केंद्र सरकार तसेच सर्व राज्यातील सरकार आपल्या आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवित असते त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच शासन वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते.
आज आपण महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र आहे.
फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील इयत्ता 10वी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वितरित करण्यात येतात सोबत प्रतिदिवस 6 जीबी इंटरनेट सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते.
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे अशा कुटुंबांची आर्थिक स्थिती बिकट असते त्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे ते आपल्या नातेवाईकांकडून तसेच साहुकाराकडून पैसे उधार घेऊन आपल्या मुलांना कसेबसे इयत्ता 10वी पर्यंत शिक्षण देतात कारण इयत्ता 10वी च्या पुढील इंजिनियरिंग, मेडिकल MHCET / IEL / NEET शिक्षण खूप महाग असते त्यासाठी कोचिंग क्लास ची सुद्धा गरज असते आणि अशा शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज असते जे आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाना पैशाच्या दृष्टीने परवडण्यासारखे नसते त्यामुळे शिक्षणाची इच्छा असून सुद्धा राज्यातील बहुतांश विद्यार्थी पैशा अभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात ज्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होत नाही त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राज्यातील ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता १०वी पास करून मेडिकल/इंजिनियरिंग मध्ये प्रवेश घेतला आहे अशा विद्यार्थ्यांना MHCET / IEL / NEET च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन कोचिंग देते परंतु ऑनलाईन कोचिंगसाठी टॅबलेट व इंटरनेट ची गरज असते परंतु आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाला टॅबलेट तसेच इंटरनेट कनेक्शन घेणे शक्य नसते त्यामुळे राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना MHCET / IEL / NEET च्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन कोचिंग पूर्ण करता यावे यासाठी मोफत टॅबलेट उपलब्ध करून दिला जातो व सोबत प्रतिदिवस 6 जीबी इंटरनेट ची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाते जेणेकरून अभ्यास करताना विद्यार्थ्यांना कुठल्याच अडचणींचा सामना करावा लागू नये.
आजचे युग हे डिजिटली युग आहे प्रत्येक क्षेत्रात आज डिजिटलीकरणाचा वापर वाढत चालला आहे आज शिक्षण क्षेत्रात सुद्धा डिजिटलीकरणाचा वापर वाढला आहेत आज शिक्षण उपयोगी सर्व पुस्तके तसेच इतर गोष्टी ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहेत परंतु आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांकडे टॅबलेट नसतो त्यामुळे त्यांना ऑनलाईन पुस्तकांचा तसेच शिक्षण उपयोगी इतर गोष्टींचा लाभ घेणे शक्य होत नाही.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील इयत्ता 10वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील इंजिनियरिंग तसेच मेडिकल शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास साठी मोफत टॅबलेट वितरण करणे जेणेकरून विद्यार्थी ऑनलाईन स्वतःचे कोचिंग शिक्षण पूर्ण करू शकतील
योजनेचे नाव | महाज्योती फ्री टॅबलेट योजना |
विभाग | शिक्षण विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | इयत्ता 11वी ला सायन्स मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी |
लाभ | मोफत टॅबलेट व प्रति दिवस 6 जीबी इंटरनेट सुविधा |
उद्देश | विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या पूर्व तयारीसाठी टॅबलेट चे वितरण करून मदत करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचे उद्दिष्ट
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील इयत्ता 10वी पास विद्यार्थ्यांना त्यांचे पुढील इंजिनियरिंग तसेच मेडिकल शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास उपलब्ध करून दिले जातात व त्यांना या ऑनलाईन कोचिंग क्लास चा लाभ घेता यावा यासाठी मोफत टॅबलेट उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फ्री टॅबलेट योजनेची सुरुवात केली गेली आहे.
- या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल बनविणे
- विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी पाठबळ देणे
- विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग प्रशिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी टॅबलेट विकत घेण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता पडू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यांना MHCET / IEL / NEET च्या पूर्वतयारीसाठी मदत करणे
योजनेचे लाभार्थी:
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील ईमाव (OBC), वीजभज (VJNT), विमाप्र (SBC) वर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील इयत्ता 10वी उत्तीर्ण करून इयत्ता 11वी मध्ये सायन्स मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी
योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ:
- महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट तसेच प्रति दिवस 6 जीबी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक गुण:
इयत्ता 10वी | शहरी भागातील विद्यार्थी | 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. |
इयत्ता 10वी | ग्रामीण भागातील विद्यार्थी | 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. |
योजनेचा फायदा:
- महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना त्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करता यावे यासाठी मोफत टॅबलेट वितरित केले जातात.
- विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करताना कुठल्याच अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रतिदिवस 6 जीबी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
- टॅबलेट मध्ये शिक्षण उपयोगी पुस्तके अपलोड करून दिली जातात.
- महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत टॅबलेट मिळणार आहे.
- विद्यार्थी ऑनलाईन विविध पुस्तके तसेच शिक्षण उपयोगी गोष्टींचा उपयोग करून स्वतःचा शैक्षणिक विकास करू शकतील.
- योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना JEE, NEET आणि CET शिक्षणाची ऑनलाईन कोचिंग क्लास ची मोफत सुविधा दिली जाणार आहे.
- विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठबळ मिळेल.
- या योजनेअंतर्गत विद्यार्थी मोफत टॅबलेट चा वापर करून ऑनलाईन पद्धतीने स्वतःचा अभ्यास पूर्ण करू शकतील.
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना आपल्या मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी टॅबलेट विकत घेण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता लागणार नाही.
- विद्यार्थ्यांना त्यांच्या MHCET / IEL / NEET अभ्यासक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मदत होईल
- राज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास होईल.
- विद्यार्थी डिजिटल क्षेत्राशी जोडला जाईल.
योजनेसाठी आवश्यक पात्रता:
- अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थ्याने इयत्ता 10वी उत्तीर्ण करून इयत्ता 11वी मध्ये सायन्स विषयात प्रवेश घेतलेला असावा.
योजनेच्या अटी:
- महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच देण्यात येईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थ्यांने इयत्ता 10वी उत्तीर्ण होऊन इयत्ता 11वी मध्ये सायन्स ला प्रवेश घेतलेला असावा.
- शहरी भागातील विद्यार्थी इयत्ता 10वी मध्ये 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
- विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे
- ग्रामीण भागातील विद्यार्थी इयत्ता 10वी मध्ये 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.
- अर्जदार विद्यार्थ्यांने जर शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत टॅबलेट चा लाभ मिळवला असेल तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील सरकारी नोकरीत कार्यरत असतील तर अशा विद्यार्थाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- जर विद्यार्थ्याने त्याचे शिक्षण मध्येत सोडले तर अशा विद्यार्थ्यांकडून टॅबलेट परत घेतला जाईल.
- टॅबलेट ची 1 वर्षाची वॉरंटी दिली जाईल परंतु 1 वर्षानंतर टॅबलेट मध्ये बिघाड झाल्यास त्याच्या दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यांची असेल त्यासाठी शासनाकडून दुरुस्ती देखभाल खर्च दिला जाणार नाही.
- टॅबलेट सोबत लाभार्थी विद्यार्थ्याला प्रति दिवस ६ जीबी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाईल त्या व्यतिरिक्त कुठलेच सब्स्क्रिपशन उपलब्ध करून दिले जाणार नाही.
योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात:
- OBC (इमाव)
- VJNT (विजाभज)
- SBC (विमाप्र)
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी पुरावा (वीजबिल,घरपट्टी,भाडेपावती)
- इयत्ता 10वी उत्तीर्ण मार्कशीट
- इयत्ता 11वी सायन्स मध्ये प्रवेश घेतल्याचे प्रवेश पत्र
- विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला.
- विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला
- नॉन क्रीमीलेयर सर्टिफिकेट
- विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो
- विद्यार्थ्यांचे ई-मेल आयडी
- मोबाईल नंबर
- बँक खात्याचा तपशील
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- होम पेज वर गेल्यावर Upcoming Event खाली MH-CET /JEE / NEET नोंदणी खाली Read More बटण दिसेल त्याला क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल त्यावर Click Here For Registration या Option वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या समोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारले सर्व माहिती भरावी लागेल म्हणजे सर्व पुरावे अपलोड करावे लागतील (उदाहरणार्थ Photo, Signature, Leaving Certificate, Cast Certificate, Bonafid Certificate)
- सर्व माहिती भरून झाल्यावर Upload वर क्लिक करावे.
- Upload Option वर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे
- अशा प्रकारे तुमची महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
- अर्ज केल्यानंतर थोड्या दिवसांनी महाज्योती संस्थेतर्फे अर्जदार विद्यार्थ्याला मोबाईलवर तसेच ई-मेल आयडी वर संपर्क करण्यात येईल.
Telegram Group | Click Here |
Mahajyoti Free Tablet Yojana Official Website | Click Here |
Mahajyoti Free Tablet Yojana Contact Number | 7066888845 8956775376 8956775377 8956775378 8956775379 8956775380 |
Mahajyoti Free Tablet Yojana Postal Address | Dr. Babasaheb Ambedkar Samajik Nyay Bhavan, MA/15/1, S Ambazari Rd, Vasant Nagar, Nagpur, Maharashtra 440020 |
Mahajyoti Free Tablet Yojana Email ID | mahajyotingp[AT]gmail[DOT]com mahajyotimpsc21[AT]gmail[DOT]com mahajyotiupsc21[AT]gmail[DOT]com mahajyotiskill[AT]gmail[DOT]com |
महत्वाच्या गोष्टी:
- या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे विद्यार्थी घरी बसून मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदार विद्यार्थ्यांना कुठल्याच शासकीय कार्यालयाच्या फेरी मारण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे अर्जदार विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल. अर्जदार अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जाची स्थिती आपल्या मोबाईल च्या सहाय्याने वेळोवेळी ऑनलाईन पाहू शकतो.
- राज्यातील 30 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना महाज्योती फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत मोफत टॅबलेट वितरित करण्यात येणार आहेत.
- टॅबलेट साठी लाभाथी विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
- या योजनेअंतर्गत राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांना व मुलींना लाभ दिला जाईल.