आज आपण राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांना शेतीसाठी उपयुक्त अशा अवजारांच्या खरेदीसाठी 80 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचा शेती हा पारंपारिक तसेच प्रमुख व्यवसाय आहे शेतकरी हा दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतो व आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याकारणामुळे बहुतांश शेतकरी शेतीसाठी उपयुक्त अशी अवजारे खरेदी करण्यासाठी असमर्थ असतात या कारणामुळे ते आज सुद्धा ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा ना करता हाथाच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने शेती करतात त्यामुळे त्यांना शेती कार्य करताना खूप वेळ आणि मेहनत करावी लागते व यामुळे त्यांना अपघात सुद्धा होते. राज्यातील शेतकऱ्याच्या या सर्व समस्यांचा विचार करून शेती क्षेत्रात आधुनिक यंत्र सामग्रींचा वापर वाढावा तसेच शेती कार्य जलद गतीने व्हावे व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने राज्यात कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील शेतकऱ्यांना शेती उपयुक्त उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये व त्यांना शेती अवजारे खरेदी करणे सोपे व्हावे यासाठी राज्य शासनाने शेती उपकरणांच्या खरेदीसाठी 80 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना शेती कामासाठी आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे जेणेकरून वेळेची बचत होईल आणि त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.
योजनेचे नाव | कृषी यांत्रिकीकरण योजना महाराष्ट्र |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषी |
उद्देश | शेती कार्यात आधुनिक यंत्रांचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
लाभ | शेती उपयुक्त अवजारे खरेदीसाठी 80 टक्के अनुदान |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना उद्देश
- शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात आधुनिक यंत्र सामग्रीच्या खरेदीसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने कृषी यांत्रिकीकरण योजनेची सुरुवात करण्यात आली.
- कृषी क्षेत्रात शेती उपकरणांचा वापर करणे सुलभ व्हावे.
- कृषी यांत्रिकरणांला प्राधान्य देणे.
- शेती कार्य जलद गतीने व्हावे व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी.
योजनेचे वैशिष्ट्य:
- या योजनेअंतर्गत खूप साऱ्या कृषी उपकरणांवर अनुदान दिले जाते आहे जेणेकरून शेतकरी शेती उपयुक्त उपकरणे खरेदी करू शकतील व शेती कार्य जलद गतीने करू शकतील व स्वतःच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करू शकतील.
- कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदान राशी लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
- राज्यातल्या सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- कृषी यांत्रिकीकरण योजना ही केंद्रपुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.
- योजनेअंतर्गत अनुदानासाठी जीएसटी रक्कम गृहित धरण्यात येत नाही.
योजनेअंतर्गत समाविष्ट अवजारे:
ट्रॅक्टर, पॉवर टीलर | |
स्वयंचलित औजारे | रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड) |
ट्रॅक्टर चलीत औजारे | रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र (थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर),कॉटन श्रेडर,ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर, |
काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे | मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर पल्व्हराइजर/पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर, |
योजनेअंतर्गत टक्केवारी अनुसार दिले जाणारे अनुदान:
अल्प व अत्यल्प भुधारक, अनुसूचित जाती/जमाती आणि महिला शेतकरी | 50 टक्के अनुदान |
इतर शेतकरी | 40 टक्के अनुदान |
मात्र राईस मिल, दाल मिल , पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्वरायजर/पॉलीशर च्या बाबतीत अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा | 60 टक्के अनुदान |
इतर लाभार्थी | 50 टक्के अनुदान |
शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी औजारे बँक स्थापन करण्यासाठी | 60 टक्के अनुदान (24 लाख रु. पर्यंत अनुदान) |
योजनेअंतर्गत आरक्षण:
महिलांसाठी | 30 टक्के निधी |
दिव्यांग व्यक्ती | 3 टक्के निधी |
जर महिला व दिव्यांगांसाठी अर्ज आले नाहीत तर सदर निधी इतर शेतकऱ्यांसाठी वापरण्यात येईल
योजनेअंतर्गत विविध औजारांसाठी दिली जाणारी अनुदान राशी:
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (50 टक्के)
ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) | 1.25 लाख रुपये |
पॉवर टिलर | |
बीएच पी पेक्षा कमी | 65,000/- रुपये |
बीएचपी व त्यापेक्षा जास्त | 85,000/- रुपये |
स्वयंचलित अवजारे | |
