महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

राज्यातील दारिद्र्य रेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्र्य रेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात ह्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरु केली आहे जी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना अधिक दर्जेदार वैद्यकीय सेवा प्राप्त होण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.

आर्थिक दृष्या गरीब कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यावर त्यांना वैद्यकीय उपचार करणे शक्य होत नाही तसेच आजारी व्यक्तीस हॉस्पिटल मध्ये भरती करण्याची वेळ आली तर अशा परिस्थितीत त्यांना हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी लागणार खर्च परवडण्यासारखा नसतो त्यामुळे आर्थिक दृष्ट्या अशा गरीब कुटुंबांना उपचारासाठी खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो तसेच त्यांना उपचारासाठी पैशांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते व जास्त व्याज दराने कर्ज घ्यावे लागते त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील या समस्यांचा विचार करून तसेच त्यांना आजारपणात उपचारासाठी पैशांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता लागू नये या उद्देशाने सदर आरोग्य योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.

Mahatma Phule Jan Arogya Yojana ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे या योजनेअंतर्गत निवडक आजारांवर शासकीय व खाजगी रुग्णालयात पात्र शिधापत्रिकाधारक व अन्य लाभार्थी गटांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येते. ही योजना पूर्वी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ओळखली जात होती व दिनांक 2 जुलै 2012 पासून 8 जिल्हयांत लागू करण्यात आली होती. त्यांनतर दिनांक 21 नोव्हेंबर 2013 पासून ही योजना महाराष्ट्रातील उर्वरीत 28 जिल्हयांमध्ये विस्तारीत करण्यात आली. दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये योजनेच्या नावात बदल करून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हे नाव ठेवण्यात आले.
योजनेअंतर्गत राज्यातील 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. [महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी]

शासनाचा सहभाग

ही योजना विमा आणि हमी तत्त्वावर राबविण्यात येते योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबांपैकी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना 2011 च्या यादीतील (SECC database) 83.63 लक्ष कुटुंबे या योजनेची लाभार्थी आहेत.युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत एकत्रित योजनेतील गट-अ लाभार्थी कुटुंबांना 996 उपचारांकरिता प्रति कुटुंब प्रति वर्ष रुपये 1.5 लक्ष रकमेपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण विमा तत्त्वावर पुरविले जाते. गट-अ लाभार्थी कुटुंबांच्या वतीने राज्य आरोग्य हमी सोसायटी प्रति कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष 797/- रुपये विमा रक्कम त्रैमासिक हप्त्यांमध्ये विमा कंपनीस अदा करीत आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील गट-ब व गट-क लाभार्थ्यांना हमी तत्त्वावर उपचार पुरवित आहे. त्याचप्रमाणे आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 996 उपचारांकरिता रुपये 1.5 लक्षा पुढील ते रुपये 5 लक्ष रकमेपर्यंतचे व केवळ सदर योजनेत अंतर्भूत असलेल्या 213 उपचारांकरिता रुपये 5 लक्ष रकमेचे आरोग्य संरक्षण राज्य आरोग्य हमी सोसायटी हमी तत्त्वावर पुरवित आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांना गंभीर आजारांवर तसेच गंभीर शस्त्रक्रियेवर निशुल्क उपचार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे.

विमा कंपनी:

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना दिनांक 2 जुलै 2012 ते दिनांक 31 मार्च 2020 या कालावधीमध्ये नॅशनल इन्श्युरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत होती.
दिनांक 1 एप्रिल 2020 पासून एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. [महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी]

योजनेचे नावमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील कुटुंबे
लाभनिशुल्क आरोग्य सुविधेचा लाभ
योजनेचा उद्देशआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना निशुल्क आरोग्य सुविधा प्रदान करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे उद्दिष्ट

  • महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबांना गंभीर आजारांवर तसेच गंभीर शस्त्रक्रियेवर निशुल्क उपचार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना त्यांच्या आजारपणात पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.
  • राज्यातील गरीब कुटुंबांना त्यांच्या आजारपणात मदतीचा हाथ देणे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी

योजनेचे वैशिष्ट्य:

  • महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना निशुल्क चांगली वैद्यकीय सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना आहे.
  • सर्व जाती धर्मातील कुटुंबांना या योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिले जाते.
  • आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना त्यांच्याजवळील 7/12 उतारा व फोटो ओळखपत्राच्या आधारे विमा संरक्षण केले जाते.
  • योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आरोग्य मित्रांची निवड करण्यात आली आहे.
  • सदरआरोग्य योजना पूर्णपणे संगणकीकृत आहे त्यामुळे या योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयातून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळा केशरी अंत्योदय अन्नपूर्णा) व फोटो ओळखपत्राच्या आधारे विमा संरक्षण दिले जाते.

योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालये:

  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये  30 पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय, निम शासकीय, खाजगी तसेच धर्मादाय संस्था अशी एकूण 973 रुग्णालये समाविष्ट आहेत.
  • रुग्णालयांची निवड काही निकषांना अधीन राहून करण्यात आली आहे. लाभार्थी व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकतो. [महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी]

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट रुग्णालयांची यादी येथे क्लिक करा

योजनेचे लाभार्थी:

गटलाभार्थी तपशील
गट अमहाराष्ट्र राज्यातील 36 जिल्हयांमधील अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र शासन
यांचेकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका,
अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व केशरी ‍ शिधापत्रिकाधारक कुटुंबे.
गट बअवर्षणग्रस्त 14 जिल्हयातील (औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर,
नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा)
शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे
गट क1. शासकीय अनाथाश्रमातील मुले, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला
आश्रमातील महिला, शासकीय वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक

2. माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांचेवर अवलंबित असलेले
कुटुंबातील सदस्य.

3. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील
नोंदणी जिवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे

योजनेचे लाभार्थी:

सामाजिक, आर्थिक व जा‍तनिहाय जनगणनेच्या वंचित व व्यावसायिक निकषानुसार अनुक्रमे ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कुटुंबांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. [महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी]

क्षेत्रलाभार्थ्यांचा तपशील
शहरीशहरी भागातील खालील 11 व्यावसायिक गटातील कामगार योजनेसाठी पात्र आहेत.
• कचरा वेचक
• भिक्षुक
• घरगुती कामगार
• गटई कामगार/ मोची/फेरीवाले/रस्त्यावर सेवा पुरविणारे अन्य कामगार
• बांधकाम कामगार/ प्लंबर/ गवंडी/कामगार/ रंगारी/ वेल्डर/सुरक्षा रक्षक/हमाल व
डोक्याने भार वाहणारे अन्य कामगार
• सफाईगार/स्वच्छक/ माळी
• घरकाम करणारे/ हस्तकला कारागीर/शिंपी,
• वाहतूक कर्मचारी/ चालक/ वाहक/ चालक व वाहकांचे मदतनीस/हातगाडी ओढणारे/सायकल रिक्षा ओढणारे
• दुकानात काम करणारे/ सहाय्यक/ लहान आस्थापनांमधील शिपाई/ मदतनीस/ अटेण्डट/ वेटर
• वीजतंत्री/ मेकॅनिक/ असेम्ब्ली / दुरुस्ती करणारे
• धोबी व वॉचमन
ग्रामीणग्रामीण भागाच्या एकूण 7 वंचित निकषांपैकी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये खालील सहा वंचित निकषातील (D1 to D5 and D7) किमान एक निकषात बसणाऱ्या कुटुंबांचा व आपोआप समाविष्ट (बेघर, भिक्षुक, स्वच्छता कर्मी, निराधार कुटुंबे, मुलत: अनुसूचित जमाती व कायदेशीर बंधपत्रित कामगार) निकषांतील कुटुंबांचा समावेश होतो.
• D1- कच्च्या भिंती व कच्च्या छताच्या एका खोलीत राहणारे कुटुंब
• D2- 16-59 वयोगटातील प्रौढ सदस्य नसलेले कुटुंबे
• D3- 16-59 वयोगटातील प्रौढ पुरुष सदस्य नसलेले कुटुंब
• D4- दिव्यांग कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे
• D5- अनुसूचित जाती व जमाती मधील कुटुंबे
• D7- भूमिहीन मजूराची कुटुंबे

योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची ओळख:

