महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांचा शेती हा एक पारंपारिक व्यवसाय आहे त्यामुळे शेती सोबत ते पशुपालन व्यवसाय करतात काही शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी कमी जागा असते त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय करतात. परंतु पशुपालन व्यवसाय करताना त्यांना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. गाय, म्हैस यांना खायला मोठ्या प्रमाणात हिरवा चारा द्यावा लागतो त्यामुळे त्यांना दिला जाणारा हिरवा चारा हा कापावा लागतो यासाठी खूप सारे कष्ट करावे लागतात परंतु चारा कापण्यासाठी त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचे साधन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लातो त्यामुळे राज्यातील पशुपालकांच्या पशुपालन करताना येणाऱ्या समस्यांचा विचार करून त्यांच्यासाठी कडबा कुट्टी मशीन योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
गुरांसाठी हिरवा चारा देण्याआधी चारा कापावा लागतो परंतु शेतकऱ्यांजवळ चारा कापण्यासाठी कुठल्याच प्रकारचे साधन उपलब्ध नसल्याकारणामुळे हाथाने चारा कापावा लागतो ज्यामध्ये खूप वेळ लागतो तसेच खुप सारी मेहनत करावी लागतो आणि यामुळे शेतकऱ्यांना दुखापत सुद्धा होते. शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या गरीब असल्यामुळे तो चारा कापण्याची मशीन खरेदी करण्यासाठी असमर्थ असतो त्यामुळे शेतकऱ्यांना चारा कापण्यासाठी आवश्यक 2 एचपी विद्युतचलित कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान दिले जाते. जेणेकरून शेतकरी जलद गतीने चारा कापू शकतो व त्यामुळे त्याच्या वेळेची बचत होईल.
या योजनेअंतर्गत राज्य सरकार पशुपालकांना कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी 10 हजारांचे आर्थिक सहाय्य देते. कडबा कुट्टी मशीन ची साधारणतः किंमत ही 20 हजार रुपयांपर्यंत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते व त्यामुळे अतिरिक्त रक्कम ही लाभार्थ्यांना स्वतःजवळील भरणे आवश्यक आहे.
योजनेचे नाव | कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | पशुसंवर्धन विभाग |
लाभ | 10 हजार रुपये |
उद्देश्य | शेतकऱ्यांना पशुपालनासाठी प्रोत्साहित करणे |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी व पशुपालक |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र चे उद्दिष्ट
- राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांना मोफत कडबा कुट्टी मशीन उपलब्ध करून देणे.
- शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना पशु पालनासाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर नागरिकांना पशुपालनासाठी प्रोत्साहित करणे.
- शेतकऱ्यांना पशुपालन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देणे.
- शेतकऱ्यांना शेती कार्यात तसेच पशुपालन कार्यात तेजी निर्माण करून देणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- शेतकऱ्यांना दिली जाणारी अनुदानाची राशी थेट त्याच्या बँक खात्यात DBT च्या सहायाने जमा करण्यात येईल.
योजनेचा फायदा:
- मशीनच्या सहाय्याने चारा हा जलद गतीने व नासाडी न होता कापता येतो,
- यंत्राच्या सहाय्याने चाऱ्याची कापणी केल्यामुळे चारा बारीक कापता येतो त्यामुळे जनावरांना चारा खाण्यास सोपे व सहज होते.
- शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर कडबा कुट्टी मशीन मिळेल किंवा 10 हजार रुपये दिले जातील.
- चारा कापण्यासाठी मशीन मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना हाथाने चारा कापण्याची गरज भासणार नाही त्यामुले त्यांच्या वेळेची बचत होईल.
योजनेअंतर्गत मिळणारा लाभ:
- या योजनेअंतर्गत शेतकरी तसेच पशुपालकांना 2 एचपी विद्युतचलित क्षमतेचे कडबा कुट्टी मशीन खरेदी करण्यासाठी 10 हजार रुपये अनुदान दिले जाते.
योजनेचे लाभार्थी कोण आहेत:
- राज्यातील शेतकरी तसेच पशुपालक जे पशुपालन व्यवसाय करतात
लाभार्थ्यांची निवड:
- लाभार्थ्यांची निवड करताना त्यामध्ये 30 टक्के महिला लाभार्थ्यांचा व 3 टक्के अपंग लाभार्थ्यांचा समावेश केला जाईल.
आवश्यक पात्रता व अटी, शर्ती:
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहेत.
- अर्जदाराकडे पशु असणे आवश्यक आहे.
- फक्त ग्रामीण भागातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- अर्जदाराजवळ कमीत कमी 2 जनावरे असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक मिळकत 2 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी कडबा कुट्टी मशीन लाभार्थ्याला विकता येणार नाही.
- अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- सदरचे कडबाकुट्टी यंत्र हे भारतीय मानक संस्थेच्या प्रमानकानुसार असावे.
- मुंबई व मुंबई उपनगर या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत.
- केंद्र पुरस्कृत वैरण व पशुखाद्य कार्यक्रम तसेच, राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ज्या लाभार्थ्यांना यापुर्वी विद्युतचलित कडबाकुट्टी यंत्रांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. अशा लाभार्थ्यांना या प्रकल्पामधुन लाभ देता येणार नाही. [Kadba Kutti Machine Yojana Maharashtra]
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- बँक खात्याचा तपशील
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- उत्पन्नाचा दाखला
- कडबा कुट्टी मशीन खरेदी केल्याचे बिल
- जनावरांचा विमा केल्याचे प्रमाणपत्र
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर गेल्यावर अर्जदाराला आपल्या User Name आणि Password च्या सहाय्याने लॉगिन करावे लागेल. जर तुम्ही User Name आणि Password बनवला नसेल तर तुम्हाला नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करून स्वतःची नोंदणी करावी लागेल.
- लॉगिन केल्यावर तुम्हाला शेती योजना वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या सर्व योजनांची लिस्ट दिसेल त्यामध्ये तुम्हाला कडबा कुट्टी मशीन योजना वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जिल्हा कार्यालयात पशु संवर्धन विभागात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
- भरलेला अर्ज जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join |
Kadaba kutti machine yojana Maharashtra Portal | Click Here |
Kadaba kutti machine yojana Maharashtra GR | Click Here |