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) | 1,75,000/- रुपये |
रिपर कम बाइन्डर (4 व्हील) | 2,50000/- रुपये |
रीपर | 75,000/- रुपये |
पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड) | 25,000/- रुपये |
पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड) | 35,000/- रुपये |
पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) | 63,000/- रुपये |
ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे | |
रोटाव्हेटर 5 फुट | 42,000/- रुपये |
रोटाव्हेटर 6 फुट | 44,800/- रुपये |
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) | 1 लाख रुपये |
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) | 2.50 लाख रुपये |
पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) | 20,000/- रुपये |
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र) | 35,000/- रुपये |
कल्टीव्हेटर | 50,000/- रुपये |
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम | 70,000/- रुपये |
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम | 89,500/- रुपये |
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम | 4,000/- रुपये |
नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम | 50,000/- रुपये |
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट) | 1.25 लाख रुपये |
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर | 75,000/- रुपये |
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर | 1 लाख रुपये |
Manually operated chaff cutter (above 3 feet) | 6,300/- रुपये |
Manually operated chaff cutter (upto 3 feet) | 5000/- रुपये |
इतर लाभार्थी यांना 40 टक्के
ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) | 1 लाख रुपये |
पॉवर टिलर | |
8 बीएच पी पेक्षा कमी | 50,000/- रुपये |
8 एचपी आणि त्यापेक्षा जास्त | 70,000/- रुपये |
स्वयंचलित अवजारे | |
रिपर कम बाइन्डर (3 व्हील) | 1.40 लाख रुपये |
रिपर कम बाइन्डर (4 व्हील) | 2 लाख रुपये |
रीपर | 60,000/- रुपये |
पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड) | 20,000/- रुपये |
पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 बीएचपी इंजीन ऑपरेटेड) | 30,000/- रुपये |
पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) | 50,000/- रुपये |
ट्रॅक्टर (35 बीएचपी पेक्षा जास्त) चलितअवजारे | |
रोटाव्हेटर 5 फुट | 34,000/- रुपये |
रोटाव्हेटर 6 फुट | 35,800/- रुपये |
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) | 80,000/- रुपये |
थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) | 2 लाख रुपये |
पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) | 16,000/- रुपये |
रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र) | 30,000/- रुपये |
कल्टीव्हेटर | 40,000/- रुपये |
पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम | 56,000/- रुपये |
पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम | 71,600/- रुपये |
पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम | 32,000/- रुपये |
पलटी नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम | 40,000/- रुपये |
ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर | 1 लाख रुपये |
विडर (पीटीओ ऑपरेटेड)/वीड स्लैशर | 60,000/- रुपये |
कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर | 80,000/- रुपये |
Manually Operated Chaff Cutter (Above 3 Feet) | 40 टक्के 5000/- रुपये |
Manually Operated Chaff Cutter (Upto 3 Feet) | 40 टक्के 4000/- रुपये |
काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे यासाठी अनुदान:
अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा
मिनी दाल मिल | 60 टक्के 1.5 लाख रुपये |
मिनी राईस मिल | 60 टक्के 2.4 लाख रुपये |
पैकिंग मशीन | 60 टक्के 3 लाख रुपये |
सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर | 60 टक्के 60,000/- लाख रुपये |
सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर | 50 टक्के 1 लाख रुपये |
इतर लाभार्थी | |
मिनी दाल मिल | 50 टक्के 1.25 लाख रुपये |
मिनी राईस मिल | 50 टक्के 2 लाख रुपये |
पैकिंग मशीन | 50 टक्के 2.40 लाख रुपये |
सर्व प्रकारचे ग्राईंडर/ पल्वराइजर/पॉलीशर | 50 टक्के 50,000/- रुपये |
सर्व प्रकारचे क्लिनर कम ग्रेडर/ग्रेडीयंट सेपरेटर/स्पेसिफीक ग्रेव्हीटी सेपरेटर | 40 टक्के 80000/- रुपये |
योजनेचे लाभार्थी:
- महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी
योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान:
- कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी 80 टक्के असून उपलब्ध करून दिले जाते.
