जिव्हाळा योजना 2024

जिव्हाळा योजना : महाराष्ट्र राज्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून लाखो कैदी शिक्षा भोगत आहेत त्यामधील बहुतांश कैदी हे कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या कारणावरून तसेच कौटुंबिक वादातून शिक्षा भोगत आहेत हे शिक्षा भोगत असलेले कैदी कुटुंबातील एक कमावती असल्याकारणामुळे त्यांना एकाएकी कारागृहात टाकल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी विविध अडचणींचा सामना करावा लागतो त्यांना आपल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च, औषध उपचाराचा खर्च व इतर गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चासाठी इतर कोणावर तरी अवलंबून राहण्याची वेळ येते व स्वतःकडील एखादी वस्तू गहाण ठेवून जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागते व वेळेवर कर्ज ना फेडू शकल्यामुळे कुटुंबाला खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाचा शुभ मुहूर्त साधून महाराष्ट्र राज्य बँकेच्या सहकार्याने राज्यात जिव्हाळा योजना सुरु करण्याचा एक अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतला.

महाराष्ट्र राज्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना अत्यंत कमी व्याज दराने म्हणजेच 7 टक्के व्याज दराने 50,000/- रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून लाभार्थी कुटुंबे या आर्थिक सहाय्याच्या मदतीने आपल्या जीवनातील दैनंदिन गरज पूर्ण करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील जेणेकरून त्यांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही व कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून शिक्षण भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना कमी व्याज दराने 50,000/- रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे.

जिव्हाळा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची परतफेड

शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची खाती महाराष्ट्र राज्य बँकेत उघडण्यात येतात व कैद्यांच्या कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशांना या खात्यात जमा करण्यात येते व या जमा रकमेतून कैद्यांच्या कुटुंबांनी घेतलेल्या कर्जाची तसेच व्याजाची परतफेत केली जाते त्यामुळे कैदी कारागृहात शिक्षा भोगत असतानासुद्धा स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.

योजनेचे नावजिव्हाळा योजना
विभागसामाजिक कल्याण विभाग
योजनेची सुरुवात1 मे 2022
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीदीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची कुटुंबे
लाभ50,000/- रुपयांचे कर्ज
उद्देशकैद्यांच्या कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक विकास करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

जिव्हाळा योजनेचे उद्दिष्ट

  • राज्यात बहुतांश कैदी हे छोट्या छोट्या कारणावरून दीर्घकाळासाठी कारागृहात शिक्षा भोगत असतात त्यामुळे कुटुंबातील कमावता सदस्य एकाएकी कारागृहात गेल्यामुळे कुटुंबाला आपल्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आजारी पडल्यावर औषध उपचारासाठी खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे राज्य शासनाने शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबाला स्वतःच्या दैनंदिन गरज पूर्ण करता याव्यात यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने जिव्हाळा योजनेची सुरुवात केली आहे.
  • शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने जिव्हाळा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • कैद्यांची मानसिकता बदलण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना एक योग्य दिशा दाखविण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना एक चांगला व्यक्ती बनविण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
Jivhala Yojana

योजनेचे वैशिष्ट्य:

  • महाराष्ट्र राज्यातील सर्व कारागृहात या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत कुठल्याच प्रकार ची जात व धर्माची मर्यादा नाही त्यामुळे सर्व जाती धर्मातील कैद्यांची कुटुंबे या योजनेचा लाभ मिळवू शकतील.
  • शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली देशातील पहिली अशी एक योजना आहे.
  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून अर्जदाराला अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी कर्जाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
  • या योजनेअंतर्गत कर्ज परतफेड रकमेमधील 12 टक्के निधी कैद्यांच्या कल्याण निधीला देण्यात येतो.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यात दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची कुटुंबे जिव्हाळा कर्ज योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज:

  • या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला 50,000/- रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

कर्जावर आकाराला जाणारा व्याजदर:

  • या योजनेअंतर्गत कर्ज रकमेवर 7 टक्के व्याजदर आकारला जातो.

कर्जाचा परतफेड कालावधी:

  • जिव्हाळा योजनेअंतर्गत कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी निश्चित केला गेला नाही आहे.

योजनेचा लाभ:

  • महाराष्ट्र राज्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना जिव्हाळा योजनेअंतर्गत 7 टक्के व्याज दराने 50000/- रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत कमी व्याजदर आकारला जातो.
  • जिव्हाळा योजनेअंतर्गत अर्जदाराला कर्ज मिळवण्यासाठी जमीन ठेवण्याची किंवा वस्तू गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही.
  • योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी कुठल्याच प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क भरण्याची गरज नाही.
  • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत कैद्यांच्या कुटुंबांना 50000/- रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे कुटुंबाला त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही.

योजनेसाठी आवश्यक पात्रता:

  • शिक्षा भोगत असलेला कैदी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेच्या अटी व शर्ती:

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील कैद्यांच्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कैद्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची कुटुंबे या योजनेचा लाभ मिळवू शकतात.
  • जिव्हाळा योजनेअंतर्गत कैद्यांच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी राज्य शासनाची असणार नाही.
  • कैद्यांच्या शिक्षेचा कालावधी व त्यांचे कारागृहातील उत्पन्न बघूनच यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • कैद्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कैद्याची संमती असणे अनिवार्य आहे त्यामुळे जर एखाद्या कैद्याची संमती नसेल तर अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

योजनेअंतर्गत अर्ज भरल्यानंतर करण्यात येणारी कार्यवाही:

  • अर्जदाराने अर्ज भरल्यानंतर सदर अर्ज अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठविण्यात येतो.
  • अधिकारी सदर योजनेतील माहिती व कागदपत्रांची तपासणी करतात व शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचे उत्पन्न व त्याच्या शिक्षेचा कालावधी पाहून या योजनेसाठी पात्र ठरविण्यात येते.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • शपथ पत्र
  • बँक खात्याचा तपशील

योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे:

  • शिक्षा भोगत असलेला कैदी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • कैदी शिक्षा भोगत असलेला शिक्षेचा कालावधी कमी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • कैद्याला त्याच्या कामाच्या मोबदल्यात दिले जाणारे मानधन कमी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जामध्ये खोटी तसेच चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

  • जिव्हाळा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम कुटुंबातील सदस्य शिक्षा भोगत असलेल्या कारागृहात जावे लागेल व कारागृहातून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व भरलेला अर्ज कारागृहातील अधिकाऱ्यांना जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची जिव्हाळा योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

महत्वाच्या बाबी:

  • जिव्हाळा योजना ही एक नवीन योजना आहे आणि सध्या ती महाराष्ट्रातील काही निवडक तुरुंगांमध्येच राबवली जात आहे.
  • जिव्हाळा योजना ही एक नवीन योजना आहे आणि सध्या ती पायलट टप्प्यात राबवली जात आहे.
  • योजनेचा प्रतिसाद बघून क्रमाने राज्यातील सर्व तुरुंगांमध्ये राबवण्यात येईल.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज PDF
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
Gopinath Munde Apghat Vima Yojana Form
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

2 thoughts on “जिव्हाळा योजना 2024”

Leave a Comment

Join WhatsApp Group!