महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना : Mahajyoti Kaushal Vikas Prashikshan Yojana

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश युवक/युवती सुशिक्षित आहेत परंतु त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार तसेच आवडीनुसार राज्यात रोजगार उपलब्ध नाहीत. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांच्या खांद्यावर स्वतःला तसेच आपल्या कुटुंबाला सांभाळण्याची मोठी जबादारी असते त्यामुळे युवक/युवतींना रोजगारासाठी आपल्या घरापासून दूर शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जावे लागते त्यामुळे मोठ्या प्रकरणात नागरिकांचे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरण होते.

युवकांना/युवतींना राज्यात त्यांच्या शिक्षणानुसार तसेच आवडीनुसार रोजगार उपलब्ध नसल्या कारणामुळे बहुतांश नागरिक स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक असतात परंतु त्यांच्याजवळ उद्योगाशी संबंधित कुठल्याच प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण त्यांच्याजवळ उपलब्ध नसल्याकारणामुळे त्यांना स्वतःचा उद्योग सुरु करता येत नाही त्यामुळे ते उद्योगाशी संबंधित एखादे कौशल्य प्रशिक्षण मिळवण्यासाठी प्रयन्त करतात परंतु एखाद्या उद्योगाशी संबंधित कौशल्य प्रशिक्षण मिळवण्यासाठी प्रशिक्षण शुल्क जास्त असल्यामुळे तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना कौशल्य प्रशिक्षण शुल्क भरणे शक्य नसते त्यामुळे राज्यातील युवक/युवतींच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती या स्वायत्त्व संस्थेमार्फत इतर मागासवर्गीय,विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 18 ते 45 वयोगटातील तसेच नॉनक्रिमिलेअर गटातील युवक युवतींना निवासी व अनिवासी स्वरूपाचे विविध क्षेत्रातील मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने राज्यात महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

Table of Contents

या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील बेरोजगार युवक युवतींना नामवंत प्रशिक्षण संस्थांमधून विविध टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल कोर्सेस चे प्रशिक्षण देण्यात येते.

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण यशस्विरीत्या पूर्ण करणाऱ्या युवक युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येतात तसेच स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी बँक तसेच वित्त संस्थांमार्फत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सहाय्य केले जाते जेणेकरून युवक/युवती स्वतःचा एखादा उद्योग सुरु करू शकतील व राज्यातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करू शकतील जेणेकरून त्यांना रोजगारासाठी स्वतःच्या घरापासून दूर शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाण्याची गरज लागणार नाही.

या योजनेचा मुख्य उद्देश मागास प्रवर्गातील युवक युवतींना निवासी व अनिवासी स्वरूपाचे विविध क्षेत्रातील मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देणे जेणेकरून प्रशिक्षण पूर्ण करून ते स्वतःचा उद्योग सुरु करू शकतील.

या योजनेमुळे राज्यात नवीन उद्योग सुरु झाल्यामुळे राज्याचा औद्योगिक विकास होईल व राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.

वाचकांना विनंती

आम्ही महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती असतील त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ मिळवून राज्यात स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करू शकतील.

योजनेचे नावमहाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
विभागरोजगार विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीराज्यातील सुशिक्षित युवक/युवती
लाभमोफत कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते.
उद्देशराज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक/युवतींना
स्वतःच उद्योग सुरु करण्यासाठी सहाय्य करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा उद्देश

Mahajyoti Kaushlya Vikas Prashikshan Yojana Purpose

 • महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 18 ते 45 वयोगटातील तसेच नॉनक्रिमिलेअर गटातील युवक युवतींना निवासी व अनिवासी स्वरूपाचे विविध क्षेत्रातील मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने राज्यात महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण मिळवण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
 • राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे
 • राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक/युवतींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
 • या योजनेअंतर्गत राज्यात नवीन उद्योग सुरु करून नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे.
 • राज्यातील बेरोजगारी कमी करणे
 • राज्यात नवीन उद्योग सुरु करून राज्याचा औद्योगिक विकास करणे.
 • राज्यातील युवक/युवतींना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण मिळवण्यासाठी लागणारे शुल्क भरण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • राज्यातील युवक/युवतींना स्वावलंबी बनविणे
 • युवकांना स्वतःच्या पायावर उभे करणे.
 • राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांचे भविष्य उज्वल बनविणे
 • राज्यातील नागरिकांचा सामाजिक स्तर उंचावणे
 • राज्यातून दुसऱ्या राज्यात युवक/युवतींचे होणारे स्थलांतरण थांबविणे.
Mahajyoti Kaushlya Vikas Prashikshan Yojana