योजनेचा फायदा:
- महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे झाले आहेत. यामुळे शेतीच्या कामांमध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकता लक्षणीयरीत्या वाढली आहे. यामुळे शेतीचे खर्च कमी झाले आहेत आणि रोजगार निर्मितीही झाली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेती अधिक आधुनिक आणि स्पर्धात्मक बनली आहे.
- कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
- या योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेतीसंबंधित विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते.
- या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची कामे कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे.
- महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे राज्यातील शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला मोठी गती मिळाली आहे.
- या योजनेमुळे शेतीची उत्पादकता आणि कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या कष्टांमध्ये मोठी घट झाली आहे.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित.जमाती मधील असल्यास त्याच्याजवळ जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
- योजनेअंतर्गत मिळणारी औजारे किमान 6 वर्षे हस्तांतर/पुनर्वीक्री/गहाण ठेवता येणार नाहीत.
- शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8अ असणे गरजेचे आहे.
- अर्जदारास ट्रॅक्टर किंवा यंत्र/अवजार यांपैकी फक्त एकाच गोष्टीसाठी अनुदान दिले जाईल.
- अर्जदाराच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने ट्रॅक्टर चा लाभ मिळवला असल्यास ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास अर्जदार पात्र असेल परंतु त्याला ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
- जर शेतकऱ्याने एखाद्या अवजाराचा लाभ घेतला असल्यास त्याच अवजारासाठी पुढील 10 वर्षे लाभ घेता येणार नाही परंतु दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करता येईल.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- जातीचा दाखला
- जमिनीचा 7/12 व 8अ
- बँक खाते पासबुक
- यंत्र/अवजारांचे कोटेशन
- परीक्षण अहवाल
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- प्रतिज्ञा पत्र
लाभार्थी निवड पद्धत:
- जमा झालेल्या अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाईन छाननी करण्यात येते व पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पुर्व सम्मती आदेश ऑनलाईन देण्यात येतो व त्याबाबतचा शेतकऱ्यांच्या मोबाईल वर SMS पाठवला जातो.
- शेतकरी पूर्वसंमती आदेश महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून पाहू शकतील.
- ज्या शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत निवड झाली नाही परंतु ते प्रतिक्षा यादीत आहेत असे लाभार्थी पुढील वर्षी त्याच बाबीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबिटी पोर्टल वर मागिल वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा लागेल व त्यांना या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर घेल्यावर कृषी विभागात कृषी यांत्रिकीकरण योजना वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करावे लागेल
- अशा प्रकारे तुमची कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदार शेतकऱ्याला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join |
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना अधिकृत वेबसाईट | Click Here |
महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना GR | Click Here |
योजनेतील काही आव्हाने:
- काही शेतकऱ्यांना योजनेबद्दल पुरेशी माहिती नसल्याने त्यांना त्याचा लाभ मिळू शकत नाही.
- योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काही शेतकऱ्यांसाठी क्लिष्ट असू शकते.
- काही शेतकऱ्यांकडे अनुदान रक्कम भरण्यासाठी पुरेसे पैसे नसतात.
- काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यास अडचणी येतात. याची मुख्य कारणे म्हणजे अनुदानाची मर्यादित रक्कम, जटिल अर्ज प्रक्रिया आणि बँकांकडून कर्ज मिळवण्यात अडचण. या योजनेचा लाभ सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने या मर्यादांवर मात करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.