मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी यासाठी विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
पावसाच्या अनियमिततेमुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकाच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही व पाण्याअभावी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो त्यामुळे शेतीपिकांच्या सिंचनासाठी विहिरींमधून पाण्याची उपलब्धता केली जाऊ शकते परंतु विहीर खोदण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते व राज्यातील बहुतांश शेतकरी हे आर्थिक दृष्ट्या गरीब आहेत त्यामुळे पैशांअभावी शेतकरी शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या समस्येचा विचार करून राज्य शासनाने राज्यात पंचायत समिती विहीर योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा असा निर्णय हाती घेतला.
महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना सिंचनाच्या जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिक अनुदान उपलब्ध करून देणे हा Magel Tyala Vihir चा मुख्य उद्देश आहे.
योजनेचे नाव | विहीर योजना 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषी विभाग |
लाभ | 4 लाख रुपये अनुदान |
उद्देश्य | शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिक अनुदान |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील शेतकरी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
मागेल त्याला विहीर योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेती पिकांच्या सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता व्हावी या उद्देशाने मागासवर्गीय विहीर योजना ची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्राकडे प्रोत्साहित करणे.
- शेतीसाठी पाण्याचा स्रोत निर्माण करून देणे तसेच पाण्यासाठी आत्मनिर्भर बनविणे व पाण्याअभावी शेती पिकांचे होणारे नुकसान टाळणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या सिंचनासाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता भासू नये.
योजनेचे वैशिष्ट्य:
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगाच्या) माध्यमातून सिंचन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये एवढं अनुदान दिलं जाणार आहे हे Magel Tyala Vihir Yojana 2024 चे महत्वाच वैशिष्ट्य आहे.
- राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घेता यावा याकरिता महाराष्ट्र शासनाने गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहिरींची संख्यांची अट ही रद्द केलेली असून आता जास्तीत जास्त लोकांना मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत लाभ मिळवता येणार आहे.
- या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाईल.
- राज्यातील सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
- मागेल त्याला विहीर अनूदान योजनेला पंचायत समिती विहीर योजना या नावाने देखील ओळखण्यात येते.
शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान:
- शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
योजनेचे लाभार्थी:
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी जे स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी असमर्थ आहेत.
- भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गातील व्यक्ती
- अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्ती
- अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वननिवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 खालील लाभार्थी.
- अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्ती
- जॉब कार्ड धारक व्यक्ती
- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्ती
- इतर मागास वर्गातील शेतकरी
- सीमांत शेतकरी म्हणजेच ज्यांच्याकडे अडीच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
- महिला कर्ता असलेल्या कुटुंबातील महिला
- कुटूंबामध्ये आत्महत्या झालेली आहे त्यांचे वारसदार
- इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
- शारीरिक दृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे
- जमिनी सुधारक सुधारण्याचे लाभार्थी
- नीरधीसूचित जमाती
- अल्पभूधारक शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे शेतकरी.
- दारिद्र्यरेषेखाली कुटुंब
शेतकऱ्यांना होणारा फायदा:
- विहीर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना पिण्यासाठी तसेच शेती पीक सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल.
- पाण्याअभावी शेत पिकांचे नुकसान होणार नाही.
- शेतकरी शेतीसाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील.
- शेतकरी शेती क्षेत्राकडे पाठ फिरवणार नाहीत.
शेतकऱ्यांना दिला जाणारा लाभ:
- मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी 4 लाखांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते जेणेकरून त्यांना शेती पिकाच्या सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी.
योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया:
- सिंचन विहीर योजनेअंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया हि ग्रामसेवक यांच्या मार्फत करण्यात येईल.
अर्जदारासाठी आवश्यक पात्रता:
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच शेत विहीर योजना चा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे आणि त्याच्याजवळ शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहे.
- सरकारी विहीर योजना अंतर्गत अर्ज करताना शेतात विहीर असता कामा नये.
- अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे राष्ट्रयीकृत बँक खाते असणे आवश्यक आहे व बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे.
- अर्जदार शेतकऱ्याने विहीर योजना अंतर्गत अर्ज करण्यापूर्वी विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरासोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदार शेतकऱ्याकडे किमान 0.40 हेक्टर क्षेत्र सलग असणे आवश्यक आहे.
- शेतात ज्या ठिकाणी विहिरीचे खोदकाम करायचे आहे त्या ठिकाणपासून 500 मीटर पर्यंत विहीर असता कामा नये.
- अर्जदार शेतकऱ्याची जमीन विहीरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील. (यासंदर्भात शाखा अभियंता / उप अभियंता यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी / कर्मचारी यांच्यासोबत जागेची पाहणी करून त्यांचा अहवाल घेण्यात येईल)
- दोन विहिरीमधील किमान 150 मीटर अंतराची अट ही रन ऑफ झोन तसेच अनुसूचित जाती व जमाती व दारिद्र रेषेखालील कुटुंब याकरिता लागू करण्यात येणार नाही.
- अर्जदार व्यक्तीच्या 7/12 वर यापूर्वी विहिरीची नोंद असता कामा नये.
- अर्जदार शेतकऱ्याकडे ऑनलाईन एकूण जमिनीचा दाखला असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी एकापेक्षा जास्त असेल तर अशावेळी संयुक्तपणे ते विहीर अनुदान योजनेचा लाभ घेवू शकतात मात्र त्यासाठी एकूण सलग जमिनीचे क्षेत्र 0.40 पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे.
- जर अर्जदार शेतकऱ्याच्या जमिनीत सह हिस्सेदार असतील तर अशा परिस्थितीत अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
विहिर कोठे खोदावी याबाबत माहिती:
- दोन नाल्यांच्या मधिल क्षेत्रात व नाल्यांचे संगमाजवळ जेथे मातीचा किमान 30 से.मी. चा थर व किमान 5 मीटर खोलीपर्यंत मऊ (झिजलेला खडक) आढळतो तेथे.
- नदी व नाल्या जवळील उथळ गाळाच्या प्रदेशात.
- जमिनीच्या सखल भागात जेथे किमान 30 से. मी. पर्यंत मातीचा थर व किमान 5 मीटर खोली पर्यंत मुरुम (झिजलेला खडक) आढळतो.
- नाल्याच्या तिरावर जेथे उंचवटा आहे तेथे, परंतु सदर उंचावर चोपण किंवा चिकण माती नसावी.
- घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात
- नदी व नाल्याचे जुने प्रवाह पात्र जेथे आता नदी पात्र नसतांना देखील वाळु, रेती व गारगोट्या थर दिसून येते.
- नदीचे/ नाल्याचे गोलाकार वळणाच्या आतील भूभाग.
- अचानक दमट वाटणाऱ्या अथवा असणाऱ्या जागेत.
अर्ज करताना लागणारी कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- रोजगार हमी योजनेची जॉब कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याचा तपशील
- जमिनीचे कागदपत्रे 7/12 व 8अ
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून 0.40 हेक्टर पेक्षा अधिक सलग जमिन असल्याचा पंचनामा
- सामुदायिक विहीर असल्यास समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्यांमध्ये करारपत्र
Magel Tyala Vihir Online Application Process:
- अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्राम पंचायत कार्यालयात जावे लागेल व ग्राम सेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत आवश्यक अशी कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Magel Tyala Vihir Apply Online:
- अर्जदार शेतकऱ्याला विहीर अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर मागेल त्याला विहीर योजना यावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल व सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील व सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join |
मागेल त्याला विहीर योजना अर्ज | Click Here |
Magel Tyala Vihir GR | Click Here |
या योजने अंतर्गत अनुदान रक्कम केव्हा मिळते विहीर पूर्ण झाल्यावर कि काम सुरु करते वेळी .
