गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना: एखाद्या शेतकऱ्याचा शेतात काम करताना किंवा शेती क्षेत्राशी निगडित इतर कामे करताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये व अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबीयांस  गोपीनाथ मुंडे अपघात विमा अंतर्गत 1 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जात.

आपण शेतकऱ्याचा अपघात झाल्यास त्याला उपचारासाठी आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने तसेच त्याला विमा सुरक्षा देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

महत्वाचे बदल:

  • 2023 मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले.
  • या योजनेचे नाव आता “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” असे आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक नाही.
  • आता विमा रक्कम आणि लाभांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
  • या योजनेनुसार, आता शेतकऱ्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांना (आई-वडील, पती/पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी यापैकी एक) अपघात विमा संरक्षण मिळेल.
  • शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून त्रास होत असल्यामुळे, आता शासन स्वतःच विमा लाभ देईल.
योजनेचे नावगोपीनाथ मुंडे अपघात योजना
विभागकृषी विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील सर्व जाती धर्माचे शेतकरी
लाभ2 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य
उद्देशअपघातग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे.
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे उद्दिष्ट

  • राज्यातील शेतकऱ्यांचा शेतात काम करताना किंवा शेती क्षेत्राशी संबंधी काम करताना अपघात मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देणे हा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य देणे हा आहे जेणेकरून शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये.
  • शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अपघातामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण प्रदान करणे.
gopinath munde shetkari apghat vima yojana

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत अपघात ग्रस्त शेतकऱ्यांना / त्यांच्या कुटुंबियांस प्रकरणपरत्वे खालील प्रमाणे लाभ अनुज्ञेय राहील.

अपघाताची बाबनुकसान भरपाई
अपघाती मृत्यू 2 लाख रुपये
अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा
दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा
एक पाय निकामी झाल्यास
2 लाख रुपये
अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास1 लाख रुपये

योजनेचे लाभार्थी:

  • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत शेतकरी व त्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य त्यामध्ये आई, वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 2 जणांना या योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेचा फायदा:

  • एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास सरकार कडून त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य दिले जाते त्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.
  • अपघात मृत्यू: जर एखाद्या शेतकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते.
  • पूर्ण अपंगत्व: अपघातामुळे शेतकरी पूर्णपणे अपंग झाल्यास त्याला 2 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत मिळते.
  • अंशतः अपंगत्व: अपघातामुळे शेतकरी अंशतः अपंग झाल्यास त्याला 1 लाख रुपयांपर्यंत मदत मिळते.
  • इतर लाभ: या योजनेतून इतरही काही लाभ उपलब्ध आहेत जसे की वैद्यकीय खर्च, अंत्यसंस्कार खर्च आणि शिक्षण खर्च.

योजनेअंतर्गत समाविष्ट अपघाताची कारणे:

  • अंगावर वीज पडून मृत्यू होणे
  • विजेचा शॉक लागून मृत्यू
  • पाण्यात बुडून मृत्यू
  • पूर
  • नैसर्गिक आपत्ती
  • सर्पदंश
  • विंचू दंश
  • बाळंतपणातील मृत्यू
  • रेल्वे अपघात
  • वाहन अपघात
  • रस्त्यावरील अपघात
  • उंचावरून पडून झालेला अपघात
  • जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा
  • खून
  • दंगल
  • नक्षलवाद्यांकडून हत्या
  • हिंस्त्र जनावरांनी चावल्यामुळे मृत्यू किंवा जखमी होणे.

खालील कारणासाठी शेतकऱ्यास लाभ दिला जाणार नाही:

  • नैसर्गिक मृत्यू
  • विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व
  • आत्महत्या
  • आत्महत्येचा प्रयत्न
  • अमली पदार्थाच्या सेवनामुळे झालेला अपघात
  • स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेणे
  • मोटार शर्यतीतील अपघात
  • गुन्हयाच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात
  • बाळंतपणातील मृत्यू
  • सैन्यातील नोकरी
  • जवळच्या लाभार्थ्यांकडून / वारसाकडून खून
  • भ्रमिष्टपणा
  • शरीरांतर्गत रक्तस्त्राव
  • युद्ध

दावा सादर करण्याचा कालावधी:

  • अपघात झालेल्या शेतकऱ्याचा दावा अर्ज विमा कालावधीत तसेच विमा कालावधी संपल्यानंतर देखील 30 दिवसांपर्यंत विमा कंपनीकडे सादर करता येईल.

अपघातग्रस्ताचे निधन झाल्यास त्यांच्या कुंटुंबातील वारसदाराची निवड व सानुग्रह अनुदानाची रक्कम पुढील प्राधान्य क्रमानुसार अदा केली जाईल

1. अपघातग्रस्त यांची पत्नी / अपघातग्रस्त स्त्रीचा पती
2. अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी
3. अपघातग्रस्ताची आई
4. अपघातग्रस्ताचा मुलगा
5. अपघातग्रस्ताचे वडिल
6. अपघातग्रस्ताची सुन
7. अन्य कायदेशीर वारसदार

आवश्यक पात्रता:

  • ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे असे शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • ज्या व्यक्तींचे 7/12 वर नाव नाही पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे अशा कुटुंबातील कोणताही 1 सदस्य या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहे.

योजनेच्या अटी व शर्ती:

  • मूळ रहिवाशी: अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी कुटुंब: अर्जदार व्यक्ती शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
  • केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • वयोमर्यादा: अर्जदार व्यक्तीचे वय 10 ते 75 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • दावा कालावधी: विमा कालावधी संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत दावा अर्ज जमा न केल्यास अशा शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही.
  • सदर योजने अंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्याने / शेतकऱ्याच्या कोणत्याही वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत.
  • विमाधारकाला स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक नाही..