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचे वैशिष्ट्य

Mahajyoti Kaushal Vikas Prashikshan Yojana Features

 • महाराष्ट्र शासनाच्या महाज्योती नागपूर या स्वायत्त्व संस्थेमार्फत या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 18 ते 45 वयोगटातील तसेच नॉनक्रिमिलेअर गटातील युवक युवतींना निवासी व अनिवासी स्वरूपाचे विविध क्षेत्रातील मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.
 • महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यासाठी महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना फायद्याची आणि महत्वाची योजना ठरणार आहे.
 • राज्यातील युवक/युवतींना अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे.
 • महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेची अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन केली गेली आहे जेणेकरून अर्जदार नागरिक घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतील व त्यांना कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
 • या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जदार अर्जाची स्थिती वेळोवेळी आपल्या मोबाईल च्या सहाय्याने पाहू शकतो तसेच महाज्योती संस्थेमार्फत अर्जाची स्थिती अर्जदाराला त्याच्या मोबाईल तसेच ई-मेल वर मेसेज द्वारे वेळोवेळी कळवण्यात येईल.
 • या योजनेत युवक तसेच युवती देखील अर्ज करून कौशल प्रशिक्षण मिळवू शकतात.
 • या योजनेअंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील युवक युवतींना सहभागी केले गेले आहे.
 • राज्यातील 65 वर्षावरील नागरिकांना सरकार देत आहे दर महिना 1500/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा श्रावणबाळ योजना
 • सरकार गटई कामगारांना देत आहे मोफत पत्र्याचे स्टॉल त्यासाठी वाचा गटई स्टॉल योजना
 • मुलींचे आरोग्य, शिक्षण, मुलीचे लग्न तसेच मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक साहाय्य त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी

Mahajyoti Kaushlya Vikas Prashikshan Yojana Beneficiary

 • महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय,विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 18 ते 45 वयोगटातील तसेच नॉनक्रिमिलेअर गटातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील युवक/युवती महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ

Mahajyoti Kaushlya Vikas Prashikshan Yojana Benefits

 • महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील 18 ते 45 वयोगटातील तसेच नॉनक्रिमिलेअर गटातील युवक युवतींना निवासी व अनिवासी स्वरूपाचे विविध क्षेत्रातील मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
 • राज्यातील नागरिकांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
 • या योजनेच्या सहाय्याने राज्यात नवीन उद्योग सुरु होऊन रोजगाराच्या संधी निर्माण होतील व राज्याचा औद्योगिक विकास होईल.
 • राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
 • या योजनेच्या सहाय्याने राज्यात नवीन उद्योग सुरु होतील जेणेकरून राज्यातील बेरोजगार नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील जेणेकरून त्यांना रोजगाराच्या शोधात आपल्या घरापासून दूर शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही व युवक/युवतींचे होणारे स्थलांतरण थांबेल.
 • नागरिकांना उद्योग क्षेत्राशी निगडित कौशल्य प्रशिक्षण मिळवण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची गरज भासणार नाही.
 • राज्यातील युवक/युवती स्वतःचे प्रशिक्षण पूर्ण करून एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील व स्वतःचा तसेच स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील व स्वावलंबी बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहतील.
 • राज्यातील नागरिकांचे भविष्य उज्वल बनेल.
 • राज्यातील नागरिकांचा सामाजिक स्तर उंचावेल.
Free Mahajyoti Kaushal Prashikshan Yojana

महाज्योती मार्फत राबविण्यात येणारे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

Mahajyoti Kaushal Vikas Prashikshan Yojana Program

महाज्योती मार्फत राबविण्यात येणारे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत.

Sr No.Name of CoursesEducational CriteriaAgeDuration in Hrs
1EMS Technician12th18 to 45400
2Technical Support Engineer12th18 to 45400
3Retail Sales Associate10th18 to 45250
4Inventory Clerk12th18 to 45280
5Machine Operator-Plastic Processing
(MO-PP)
8th18 to 45960
6Machine Operator-Injection Moulding
(MO-IM)
8th18 to 45960
7Machine Operator-Tool Room
(MO-TR)
10th/ITI/Diploma18 to 45960
8Machine Operator & Programmer-
(CNC Lathe)
10th/ITI/Diploma18 to 45960
9Machine Operator & Programmer-
(CNC Miling)
10th/ITI/Diploma18 to 45960
10Maintenance Of Machinery –
Technician
10th/ITI/Diploma18 to 45960
11General Duty Assistant10th18 to 45420
12Emergency Medical Technician12th18 to 45360
13Home Health Aid10th18 to 45360
14Warehouse SupervisorAny Diploma18 to 45240
15CRM Domestic Voice10th18 to 45400
16Web Developer12th18 to 45400
 • सरकार महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे त्यासाठी वाचा महिला बचत गट कर्ज योजना
 • गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते आहे रोख रक्कम त्यासाठी वाचा जननी सुरक्षा योजना
 • शेळी पालन उद्योग सुरु करण्यासाठी सरकार देत आहे 50 लाखांचे कमी व्याज दरात कर्ज त्यासाठी वाचा शेळी पालन योजना

निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात खालीलप्रमाणे दिले जाणारा पोटभर नाष्टा-भोजन

 • सकाळचा नाष्टा व चहा
 • दुपारचे भोजन
 • दुपारचा चहा
 • रात्रीचे भोजन

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक पात्रता

Mahajyoti Kaushal Vikas Prashikshan Yojana Eligibility

 • अर्जदार नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेच्या अटी व शर्ती

Mahajyoti Kaushal Vikas Prashikshan Yojana Terms & Condition

 • फक्त महाराष्ट्र राज्यातील युवक/युवतींनाच महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार व्यक्ती ही इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग गटातील असणे आवश्यक आहे.
 • खुल्या वर्गातील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार व्यक्ती ही नॉन क्रिमीलेअर गटातील असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराकडे नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार व्यक्तीने कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण केलेली असावी.
 • अर्जदार व्यक्तीची राज्यात कोणत्याही ठिकाणी रोजगार करण्याची तीव्र इच्छा असावी.
 • अर्जदार व्यक्तीचे वय 18 वर्ष ते 45 वर्ष दरम्यान असावे.
 • 18 वर्षाखालील तसेच 45 वर्षाच्या वरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार व्यक्तीने या पूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु केलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • अर्जदार व्यक्ती आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे.
 • अर्जदाराला मुदतीपूर्वी अर्ज करणे गरजेचे आहे.
 • मुदतीनंतर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • अर्जदार व्यक्तीला एकावेळी फक्त एकाच कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ दिला जाईल.
 • योजनेअंतर्गत लाभार्थ्यास प्रशिक्षण शुल्क, भोजन शुल्क, निवास शुल्क अदा करण्यात येईल त्याशिवाय कोणताही खर्च अनुज्ञेय असणार नाही.
 • प्रशिक्षणाच्या वेळी लाभार्थ्याला रोजगार भत्ता दिला जाणार नाही.
 • प्रशिक्षण कार्यक्रम दरम्यान विद्यार्थ्यांची किमान 80 टक्के हजेरी आवश्यक असेल.
 • योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या उमेदवारांची मुलाखत घेऊनच अंतिम निवड करण्यात येईल निवडीबाबतचे अंतिम अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती नागपूर यांना राहील.
 • प्रशिक्षणार्थी शिस्तभंग/गैरवर्तणूक करत असल्यास त्याच्यावर कार्यवाही केली जाईल.
Mahajyoti Training Scheme

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Mahajyoti Kaushal Vikas Prashikshan Yojana Documents

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • जातीचा दाखला
 • जन्माचा दाखला (शाळेचा दाखला)
 • बँक खात्याचा तपशील.
 • नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Mahajyoti Kaushal Vikas Prashikshan Yojana Registration Process

 • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
 • होम पेज वर कौशल्य विकास वर क्लिक करावा लागेल.
Mahajyoti Kaushlya Vikas Prashikshan Yojana home page

 • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2021 – नोंदणी अर्ज वर क्लिक करावा लागेल.
Mahajyoti Kaushlya Vikas Prashikshan Yojana Application Tab

 • आता तुमच्यासमोर महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल व सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
 • सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
Mahajyoti Kaushlya Vikas Prashikshan Yojana Application Form

 • अशा प्रकारे तुमची महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
Mahajyoti Official WebsiteClick Here
Mahajyoti Postal Addressडॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,
एमए / 15/1, एस अंबाझरी आरडी,
वसंत नगर, नागपूर,
महाराष्ट्र 440020
Mahajyoti Contact Number07122870120
07122870121
8956775376
8956775377
8956775378
8956775379
8956775380
Mahajyoti Email Idmahajyotingp[At]gmail[Dot]com
mahajyotimpsc21[At]gmail[Dot]com
mahajyotiupsc21[At]gmail[Dot]com
mahajyotiskill[At]gmail[Dot]com
 • स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते आहे त्यासाठी वाचा प्रशिक्षण योजना

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण/तरुणी महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा लाभ काय आहे?

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत लाभार्थी तरुण/तरुणींना उद्योग क्षेत्राशी संबंधित मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते.

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्जदाराची वयोमर्यादा काय आहे?

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्जदाराचे वय 18 वर्ष ते 45 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा उद्देश काय आहे?

राज्यातील सुशिक्षित तरुणांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे हा महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेचा मुख्य उद्देश आहे.

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?

महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल.

Leave a Comment