खावटी अनुदान योजना : Khavati Anudan Yojana

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते.
आज आपण राज्य शासनाद्वारे राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या आदिवासी कुटुंबाच्या आर्थिक विकासासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या अशाच अनेक योजनेची सविस्त माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव खावटी अनुदान योजना आहे.

खावटी अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील आदिवासी कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी प्रतिवर्ष 4000/- रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते.

Table of Contents

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात तसेच ग्रामीण भागात रोजगाराचे कुठल्याच प्रकारचे स्थायी साधन उपलब्ध नसल्याकारणामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते. अशा कुटुंबांचे हाथावरचे पोट असते त्यामुळे अशी कुटुंबे हि मिळेल ती कामे करून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यामुळे पावसाच्या महिन्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर महिन्यात त्यांच्याजवळ कुठल्याच प्रकारचा रोजगार उपलब्ध नसतो त्यामुळे अशा कुटुंबांवर पावसाळ्यात उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे उपासमारीची वेळ येते त्यामुळे राज्यातील दारिद्र्य आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये या उद्देशाने राज्यात खावटी अनुदान योजनेची सुरु करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला.

राज्यात एखाद्या आपातकालीन परिस्थितीमध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याची समस्या निर्माण होते व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. आपणास माहीतच आहे कोरोना महामारीचा देशात किती मोठा परिणाम झाला लॉकडाउन मुळे देशातील सर्व कंपन्या तसेच उद्योगधंदे बंद झालेत त्यामुळे अनेकांचे रोजगार गेलेत त्याचा मोठा फटका हाथावरचे पोट असलेल्या दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांना बसला अशा कुटुंबांवर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला व रोजगार उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने खावटी अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली.

या योजनेअंतर्गत अंदाजे 11.55 लाख आदिवासी तसेच अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य्य करण्यात येते त्यासाठी राज्य शासनाकडून 486 कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले गेले आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांकडे उत्पन्नाचे कुठल्याच प्रकारचे स्थायी साधन उपलब्ध नसते त्यामुळे पावसाळ्यात जून ते सप्टेंबर महिन्यात त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही त्यामुळे अशा कुटुंबांवर पावसाळ्यात उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी प्रतिवर्षी 4000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देणे.

वाचकांना विनंती

आम्ही खावटी अनुदान योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी अनुसूचित जमाती तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ मिळवून स्वतःसाठी आर्थिक सहाय्य मिळवू शकतील.

योजनेचे नावखावटी अनुदान योजना
विभागसमाज कल्याण विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील अनुसूचित जमातीमधील आदिवासी कुटुंबे
लाभप्रति कुटुंब 4000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
उद्देशआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्य करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

खावटी अनुदान योजनेचा उद्देश

Khavati Anudan Yojana Purpose

 1. महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांकडे उत्पन्नाचे कुठल्याच प्रकारचे स्थायी साधन उपलब्ध नसते त्यामुळे पावसाळ्यात जून ते सप्टेंबर महिन्यात त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही त्यामुळे अशा कुटुंबांवर पावसाळ्यात उपासमारीची वेळ येऊ नये या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने राज्यात खावटी अनुदान योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला.
 2. राज्यातील अनुसूचित जातीतील आदिवासी कुटुंबांना या योजनेअंतर्गत सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
 3. राज्यातील आर्थिक दृष्टया गरीब कुटुंबांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
 4. या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
 5. राज्यातील आर्थिक दृष्टया गरीब कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासू नये या उद्देशाने खावटी अनुदान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 6. राज्यातील आदिवासी कुटुंबाना स्वावलंबी बनविणे तसेच त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे.
Khavti

