राज्यातील बहुतांश नागरिक गाय, म्हैस पाळतात तसेच शेतकरी सुद्धा शेती सोबत जोडधंदा म्हणून गाय, म्हैस पालन करतात परंतु ग्रामीण भागात बहुतांश जनावरांच्या गोठयाची जागा ही ओबडधोबड व खाचखळग्यानी भरलेली असते, सदरचे गोठे हे व्यवस्थित नसतात त्यामुळे जनावरांना ऊन, वारा, पाऊस, थंडी यांचा सामना करावा लागतो. गोठयांमध्ये मोठया प्रमाणावर जनावरांचे शेण व मूत्र इतरत्र पडलेले असते तसेच पावसाळ्याच्या दिवसांत गोठ्यातील जमीन दलदली सारखी होते व त्या जागेतच जनावरे बसत असल्यामुळे ते विवीध प्रकारच्या आजारांना बळी पडतात. तसेच काही जनावरांना स्तनदाह होऊन उपचारांसाठी हजारो रुपये खर्च होतात. तर काही वेळेस गाई/ म्हशींची कास निकामी होते, त्यांच्या शरीराच्या खालील बाजूस जखमा होतात व जनावरांचा मृत्यू देखील होतो.
बऱ्याच ठिकाणी जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाणी बांधलेल्या नसतात. त्यांच्यापुढील मोकळया जागेवरच चारा टाकला जातो. या चाऱ्यावर बऱ्याच वेळा शेण व मूत्र पडल्याने जनावरे चारा खात नाहीत व हा चारा वाया जातो.
गोठ्यातील ओबडधोबड जमिनीमुळे जनावरांपासून मिळणारे मौल्यवान मूत्र व शेण यांचा संचय करता न आल्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर वाया जाते. जनावरांचे मूत्र व शेण हे एक उत्कृष्ठ प्रकारचे सेंद्रीय खत असल्याने जनावरांच्या गोठ्यातील जागा ही सिमेंट काँक्रीटचा वापर करुन पक्क्या स्वरुपात सपाटीकरण केल्यास जनावरांपासून मिळणारे मूत्र व शेण गोठ्याशेजारील खड्यांमधे एकत्र जमा करुन त्याचा शेतजमिनीची सुपिकता व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी उपयोग करुन घेता येऊ शकतो परंतु राज्यातील बहुतांश शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत त्यामुळे जनावरांसाठी पक्क्या स्वरूपात गोठा बांधण्यासाठी त्यांच्या जवळ पुरेसे अर्थसहाय्य उपलब्ध नसते त्यामुळे त्यांना खूप साऱ्या संकटांचा सामना करावा लागतो त्यामुळे राज्यातील पशुपालक व शेतकरी यांच्या या सर्व समस्येचा विचार करून राज्य शासनाने राज्यात गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023 सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
या योजने अंतर्गत गायीचा गोठा बांधणीसाठी पशुपालक व शेतकऱ्यांना राज्य शासनाद्वारे 77 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येते. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकरी व पशुपालकांना त्यांच्या जनावरांना गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे आहे.
योजनेचे नाव | गोठा बांधणी अनुदान 2023 |
लाभार्थी | शेतकरी व पशुपालक |
लाभ | गोठा बांधण्यासाठी आर्थिक अनुदान |
उद्देश | पशु पालनासाठी प्रोत्साहित करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन |
गाय म्हैस पालन योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील नागरिकांना त्यांच्या जनावरांसाठी गोठा बांधून देण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा जनावरांचा गोठा अनुदान योजना चा मुख्य उद्देश आहे.
- जनावरांना राहण्यासाठी कायमस्वरूपी छत बांधून देणे.
- जनावरांचा ऊन, वारा, पाऊस, थंडी यांपासून रक्षण करणे.
- पशुपालक तसेच शेतकऱ्यांना पशुपालनासाठी प्रोत्साहित करणे.
- राज्यातील इतर नागरिकांना पशु पालनासाठी आकर्षित करणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाद्वारे गाई म्हशी गोठा योजना राबविण्यात येते आहे.
- लाभाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
योजनेअंतर्गत एक लाभार्थीस पशु संख्येच्या प्रमाणात मिळणारे अनुदान बाबतची माहिती
कामांची माहिती व पशु संख्येच्या प्रमाणात अनुज्ञेय अनुदान माहिती प्रमाणे
गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत 2 ते 6 गुरे या करिता 77 हजार 188 रुपयांचे अनुदान देण्यात येते तसेच 6 ते 12 गुरांसाठी दुप्पट आणि 18 पेक्षा जास्त गुरांसाठी 3 पट अनुदान देण्यात येते.
एका कामासाठी किमान मिळणारे अनुदान रक्कम
गाय गोठा कसा असावा व गोठा बांधण्याची पद्धत
2 ते 6 गुरांसाठी
- 26.95 चौ.मी. निवारा असावा त्याची लांबी 7.70 मी. व रुंदी 3.50 मी. असावी.
- गव्हाण 7.7 मी. × 2.2 मी. × 0.65 मी. आणि 250 लिटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधणे.
- जनावरांना पिण्याच्या पाण्याची 200 लिटर क्षमतेची टाकी सुद्धा बांधण्यात यावी.
सदर लाभार्थीची पात्रता खालील प्रवर्गातील असणे आवश्यक आहे
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- भटक्या विमुक्त जमाती
- दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंब
- महिलाप्रधान कुटुंब
- शारीरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंब
- भूसुधार योजनेचे लाभार्थी
- अनुसूचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्य निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती
- कृषी कर्जमाफी 2008 नुसार अल्प भूधारक (1 हेक्टर पेक्षा जास्त पण 2 हेक्टर (5 एकर) पर्यंत जमीन असलेला शेतकरी (जमीन मालक / कुळ) व सीमांत शेतकरी (1 हेक्टर पर्यंत जमीन असलेला शेतकरी).
योजनेअंतर्गत महत्वाच्या बाबी:
- मग्रारोहयो अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या विवीध वैयक्तिक (उदा. कामाचा प्रकार: फळबाग, वृक्षलागवड, शेततळे) व सार्वजनिक ( उदा. कामाचा प्रकार : रस्ता, ओढा / नाला / पाझर तलाव गाळ काढणे / ग्रा.प क्षेत्रावर वृक्ष लागवड संगोपन इ.) कामाच्या संयोजनातून अकुशल कुशल प्रमाण 60:40 लाभार्थी पातळीवर राखण्यासाठी योजने अंतर्गत काम केलेले असावे. (याबाबत ग्रामसेवक / कृषी सहाय्यक / यंत्रणा अधिकारी यांचा कामाबाबतचा शिफारस दाखला जोडावा.)
- सदर लाभार्थी कुटुंब यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक क्षेत्रावर किमान 20 ते 50 फळझाडे / वृक्षलागवड करण्यात येऊन त्याचे तीन वर्ष संगोपन करून झाडे 100% जिवंत ठेऊन योजनेचा लाभ पुर्ण घेणारे लाभार्थी किंवा चालू वर्ष मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान 100 दिवस काम पुर्ण करणे आवश्यक आहे.
1) वैयक्तिक क्षेत्रावर 20 ते 50 फळझाडे / वृक्षलागवड केल्यास : गाय गोठा (छता विरहित ) कामाचा लाभाकरिता पात्र असेल.
2) वैयक्तिक क्षेत्रावर 50 पेक्षा जास्त फळझाडे/ वृक्षलागवड केल्यास : गाय गोठा (छतासह) कामाचा लाभाकरिता पात्र असेल.
3) सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान 100 दिवस काम केल्यास : छतासह गोठा कामाचा लाभाकरिता पात्र असेल.
- अर्जदाराला पशुपालन असलेबाबतचा पशुधन पर्यवेक्षक / पशुधन अधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
- गाय गोठा करीता 2 ते 6 गुरे असणे आवश्यक आहे (जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील)
- कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र ऑनलाईन जॉबकार्ड किंवा जॉबकार्ड झेरॉक्स प्रत आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांच्या नावे जमीन / जागा असणे आवश्यक आहे (असल्यास सोबत 7/12 व 8अ व ग्रामपंचायत नमुना 9 चा उतारा (3 महिने आतील) साक्षांकित सत्य प्रत जोडणे आवश्यक)
- अर्जदार व्यक्ती सदर गावाचा रहिवाशी असणे आवश्यक आहे (रहिवाशी स्वयंघोषणापत्र)
- अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- सदरचे काम ग्रामपंचायत चालू वार्षिक कृती आराखडा / लेबर बजेट / पुरवणी लेबर बजेट मध्ये नाव समाविष्ट असलेबाबत ग्रामपंचायतचे प्राधान्य क्र. नुसार शिफारस पत्र घेणे आवश्यक आहे.
