क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना

महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच शासन विद्यार्थ्यांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने विविध महत्वपूर्ण योजनांची सुरुवात करत असते. आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करत यावे यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंब हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यांच्याजवळ उत्पन्नाचे कुठल्याच प्रकार चे स्थायी साधन उपलब्ध नसते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते अशा कुटुंबाला आपल्या परिवाराच्या आर्थिक गरज पूर्ण करता येत नाही त्यामुळे त्यांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी खुप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. कुटुंबाजवळ मिळकतीचे साधन नसल्यामुळे त्यांना बँक व वित्त संस्था कर्ज देत नाही त्यामुळे त्यांना साहुकाराकडून जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागते व वेळेवर कर्ज फेडू न शकल्यामुळे कुटुंबाला खूप साऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो

Table of Contents

समाजात आज सुद्धा मुलींना मुलांच्या तुलनेत कमी महत्व दिले जाते मुलींना कुटुंबाचे ओझे समजले जाते त्यामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते काही कुटुंबे हे मुलींना मुलांप्रमाणेच महत्व देतात व मुलींना शिक्षण देण्यासाठी इच्छुक असतात परंतु परिवाराची आर्थिक स्थिती कमजोर असल्या कारणामुळे ते आपल्या मुलींना शिक्षण देण्यासाठी असमर्थ असतात याचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर होतो व मुली शिक्षणापासून वंचित राहतात परिणामी मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास होत नाही त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाच्या या सर्व समस्यांचा विचार करून मुलींना योग्य शिक्षण मिळावे या उद्देशाने राज्य शासनाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

या योजनेचा मुख्य उद्देश पदवी व पदव्युत्तर अव्यवसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आर्थिक दुर्बल घटक, गुणवत्ताधारक, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीची च्या माध्यमातून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.

वाचकांना विनंती

आम्ही सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात गरीब कुटुंबातील अशा कोणत्या मुली असतील ज्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो आहे तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील

योजनेचे नावक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीगरीब कुटुंबातील विद्यार्थिनी
लाभशिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीचा लाभ
उद्देशराज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थींना शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य्य देणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन/ऑनलाईन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना उद्देश

Krantijyoti Savitribai Phule Arthsahay Yojana Purpose

 1. महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील विद्यार्थिनींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 2. शैक्षणिक गुणवत्ता असून देखील विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने सदर अर्थसहाय्य योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
 3. विद्यार्थींनींचे गळतीचे प्रमाण कमी करण्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जाते.
 4. राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे या योजनेचा उद्देश आहे.
 5. राज्यातील विद्यार्थिनींचे जीवनमान सुधारणे
 6. या योजनेअंतर्गत मुलीचा सामाजिक व आर्थिक विकास करणे
 7. महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणे
 8. मुलीचे भविष्य उज्वल बनविणे.
 9. मुलींना समाजात मनाचे स्थान मिळवून देणे
 10. समाजात मुलींबद्दलचे असणारे नकारात्मक विचार बदलून ते सकारात्मक करणे
 11. राज्यात मुलींना सन्मानाने जगता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 12. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात केली गेली आहे
 13. राज्यात होणारी भ्रूणहत्या थांबविणे हा या योजनेचा उद्देश आहे
 14. राज्यात मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढविणे
 15. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीच्या आई वडिलांना आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
 16. आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 17. मुलींना या योजनेअंतर्गत शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे पुढील भविष्य सुरक्षित करणे.
 18. मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे.
 19. आपल्या मुलीचा शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्तीची संधी प्रदान करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
krantujyoti savitribai phule arthasahay yojana

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना वैशिष्टय

Krantijyoti Savitribai Phule Arthsahay Yojana Features

 • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने सुरु करण्यात आलेली सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना एक महत्वाची अशी एक योजना आहे.
 • महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक विभागाद्वारे तसेच सामाजिक व विशेष न्याय विभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • शिक्षणासाठी अर्थसहाय्य देऊन राज्यातील मुलीचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्याच्या दुर्ष्टीने तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना योजना महत्वाची योजना ठरणार आहे.
 • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदाराला अर्ज करताना कुठल्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.
 • या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ठेवण्यात आली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेसाठी अर्ज करू शकतो ज्यामुळे त्याला कुठल्याच सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणारं नाही व अर्जदाराचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
 • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
 • देशात आणि परदेशात शिक्षण घेण्यासाठी सरकार देत आहे 20 लाखांपर्यंत कर्ज त्यासाठी वाचा शैक्षणिक कर्ज योजना
 • मुलींचे आरोग्य, शिक्षण, मुलीचे लग्न तसेच मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक साहाय्य त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना
 • सरकार महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे त्यासाठी वाचा महिला बचत गट कर्ज योजना