काम सुरु करायच्या आधी पहिल्या टप्प्याची रक्कम दिले जाते व उर्वरित रक्कम विहिरीचे काम पूर्ण झाल्यावर दिली जाते.
सातबाऱ्यावर जुनी विहीर आहे मात्र प्रत्यक्ष वाहीवटला गाळाने पूर्णपणे भरून गेलेली आहे. तर मग सातबाऱ्यावरुन विहीर कडून नवीन विहिरीसाठी अर्ज करता येईल का ..?
किंवा नवीन विहिरिसाठी काय करावे लागेल…?
तुमची जुनी विहीर गाळाने भरली गेली आहे याची माहिती अर्जासोबत जोडा.
मी शहरात नोकरी करत असून. माझे वार्षिक उत्पन्न रू११,००,०००/- (रूपये अकरा लाख ) आहे.
मी नियमित दरवर्षी इन्कमटॅक्स रिटर्न्स फाईल करतो.
माझी गावी शेती आणि बागायत लागवड योग्य १.११ हेक्टर जमिनीचा एक अखंड प्लाॅट असून पाण्याअभावी तो अस्च पडुन आहे.
मला तो शेती आणि काजू, आंबा लागवडीसाठी वापरायचा आहे तरि त्यात मागेल त्याला विहीर ह्या सरकारी योजणेत अनुदान प्राप्त करण्यास मी पात्र ठरू शकतो का. तसेच मला त्यासाठी लागणारे जाॅब कार्ड ग्रामपंचायतीतून मिळेल का?
कृपया मार्गदर्शन करावे.
तुम्ही अर्ज करू शकता आणि तुमच्या शेतात विहीर खोदण्यासाठी अनुदान प्राप्त करू शकता.
सरकारी कर्मचारी यांना या योजनेचा लाभ भेटू शकतो काय . किंव्हा वडिलोपार्जित शेती मध्ये 3 वारस असतील आणि त्यातील 1 सरकारी कर्मचारी आहे आणि इतर नाही त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटेल काय.. कृपया मार्ग दर्शन करावे आणि जॉब कार्ड कुठणा काढता येईल
अर्जदार किंवा वारसामधील एखादी व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. आणि योजनेअंतर्गत लाभ मिळवू शकता.
जमीन आज्जीच्या नावावर पण आजोबा शिक्षक होते पण ते वारले आहे त त्याच्या पेन्शन आज्जीला भेटत आहे तर विहीर मंजुर व्हायला काही अडचण नाही ना
काहीच अडचण नाही
जर आम्ही पाहिले विहीर बाधून पूर्ण झाली असेल तर नंतर अर्ज करून अनुदान घेऊ शकतो का , आणि त्यात अशी काय अटी आहेत का की विहीर यंत्राचा साह्याने खोदलेली नसावी .
तुम्हाला विहीर खोदण्याच्या आधी अर्ज करावा लागतो त्यानंतर विहीर खोदण्यासाठी तुम्हाला टप्प्या टप्याने अनुदान दिले जाते. जर तुम्ही आधीच विहीर खोदली असेल तर अनुदान दिले जाणार नाही. अधिक माहितीसाठी तुमच्या ग्रामपंचायत किंवा जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा.
मागेल त्याला विहीर हि योजना महाराष्ट्र राज्याच्या सर्व शेतकरी वर्गासाठी आहे कि ठराविक जिल्ह्यातील शेतकरी वर्गासाठी आहे
सदर योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
Vihir manjur karnya madhe sarpanchacha hastkshep asto ka
विहीर मंजूर करण्यासंबंधी सरपंच यांचा हस्तक्षेप नसतो फक्त अर्जासोबत रहिवाशी दाखला मागितल्यास सरपंच यांकडून तो दाखला घ्यावा लागतो.
अर्ज कस करायच
तुम्ही तुमच्या ग्रामपंचात कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयात जाऊन अर्ज करू शकता.