- निवडलेल्या कामाचा / जागेचा अक्षांश-रेखांश असलेला फोटो सह ग्रामसेवक, तांत्रिक सहाय्यक (नरेगा) / पशुधन पर्यवेक्षक, लाभार्थी यांची संयुक्त सहीचा स्थळ पहाणी अहवाल जोडणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे काम मंजूर झाल्यास केलेल्या कामाचे फोटो:
- काम सुरु करण्यापूर्वीच फोटो
- काम चालू असतानाचा फोटो
- काम पूर्ण झाल्याचा बोर्ड व लाभार्थी सह फोटो इत्यादी
हे तीन प्रकारामधील फोटो अंतिम देयक प्रस्ताव सोबत 7 दिवसात सादर करणे बंधनकारक राहील.
योजनेचे लाभार्थी:
- महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व पशुपालक
योजनेचा फायदा:
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांना जनावरांसाठी गोठा बनण्यासाठी अर्थसहाय्य प्राप्त होईल.
- शेतकरी गाय व म्हैशींचे दुध, गोबर, मूत्र इत्यादी विकून श्रीमंत होतील.
- राज्यातील पशुपालक तसेच शेतकरी पशुपालनासाठी प्रोत्साहित होतील तसेच राज्यातील इतर नागरिक पशुपालनासाठी आकर्षित होतील व राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील तसेच राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.
- जनावरांचा पाऊस, ऊन, थंडी, वारा यांपासून रक्षण होईल.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व पशुपालकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- गाय गोठा करीत अर्जदाराकडे कमीत कमी 2 ते 6 गुरे असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने गुरांचे टॅगिंग करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराला पशु पालनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने वैयक्तिक क्षेत्रावर 20 ते 50 व अधिक फळझाडे / वृक्षलागवड करणे आवश्यक आहे तसेच सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान 100 दिवस काम करणे आवश्यक आहे.
अर्जदारांसाठी महत्वाची गोष्ट:
खूप साऱ्या अर्जदारांची अशी तक्रार असते की आम्ही गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज भरून खूप महिने / वर्षे झालीत तरी देखील आम्हाला या योजनेचा लाभ अजून मिळाला नाही आहे त्यासाठी आम्ही सांगू इच्छितो की अर्जदाराने वैयक्तिक क्षेत्रावर 20 ते 50 व अधिक फळझाडे / वृक्षलागवड करणे आवश्यक आहे तसेच सार्वजनिक कामावर मजूर म्हणून किमान 100 दिवस काम करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास अशा अर्जदारांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- जातीचा दाखला
- जनावरांचे टॅगिंग दाखला
- कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र, ऑनलाईन जॉबकार्ड किंवा जॉबकार्ड झेरॉक्स प्रत
- जमिनीचा 7/12 व 8अ व ग्रामपंचायत नमुना 9 चा उतारा
- बँक खात्याचा तपशील
- ग्रामपंचायतीचे प्राधान्य क्रम नुसार शिफारस पत्र
- निवडलेल्या कामाचा / जागेचा अक्षांश-रेखांश असलेला फोटो सह ग्रामसेवक, तांत्रिक सहाय्यक (नरेगा) / पशुधन पर्यवेक्षक, लाभार्थी यांची संयुक्त सहीचा स्थळ पहाणी अहवाल
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- स्वघोषणापत्र
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागेल.
- ग्राम पंचायत कार्यालयातून गाय गोठा अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा लागेल.
Telegram Group | Click Here |
Gay Gotha Yojana Form PDF | Click Here |
गाय गोठा अनुदान योजना GR | Click Here |
गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023 Form PDF | Click Here |