गटपात्रतेचे निकष
गट असर्व पात्र लाभार्थ्यांची ओळख पिवळी, केशरी, अंत्योदय अन्न योजना व अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व
त्यासोबत राज्य आरोग्य हमी सोसायटीने निश्चित केलेल्या फोटो ओळखपत्रांपैकी
कोणतेही एक फोटो ओळखपत्र याव्दारे पटविली जाते.
गट बमहाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त 14 जिल्हयांतील शेतकऱ्यांची पात्रता लाभार्थ्यांचे / कुटुंब प्रमुखाचे नाव असलेल्या
7/12 उताऱ्यासह शुभ्र शिधापत्रिका किंवा नजीकच्या महसुल अधिकाऱ्यांनी लाभार्थी/ शेतकरी कुटुंबांतील
सदस्य हा शेतकरी असल्याचे नमुद केलेले प्रमाणपत्र व लाभार्थ्याचे फोटो ओळखपत्र याव्दारे निश्चित केली जाते.
गट कमहाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त 14 जिल्हयांतील शेतकऱ्यांची पात्रता लाभार्थ्यांचे / कुटुंब प्रमुखाचे नाव असलेल्या
7/12 उताऱ्यासह शुभ्र शिधापत्रिका किंवा नजीकच्या महसुल अधिकाऱ्यांनी लाभार्थी/ शेतकरी कुटुंबांतील
सदस्य हा शेतकरी असल्याचे नमुद केलेले प्रमाणपत्र व लाभार्थ्याचे फोटो ओळखपत्र या व्दारे निश्चित केली जाते.

लाभार्थ्यांची ओळख:

  • सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना 2011 मध्ये नोंदीत कुटुंबांतील सदस्य प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयात संगणकीकृत ई-कार्ड व फोटो ओळखपत्र दाखवून लाभ घेऊ शकतात. [महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी]

योजनेअंतर्गत वार्षिक विमा संरक्षण मर्यादा:

  • या योजनेअंतर्गत एका पॉलिसी वर्षात लाभार्थ्यावर प्रति कुटुंब 1,50,000/- रुपये पर्यंत झालेल्या सर्व रुग्णालयीन खर्चाचा समावेश होतो. मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा प्रति कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष 2,50,000/- रुपये इतकी वाढविण्यात आली आहे.
  • योजनेचा लाभ कुटुंबातील एकाला किंवा सर्व सदस्यांना घेता येतो म्हणजेच प्रकरण परत्वे एकूण 1.5 लक्ष रुपये किंवा 2.5 लक्ष रुपये खर्चाचा लाभ पॉलिसी वर्षात कुटुंबांतील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात.

वार्षिक विमा संरक्षण मर्यादा:

  • या योजनेंतर्गत व्दितीय व तृतीय सेवेकरिता देशातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात दाखल झालेल्या लाभार्थ्याला प्रति कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष रुपये 5 लक्षापर्यंत आरोग्य कवच पुरविण्यात येते. या योजनेचा लाभ देखील कुटुंबांतील एका किंवा सर्व सदस्यांना घेता येतो म्हणजेच रुपये 5 लाखापर्यंतच्या रुग्णालयीन खर्चाचा लाभ पॉलिसी वर्षात कुटुंबांतील एक किंवा सर्व सदस्य घेऊ शकतात.
  • प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत रुपये 1.5 लक्षापर्यंचे विमा कवच विमा कंपनीमार्फत पुरविण्यात येते तर रुपये 1.5 लक्षापुढील ते रुपये 5 लक्षापर्यंतचे कवच राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत हमी तत्त्वावर पुरविण्यात येते. पॉलिसी वर्ष-चालू वर्षातील 1 एप्रिल ते पुढील वर्षातील 31 मार्च. [महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी]

योजनेअंतर्गत समाविष्ट आजारांची यादी:

  • जळीत
  • ह्दयरोग
  • ह्दयरोग शस्त्रक्रिया व उपचार
  • आकस्मिक सेवा
  • त्वचारोग
  • अंत:स्त्राव संस्थेचे विकार
  • कान, नाक व घसा रोग
  • सर्वसाधारण औषधशास्त्र चिकित्सा
  • सर्वसाधारण शस्त्रक्रिया
  • व्याधी चिकित्सा
  • संर्सगजन्य आजार
  • इंटरव्हेन्श्नल रेडिओलॉजी
  • जठरांत्रमार्गाचे रोग
  • कर्करोगावरील औषधोपचार
  • नवजात व बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
  • मुत्रपिंड विकार
  • मज्जातंतूचे विकार
  • मज्जातंतूच्या विकारावरील शस्त्रक्रिया
  • स्त्री रोग व प्रसुती शास्त्र
  • नेत्ररोग शस्त्रक्रिया
  • अस्थिव्यंग शस्त्रक्रिया
  • बालरोग शस्त्रक्रिया
  • बालरोग कर्करोग
  • प्लास्टीक सर्जरी
  • आस्कमिक वैद्यकीय उपचार
  • कृत्रिम अवयव उपचार
  • फुफ्फुसाच्या आजारावरील उपचार
  • किरणोत्सर्गाव्दारे कर्करोग चिकित्सा
  • संधिवात सबंधी उपचार
  • जठर व आंत्र विकाराच्या शस्त्रक्रिया
  • कर्करोगाच्या शस्त्रक्रिया
  • मुत्रवह संस्थेच्या विकारांवरील शस्त्रक्रिया
  • मानसिक आजार
  • जबडा व चेहऱ्याच्या अस्थींवरील शस्त्रक्रिया

अंगीकृत रुग्णालयांना दिल्या जाणाऱ्या पॅकेजच्या दरामध्ये सर्वसाधारण वॉर्डमधील खाटाचे शुल्क, परिचारिका शुल्क, विशेषज्ञ, भूलतज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांचे शुल्क, तपासणी शुल्क, भुल, ऑक्सीजन, ऑपरेशन थिअटर व अतिदक्षता शुल्क, शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याची किंमत, औषधे व द्रव्ये, कृत्रिम अवयवाची किंमत, रक्त संक्रमणाचे दर (राज्य शासनाच्या धोरणानुसार रक्त पुरविणे), इन्प्लॉट, एक्स-रे व निदान चाचण्या, आंतररुग्णास भोजन, डिस्पोजेबल व कन्झुमेबल, राज्य परिवहनाच्या दरानुसार किंवा रेल्वेच्या व्दितीय श्रेणी भाडे यानुसार वाहतुक खर्च (रुग्णालय ते रुग्णाचे निवासापर्यंत) या खर्चाचा समावेश आहे. पॅकेज दरामध्ये रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते घरी जाईपर्यंतच्या तसेच उपचारादरम्यान काही गुंतागुंत झाल्यास त्यासह संपुर्ण खर्चाचा अंतर्भाव असून लाभार्थ्यास सर्व सेवा नि:शुल्क पुरवावयाची आहे. जर रुग्णाचा मृत्यू झाला तर रुग्णाचा मृतदेह रुग्णालयातून घरापर्यंत घेऊन जाण्याचा खर्च पॅकेजमध्ये समाविष्ट आहे. [महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी]

राखीव उपचार

  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या 996 उपचारांपैकी 131 उपचार आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या 213 उपचारांपैकी 37 उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
  • 24*7 उपचारांस पुर्वपरवानगी: अंगीकृत रुग्णालयाने तपासण्यांच्या आधारावर रुग्णास दाखल करुन घेऊन उपचारांस पुर्वपरवानगीची विनंती विमा कंपनीस पाठवावी लागते. पूर्वपरवानगी 12 तासांमध्ये निश्चित केली जाते. आकस्मिक परिस्थितीत, सबंधित वैद्यकीय समन्वयकाने व्हाईस रेकॉडींग सुविधा असलेल्या आपत्कालीन दुरध्वनी सेवेव्दारे (ETI) वैद्यकीय/शल्यचिकित्सा पुर्वपरवानगीची मान्यता दिली जाते.
  • दाव्यांची ऑनलाईन अदायगी: अंगीकृत रुग्णालयाकडून संपुर्ण कागदपत्रांसहीत सादर करण्यात आलेल्या दाव्याचे प्रदान सबंधित रुग्णालयास कामकाजाच्या 15 दिवसांत विमा कंपनीकडून करण्यात येते. [महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी]

अंगीकृत रुग्णालये

1. योजनेंतर्गत शासकीय व खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णालयांचा समावेश आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महानगरपालिका व नगरपालिका यांच्या अखत्यारीतील रुग्णालयांचा समावेश आहे.
2. बहु-विशेष सेवा किंवा एकल विशेष सेवा पुरवठादार शासकीय किंवा खाजगी रुग्णालयांचे अंगीकरण मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्या अध्यक्षतेखालील समन्वय, अंगीकरण व शिस्तपालन समितीच्या आवश्यकतेनुसार व निर्देशानुसार करण्यात येते. बहु-विशेष खाजगी रुग्णालयांसाठी किमान 30 खाट व अतिदक्षता विभाग असे निकष (काही सवलतींसह) तर एकल विशेष खाजगी रुग्णालयांसाठी 10 खाटा व इतर निकष लागू आहे.
3. अंगीकृत रुग्णालयांची कमाल संख्या 1000 इतकी असून सद्यस्थितीत 999 रुग्णालये अंगीकृत त्यापैकी 282 शासकीय रुग्णालये व 717 खाजगी रूग्णालये आहेत.