अपघाताच्या घटनेच्या स्वरूपानुसार पुराव्यादाखल सादर करावयाची कागदपत्रे:

अपघाताचे स्वरूपआवश्यक कागदपत्रे
रस्ता रेल्वे अपघातइन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल,
विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालविताना अपघात झाल्यास
त्याचा मोटार वाहन परवाना
पाण्यामध्ये बुडून मृत्यूइन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल,
बुडून बेपत्ता झाल्यास फक्त प्रथम माहिती अहवाल
व क्षतिपूर्ती बंधपत्र आवश्यक
जंतुनाशके किंवा
अन्य कारणामुळे विषबाधा
इन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल,
रासायनिक विश्लेषण अहवाल (व्हिसेरा अहवाल)
विजेचा धक्का अपघातइन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल
वीज पडून मृत्यूइन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल
खूनइन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल,
रासायनिक विश्लेषण अहवाल
(व्हिसेरा अहवाल), दोषारोप पत्र
उंचावरून पडून झालेला अपघातइन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल,
पोलीस अंतिम अहवाल
सर्पदंश / विंचूदंशइन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल,
वैद्यकीय उपचारापूर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टम झाले नसल्यास
या अहवालातून सूट
मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र
अधिकाऱ्याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक.
नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्याइन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल,
नक्षलवादी हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्र
जनावरांच्या चावण्यामुळे रेबीज होऊन मृत्यूऔषधोपचाराची कागदपत्रे
जनावरांच्या हल्ल्यात / चावण्यामुळे
जखमी होऊन मृत्यू
इन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम
जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शव न मिळणेक्षतिपूर्ती बंधपत्र आवश्यक
दंगलइन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल
दंगलीबाबतची कार्यालयीन कागदपत्रे
अन्य कोणतेही अपघातइन्ववेस्ट पुंचनामा, पोस्ट मॉर्टम अहवाल
पोलीस अंतिम अहवाल
अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी
सादर करावयाची कागदपत्रे
1. अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे करणाबाबतचे
डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याच्या नोंदी

2. प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र / जिल्हा शल्य चिकित्सक यांचे
प्रतिस्वाक्षरीसह कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र.

आवश्यक कागदपत्रे:

  • ओळखीचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड
  • पत्त्याचा पुरावा: रेशन कार्ड, वीज बिल, आधार कार्ड
  • जमिनीचा उतारा: 7/12 उतारा
  • शेतकरी प्रमाणपत्र: शेतकरी दाखला किंवा ग्रामपयत कार्यालयामधून शेतकरी असल्याचा दाखला.
  • दावा अर्ज
  • अपघातग्रस्तांचा वयाचा दाखला: जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड
  • बँक खात्याची माहिती: बँक खाते पासबुक झेरॉक्स, कॅन्सल चेक
  • एफ.आय.आर कॉपी: पोलिसांनी दिलेला
  • एखादा अपघात झाल्यास प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटील अहवाल
  • इंनक्वेस्ट पंचनामा
  • मृत्यू दाखला
  • अपंगत्वाचा दाखला: सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला
  • घोषणापत्र
  • फोटो: पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अपघात घटनास्थळ पंचनामा: पोलिसांनी दिलेला
  • पोष्ठ मार्टेम रिपोर्ट: डॉक्टरांनी दिलेला
  • कृषी अधिकारी पत्र
  • औषधोपचाराचे कागदपत्र
  • डिस्चार्ज कार्ड: डॉक्टरांनी दिलेले

दावा अर्ज करण्याची पद्धत:

जेव्हा शेतकऱ्याचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्यांचे वारसदार यांनी दावा अर्ज व सोबत सर्व निर्धारीत कागदपत्रांसह परिपुर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडे 30 दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक आहे.

योजनेअंतर्गत दावा अर्ज रद्द होण्याची कारणे:

  • अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार व्यक्ती शेतकरी कुटुंबातील नसल्यास
  • विमा कालावधीपूर्वी अपंगत्व आल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराला आत्महत्येचा प्रयत्न करताना अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास दावा अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जात खोटी माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.

दावा अर्ज करताना लक्षात ठेवायच्या गोष्टी:

  • अर्ज करण्यापूर्वी पात्रता व निकष तपासून घ्या.
  • अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची तपासणी करा
  • अर्ज अचूक व संपूर्ण भरा
  • अर्जात खोटी माहिती भरून नका.
Telegram GroupJoin
Gopinath Munde Apghat Vima Yojana PDFClick Here
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana
Application Form PDF
Click Here
टोल-फ्री क्रमांक1800-233-1122

महत्वाची गोष्ट:

या योजनेचे नियम आणि अटी यामध्ये वेळोवेळी बदल होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे योजनेच्या अचूक माहितीसाठी अधिकृत पोर्टल ला किंवा आपल्या क्षेत्रातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.

महत्वाचे मुद्दे:

  • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सध्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणून ओळखली जाते
  • राज्यातील शेतकरी तसेच त्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा एक महत्वपूर्ण अशी एक योजना आहे.
  • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत आकारण्यात येणारी विम्याची रक्कम 32.23 रुपये निर्धारित केली गेली आहे जी शासनामार्फत दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला अदा करण्यात येते त्यामुळे शेतकऱ्याला विमा हप्त्याची रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दिले जाणारे आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
  • विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्याच्या कुटुंबातील विहितीधारक खातेदार म्हणुन नोंद नसलेले कोणताही 1 सदस्य त्यामध्ये आई वडील, लाभार्थीचे पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही 1 व्यक्ती असे 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 2 जणांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विम्याचा हफ्ता भरण्याची आवश्यकता नाही कारण महाराष्ट्र शासनाद्वारे दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला विम्याची रक्कम अदा केली जाते.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

Swadhar Yojana Income Limit
स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!