जिव्हाळा योजना : Jivhala Yojana

केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी विविध योजनांची सुरुवात करत असते त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या राज्यातील नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कैद्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारावे यासाठी त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव जिव्हाळा योजना आहे.

महाराष्ट्र राज्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून लाखो कैदी शिक्षा भोगत आहेत त्यामधील बहुतांश कैदी हे कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या कारणावरून तसेच कौटुंबिक वादातून शिक्षा भोगत आहेत हे शिक्षा भोगत असलेले कैदी कुटुंबातील एक कमावती असल्याकारणामुळे त्यांना एकाएकी कारागृहात टाकल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी विविध अडचणींचा सामना करावा लागतो त्यांना आपल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च, औषध उपचाराचा खर्च व इतर गोष्टींसाठी लागणाऱ्या खर्चासाठी इतर कोणावर तरी अवलंबून राहण्याची वेळ येते व स्वतःकडील एखादी वस्तू गहाण ठेवून जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागते व वेळेवर कर्ज ना फेडू शकल्यामुळे कुटुंबाला खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनाचा शुभ मुहूर्त साधून महाराष्ट्र राज्य बँकेच्या सहकार्याने राज्यात जिव्हाळा योजना सुरु करण्याचा एक अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतला.

Table of Contents

महाराष्ट्र राज्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना अत्यंत कमी व्याज दराने म्हणजेच 7 टक्के व्याज दराने 50,000/- रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते जेणेकरून लाभार्थी कुटुंबे या आर्थिक सहाय्याच्या मदतीने आपल्या जीवनातील दैनंदिन गरज पूर्ण करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील जेणेकरून त्यांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही व कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून शिक्षण भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना कमी व्याज दराने 50,000/- रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे.

जिव्हाळा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची परतफेड

शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची खाती महाराष्ट्र राज्य बँकेत उघडण्यात येतात व कैद्यांच्या कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशांना या खात्यात जमा करण्यात येते व या जमा रकमेतून कैद्यांच्या कुटुंबांनी घेतलेल्या कर्जाची तसेच व्याजाची परतफेत केली जाते त्यामुळे कैदी कारागृहात शिक्षा भोगत असतानासुद्धा स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.

वाचकांना विनंती

आम्ही जिव्हाळा योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात अशी कोणी कैद्यांची कुटुंबे असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत कर्ज मिळवून स्वतःच्या दैनंदिन गरज पूर्ण करू शकतील.

योजनेचे नावजिव्हाळा योजना
विभागसामाजिक कल्याण विभाग
योजनेची सुरुवात1 मे 2022
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीदीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची कुटुंबे
लाभ50,000/- रुपयांचे कर्ज
उद्देशकैद्यांच्या कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक विकास करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

जिव्हाळा योजनेचा उद्देश

jivhala yojana purpose

 • राज्यात बहुतांश कैदी हे छोट्या छोट्या कारणावरून दीर्घकाळासाठी कारागृहात शिक्षा भोगत असतात त्यामुळे कुटुंबातील कमावता सदस्य एकाएकी कारागृहात गेल्यामुळे कुटुंबाला आपल्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी तसेच मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आजारी पडल्यावर औषध उपचारासाठी खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे राज्य शासनाने शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबाला स्वतःच्या दैनंदिन गरज पूर्ण करता याव्यात यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने जिव्हाळा योजनेची सुरुवात केली आहे.
 • राज्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारणे.
 • कैद्यांच्या कुटुंबांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
 • राज्यातील कैद्यांच्या कुटुंबाना स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये किंवा त्यांना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने जिव्हाळा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • राज्यातील कैद्यांच्या कुटुंबाचे भविष्य उज्वल बनविणे.
 • शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्याच्या उद्देशाने जिव्हाळा योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • कैद्यांची मानसिकता बदलण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना एक योग्य दिशा दाखविण्याच्या उद्देशाने तसेच त्यांना एक चांगला व्यक्ती बनविण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आपल्या कुटुंबाची चिंता करण्याठी गरज भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली गेली आहे.
Jivhala Yojana

जिव्हाळा योजनेचे वैशिष्ट्य

jivhala yojana features

 • राज्यात दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबाबाचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली जिव्हाळा योजना एक महत्वाची अशी एक योजना आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील सर्व कारागृहात या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • या योजनेअंतर्गत कुठल्याच प्रकार ची जात व धर्माची मर्यादा नाही त्यामुळे सर्व जाती धर्मातील कैद्यांची कुटुंबे या योजनेचा लाभ मिळवू शकतील.
 • शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली देशातील पहिली अशी एक योजना आहे.
 • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून अर्जदाराला अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
 • राज्यात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी तसेच ते सशक्त व आत्मनिर्भर बनण्यासाठी जिव्हाळा योजना फायद्याची ठरणार आहे.
 • या योजनेअंतर्गत दिली जाणारी कर्जाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
 • या योजनेअंतर्गत कर्ज परतफेड रकमेमधील 12 टक्के निधी कैद्यांच्या कल्याण निधीला देण्यात येतो.
 • महाराष्ट्र शासन मुलींच्या शिक्षणासाठी देत आहे 98 हजारांचे आर्थिक सहाय्य्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना

जिव्हाळा योजनेचे लाभार्थी

jivhala yojana Beneficiary

 • महाराष्ट्र राज्यात दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची कुटुंबे जिव्हाळा कर्ज योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

जिव्हाळा योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज

jivhala yojana loan amount

 • या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला 50000/- रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत कर्जावर आकाराला जाणारा व्याजदर

jivhala yojana interest rate

 • या योजनेअंतर्गत कर्ज रकमेवर 7 टक्के व्याजदर आकारला जातो.

जिव्हाळा योजनेअंतर्गत कर्जाचा परतफेड कालावधी

 • जिव्हाळा योजनेअंतर्गत कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी निश्चित केला गेला नाही आहे.

जिव्हाळा योजनेचा लाभ

jivhala yojana benefits

 • महाराष्ट्र राज्यात कुठल्या ना कुठल्या कारणावरून दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना जिव्हाळा योजनेअंतर्गत 7 टक्के व्याज दराने 50000/- रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील कुटुंबे ही सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • या योजनेच्या सहाय्याने कैद्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारेल.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
 • या योजनेअंतर्गत कमी व्याजदर आकारला जातो.
 • जिव्हाळा योजनेअंतर्गत अर्जदाराला कर्ज मिळवण्यासाठी जमीन ठेवण्याची किंवा वस्तू गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही.
 • योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी कुठल्याच प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क भरण्याची गरज नाही.
 • जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत कैद्यांच्या कुटुंबांना 50000/- रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे कुटुंबाला त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही.

जिव्हाळा योजनेसाठी आवश्यक पात्रता

jivhala yojana eligibility

 • शिक्षा भोगत असलेला कैदी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

जिव्हाळा योजनेच्या अटी व शर्ती

jivhala yojana terms & condition

 • फक्त महाराष्ट्र राज्यातील कैद्यांच्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कैद्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • फक्त दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची कुटुंबे या योजनेचा लाभ मिळवू शकतात.
 • जिव्हाळा योजनेअंतर्गत कैद्यांच्या कुटुंबाला देण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी राज्य शासनाची असणार नाही.
 • कैद्यांच्या शिक्षेचा कालावधी व त्यांचे कारागृहातील उत्पन्न बघूनच यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • कैद्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कैद्याची संमती असणे अनिवार्य आहे त्यामुळे जर एखाद्या कैद्याची संमती नसेल तर अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

जिव्हाळा योजनेअंतर्गत अर्ज भरल्यानंतर करण्यात येणारी कार्यवाही

 • अर्जदाराने अर्ज भरल्यानंतर सदर अर्ज अधिकाऱ्यांकडे तपासणीसाठी पाठविण्यात येतो.
 • अधिकारी सदर योजनेतील माहिती व कागदपत्रांची तपासणी करतात व शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांचे उत्पन्न व त्याच्या शिक्षेचा कालावधी पाहून या योजनेसाठी पात्र ठरविण्यात येते.

जिव्हाळा कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

jivhala yojana documents

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • ई-मेल आयडी
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • शपथ पत्र
 • बँक खात्याचा तपशील

जिव्हाळा योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

 • शिक्षा भोगत असलेला कैदी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • कैदी शिक्षा भोगत असलेला शिक्षेचा कालावधी कमी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • कैद्याला त्याच्या कामाच्या मोबदल्यात दिले जाणारे मानधन कमी असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जामध्ये खोटी तसेच चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

jivhala yojana application process

 • जिव्हाळा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम कुटुंबातील सदस्य शिक्षा भोगत असलेल्या कारागृहात जावे लागेल व कारागृहातून या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व भरलेला अर्ज कारागृहातील अधिकाऱ्यांना जमा करावा लागेल.
 • अशा प्रकारे तुमची जिव्हाळा योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

जिव्हाळा योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

जिव्हाळा योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

जिव्हाळा योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.

जिव्हाळा योजनेचे लाभार्थ कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यात दीर्घकालीन शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची कुटुंबे जिव्हाळा कर्ज योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

जिव्हाळा योजनेचा लाभ काय आहे?

जिव्हाळा योजनेअंतर्गत 50000/- रुपयांचे कर्ज दिले जाते.

जिव्हाळा योजनेअंतर्गत किती व्याजदर आकारला जातो.

या योजनेअंतर्गत 7 टक्के व्याजदर आकारला जातो.

जिव्हाळा योजनेचा उद्देश काय आहे?

राज्यातील शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कुटुंबांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?

जिव्हाळा कर्ज योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला जिव्हाळा योजनेची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे जिव्हाळा कर्ज योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल.

2 thoughts on “जिव्हाळा योजना : Jivhala Yojana”

Leave a Comment