किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

या योजनेअंतर्गत राज्यातील 11 वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील ग्रामीण/आदिवासी तसेच नागरिक क्षेत्रातील मुलींना अंगणवाडी सेविकांच्या मदतीने मुलींचे आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण इत्यादी विषयांवर किशोरवयीन मुलींना आरोग्य शिक्षण विषयी संपूर्ण माहिती दिली जाते जेणेकरून मुलींना याचा भविष्यात उपयोग होईल व त्यांचा सामाजिक विकास होईल.

ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे अशा कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असते तसेच अशा गरीब कुटुंबातील सदस्यांना योग्य शिक्षण मिळाले नसल्यामुळे त्यांना आपल्या मुलींचे शिक्षण, आरोग्य, स्वच्छता तसेच कला कौशल्य यांच्याकडे लक्ष देता येत नाही तसेच त्यांना या बद्दल काही गोष्टींचे ज्ञान देता येत नाही त्यामुळे राज्य शासनाने बाल कल्याण विभागाच्या मदतीने राज्यात किशोरी शक्ती योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला.

किशोरावस्था हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर ती मुलगी तारुण्याच्या उंबरठ्यावर असल्याने स्त्रीच्या मानसिक, भावनिक आणि मानसिक विकासाच्या दृष्टीने पौगंडावस्था बदलते त्यामुळे मुलींना त्यांच्या विकासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

किशोरी योजना ही ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडी केंद्रांमार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील अविवाहित व शालेय शिक्षणबाहेर पडलेल्या किशोरवयीन मुलींची निवड करून त्यांना स्थानिक अंगणवाडी केंद्रांमध्ये 6 महिन्यांसाठी अध्यापन आणि प्रशिक्षण कार्यात समाविष्ट केले जाते.

एका सर्वेक्षणातून असे आढळून आले आहे कि राज्यातील किशोरवयीन मुलींची पोषण, शैक्षणिक आणि सामाजिक स्थिती समाधानकारक नाही. किशोरवयीन मुलींकडे आरोग्य आणि पोषणाशी संबंधित पुरेशी माहिती/सेवा नसल्याचंही या सर्वेक्षणांतून स्पष्ट झाले त्यामुळे पौगंडावस्थेतील मुलींचे पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आणि आरोग्य, स्वच्छता, पोषण, कुटुंब कल्याण आणि व्यवस्थापन यांना चालना देण्यासाठी किशोरी शक्ती योजना सुरु करण्यात आली.

या योजनेचा मुख्य उद्देश 11 ते 18 वर्ष वयोगटातील कुशोरीवयीन मुलींचे आरोग्य, पोषण, शिक्षण तसेच त्यांना कौशल्य प्रशिक्षण याबाबत जनजागृती करून त्यांचा दर्जा सुधारणे.

योजनेचे नावKishori Shakti Scheme
लाभार्थीआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील किशोरीवयीन मुली
लाभसामाजिक व आर्थिक विकास केला जातो
उद्देशआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीचे भविष्य उज्वल बनविणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन चे उद्दिष्ट

  • महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील 11 ते 18 वर्ष वयोगटातील कुशोरीवयीन मुलींचे आरोग्य, पोषण, शिक्षण तसेच त्यांना कौशल्य प्रशिक्षण याबाबत जनजागृती करून त्यांचा दर्जा सुधारणे हा Kishori Shakti Yojana चा मुख्य उद्देश आहे.
  • किशोरवयीन मुलींचा आत्मविश्वास, उत्साह आणि आत्मसन्मान वाढवणे.
  • राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना घरगुती तसेच व्यावसायीक प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय करण्याच्या दृष्टीने सक्षम बनविणे.
  • मुलींना त्यांच्या विकासासाठी अनुकूल वातावरण उपलब्ध करून देणे.
  • राज्यातील किशोरीवयीन मुलींची एखाद्या विषयावर निर्णय घेण्याची क्षमता वाढविणे.
  • किशोरीवयीन मुलीच्या वैयक्तिक पोषण आहाराबद्दल जनजागृती करणे.
  • कुटुंब कल्याणाबाबत जनजागृती करणे.
  • गृह व्यवस्थानाबद्दल जनजागृती करणे.
  • किशोरीवयीन मुलींच्या वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती करणे.
  • किशोरवयीन मुलींना त्यांची घरगुती आणि व्यावसायिक कौशल्ये सुधारण्यासाठी सक्षम करण्यासाठी प्रशिक्षित आणि सक्षम करणे.
  • मुलींना शिक्षण, आरोग्य आणि अन्य गोष्टींसाठी प्रोत्साहित करणे.
  • पौगंडावस्थेतील मुलींना सामाजिक अनुभव आणि ज्ञान मिळविण्यासाठी प्रवृत्त करणे आणि त्यांची निर्णय क्षमता सुधारण्यास मदत करणे.
किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

