महाडीबीटी शेतकरी योजना 2024 : नोंदणी सुरु

महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेले एक महत्वाचे तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या फायद्याचे असे पोर्टल आहे.

महाराष्ट्र शासन राज्यातील शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक व्हावा त्यांचे जीवनमान सुधारावे व ते सशक्त व आत्मनिर्भर व्हावेत यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते.
काही वर्षांपूर्वी कृषी योजनांचा लाभ मिळविण्याकरीता शेतकऱ्यांना विविध पोर्टल वर जाणून अर्ज सादर करावा लागायचा त्यामधील खूप साऱ्या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचत सुद्धा नव्हती त्यामुळे शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित रहायचे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाच्या कृषी विभागाने Mahadbt Farmer Login सुरु करण्याच्या उपक्रम हाती घेतला.

राज्यात सुरु करण्यात येणाऱ्या सर्व कृषी योजनांची माहिती Mahadbt Farmer Login वर उपलब्ध केली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांसाठी विविध पोर्टल वर जाण्याची गरज भासणार नाही व ते कृषी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत. या पोर्टल वर शेतकऱ्यांना एकदाच नोंदणी करून भविष्यात सुरु करण्यात येणाऱ्या सर्व कृषी योजनांचा लाभ घेता येईल.

आपले सरकार Mahadbt Farmer Portal हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असून, सामान्य नागरिकांना योजनांच्या माध्यमातून थेट लाभ मिळवून देण्यासाठी उभारलेले एक अद्वितीय व्यासपीठ आहे.

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना चा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या सर्व कृषी योजनांची माहिती तसेच अर्ज प्रक्रिया आर्थिक लाभाचे वितरण एकाच पोर्टल वर उपलब्ध करून देणे जेणेकरून शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांसाठी विविध पोर्टल वर जाण्याची गरज भासणार नाही.

योजनेचे नावMaha Dbt Farmer Login Portal
लाभार्थीशेतकरी
लाभविविध कृषी योजनांचा लाभ मिळवणे शक्य होईल
उद्देशएकाच पोर्टल वर सर्व योजनांची माहिती उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

योजनेचे उद्दिष्ट:

  • राज्य DBT आणि सेवा पोर्टलचे मुख्य पृष्ठ विकसित करणे आणि विविध DBT योजनांसाठी आणि कृषी योजनांमार्फत सुरु होणाऱ्या विविध सेवांसाठी आंतरिक कार्यप्रवाह व्यवस्थापन आणि सामग्री व्यवस्थापनाचे व्यासपीठ तयार करणे हे आपले सरकार DBT योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या सर्व कृषी योजनांची माहिती तसेच अर्ज प्रक्रिया एकाच पोर्टल वर शक्य व्हावी या उद्देशाने या पोर्टल ची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांना विविध पोर्टल वर जाण्याची गरज भासू नये.
  • शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना त्वरित आर्थिक भरपाई देणे शक्य व्हावे.
  • फेर-अभियांत्रिकीच्या माध्यमातून कल्याणकारी योजनांमधील विद्यमान प्रक्रियेतील माहिती / निधीचे वितरण सुलभ व जलद गतीने होणे आणि अचूक लाभार्थी गट निश्चित करणे.
  • पारदर्शक व्यवहार तसेच विद्यमान यंत्रणेतील त्रुटी कमी करणे हे शासकीय वितरण प्रणालीचे फायदे सुधारण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
  • शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या कृषी योजनांसाठी सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासू नये.
महाडीबीटी शेतकरी योजना

योजनेचे वैशिष्ट्य:

  • शेतकरी कोणत्याही वेळी, कुठूनही आपले सरकार Mahadbt Farmer Portal वरून नोंदणी करून राज्य आणि केंद्र पुरस्कृत कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • शेतकरी त्यांनी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती त्यांच्या वापरकर्ता आयडी वापरून कधीही पाहू शकतात.
  • सुलभ पडताळणी आणि पारदर्शकता यासाठी 7/12 प्रमाणपत्र, 8अ प्रमाणपत्र, आधार संलग्नित बँक खात्याच्या पासबुकची प्रत, खरेदीच्या पावतीची प्रत, इ. अपलोड करू शकतात.
  • आपले सरकार DBT च्या अर्ज प्रक्रियेच्या विविध स्तरांवर अर्जदारांना एसएमएस आणि ईमेल अलर्टची तरतूद.
  • नोंदणीकृत अर्जदार/ शेतकरी यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात थेट लाभ वितरण.
  • मंजूरी प्राधिकरणासाठी अर्ज मंजुरीची सुलभ प्रक्रिया.
  • भूमिका आधारित युनिक वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड उपलब्ध.
  • विभाग / राज्य प्राधिकरण यांच्याद्वारे कृषी योजना अर्जांच्या देखरेखीची पारदर्शकता.

