत असल्यास महानगर पालिकेमध्ये महिला व बालकल्याण विकास विभागात जाऊन मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.

   Reply

Leave a Comment