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यर्थिनींना महत्वाच्या सूचना

Krantijyoti Savitribai Phule Arthsahay Yojana Maharashtra

 • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती /अर्थसहाय्य योजनेसाठी विहित केलेल्या तरतुदीनुसार नियम व अटीची पूर्तता करीत असलेल्या विद्याथ्यांनीच अर्ज करावेत.
 • शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळत असलेल्या विद्यार्थ्यांनीस सदर योजना लागू राहणार नाही.
 • विहित केलेल्या शैक्षणिक गुणांच्या टक्केवारीपेक्षा कमी गुण व A.T.K.T असलेल्या विद्यार्थिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज करू नयेत.
 • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना फक्त मुलींसाठी असून मुलांनी अर्ज करू नयेत.
 • सदर योजना व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना या दोन्ही शिष्यवृत्तीपैकी पदवी अभ्यासक्रमासाठी फक्त एकाच वेळी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी फक्त एकाच वेळी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येईल.
 • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा फायदा विद्यार्थिनीस संपुर्ण पदवी काळात एकदाच आणि पदव्युत्तर काळात एकदा दिला जात असल्याने ज्या विद्यार्थिनींनी अर्ज करण्यापूर्वी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थिनींनी पुन्हा अर्ज करू नयेत.
 • विद्यार्थिनींनी अर्ज भरताना त्यांना मिळालेल्या ग्रेड पॉईट चा उल्लेख न करता टक्केवारी मध्ये उल्लेख करावा.
 • विद्यार्थिंनींनी ऑनलाईन अर्ज भरताना अचुक व परिपुर्ण भरावी.
 • अर्जदार विद्यार्थिनीचे फक्त राष्ट्रीयकृत बँकेतच बचत खाते असावे.
 • विद्यार्थिनीने बँकेची माहिती भरताना स्वत:चे खाते असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेची अद्ययावत माहिती अर्जामध्ये व्यवस्थितरित्या नमुद करावी. पालकांची अथवा इतर व्यक्तीचा बँक खाते शिष्यवृत्तीसाठी विचारात घेतले जाणार नाही.
 • ऑनलाईन अर्जासोबत विद्यार्थिनीने आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत इतर कोणतेही कागदपत्रे अपलोड करू नये.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी

Krantijyoti Savitribai Phule Arthsahay Yojana Beneficiary

 • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य

 • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अव्यवसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 10 व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जास्तीत जास्त 5 विद्यार्थिनीस गुणानुक्रमे 5000/- रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजनेचे लाभ

Krantijyoti Savitribai Phule Arthsahay Yojana Benefits

 • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीला तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती च्या रूपाने आर्थिक सहाय्य केले जाते.
 • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थिनी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • या योजनेच्या मदतीने राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थिनीचे जीवनमान सुधारेल.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थिनीचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाला आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही.
 • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या सहाय्याने शिक्षण पूर्ण करण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थिनी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व भविष्यात स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील व स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.
 • राज्यातील मुलीचे शिक्षणाचे प्रमाण वाढेल.
 • गरीब कुटुंबातील मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहतील
 • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मुलींचे भविष्य सुरक्षित होईल.
 • किशोरवयीन मुलींना स्थानिक अंगणवाडी केंद्रांमध्ये 6 महिन्यांसाठी अध्यापन आणि प्रशिक्षण कार्यात समाविष्ट करून घेण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे किशोरी शक्ती योजना
 • गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते आहे रोख रक्कम त्यासाठी वाचा जननी सुरक्षा योजना

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी आवश्यक पात्रता

Krantijyoti Savitribai Phule Arthsahay Yojana Eligibility

 • अर्जदार विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या अटी व शर्ती

Krantijyoti Savitribai Phule Arthsahay Yojana Terms & Condition

 • केवळ महाराष्ट्रात राज्यातील मुलींनाच सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • फक्त मुलींनाच या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.
 • मुलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
 • A.T.K.T असलेल्या विद्यार्थिनींनी या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • एका वेळी फक्त एकदाच पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज करता येईल.
 • अर्जदार विद्यार्थिनीने  केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत तिला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • विद्यार्थिनीने खोटी माहिती देऊन जर या योजनेअंतर्ग लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत तिला या योजनेमधून रद्द केले जातील व कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
 • अर्जदार विद्यार्थिनीचे आई किंवा वडील एखाद्या सरकारी सेवेत कार्यरत असल्यास अशा वियार्थिनीस या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे

Krantijyoti Savitribai Phule Arthsahay Yojana Documents

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • ई-मेल आयडी
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • विद्यार्थ्यांचे मागील लगतच्या अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेची साक्षांकित प्रत
 • वार्षिक उत्पन्नाचा तहसिलदाराने दिलेला दाखला
 • राष्ट्रीयकृत बँकेच्या बचत खातेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत
 • शपथ पत्र
 • पुरग्रस्त/दुष्काळग्रस्त/आपत्तीग्रस्त विभागप्रमुख/प्राचार्य शिफारस प्रमाणपत्र

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

Krantijyoti Savitribai Phule Arthsahay Yojana Application Process

पहिला टप्पा:

 • अर्जदार विद्यार्थिनीस सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
 • होम पेज वर New User वर क्लिक करून Login Id आणि Password तयार करावा लागेल.

दुसरा टप्पा:

 • आता तुम्हाला तुमच्या Username आणि Password टाकून लॉगिन करावे लागेल.
rantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Home Page

 • आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला Apply For scholarship बटनावर क्लिक करावे लागेल.
 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
rantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Information
rantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Documents Upload
Krantijyoti Savitribai Phule arthasahay yojana Apply

 • अशा प्रकारे तुमची सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
Savitribai Phule Scholarship ContactP. G. Admission Section,
Savitribai Phule Pune University,
Pune – 411 007.
Emailscholarship[at]pun[dot]unipune[dot]ac[dot]in
 • इयत्ता 10वी व 11वी च्या शिक्षणासाठी सरकार विद्यार्थ्यांना देत आहे 60 हजारांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा स्वाधार योजना

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना कोणत्या राज्यातील मुलींसाठी लागू आहे?

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी लागू आहे.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना कोणत्या प्रवर्गातील मुलींसाठी लागू आहे?

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना विमुक्त जाती व भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्गातील मुलींसाठी लागू आहे

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा लाभ काय आहे?

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थिनींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा उद्देश काय आहे?

राज्यातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करून त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल.

Leave a Comment