Mahadbt Farmer Scheme List:

1. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन घटक)

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तुषार व ठिबक सिंचनासाठी 55 टक्क्यांपर्यंत आर्थिक अनुदान दिले जाते.

2. कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खाली दिलेल्या कृषी यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते.

  • ट्रॅक्टर
  • पॉवर टिलर
  • ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे
  • बैल चलित यंत्र / अवजारे
  • मनुष्य चलित यंत्र / अवजारे
  • प्रक्रिया संच
  • काढणी पश्चात तंत्रज्ञान
  • फलोत्पादन यंत्रे / अवजारे
  • वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
  • स्वयं चलित यंत्रे

3. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान : अन्नधान्य, तेलबिया, ऊस व कापूस

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (सूक्ष्म मूलद्रव्ये), एकात्मिक कीड व्यवस्थापन (पिक संरक्षण औषधे व जैविक घटक, तणनाशाके), वैयक्तिक शेततळे, पंप संच, पाईप, विविध कृषी अवजारे या बाबींना अनुदान देण्यात येते. [महाडीबीटी शेतकरी योजना]

4. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य)

या योजनेंतर्गत नवीन विहीर (2.50 लाख रुपये), जुनी विहीर दुरुस्ती (50 हजार रुपये), इनवेल बोअरींग (20 हजार रुपये), पंप संच (20 हजार रुपये), वीज जोडणी आकार (10 हजार रुपये), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (1 लाख रुपये) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच – 50 हजार रुपये किंवा तुषार सिंचन संच – 25 हजार रुपये), पीव्हीसी पाईप (30 हजार रुपये), परसबाग (500 /- रुपये), या बाबींवर अनुदान देण्यात येते.

5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

या योजनेंतर्गत नवीन विहीर (2.50 लाख रुपये), जुनी विहीर दुरुस्ती (50 हजार रुपये), इनवेल बोअरींग (20 हजार रुपये), पंप संच (20 हजार रुपये), वीज जोडणी आकार (10 हजार रुपये), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (1 लाख रुपये) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच – 50 हजार रुपये किंवा तुषार सिंचन संच – 25 हजार रुपये), पीव्हीसी पाईप (30 हजार रुपये), परसबाग (500 /- रुपये), या बाबींवर अनुदान देण्यात येते.

6. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

शेतकरी खालील घटकांचा लाभ या योजनेअंतर्गत घेऊ शकतात

1) उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकांची स्थापना करणे.
2) उतीसंवर्धन प्रयोगशाळा बळकटीकरण/पुनरुज्जीकरण
3) नवीन उतीसंवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे
4) भाजीपाला विकास कार्यक्रम
5) गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य आयात करणे
6) भाजीपाला, बियाणे प्रक्रिया, पॅकिंग, साठवण इ. पायाभूत सुविधा
7) नवीन बागांची स्थापना करणे
8) फलोत्पादन यांत्रिकीकरण
9) अळिंबी उत्पादन
10) पुष्प उत्पादन
11) मसाला पिके लागवड
12) जुन्या फळबागांचे पुनरुज्जीकरण करून उत्पादकतेत वाढ करणे (आंबा, संत्री, काजू, चिकू, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, आवळा)
13) नियंत्रित शेती घटक (हरितगृह, शेडनेट हाऊस, पक्षिरोधक जाळी, प्लॅटिक आच्छादन, प्लास्टिक टनेल, पॉलीहाऊसमधील उच्च दर्जाच्या भाजीपाला लागवड साहित्यासाठी व निविष्ठांसाठी अनुदान, पॉलीहाऊसमधील/शेडनेट हाऊस मधील उच्च दर्जाच्या फुलपिकांच्या लागवड साहित्यासाठी व निविष्ठांसाठी अनुदान)
14) सेंद्रिय शेती
15) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक कीड व्यवस्थापन
16) परंपरागीकरणासाठी मधुमक्षिका पालन
17) एकात्मिक काढणीपश्चात व्यवस्थापन (पॅक हाऊस, एकात्मिक पॅक हाऊस, पूर्व शितकरण गृह, शितखोली (स्टेजिंग), फिरते पूर्व शितकरण गृह, शितगृह (नवीन/विस्तारीकरण/आधुनिकीकरण), शितसाखळीमध्ये नवीन तंत्रज्ञान राबविणे व शितसाखळीचे आधुनिकीकरण करणे, शितवाहन, प्राथमिक / फिरते प्रक्रिया केंद्र, रायपनींग चेंबर, शेतावरील कमी ऊर्जा वापरणारे थंड साठवणूक गृह, कमी किमतीचे फळ-भाजीपाला साठवण केंद्र, कमी खर्चाचे कांडा साठवून्क गृह / कांदाचाळ – 25 मे. टन, पुसा शून्य ऊर्जा आधारित शितगृह – 100 किलो, एकात्मिक शितसाखळी पुरवठा प्रणाली-प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी वरील घटकांमधील घटकांचा समावेश असणे आवश्यक आहे.)
18) फलोत्पादन पिकांसाठी पणन सुविधा स्थापन करणे (शासकीय/ खासगी/ सहकारी क्षेत्र)
19) या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण या बाबींवर अनुदान देण्यात येईल. [महाडीबीटी शेतकरी योजना]

7. कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम

8. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

या योजनेअंतर्गत लाभार्थ्याना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरीता 100 टक्के अनुदान देण्यात येते.

9. राष्ट्रीय कृषी विकास योजना – रफ्तार

10. राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना

या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येते

1) ट्रॅक्टर
2) पॉवर टिलर
3) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
4) बैल चलित यंत्र/अवजारे
5) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
6) प्रक्रिया संच
7) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
8) फलोत्पादन यंत्र/अवजारे
9) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
10) स्वयं चलित यंत्रे

11. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना

महाडीबीटी पोर्टल चा फायदा:

  • राज्यातील शेतकऱ्यांना एकाच पोर्टल वर सर्व कृषी योजनांची माहिती मिळणे शक्य होईल.
  • राज्यातील शेतकरी एकाच पोर्टल वरून सर्व योजनांसाठी अर्ज करू शकतील त्यामुळे त्यांना विविध योजनांसाठी विविध पोर्टल वर जाण्याची गरज भासणार नाही.
  • अर्जदार ऑनलाईन नोंदणीद्वारे नोंदणी करून नोंदणीकृत वापरकर्ता आयडी (User Name) आणि पासवर्ड (Password) वापरून संबंधित योजनांचा लाभ घेऊ शकतात.
  • नागरिक आपले सरकार महाडीबीटी पोर्टल संबंधित आपल्या प्रश्नांसंदर्भात अधिक माहितीसाठी उपलब्ध हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करू शकतात.
  • शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना त्वरित आर्थिक भरपाई देणे शक्य होईल.
  • mahadbt farmer portal मुळे शेतकरी घरी बसून मोबाईल च्या सहाय्याने सर्व योजनांची माहिती मिळवू शकतील व अर्ज करू शकतील त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी विविध सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • राज्यात सुरु करण्यात येणाऱ्या विविध कृषी योजनेअंतर्गत आर्थिक अनुदान मिळवणे शेतकऱ्यांना शक्य होईल.

शेतकऱ्यांसाठी आपले सरकार महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक तत्वे

  • शैक्षणिक सत्र 2017-18 पासून आधार क्रमांक आवश्यक आहे. आधार नोंदणी न झालेले शेतकरीसुद्धा आपले सरकार DBT पोर्टलवर नोंदणी करू शकतात.
  • अर्जदारांना सूचित केले जाते, कृपया मार्गदर्शक पुस्तिकेचे काळजीपूर्वक अवलोकन करावे आणि आपले सरकार DBT पोर्टलवर कृषी योजनेचे अर्ज भरण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घेणे.
  • कृषी योजनेसाठी निर्धारित केलेल्या सर्व अटी आणि अर्ज भरण्यासाठी आवश्यक पात्रता निकष (पात्रता विभाग तपासा) पूर्ण करण्यासाठी अर्जदार पात्र आहे कि नाही, याची खात्री करण्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदाराची असेल. अर्जदाराची पात्रता कोणत्याही स्तरावर अवैध आढळून आली, तर त्याचा / तिचा अर्ज रद्द करण्यात येईल.
  • अर्जदाराने अंतिमतः अर्ज जमा करण्यापूर्वी त्याच्या / तिच्या द्वारे प्रदान केलेले सर्व तपशील योग्य आहेत का, हे तपासून घ्यावे, कारण त्यानंतर किरकोळ बदल करण्यासाठी अर्ज परत पाठविण्यास केवळ माहिती संपादित करण्यासाठी तरतूद असेल.
  • कृषी योजनेसाठी अर्ज सादर करण्याची पद्धत फक्त ऑनलाईनद्वारेच असेल. अन्य कोणत्याही पद्धतीने भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्जामध्ये * चिन्हासह जे चिन्हांकित क्षेत्र आहेत ते भरणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

