Garodar Mata Yojna Marathi

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना महाराष्ट्र राज्यातील गर्भवती आणि स्तनपान कालावधीत महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देण्यासाठी तसेच त्यांना पोषक आहार उपलब्ध करून त्यांच्या आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे.

या योजनेअंतर्गत गर्भवती महिलेने नोंदणी केल्यानंतर तिला राज्य शासनातर्फे दोन हप्त्यांमध्ये एकूण 6,000/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रथम प्रसुतीच्या वेळी 3,000/- रुपये आणि बालक 6 महिन्यांचे झाल्यावर 3,000/- रुपये देण्यात येतात.

आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला गरोदरपणात देखील रोजगारासाठी गरोदरपणाच्या शेवटच्या टप्यापर्यंत काम करत राहतात. त्यामुळे त्यांच्या वजनात योग्य त्या प्रमाणात वाढ होत नाही. प्रसुतीनंतर लगेचच शरीर साथ देत नसताना देखील कामाला लागतात. त्यामुळे त्यांच्या शरीराला परत पूर्वावस्थेत यायला बाधा निर्माण होते. त्यांना नवजात अर्भकाचे पहिल्या 6 महिन्यापर्यंत स्तनपान देखील व्यवस्थितपणे करता येत नाही. त्यामुळे अशा महिलाच्या उत्पन्नात होणारे नुकसान अंशतः भरून काढण्यासाठी प्रसूती लाभ योजनेची नितांत आवश्यकता लक्षात घेऊन केंद्र शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांना त्यांच्या गरोदर आणि स्तनपान कालावधीमध्ये बुडीत मजुरीपोटी नुकसानभरपाई म्हणून रोख रक्कम देऊन त्यांचे आरोग्य व आहाराचा दर्जा सुधारावा या उद्देशाने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना महाराष्ट्र (IGMSY) सशर्त प्रसुती लाभ योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला.

योजनेचे नावइंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना महाराष्ट्र
उद्देशमहिलांना गर्भावस्थेत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे
लाभार्थीराज्यातील गरोदर महिला
लाभमहिलांचा आर्थिक विकास करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

योजनेचे उद्दिष्ट

  • गरोदर स्त्रिया आणि स्तनदा माता यांना त्यांच्या गरोदर आणि स्तनपान कालावधीमध्ये बुडीत मजुरीपोटी नुकसानभरपाई म्हणून रोख रक्कम देऊन त्यांचे आरोग्य व आहाराचा दर्जा सुधारावा या उद्देशाने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना महाराष्ट्र सुरु केली आहे.
  • महिलांना त्यांच्या गरोदर पनात आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
Garodar Mata Yojna Marathi

योजनेचे वैशिष्ट्य:

  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
  • महिलांना त्यांच्या गरोदर पनात आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.
  • घरी प्रसूती झालेल्या महीलांनाही सदर योजनेचा लाभ दिला जाईल.

योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:

  • पहिल्या टप्प्यात 2,000/- रुपये इतकी रक्कम गरोदरपणात नोंदणी करण्याच्या अटीवर, गरोदरपणाचे 6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी हे अंगणवाडी सेविकेमार्फत गरोदर मातांच्या बँक / पोस्ट ऑफीस खात्यात जमा करतील.
  • दुसऱ्या टप्प्यात 2,000/- रुपये इतकी रक्कम बालकाच्या जन्माच्या 3 महिन्यानंतर, बालकाचे लसीकरण झाल्याच्या अटीवर व नियमितपणे स्तनपान होण्याच्या अटीवर, बाल विकास प्रकल्प अधिकारी हे अंगणवाडी सेविके मार्फत मातेच्या बँक / पोस्ट ऑफीस खात्यात जमा करतील.
  • तिसऱ्या टप्प्यात 1,000/- रुपये इतकी रक्कम बालकाच्या जन्माच्या 6 महिन्या नंतर नियमित स्तनपान व लसीकरण होण्याच्या अटीवर, बाल विकास प्रकल्प अधिकारी हे अंगणवाडी सेविकेमार्फत मातेच्या बँक / पोस्ट ऑफीस खात्यात जमा करतील.
IGMSS Chart

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील गर्भवती महिला

योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ:

  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना महाराष्ट्र अंतर्गत गर्भवती महिलेने नोंदणी केल्यानंतर तिला राज्य शासनातर्फे दोन हप्त्यांमध्ये एकूण 6,000/- रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रथम प्रसुतीच्या वेळी 3,000/- रुपये आणि बालक 6 महिन्यांचे झाल्यावर 3,000/- रुपये देण्यात येतात.

योजनेचा फायदा:

  • महिलांना गर्भावस्तेत पोषक आहार घेणे शक्य होईल.
  • महिलांना त्यांच्या गर्भावस्थेत काम करण्याची गरज भासणार नाही.

आवश्यक पात्रता:

  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेच्या अटी व शर्ती:

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील गर्भवती महिलांना इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिला गर्भाची असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे कारण कुटुंबातील अन्य सदस्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार नाही.
  • सर्व शासकीय व सार्वजनिक उपक्रमातील (केंद्र / राज्य) कर्मचारी यांना सहवेतन मातृत्व रजा मिळत असल्यामुळे त्यांना या योजनेमधून वगळण्यात आलेले आहे.

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • प्रतिज्ञा पत्र

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदार महिला गर्भावस्तेत ज्या आरोग्य केंद्रात तपासणी करत असेल तेथील आरोग्य सेविकेद्वारे गर्भवती महिलांचा इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत अर्ज भरला जाईल. गर्भवती महिलांना फक्त आवश्यक अशा कागपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

किंवा

  • गर्भवती महिलेला आपल्या क्षेत्रातील महिला व बाल विकास विभागात जाऊन इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
  • भरलेला अर्ज महिला व बाल विकास विभागात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. [Garodar Mata Yojna Marathi]
Telegram GroupJoin
Indira Gandhi Matritva Sahyog Yojana Maharashtra GRClick Here

Leave a Comment