आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे

आंतरजातीय विवाह अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करताना अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी लागतात.

  • योजनेचा अर्ज: योजनेचा अर्ज आम्ही खाली दिलेला आहे तो डाउनलोड करा किंवा कार्यालयात जाऊन अर्ज मिळवू शकता.
  • आधार कार्ड: अर्जदार वधू आणि वराचे आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला: रेशन कार्ड, वीज बिल
  • विवाह प्रमाणपत्र: विवाह केल्याचे प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र: वधू आणि वराचे सक्षम अधिकारी यांनी दिलेले जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला: सक्षम प्राधिकाऱ्यानी दिलेला उत्पनाचा दाखला
  • बँक खात्याची माहिती: बँक पासबुक झेरॉक्स
  • फोटो: लग्नाचा एक फोटो, लग्न पत्रिकेचा फोटो, पासपोर्ट आकाराचा फोटो, जामीनदारांचे फोटो
  • विवाहानंतर तीन वर्षांपर्यंत एकत्र राहण्याचा शपथपत्र
  • वर आणि वधू यांच्या वार्षिक उत्पन्नाचा पुरावा (जर नोकरी करत असतील तर वेतनपत्रक, आणि जर व्यवसाय करत असतील तर ITR)

कागदपत्रे जमा करण्याची प्रक्रिया:

  • विहित नमुना अर्ज भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • भरलेला अर्ज आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयात जमा करा.
  • अर्ज जमा केल्यानंतर अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जाईल आणि जर कागदपत्रे पूर्ण आणि योग्य असतील तर तुम्हला पात्र समजून अनुदान मंजूर केले जाईल.
  • अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

महत्त्वाचे मुद्दे:

  • अर्ज विवाहाच्या तीन वर्षांच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
  • वर आणि वधू हे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • विवाह नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
  • वर आणि वधू यांच्यातील वय फरक किमान 21 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार किंवा त्याचा/तिची पत्नी/पती यांनी शासनाच्या कोणत्याही इतर योजनेतून आर्थिक लाभ घेतला नसावा.
  • योजनेमध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे आवश्यक कागदपत्रांमध्ये बदल होऊ शकतात.
कार्यालय पत्तासंबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी,
जिल्हा परिषद / मुंबई शहर व उपनगरासाठी
समाज कल्याण अधिकारी.
संपर्क क्रमांक1800-233-7337
अधिकृत वेबसाईटClick Here
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी