कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र

आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांना शेतीसाठी उपयुक्त अशा अवजारांच्या खरेदीसाठी 80 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचा शेती हा पारंपारिक तसेच प्रमुख व्यवसाय आहे शेतकरी हा दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतो व आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याकारणामुळे बहुतांश शेतकरी शेतीसाठी उपयुक्त अशी अवजारे खरेदी करण्यासाठी असमर्थ असतात या कारणामुळे ते आज सुद्धा ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा ना करता हाथाच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने शेती करतात त्यामुळे त्यांना शेती कार्य करताना खूप वेळ आणि मेहनत करावी लागते व यामुळे त्यांना अपघात  सुद्धा होते. राज्यातील शेतकऱ्याच्या या सर्व समस्यांचा विचार करून शेती क्षेत्रात आधुनिक यंत्र सामग्रींचा वापर वाढावा तसेच शेती कार्य जलद गतीने व्हावे व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने राज्यात कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला.

राज्यातील शेतकऱ्यांना शेती उपयुक्त उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये व त्यांना शेती अवजारे खरेदी करणे सोपे व्हावे यासाठी राज्य शासनाने शेती उपकरणांच्या खरेदीसाठी 80 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना शेती कामासाठी आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे जेणेकरून वेळेची बचत होईल आणि त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.

योजनेचे नावकृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र
राज्यमहाराष्ट्र
विभागकृषी
उद्देशशेती कार्यात आधुनिक यंत्रांचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभशेती उपयुक्त अवजारे खरेदीसाठी 80 टक्के अनुदान
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन/ऑफलाईन

महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना उद्देश

  1. शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात आधुनिक यंत्र सामग्रीच्या खरेदीसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने कृषी यांत्रिकीकरण योजनेची सुरुवात करण्यात आली.
  2. कृषी क्षेत्रात शेती उपकरणांचा वापर करणे सुलभ व्हावे.
  3. कृषी यांत्रिकरणांला प्राधान्य देणे.
  4. शेती कार्य जलद गतीने व्हावे व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी.
Krushi Yantrikikaran Yojana Maharashtra

योजनेचे वैशिष्ट्य:

  • या योजनेअंतर्गत खूप साऱ्या कृषी उपकरणांवर अनुदान दिले जाते आहे जेणेकरून शेतकरी शेती उपयुक्त उपकरणे खरेदी करू शकतील व शेती कार्य जलद गतीने करू शकतील व स्वतःच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करू शकतील.
  • कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदान राशी लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
  • राज्यातल्या सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
  • कृषी यांत्रिकीकरण योजना ही केंद्रपुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.
  • योजनेअंतर्गत अनुदानासाठी जीएसटी रक्कम गृहित धरण्यात येत नाही.

योजनेअंतर्गत समाविष्ट अवजारे:

ट्रॅक्टर, पॉवर टीलर
स्वयंचलित औजारेरिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड)
ट्रॅक्टर चलीत औजारेरोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र,
मळणी यंत्र (थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर),कॉटन श्रेडर,ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर,
काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणेमिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर पल्व्हराइजर/पॉलीशर,
क्लिनर कम ग्रेडर,

योजनेअंतर्गत टक्केवारी अनुसार दिले जाणारे अनुदान:

अल्प व अत्यल्प भुधारक, अनुसूचित जाती/जमाती आणि महिला शेतकरी50 टक्के अनुदान
इतर शेतकरी40 टक्के अनुदान
मात्र राईस मिल, दाल मिल , पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्वरायजर/पॉलीशर च्या बाबतीत
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा
60 टक्के अनुदान
इतर लाभार्थी50 टक्के अनुदान
शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी औजारे बँक स्थापन करण्यासाठी60 टक्के अनुदान
(24 लाख रु. पर्यंत अनुदान)

योजनेअंतर्गत आरक्षण:

महिलांसाठी30 टक्के निधी
दिव्यांग व्यक्ती3 टक्के निधी

जर महिला व दिव्यांगांसाठी अर्ज आले नाहीत तर सदर निधी इतर शेतकऱ्यांसाठी वापरण्यात येईल