योजनेचे वैशिष्ट्य:

  • महाराष्ट्र शासनाच्या बाल कल्याण विभागाद्वारे राज्यातील 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरीवयीन मुलींचे आरोग्य, पोषण, शिक्षण तसेच त्यांना कौशल्य प्रशिक्षण याबाबत जनजागृती करून त्यांचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलींना सहभागी केले जाईल.

योजनेअंतर्गत लाभार्थी व त्यांची निवड प्रक्रिया:

  • ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रत्येक क्षेत्रातून 11 ते 18 वर्षे वयोगटातील एकूण 20 किशोरवयीन मुलींची 6 महिन्यांकरिता निवड करण्यात येते त्यापैकी 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींची निवड दारिद्र रेषेखालील कुटुंब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या मधून केली जाते. तसेच शाळा सोडलेल्या मुलींना विशेष प्राधान्य दिले जाते.
  • या वयोगटातील 3 मुलींना अंगणवाडी केंद्राशी संलग्न ठेवण्यात येते तसेच त्याना अंगणवाडीच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी केले जाते.
  • ग्रामीण, आदिवासी आणि नागरिक प्रकल्पात सदर मुलींची निवड बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते.

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील दारिद्र रेषेखालील,अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील किशोरवयीन मुली या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

योजनेचा फायदा:

  • योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील 11 ते 18 वर्ष वयोगटातील कुशोरीवयीन मुलींचे आरोग्य, पोषण, शिक्षण तसेच त्यांना कौशल्य प्रशिक्षण याबाबत जनजागृती करून त्यांचा दर्जा सुधारला जाईल.
  • योजनेअंतर्गत राज्यातील 11 ते 18 वर्ष वयोगटातील मुली स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी बनतील.
  • किशोरवयीन मुलींचा या योजनेअंतर्गत सर्वांगीण विकास होईल.

योजनेअंतर्गत मुलींना दिले जाणारे लाभ:

