गरोदर महिलांसाठी सरकारी योजना महाराष्ट्र 2024 | अर्ज सुरु

गरोदर महिलांसाठी सरकारी योजना: केंद्र सरकार देशातील नागरिकांच्या हितासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी नवजात बालकांपासून ते वृद्धांसाठी विविध सरकारी योजनांची सुरुवात करत असते. आज आपण केंद्र सरकारद्वारे देशातील गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र आहे.

योजनेअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या गर्भवती महिलांना व त्यांच्या नवजात बालकांना पोषक आहार मिळावा यासाठी 6,000/- रुपयांची रोख रक्कम दिली जाते.

Table of Contents

गरोदरपणात डॉक्टरांची फी, हॉस्पिटल मध्ये येण्या जाण्याचा खर्च, औषधांचा खर्च, रक्ताची तपासणीचा खर्च तसेच सोनोग्राफी खर्च आणि इतर खर्च करणे आर्थिक दृष्टया गरीब कुटुंबांना परवडण्यासारखे नसते त्यामुळे आज सुद्धा ग्रामीण भागात गर्भवती महिलांची घरी प्रसूती केली जाते व गर्भवती महिलांची घरी प्रसूती केल्यामुळे महिला तसेच त्याच्या नवजात बालकांच्या जीवाला धोका निर्माण होतो व परिणामी माता व नवजात बालकांचा मृत्यू देखील होतो त्यामुळे राज्यातील गर्भवती महिला व त्यांच्या नवजात बालकांचे आरोग्य हित लक्षात घेऊन तसेच त्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने देशातGarbhavati Mahila Yojana Maharashtra सुरु करण्याचा एक महत्वाचा असा निर्णय घेतला ज्यासाठी केंद्र सरकारने दरवर्षी 1600 कोटीचे बजेट तयार केले आहे.

नवजात बालक आईच्या दुधावरच अवलंबून असते व त्यांना आईच्या दूधातूनच पोषक आहार मिळतो त्यामुळे प्रसूती नंतर मातांना पोषक आहार मिळणे अत्यंत गरजेचे असते  परंतु देशातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगात असतात त्यामुळे अशा कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते त्यामुळे अशा कुटुंबाला आपल्या परिवाराच्या गरज पूर्ण करणे अशक्य असते त्यामुळे प्रसूतीनंतर कुटुंबाला मातेला पोषक आहार देणे शक्य नसते व मातेला पोषक आहार न मिळाल्यामुळे याचा परिणाम नवजात बालकाच्या आरोग्यावर होतो व बाळ कुपोषण तसेच इतर आजारांना बळी पडते.

गरीब कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्यामुळे अशा कुटुंबांना महिलांच्या प्रसूती काळात त्यांना लागणाऱ्या खर्चाची पूर्ती करण्यासाठी पैशांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासते तसेच दुसऱ्यांकडून कर्ज घ्यावे लागते त्यामुळे अशा आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील परिवाराला महिलांच्या प्रसूती काळात खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांच्या या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र शासनाने Janani Suraksha Yojana In Marathi सुरु करण्याचा एक महत्वाचा असा निर्णय घेतला.

योजनेचा लाभ फक्त दुसऱ्या प्रसूती पर्यंतच दिला जातो परंतु जर गर्भवती माता तिसऱ्या बाळंतपणानंतर स्व खुशीने ऑपरेशन करण्यात तयार असेल तर त्यांना जननी सुरक्षा योजनेचा लाभ दिला जाईल. अशा स्त्रियांना 700/- रुपयांची रक्कम दिली जाईल तसेच महिलांना हॉस्पिटल मध्ये येण्या जाण्याचा खर्च तसेच रुग्णालयात बाळंतिणीसोबत राहण्याच्या खर्चासाठी 600/- रुपये दिले जातील.
जर महिलेची घरी प्रसूती झाली तर अशा परिस्थितीत त्या महिलेला 7 दिवसाच्या आत 500/- रुपयांची राशी दिली जाईल. [गरोदर महिलांसाठी सरकारी योजना]

वाचकांसाठी महत्वाची सूचना

आम्ही महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात अशा कोणी गर्भवती महिला असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ मिळवून स्वतःसाठी लाभ मिळवू शकतील व स्वतःसाठी पोषक आहार मिळवू शकतील.

योजनेचे नावजननी सुरक्षा योजना मराठी माहिती
लाभार्थीदेशातील/राज्यातील गर्भवती महिला
लाभगर्भवती महिलांना 6,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
उद्देशयोजनेअंतर्गत गर्भवती महिलांना पोषक आहार देणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

गरोदर महिलांसाठी सरकारी योजना चे उद्दिष्ट

 • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या गर्भवती महिलांना तसेच त्यांच्या नवजात बालकांना पोषक आहार मिळावा या उद्देशाने Government Schemes For Pregnant Ladies In Maharashtra ची सुरुवात करण्यात आली आहे.
 • गर्भवती माता व त्याच्या नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे.
 • गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेणे.
 • घरी करण्यात येणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण रोखणे.
 • राज्यातील गर्भवती महिलांना तसेच त्यांच्या नवजात बालकांना सशक्त व आत्मनिर्भर करणे.
 • राज्यातील गर्भवती महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
 • राज्यातील गर्भवती महिलांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 • महिलांचे सामाजिक स्तर उंचावणे.
 • नवजात बालकांना आर्थिक सुरक्षा आणि पुरेसे पोषण देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • गर्भवती महिलांची स्थिती सुधारण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • प्रसूतीच्या समस्यांचा मागोवा घेणे.
 • प्रसूतीनंतर गर्भवती माता व त्यांच्या नवजात बालकांची काळजी घेणे. [गरोदर महिलांसाठी सरकारी योजना]
गरोदर महिलांसाठी सरकारी योजना

Government Scheme For Pregnant Ladies In Maharashtra ची वैशिष्ट्ये

 • केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत जननी सुरक्षा योजना ची सुरुवात करण्यात आली आहे.
 • देशातील गर्भवती महिलांचे व त्यांच्या नवजात बालकांचा मृत्युदर कमी करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
 • राज्यातील गर्भवती महिला व त्यांच्या नवजात बालकांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी सदर योजना महत्वाची ठरणार आहे.
 • Janani Suraksha Yojana Maharashtra साठी केंद्र शासनाकडून दरवर्षी 1600 करोड रुपयांचे बजट निर्धारित केले जाते.
 • या योजनेअंतर्गत देशातील सर्व जाती धर्माच्या गर्भवती महिलांना लाभ दिला जातो.
 • योजनेअंतर्गत सर्व सरकारी आरोग्य संस्था आणि सरकारने प्रमाणित केलेल्या खाजगी रुग्णालयांचा समावेश केला गेला आहे.
 • योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि नवजात बालकांना अधिक संरक्षण देण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 • गरोदर महिलांना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागू नये म्हणून या योजनेची अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे.
 • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल. [गरोदर महिलांसाठी सरकारी योजना]

महिलांना स्वरोजगार सुरु करण्यासाठी सरकार देत आहे 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज त्यासाठी वाचा महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना

निराधार व्यक्तींना सरकार देत आणि दरमहिन्याला 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य त्यासाठी वाचा संजय गांधी निराधार योजना

महाराष्ट्र शासन मुलींच्या शिक्षणासाठी देत आहे 98 हजारांचे आर्थिक सहाय्य्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना

सरकार देत आहे मोफत पिठाची गिरणी त्यासाठी वाचा पिठाची गिरणी योजना

सरकार देत आहे मोफत घरे त्यासाठी वाचा रमाई घरकुल योजना

Garodar Mata Yojna Marathi अंतर्गत माता व नवजात बालकांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य

 • ग्रामीण भागातील गर्भवती मातेची जर शासकीय/ निमशासकीय आरोग्य संस्थेत प्रसूती झाली असल्यास तिला प्रसुतीच्या तारखेनंतर 7 दिवसाच्या आत 700/- रुपये इतकी रक्कम धनादेशाद्वारे दिली जाते.
 • शहरी भागातील गर्भवती मातेची जर शासकीय/ निमशासकीय आरोग्य संस्थेत प्रसूती झाली असल्यास तिला प्रसुतीच्या तारखेनंतर 7 दिवसाच्या आत 600/- रुपये इतकी रक्कम धनादेशाद्वारे दिली जाते किंवा आधार संलग्न असेल्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
 • शहरी तसेच ग्रामीण भागासाठी दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील गर्भवती मातेची प्रसुती घरी झाल्यास 500/- रुपये इतकी रक्कम प्रसुतीच्या तारखेनंतर 7 दिवसाच्या आत देण्यात येते.
 • सिझेरीयन शस्त्रक्रिया (Cesarean Delivery) झाल्यास पात्र लाभार्थी महिलेस 1,500/- रुपये इतकी रक्कम देण्यात येते.
 • जेव्हा एखाद्या महिलेची सरकारी रुग्णालयात प्रसूती होते तेव्हा तिला उर्वरित रक्कम म्हणजे प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 5000/- रुपये मिळतात.
 • याशिवाय जननी योजनेत नोंदणी केलेल्या महिलांना प्रसूतीनंतर 5 वर्षांपर्यंत माता आणि बाळाच्या लसीकरणाबाबतचे संदेशही मिळतात.
 • बालक 5 वर्षाचे होईपर्यंत सर्व प्रकारच्या लस सरकारी रुग्णालयात मोफत दिल्या जातात. [गरोदर महिलांसाठी सरकारी योजना]