योजनेअंतर्गत विविध औजारांसाठी दिली जाणारी अनुदान राशी:

अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (50 टक्के)

ट्रॅक्टर
(08-70 पीटीओ एचपी)
1.25 लाख रुपये
पॉवर टिलर
बीएच पी पेक्षा कमी65,000/- रुपये
बीएचपी व त्यापेक्षा जास्त85,000/- रुपये
स्वयंचलित अवजारे
रिपर कम बाइन्डर (3 व्हील)1,75,000/- रुपये
रिपर कम बाइन्डर (4 व्हील)2,50000/- रुपये
रीपर75,000/- रुपये
पॉवर वीडर
(2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड)
25,000/- रुपये
पॉवर वीडर
(2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड)
35,000/- रुपये
पॉवर वीडर
(5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड)
63,000/- रुपये
ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे
रोटाव्हेटर 5 फुट42,000/- रुपये
रोटाव्हेटर 6 फुट44,800/- रुपये
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर
(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी)
1 लाख रुपये
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त)2.50 लाख रुपये
पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त)20,000/- रुपये
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)35,000/- रुपये
कल्टीव्हेटर50,000/- रुपये
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम70,000/- रुपये
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम89,500/- रुपये
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम4,000/- रुपये
नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम50,000/- रुपये
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर
(एयर केरियेर/एयर असिस्ट)
1.25 लाख रुपये
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर75,000/- रुपये
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर1 लाख रुपये
Manually operated chaff cutter
(above 3 feet)
6,300/- रुपये
Manually operated chaff cutter
(upto 3 feet)
5000/- रुपये

इतर लाभार्थी यांना 40 टक्के

ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी)1 लाख रुपये
पॉवर टिलर
8 बीएच पी पेक्षा कमी50,000/- रुपये
8 एचपी आणि त्यापेक्षा जास्त70,000/- रुपये
स्वयंचलित अवजारे
रिपर कम बाइन्डर (3 व्हील)1.40 लाख रुपये
रिपर कम बाइन्डर (4 व्हील)2 लाख रुपये
रीपर60,000/- रुपये
पॉवर वीडर
(2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड)
20,000/- रुपये
पॉवर वीडर
(2 बीएचपी ते 5 बीएचपी इंजीन ऑपरेटेड)
30,000/- रुपये
पॉवर वीडर
(5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड)
50,000/- रुपये
ट्रॅक्टर (35 बीएचपी पेक्षा जास्त)
चलितअवजारे
रोटाव्हेटर 5 फुट34,000/- रुपये
रोटाव्हेटर 6 फुट35,800/- रुपये
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर
(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी)
80,000/- रुपये
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर
(क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त)
2 लाख रुपये
पेरणी यंत्र
(सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त)
16,000/- रुपये
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)30,000/- रुपये
कल्टीव्हेटर40,000/- रुपये
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम56,000/- रुपये
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम71,600/- रुपये
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम32,000/- रुपये
पलटी नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम40,000/- रुपये
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर1 लाख रुपये
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर60,000/- रुपये
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर80,000/- रुपये
Manually Operated Chaff Cutter
(Above 3 Feet)
40 टक्के
5000/- रुपये
Manually Operated Chaff Cutter
(Upto 3 Feet)
40 टक्के
4000/- रुपये

काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे यासाठी अनुदान:

अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा

मिनी दाल मिल60 टक्के
1.5 लाख रुपये
मिनी राईस मिल60 टक्के
2.4 लाख रुपये
पैकिंग मशीन60 टक्के
3 लाख रुपये
सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर60 टक्के
60,000/- लाख रुपये
सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर50 टक्के
1 लाख रुपये
इतर लाभार्थी 
मिनी दाल मिल50 टक्के
1.25 लाख रुपये
मिनी राईस मिल50 टक्के
2 लाख रुपये
पैकिंग मशीन50 टक्के
2.40 लाख रुपये
सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर50 टक्के
50,000/- रुपये
सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर40 टक्के
80000/- रुपये

योजनेचे लाभार्थी:

  • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी

योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान:

  • कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी 80 टक्के असून उपलब्ध करून दिले जाते.

योजनेचा फायदा:

  • महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे झाले आहेत. यामुळे शेतीच्या कामांमध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकता लक्षणीयरीत्या वाढली आहे. यामुळे शेतीचे खर्च कमी झाले आहेत आणि रोजगार निर्मितीही झाली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेती अधिक आधुनिक आणि स्पर्धात्मक बनली आहे.
  • कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
  • या योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेतीसंबंधित विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते.
  • या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची कामे कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे.
  • महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे राज्यातील शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला मोठी गती मिळाली आहे.
  • या योजनेमुळे शेतीची उत्पादकता आणि कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या कष्टांमध्ये मोठी घट झाली आहे.

आवश्यक पात्रता:

  • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेच्या अटी व शर्ती:

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित.जमाती मधील असल्यास त्याच्याजवळ जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • योजनेअंतर्गत मिळणारी औजारे किमान 6 वर्षे हस्तांतर/पुनर्वीक्री/गहाण ठेवता येणार नाहीत.
  • शेतकऱ्याकडे  7/12 उतारा व 8अ असणे गरजेचे आहे.
  • अर्जदारास ट्रॅक्टर किंवा यंत्र/अवजार यांपैकी फक्त एकाच गोष्टीसाठी अनुदान दिले जाईल.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने ट्रॅक्टर चा लाभ मिळवला असल्यास ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास अर्जदार पात्र असेल परंतु त्याला ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • जर शेतकऱ्याने एखाद्या अवजाराचा लाभ घेतला असल्यास त्याच अवजारासाठी पुढील 10 वर्षे लाभ घेता येणार नाही परंतु दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करता येईल.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • जातीचा दाखला
  • जमिनीचा 7/12 व 8अ
  • बँक खाते पासबुक
  • यंत्र/अवजारांचे कोटेशन
  • परीक्षण अहवाल
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • प्रतिज्ञा पत्र

लाभार्थी निवड पद्धत:

  • जमा झालेल्या अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाईन छाननी करण्यात येते व पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पुर्व सम्मती आदेश ऑनलाईन देण्यात येतो व त्याबाबतचा शेतकऱ्यांच्या मोबाईल वर SMS पाठवला जातो.
  • शेतकरी पूर्वसंमती आदेश महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून पाहू शकतील.
  • ज्या शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत निवड झाली नाही परंतु ते प्रतिक्षा यादीत आहेत असे लाभार्थी पुढील वर्षी त्याच बाबीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबिटी पोर्टल वर मागिल वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा लागेल व त्यांना या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदाराला सर्वात प्रथम कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर घेल्यावर कृषी विभागात कृषी यांत्रिकीकरण योजना वर क्लिक करावे लागेल.
Maharashtra Krushi Yantrikikaran Yojana

  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करावे लागेल
  • अशा प्रकारे तुमची कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदार शेतकऱ्याला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना अधिकृत वेबसाईटClick Here
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना GRClick Here

योजनेतील काही आव्हाने:

  • काही शेतकऱ्यांना योजनेबद्दल पुरेशी माहिती नसल्याने त्यांना त्याचा लाभ मिळू शकत नाही.
  • योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काही शेतकऱ्यांसाठी क्लिष्ट असू शकते.
  • काही शेतकऱ्यांकडे अनुदान रक्कम भरण्यासाठी पुरेसे पैसे नसतात.
  • काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यास अडचणी येतात. याची मुख्य कारणे म्हणजे अनुदानाची मर्यादित रक्कम, जटिल अर्ज प्रक्रिया आणि बँकांकडून कर्ज मिळवण्यात अडचण. या योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने या मर्यादांवर मात करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाच्या योजना

Swadhar Yojana Income Limit
स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!