नोंदणी करण्यासाठी काही अटी व शर्ती:

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकच अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिक अर्ज करण्यासाठी पात्र नाहीत.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • पत्त्याचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • जातीचा दाखला
  • जमिनीचा दाखला 7/12 व 8अ
  • उत्पनाचा दाखला
  • बँक खात्याचा तपशील
  • पिकाची माहिती
  • डोमेसाइल प्रमाणपत्र
  • कुटुंबाची माहिती

नवीन नोंदणी करण्याची पद्धत:

पहिला टप्पा

  • अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम Mahadbt Farmer Portal वर जावे लागेल.
  • होम पेज वर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
महाडीबीटी शेतकरी योजना

  • आता तुमच्यासमोर नवीन अर्जदार नोंदणी अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (अर्जदाराचे नाव, वापरकर्त्याचे नाव, पासवर्ड, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, OTP) भरून नोंदणी करा वर क्लिक करावे लागेल.
महाडीबीटी शेतकरी योजना

  • आता तुमच्यासमोर एक पर्याय उघडेल (तुमच्याजवळ आधार कार्ड आहे का?)
  • त्यामध्ये तुम्हाला No वर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर एक नवीन नोंदणी अर्ज उघडेल (Non Aadhaar) त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून जतन करा वर क्लिक करावे.
महाडीबीटी शेतकरी योजना

  • अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

लॉगिन करण्याची पद्धत:

दुसरा टप्पा

  • अर्जदाराला होम पेज वर अर्जदार लॉगिन वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुम्हाला वापरकर्ता आयडी वर क्लिक करावे लागेल व तुमचा Username, Password, Captcha टाकून लॉग इन करा वर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची Mahadbt Farmer Portal अंतर्गत लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.

तिसरा टप्पा

  • लॉगिन केल्यावर अर्जदारासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Apply वर क्लिक करावे लागेल.
महाडीबीटी शेतकरी योजना

  • आता अर्जदारासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये त्याला त्याची वैयक्तिक माहिती, जागेची माहिती, पिकाची माहिती, जात तपशील, उत्पन्न तपशील, अधिवास तपशील, वैयक्तिक पात्रता तपशील, बँक तपशील इत्यादी माहिती भरावी लागेल व जतन करा वर क्लिक करावे लागेल.
महाडीबीटी शेतकरी योजना

  • आता अर्जदाराला त्याच्या पत्त्याची माहिती भरून जतन बटनावर क्लिक करावे लागेल.
महाडीबीटी शेतकरी योजना

  • आता अर्जदाराला त्याच्या कुटुंबाचा तपशील भरावा लागेल.
महाडीबीटी शेतकरी योजना

  • आता अर्जदाराला त्याच्या जमिनीचा तपशील भरावा लागेल.
महाडीबीटी शेतकरी योजना

  • आता अर्जदाराला त्याच्या पिकाचा तपशील भरावा लागेल.
महाडीबीटी शेतकरी योजना

  • आता अर्जदाराला त्याच्या आंतर पिकाचा तपशील भरावा लागेल.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर जतन करा वर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे अर्जदाराची mahadbt farmer portal अंतर्गत नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
Mahadbt Farmer PortalClick Here
Mahadbt Farmer Helpline Number022-61316429
Mahadbt Farmer Scheme PDFClick Here
Mahadbt Farmer Scheme List In Marathi PDF DownloadClick Here
Mahadbt Farmer Scheme Helpline Number022-61316429
Mahadbt Farmer Customer Care Number022-61316429
Mahadbt Complain Number022-61316429

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज PDF
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
Gopinath Munde Apghat Vima Yojana Form
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment

Join WhatsApp Group!