इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र

राज्यातील विधवा महिलांना दरमहिना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.

राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरवात करत असते त्या योजनांमधील इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना एक महत्वाची योजना आहे.

घरातील कर्त्या पुरुषाच्या एकाएकी मृत्यूमुळे कुटुंबावर खूप मोठे आर्थिक संकट येते व पतीच्या मृत्यूमुळे विधवा महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी आवश्यक पैशांसाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो व इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासते त्यामुळे राज्यातील विधवा महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र शासनाने देशात या योजनेची सुरुवात करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून प्रतीमहा 200/- रुपये  व राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत प्रतीमहा  400/- रुपये असे एकूण प्रतीमहा 600/- रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते.

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र

योजनेचे नावVidhwa Pension Yojana Maharashtra
लाभार्थीराज्यातील विधवा महिला
लाभदरमहिना 600/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
उद्देश्यविधवा महिलांना आर्थिक सहाय्य देणे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाईन

इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट

  • राज्यातील विधवा महिलांना आर्थिक सहाय्य करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार आणणे.

योजनेचे वैशिष्ट्य:

  • योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:

केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडूनएकूण
दरमहा 200/- रुपयेदरमहा 400/- रुपयेदरमहा 600/-रुपये

योजनेचे लाभार्थी:

  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या 40 ते 65 वर्षाखालील वयोगटातील विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र आहेत.

योजनेचा फायदा:

  • या योजनेअंतर्गत राज्यातील विधवा महिलांना दरमहा 600/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
  • विधवा महिलांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही तसेच पैशांअभावी त्यांची हेळसांड होणार नाही.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब विधवा महिलांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार येईल.

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी:

  • 3 महिने

निर्णय प्रक्रियेत तपासणी करण्यात येत असलेल्या बाबी

ऑनलाईन प्रणालीव्दारे अर्ज दाखल झाल्यावर दोन महिन्याच्या आत तलाठी (चौकशी अधिकारी) लाभार्थ्यांच्या आलेल्या अर्जावर सखोल चौकशी करुन, कागदपत्राची छाननी करुन सविस्तर अहवाल सादर करतात व मिटींगमध्ये मंजुरीस पाठविले जातात. मिटींगमध्ये प्रकरणे मंजुर/नामंजूर झाल्यावर मंजुर/नामंजूर अर्जाची माहिती लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रणालीव्दारे कळविली जाते. त्यानंतर लाभार्थाची ओळख पटवून घेऊन, रजिस्टरमध्ये नोंद घेऊन, सर्व पात्र लाभार्थ्यांचे बिल दरमहा कोषागारात सादर केले जाते. त्यावरुन योजनानिहाय बॅक याद्या तयार करुन, लाभार्थ्यांना बॅक खात्यावर पैसे वितरीत केले जातात.

Indira Gandhi Vidhava Pension Yojana

आवश्यक पात्रता:

  • अर्जदार विधवा  महिला महाराष्ट्र/भारताची रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेच्या अटी व शर्ती:

  • फक्त आर्थिक दृष्ट्या गरीब विधवा  महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • केवळ 40 ते 65 वर्षाखालील महिलांना या योजनेअंतर्गत सहभागी केले जाईल.
  • 65 वर्षावरील महिलांना इंदिरा गांधी विधवा पेंशन योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

आवश्यक कागदपत्रे:

  • विहीत नमुन्यातील अर्ज
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • पतीचा मृत्यु दाखला – ग्रामसेवक किंवा नगरपालिका यांचेकडील मृत्युचा दाखला.
  • दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीचा साक्षांकित प्रमाणपत्र – ग्रामसेवक किंवा नगरपालिका यांचेकडील दाखला.
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
  • बँक खात्याचा तपशील
  • वयाचा पुरावा
  • पत्त्याचा पुरावा
  • बीपीएल कार्ड
  • शपथपत्र

अर्ज कोठे करावा:

  • अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.

अर्जाची कार्यपद्धती:

  • अर्ज स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांकडून पात्रतेची तपासणी केली जाते.
  • अर्जदार पात्र असल्यास लाभार्थ्याला पेंशन मंजूर केले जाते.

महत्वाच्या गोष्टी:

  • ही योजना केंद्र आणि राज्य सरकारद्वारे संयुक्तपणे राबवली जाते.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख जाहीर केलेली नाही.
  • योजनांमध्ये वेळोवेळी बदल होण्याची शक्यता असल्याने नवीन माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
Telegram GroupJoin
संपर्क कार्यालयाचे नावजिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार,
संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना पोर्टलClick Here

Leave a Comment