  • या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलीचे प्रत्येक महिन्याला नियमितपणे वजन तपासण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत निवड झालेल्या किशोरवयीन मुलींना 6 महिन्यातून एकदा जंतनाशक गोळ्या (Deworming Tablets) दिल्या जातात.
  • निवड झालेल्या किशोरवयीन मुलींना आठवड्यातून एकदा लोहयुक्त गोळ्या (IFA Tablet) दिल्या जातात.
  • निवड झालेल्या किशोरवयीन मुलींचे रक्त तपासून त्यात हिमोग्लोबिन ची मात्रा तपासली जाते.
  • निवड झालेल्या किशोरवयीन मुलींपैकी 15 ते 18 वर्षे वयोगटातील 3 मुलींचे बिट स्थरावर प्रशिक्षण घेण्यात येते व त्यांना योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन करण्यात येते तसेच या मुलींना प्रशिक्षण देऊन झाल्यावर त्यांच्या मार्फत अंगणवाडीच्या मदतीने त्या परिसरातील इतर किशोरवयीन मुलींना प्रशिक्षित करण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत निवड झालेल्या किशोरवयीन मुलींना आरोग्य, पोषण, शिक्षण, वयक्तिक स्वच्छता,परिसर स्वच्छता,सामुदायिक पोषण, मासिक पाळी त्यांचे विज्ञान, स्वच्छता,गैरसमज, गर्भावस्था मागील शरीर शास्त्र, गर्भनिरोधन,बालविवाहाचे परिणाम तसेच लैंगिक छळ झाल्यास कोणाची मदत घ्यावी त्यासाठी हेल्पलाईन चा उपयोग, एड्स नियंत्रण व त्यावर प्रतिबंध, स्त्री विषयक कायदे व हक्कांची माहिती, विवाह कायदा व त्यांची माहिती इत्यादी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात येते. यासाठी अंगणवाडी मधील पुस्तके व भिंती पत्रके याचा वापर करण्यात येतो.
  • या योजनेअंतर्गत प्रत्येक किशोरवयीन मुलींचे किशोरी कार्ड तयार करण्यात येते जेणेकरून त्यांना या योजनेअंतर्गत शासनाकडून येणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.
  • वारंवार मुलांना जन्म देण्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले जातात.
  • ज्या मुलींनी स्वतःचे शालेय शिक्षण मध्येच सोडले आहे अशा मुलींना अंगणवाडी च्या मदतीने शिक्षणाचे महत्व समजवून पुन्हा शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त केले जाते.
  • हिरव्या पालेभाज्या खाण्याचे महत्व सांगितले जातात.
  • किशोरवयीन मुलींना पूरक पोषण आहार देण्यात येतो.
  • किशोरवयीन मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी 1 लाखापर्यंत खर्च करण्यात येतो.
  • जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मुलींमध्ये निर्माण होण्यास मदत होते.
  • मुलींचे मनोबळ वाढून त्यांना कोणावर अवलंबून रहायची वेळ येणार नाही.
  • मुलींना किशोरवयीन वयात योग्य प्रशिक्षण दिल्यामुळे 18 वर्षानंतर त्यांना स्वयंरोजगार दिला जातो.
  • किशोरवयीन मुलींचा आहार आणि त्यांचे महत्व याची माहिती होते.

योजनेअंतर्गत दिले जाणारे कौशल्य प्रशिक्षण:

किशोरवयीन मुलींना स्वावलंबी बनवून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांना खालील प्रकारे विविध प्रशिक्षण दिले जाते

  • मेहंदी काढणे
  • कचऱ्यातून कला
  • जैविक शेती
  • गांडूळ खत तयार करण्याचे प्रशिक्षण
  • अकाउंटिंग
  • घरगुती विजेच्या उपकरणांची दुरुस्थी इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण या योजने मार्फत दिले जाते.
  • केक बनविणे

आवश्यक पात्रता:

  • अर्जदार मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे

योजनेच्या अटी व शर्ती:

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच किशोरी शक्ती योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त दारिद्र्य रेषेखालील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील किशोरीवयीन मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • अर्जदार मुलगी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वर्गातील असणे आवश्यक आहे.
  • फक्त 11 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरीवयीन मुलींनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • फक्त 6 महिन्यांसाठीच मुलींना या योजनेअंतर्गत समाविष्ट केले जाईल.
  • Kishori Shakti Yojana अंतर्गत लाभार्थी मुली कायमस्वरूपी नोकरीसाठी दावा करू शकत नाहीत.
  • अर्जदार मुलीच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत असता कामा नये.
  • अर्जदार मुलगी शाळेत शिकत असल्यास अशा मुलीस या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मुलीचा जन्माचा दाखला
  • दारिद्र्य रेषेखालील कार्ड
  • शालेय शिक्षण मार्कशीट
  • उत्पन्नाचा दाखला

योजनेअंतर्गत निवड प्रक्रिया:

  • अर्जदाराद्वारे अर्ज भरून झाल्यावर सदर अर्जाची व कागदपत्रांची तपासणी करून स्थानिक बालिका मंडळाद्वारे लाभार्थी मुलीची निवड करण्यात येते. [किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन]

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

  • या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार मुलीला किंवा तिच्या पालकांना आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रात जावे लागेल व किशोरी शक्ती योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यकता ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज भरावा लागेल.
  • तसेच अंगणवाडीद्वारे अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्येक घरी जाऊन सर्वे केला जातो आणि या सर्वे दरम्यान लाभार्थी किशोरवयीन मुलींची निवड केली जाते.
Telegram GroupJoin

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज PDF
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
Gopinath Munde Apghat Vima Yojana Form
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!