योजनेचा फायदा:

  • योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यास संपूर्ण आरोग्य सहाय्य दिले जाते.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब गरीब कुटुंबांना त्यांच्या उपचारासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेअंतर्गत किडनी ट्रांसप्लांटेशन साठी 3 लाख रुपये आणि कुटुंबाच्या उपचारासाठी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये 2 लाखापर्यंत विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत गंभीर उपचार व शस्त्रक्रियांसाठी लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी रुपये 3 लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते.
  • या योजनेअंतर्गत रुग्णांना रुग्णालयातून मुक्त केल्यावर 10 दिवसांपर्यंत च्या लागणाऱ्या सेवांसाठी विमा संरक्षण दिले जाते.
  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला निशुल्क आरोग्य सुविधा दिली जाते त्यामुळे लाभार्थ्यास स्वतःकडील एक रुपयाचा सुद्धा खर्च येत नाही.
  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कुठल्याही जात धर्माचे बंधन नाही सर्व जाती धर्माचे व्यक्ती महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवू शकतात.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थ्यास वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयांमधून देण्यात येणारा उपचार तसेच रोगाचे निदान व एखाद्या आजारासाठी आवश्यक औषधोपचार, भोजन तसेच एक वेळचा परतीचा प्रवास खर्च दिला जातो.
  • महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आजाराचे निदान मोफत केले जाते.

योजनेअंतर्गत महत्वाच्या गोष्टी:

  • पूर्वी हि योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने ओळखली जात होती जिचे नाव बदलून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना करण्यात आले.
  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित असलेले बांधकाम कामगार व त्यांच्यावर अवलंबित कुटुंबियांचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

आवश्यक पात्रता:

  • कुटुंब महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे
  • कुटुंब दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असणे आवश्यक आहे.

योजनेच्या अटी:

  • केवळ महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • राज्यातील दारिद्र्य रेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्र्य रेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • दारिद्र्य रेषेखालील (पिवळे) रेशनकार्ड
  • दारिद्र्य रेषेवरील (केशरी) रेशनकार्ड
  • अंत्योदय रेशनकार्ड
  • अन्नपूर्णा रेशनकार्ड
  • रहिवाशी दाखला
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • 3 पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खात्याचा तपशील
  • उत्पन्नाचा दाखला

योजनेअंतर्गत नाव नोंदणी करण्याची पद्धत:

  • अर्जदार व्यक्तीला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर ऑन्लाइन एम्पानेल्मेंत विनंती वर क्लिक करावे लागेल.
महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला Fresh Application वर क्लिक करावे लागेल.
महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी

  • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती (Hospital Basic Information, Expertise & Infrastricure, Diagnostic & Facilities, Speciality & Medical Services, Documents/Declaration & Submission Of Application) भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमचा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरला जाईल.
महात्मा फुले जन आरोग्य योजना नाव नोंदणी

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Registration:

  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत  समाविष्ट प्रत्येक रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे आरोग्य सेवक उपलब्ध असतात.
  • या योजनेअंतर्गत रुग्णांना कोणत्याही प्रकारचा दावा करण्याची गरज नाही कारण केला जाणारा दावा हा महात्मा ज्योतिबा फुले योजनेतील आरोग्य सेवकांमार्फत केले जातात.
  • रुग्णांची रुग्णालयातुन सुट्टी केल्यानंतर 10 दिवसांनी आवश्यक कागदपत्रासह दावे अंगीकृत रुग्णालयाद्वारे संगणक प्रणालीवर अपलोड केले जातात.
  • अपलोड करण्यात आलेले दावे तपासणीसाठी टीपीए कडे येतात.
  • सादर करण्यात आलेल्या दाव्यांना मंजुरी देण्यात येते जर काही आवश्यक कागदपत्रे सादर केली गेली नसल्यास दावे प्रलंबित ठेवून रुग्णांलयांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाते.
  • मंजूर करण्यात आलेल्या दाव्यांचे प्रदान विमा कंपनीद्वारे अंगीकृत रुग्णालयांना 15 दिवसांमध्ये करण्यात येते.
Telegram GroupClick Here
MJPJAY Official WebsiteClick Here
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana User ManualClick Here
Mahatma Phule Jan Arogya Yojana Online ApplicationClick Here
महात्मा फुले जन आरोग्य योजना टोल फ्री नंबर1800-233-2200 / 155388
Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Hospital ListClick Here
महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी pdfClick Here
महात्मा फुले आरोग्य योजना माहिती pdfClick Here
महात्मा फुले जन आरोग्य योजना शासन निर्णयClick Here

महाराष्ट्र शासनाच्या योजना

स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहे?
Swadhar Yojana Scholarship Amount
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना काय आहे?
Swadhar Yojana Eligibility Criteria In Marathi
स्वाधार योजना कागदपत्रे
रमाई आवास योजना कागदपत्रे
रमाई घरकुल योजना नियम व अटी
रमाई आवास घरकुल योजना अर्ज
रोजगार हमी योजना फॉर्म
रोजगार हमी योजना महाराष्ट्र यादी
रोजगार हमी योजना माहिती PDF
आंतरजातीय विवाह अनुदान कागदपत्रे मराठी
आंतरजातीय विवाह फायदे
आंतरजातीय विवाह अनुदान महाराष्ट्र शासन PDF
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज PDF
दिव्यांग शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी हॉरटीकल्चर योजना
कडबा कुट्टी मशीन योजना
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
सलोखा योजना
हातमाग विणकर योजना
बीज भांडवल योजना
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी माहिती
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
वृद्ध कलाकार मानधन योजना
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना
इंदिरा गांधी विधवा पेंशन योजना महाराष्ट्र
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी
मागेल त्याला बोडी योजना
वन्यप्राणी हल्ला अर्थसहाय्य योजना
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
आंतरजातीय विवाह योजना
शुभ मंगल सामूहिक विवाह योजना
संजय गांधी निराधार योजना
बालसंगोपन योजना
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना
लेक लाडकी योजना
मनोधैर्य योजना
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना
पिठाची गिरणी योजना
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप)
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता
शासन आपल्या दारी योजना
बेरोजगारी भत्ता योजना महाराष्ट्र
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
मासेमार संकट निवारण निधी योजना
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना
रमाई घरकुल योजना
स्वाधार योजना
राजीव गांधी अपघात विमा योजना
जिव्हाळा योजना
प्रशिक्षण योजना
महाज्योती कौशल्य विकास प्रशिक्षण योजना
खावटी अनुदान योजना
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अर्ज PDF
राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कागदपत्रे
शबरी घरकुल योजना
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना
निर्धूर चूल योजना
शिलाई मशीन योजना
राजे यशवंतराव होळकर महामेष योजना
फ्री टॅबलेट योजना
माझी कन्या भाग्यश्री योजना
शौचालय अनुदान योजना
पंचायत समिती योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना
Gopinath Munde Apghat Vima Yojana Form
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना कागदपत्रे
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम
डिझेल पंप सब्सिडी योजना
ट्रॅक्टर अनुदान महाराष्ट्र
महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना
प्रधानमंत्री पीक विमा योजना
मागेल त्याला विहीर योजना
मागेल त्याला शेततळे योजना
ताडपत्री अनुदान योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना
शेळी पालन योजना
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र
गाय गोठा अनुदान
जननी सुरक्षा योजना
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
देवदासी कल्याण योजना
महिला बचत गट कर्ज योजना
सुकन्या समृद्धी योजना
किशोरी शक्ती योजना
बांधकाम कामगार योजना
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
शेतकरी योजना
पीक कर्ज योजना माहिती
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
अस्मिता योजना महाराष्ट्र
ई पीक पाहणी नोंदणी
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
गटई स्टॉल योजना
बीज भांडवल योजना
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
सोलर रूफटॉप सब्सिडी योजना
शैक्षणिक कर्ज योजना
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
श्रावणबाळ योजना
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना
कुसुम सोलर पंप योजना

Leave a Comment