जननी सुरक्षा योजना मराठी चे लाभार्थी

 • महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्मातील गर्भवती महिला जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

Janani Suraksha Yojana Information In Marathi अंतर्गत गर्भवती महिलांना होणारा फायदा

 • Sarkar Prasuti Sahayata Yojana Maharashtra अंतर्गत राज्यातील गर्भवती मातांना प्रसूतीनंतर 6,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते.
 • योजनेअंतर्गत महिलांना आरोग्य केंद्रात मोफत प्रसूती तपासणी तसेच मोफत रक्त व इतर तपासणी केली जाते यासाठी महिलांकडून कुठल्याच प्रकारचा शुल्क आकारला जात नाही.
 • या योजनेअंतर्गत गर्भवती महिला तसेच त्यांच्या नवजात बालकांचे जीवनमान सुधारेल.
 • योजनेअंतर्गत गर्भवती महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • गर्भवती महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
 • योजनेअंतर्गत महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल.
 • Prasuti Sahayata Yojana Maharashtra अंतर्गत महिला हॉस्पिटल मध्ये प्रसूती करण्यास प्रोत्साहित होतील.
 • राज्यातील गर्भवती महिलांना त्यांच्या प्रसूती काळात पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची सुद्धा गरज भासणार नाही. [गरोदर महिलांसाठी सरकारी योजना]

Janani Suraksha Yojana Marathi अंतर्गत आवश्यक पात्रता

 • जननी सुरक्षा योजना संपूर्ण देशातील गर्भवती महिलांसाठी लागू आहे त्यामुळे गर्भवती महिला ज्या राज्यातून अर्ज करणार आहे त्या राज्याची ती मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
 • सरकार महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे त्यासाठी वाचा महिला बचत गट कर्ज योजना

Pregnancy Yojana Maharashtra In Marathi च्या अटी व शर्ती

 • अर्जदार गर्भवती महिलेचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्यास अशा महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे अर्जदार गर्भवती महिलेचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
 • जननी सुरक्षा योजना इन मराठी चा लाभ फक्त 2 जिवंत अपत्यांपर्यंतच देय राहील.
 • तिसऱ्या अपत्यासाठी जननी सुरक्षा योजनेचा लाभ दिला जाणार नाही परंतु महिला तिसऱ्या अपत्यानंतर ऑपरेशन करणार असेल तर तिला तिसऱ्या अपत्यासाठी देखील लाभ दिला जाईल.
 • या योजनेअंतर्गत सरकारी आरोग्य संस्था तसेच सरकारने प्रमाणित केलेल्या खाजगी रुग्णालयात प्रसूती झाल्यावर लाभ दिला जाईल याशिवाय अन्य कोणत्याही रुग्णालयात प्रसूती झाल्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • प्रसूती दरम्यान अपत्य दगावल्यास अशा परिस्थिती महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार महिलेला तिच्या स्वतःच्या नावाने उघडलेल्या बँक खात्याची माहिती देणे आवश्यक आहे. [गरोदर महिलांसाठी सरकारी योजना]

गर्भवती महिला योजना महाराष्ट्र ची सेवा देणाऱ्या आरोग्य संस्था

ग्रामीण भागात – उपकेंद्रे, प्र‍ाथमिक आरोग्‍य केंद्रे, ग्रामीण रुग्‍णालये, उपजिल्‍हा रुग्‍णालये, जिल्‍हा स्‍ञी रुग्‍णालये, जिल्‍हा रुग्‍णालये, आणि जननी सुरक्षा योजनेकरिता मानांकित केलेली खाजगी रुग्‍णालये.

शहरी भागात – वैदयकीय महाविदयालये, नगरपालिका व महानगरपालिका यांच्‍या कार्यक्षेञतील नागरी आरोग्‍य केंद्रे, नागरी कुटुंब कल्‍याण केंद्रे व त्‍यांच्‍याकडील इतर रुग्‍णालये आणि शासन अनुदानित रुग्‍णालये.

जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र अंतर्गत आरोग्य सेविकांचे कार्य

 • जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र मध्ये आशा वर्करचा महत्वाचा असा सहभाग असतो कारण गर्भवती मातेचे आरोग्य संस्थेत नाव नोंदणी करून घेण्यापासून ते जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळवून देण्यापर्यंत खालील प्रमाणे विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
 • योजनेअंतर्गत गर्भवती महिलेचे नाव नोंदणी करून घेणे.
 • गर्भवती महिलेचे नाव नोंदणी केल्यानंतर तिला जननी सुरक्षा कार्ड मिळवून देणे.
 • जननी सुरक्षा योजनेचा अर्ज भरून घेणे.
 • गर्भवती महिलांना गरोदर काळात कोणती काळजी घ्यावी हे सांगणे तसेच खानपान काय करावे ते सांगणे.
 • पात्र लाभार्थी महिलेकडून आवश्यक अशी कागदपत्रे जमा करुन घेणे.
 • प्रसूतीपूर्वीच्या तपासण्या करण्याची आठवण करून देणे.
 • गर्भवती महिलांना लसीकरण आणि लोहयुक्त गोळया मिळवून देणे किंवा त्याकरिता मदत करणे.
 • महिलांना शासकीय आरोग्य संस्थेत प्रसुतीकरिता प्रवृत्त करणे.
 • लाभार्थी महिलेकडे स्वतःचे बँक खाते नसल्यास, त्यांना बँकेत खाते उघडून घेण्यासाठी मदत करणे. [गरोदर महिलांसाठी सरकारी योजना]

Janani Suraksha Yojana In Marathi अंतर्गत आशा वर्कर्स ना दिले जाणारी लाभ राशी

 • Janani Suraksha Yojana In Marathi अंतर्गत ग्रामीण भागात गर्भवती महिलांना आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याबद्दल आशा कार्यकर्तीनां प्रति महिला 600/- रुपयांचे मानधन देण्यात येते.
 • त्यामधील 300/- रुपये गर्भवती महिलेच्या प्रसूतीपूर्व आणि उर्वरित 300/- रुपये आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देण्यात येते.
 • शहरी भागात गर्भवती महिलेची प्रसुती आरोग्य संस्थेत करण्यासाठी प्रवृत्त केल्यास प्रति महिला 400/- रुपये आशा कार्यकर्तीस मानधन म्हणून देण्यात येते. त्यामधील 200/- रुपये प्रसूतीपूर्व आणि 200/- रुपये आरोग्य संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देण्यात येते.
 • मुलींचे आरोग्य, शिक्षण, मुलीचे लग्न तसेच मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक साहाय्य त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना
 • राज्यातील 65 वर्षावरील नागरिकांना सरकार देत आहे दर महिना 1500/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा श्रावणबाळ योजना
 • सरकार गटई कामगारांना देत आहे मोफत पत्र्याचे स्टॉल त्यासाठी वाचा गटई स्टॉल योजना

गरोदर महिलांसाठी सरकारी योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • बँक खात्याचा तपशील
 • आरोग्य केंद्राचे कार्ड

महिलांसाठी सरकारी योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

 • महिला ज्या आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयात प्रसूती तपासणी करत आहे त्या केंद्र आरोग्य सेविकांमार्फत जननी सुरक्षा योजनेचा अर्ज भरला जातो त्यामुळे जननी सुरक्षा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी गर्भवती महिलेला कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासत नाही.अर्जदार गर्भवती महिलेला योग्य ती कागदपत्रे द्यावी लागतात. [गरोदर महिलांसाठी सरकारी योजना]
Telegram GroupJoin

जननी सुरक्षा योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

जननी सुरक्षा योजना कोणासाठी लागू आहे?

देशातील गर्भवती महिलांसाठी जननी सुरक्षा योजना लागू आहे

जननी सुरक्षा योजना चा लाभ काय आहे?

योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य केले जाते

जननी सुरक्षा योजना चा उद्देश काय आहे?

राज्यातील गर्भवती महिलांचा तसेच त्यांच्या नवजात बालकांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे

जननी सुरक्षा योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

जननी सुरक्षा योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करावा लागतो.

जननी सुरक्षा योजना चा अर्ज कोठे उपलब्ध आहे

राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शासकीय ग्रामीण व शहरी रुग्णालये, शासनमान्य खाजगी रुग्णालये या ठिकाणी जननी सुरक्षा योजना चा लाभ मिळवता येतो.

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला जननी सुरक्षा योजना महाराष्ट्र ची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल. [गरोदर महिलांसाठी सरकारी योजना]

Leave a Comment