खावटी अनुदान योजनेचे वैशिष्ट्य

Khavati Karj Yojana Features

 • महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत खावटी अनुदान योजना राबविली जाते.
 • महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळास निधी उपलब्ध करून दिला जातो.
 • आदिवासी कुटुंबाला अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागू नये या उद्देशाने अर्ज करण्याची पद्धत सोपी ठेवण्यात आली आहे.
 • सुरवातीला खावटी अनुदान योजनेअंतर्गत 50 टक्के रक्कम वस्तु स्वरूपात व 50 टक्के रक्कम रोख स्वरूपात दिली जात होती परंतु शासनाच्या नवीन नियमानुसार 100 टक्के रक्कम रोख स्वरूपात दिली जाते.
 • खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभाची राशी लाभार्थी कुटुंबातील महिलेच्या नावावर DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते जर लाभार्थी महिलेचे बँक खाते नसेल तर अशा परिस्थितीत शासनाकडून महिलेचे बँक खाते उघडून देण्यात येते.
 • या योजनेअंतर्गत अंदाजे 11 लाख 55 हजार कुटुंबांना खावटी अनुदान योजनेचा लाभ देण्याचे लक्ष आहे त्यासाठी अंदाजे 486 कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले गेले आहे.
 • काही दुर्गम भागात बँक उपलब्ध नाहीत त्यामुळे अशा परिस्थितीत लाभार्थी कुटुंबांना पोस्टामार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
 • महाराष्ट्र शासन मुलींच्या शिक्षणासाठी देत आहे 98 हजारांचे आर्थिक सहाय्य्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना
 • इयत्ता 10वी व 11वी च्या शिक्षणासाठी सरकार विद्यार्थ्यांना देत आहे 60 हजारांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा स्वाधार योजना

खावटी कर्ज योजना अंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य

Khavti Anudan Yojana Maharashtra

 • खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबास 100 टक्के रक्कम दिली जाते.
 • अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्य संख्येनुसार 4 युनिट पर्यंत 2000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
 • अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्य संख्येनुसार 5 ते 8 युनिट पर्यंत 3000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
 • अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्य संख्येनुसार 8 युनिट युनिट पुढे 4000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.

दारिद्र्य रेषेखालील योजना चे लाभार्थी

Khauti Yojana Beneficiary

 • माडिया वर्गातील कुटुंबे
 • आदिम जमातीची सर्व कुटुंबे
 • मनरेगा मध्ये एक दिवस कार्यरत असलेले आदिवासी मजूर
 • भूमिहीन शेतमजूर
 • आदिवासी वर्गातील कुटुंबे
 • पारधी जमातीची सर्व कुटुंबे
 • घटस्फोटित महिला
 • विधवा महिला
 • कोलाम वर्गातील कुटुंबे
 • अपंग व्यक्तीचे कुटुंब
 • वैयक्तिक वहनहक्क प्राप्त झालेली वहनहक्क धारक कुटुंबे
 • अनाथ मुलाचे संगोपन करणारे कुटुंब
 • कातकरी वर्गातील कुटुंबे

खावटी अनुदान योजनेअंतर्गत वस्तुस्वरूपात दिल्या जाणाऱ्या वस्तू

 • साखर
 • उडीद डाळ
 • मटकी
 • चवळी
 • चहा पावडर
 • तूरडाळ
 • मीठ
 • हरभरा
 • वाटाणा
 • शेंगदाणे तेल
 • गरम मसाला
 • मिरची पावडर

खावटी अनुदान योजनेचे लाभ

Benefits Of Khavti Anudan Yojana Maharashtra

 • खावटी अनुदान योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या आदिवासी कुटुंबांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी 4000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची तसेच कोणाकडून व्याजाने पैसे उधार घेण्याची गरज भासणार नाही.
 • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे या योजनेअंतर्गत सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • राज्यातील गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारेल.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील कुटुंबांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
 • राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांचे भविष्य उज्वल बनेल.
 • आदिवासी कुटुंबांचा सामाजिक स्तर उंचावेल.
 • राज्यातील अनुसूचित जमातीमधील कुटुंबे स्वावलंबी बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहतील.

खावटी अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता

 • अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

खावटी अनुदान योजनेसाठी आवश्यक पात्रता व अटी

 • फक्त महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीमधील आदिवासी कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • राज्य शासनाने निर्धारित केलेल्या नियमांमध्ये पात्र कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • अर्जदार कुटुंब केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु केलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत अनुदान मिळवत असेल तर अशा परिस्थितीत अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार कुटुंबातील एखादी व्यक्ती जर सरकारी नोकरीत कार्यरत असेल तर अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार कुटुंबातील महिलेचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.
 • राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आर्थिक दृष्टया गरीब आदिवासी कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • अर्जदार व्यक्तीकडे तहसीलदार/तत्सम सक्षम प्राधिकऱ्यांनी दिलेला जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार व्यक्तीकडे तहसीलदार/तत्सम सक्षम प्राधिकऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
 • फक्त ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब आदिवासी कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.

खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याची पद्धत

 • अनुसूचित जमातीच्या पात्र कुटूंबियांना वस्तुस्वरुपात मदत पोहोचविताना प्रति कुटूंबासाठी सर्व वस्तु व्यवस्थित पॅक करुन एका बॅगमध्ये एकत्र करुन त्या बॅगवर विक्रीसाठी नाही (Not for Sale) असे प्रिंट करण्यात येईल. व या वस्तुंची वाहतूक वाहनाद्वारे गावागावात पोहचविण्यात येईल.
 • वस्तूचे वाटप कधी करणार याचे वेळापत्रक तयार करुन संबंधित गावांना याबाबत आगावू सूचना देण्यात येईल. गावांमध्ये वस्तु पोहोचल्यानंतर सदर वस्तु गावचे सरपंच, उपसरपंच, महिला ग्रामपंचायत सदस्य, अनुसूचित जमातीचे सदस्य इत्यादीच्या उपस्थितीमध्ये अनुसूचित जमातीच्या पात्र कुटुंबातील महिलेस सुपूर्द करण्यात येईल व पोचपावती घेण्यात येईल.

खावटी अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • जातीचा दाखला
 • बँक खात्याचा तपशील
 • अर्जदार अपंग असल्यास अपंगांचा दाखला
 • महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
 • अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र
 • अर्जदार महिला घटस्फोटित असल्यास न्यायालयीन आदेश

खावटी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे

Khavti Yojana

 • अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जदार कुटुंब दारिद्र्य रेषेखालील आदिवासी कुटुंब नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जदाराकडे जातीचा दाखला नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
 • अर्जदार कुटुंब केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत अनुदान मिळवत असेल तर अशा परिस्थितीत अशा कुटुंबाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील एखादे सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.

खावटी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Khavti Anudan Yojana Online Apply

शहरी क्षेत्र:

शहरी क्षेत्रातील अर्जदार व्यक्तीस आपल्या क्षेत्रातील नगर पालिका, नगर क्षेत्र किंवा आदिवासी विकास योजना कार्यालयात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांकडून खावटी अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज जमा करावा लागेल

ग्रामीण क्षेत्र:

ग्रामीण क्षेत्रातील अर्जदाराला सर्वात प्रधान आपल्या गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन ग्रामसेवक, तलाठी किंवा आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांकडून खावटी अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज जमा करावा लागेल

अशा प्रकारे तुमची खावटी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Telegram GroupJoin
Khavti Anudan Yojana Official WebsiteClick Here
Khavti Anudan Yojana Contact Number022-49150800
Khavati Anudan Yojana Form PDFClick Here
 • गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते आहे रोख रक्कम त्यासाठी वाचा जननी सुरक्षा योजना
 • सरकार महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे त्यासाठी वाचा महिला बचत गट कर्ज योजना
 • मुलींचे आरोग्य, शिक्षण, मुलीचे लग्न तसेच मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक साहाय्य त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना
 • राज्यातील 65 वर्षावरील नागरिकांना सरकार देत आहे दर महिना 1500/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा श्रावणबाळ योजना

खावटी अनुदान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

खावटी अनुदान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

खावटी अनुदान योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे

खावटी अनुदान योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असेलेले आदिवासी कुटुंबे खावटी अनुदान योजना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

खावटी अनुदान योजनेचा लाभ काय आहे?

खावटी अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना 4000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते

खावटी अनुदान योजनेचा उद्देश काय आहे?

आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे

खावटी अनुदान योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

खावटी अनुदान योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

सारांश

आशा करतो कि खावटी अनुदान योजनेअंतर्गत आपल्याला सर्व माहिती प्राप्त झाली आहे तरी देखील आपले खावटी अनुदान योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास मला ई-मेल किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून जरूर कळवा आम्ही तुमच्या प्रश्नांची लवकरात लवकर उत्तरे देण्याचा प्रयत्न करू आणि जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

Leave a Comment