महाराष्ट्र राज्यातील इतर मागास वर्गातील महिलांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरु करता यावा व त्या स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फ महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना सुरु करण्यात आलेली आहे.
या योजनेअंतर्गत बचत गटातील इतर मागास वर्गातील सुशिक्षित, बेरोजगार, होतकरू महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 5 लाख ते 10 लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते व त्या कर्जाच्या रकमेवर आकारण्यात येणारे 12 टक्के व्याजदर महाराष्ट्र राज्य इतर मागासवगीय वित्त आणि विकास महामंडळामार्फ अदा करण्यात येते. त्यामुळे महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होते.
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचा मुख्य उद्देश इतर मागास प्रवर्गातील गरीब, होतकरू, परितक्त्या महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे हे आहे जेणेकरून या योजनेअंतर्गत महिला स्वतःचा एखादा स्वरोजगार सुरु करून स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील व राज्यात इतर नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करू शकतील.
योजनेचे नाव | महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना |
विभाग | राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | राज्यातील इतर मागास प्रवर्गातील महिला |
लाभ | स्वरोजगार सुरु करण्यासाठी 5 लाख ते 10 लाखांचे आर्थिक सहाय्य |
उद्देश | महिलांना स्वतःच्या पायावर उभे करून आत्मनिर्भर बनविणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन/ऑनलाईन |
योजनेचे उद्दिष्ट
- महिलांना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर बनविणे.
- महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे.
- महिलांना स्वरोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना सक्षम बनविणे.
लाभार्थ्याला दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
- महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अंतर्गत बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांना स्वतःचा स्वरोजगार सुरु करण्यासाठी 5 लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
लाभार्थी:
- महिला बचत गटातील इतर मागास प्रवर्गातील महिलांना महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचा लाभ दिला जाईल.
योजनेचा फायदा:
- महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेअंतर्गत बचत गटातील इतर मागास वर्गातील सुशिक्षित, बेरोजगार, होतकरू महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
- महिला स्वतःचा स्वरोजगार सुरु करण्यासाठी सक्षम बनतील.
- महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
- राज्यातील बेरोजगारी कमी होईल व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
- महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
- योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध होते.
अटी व शर्ती:
- फक्त बचत गटातील इतर मागास वर्गातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अजदार महिलांचे वय 18 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.त्यामुळे 60 वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार महिलेने यापूर्वी वित्तीय संस्थेचा अथवा शासनाच्या योजनेचा किंवा महामंडळामार्फत राबवीत येत असलेल्या कोणत्याही योजनेअंतर्गत लाभ घेतलेला असल्यास अशा परिस्थिती पूर्वीच्या कर्ज रक्कमेची संपूर्ण परतफेड केल्याबाबतचे प्रमाणपत्र / स्वयं-घोषणा /प्रतिज्ञापत्र लाभार्थीने सादर करणे आवश्यक राहील.
- अर्जदार महिला बँक/वित्त संस्थेचा थकबाकीदार असता कामा नये.
- एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल.
- अर्जदार महिलेला ती सुरु करू इच्छिणाऱ्या व्यवसायाच्या रुपरेषेची माहिती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्याने निर्गमित केलेला )
- वयाचा पुरावा (जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
- रहिवाशी दाखला – (आधार कार्ड, लाईट बिल, फोन बिल, प्रॉपर्टी कार्ड, व्होटर कार्ड, पासपोर्ट)
- बचत गटाचे बँक पासबुक झेरॉक्स.
- बचत गटातील महिला सदस्यांचे CMRC कडून प्रमाणित कौटुंबिक उत्पन्नाबाबतचे प्रमाणपत्र
- स्वयं-घोषणापत्र.
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- व्यवसाय सुरु करणार त्याची माहिती
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदार महिलांना आपल्या जिल्हा कार्यालयात महिला आर्थिक विकास महामंडळात जावे लागेल
- कार्यालयातून महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Click Here |
संपर्क | महिला विकास आणि कल्याण विभाग |
ईमेल | https://wcd[dot]nic[dot]in/ |
हेल्पलाइन | 181 |
टोल-फ्री नंबर | 011-23389292 |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
महत्वाच्या गोष्टी:
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम महिला बचत गटाच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- योजनेअंतर्गत कर्जाच्या रकमेवर आकारण्यात येणाऱ्या व्याजाची रक्कम ओबीसी महामंडळामार्फत अदा करण्यात येईल त्यामुळे महिलांना शून्य व्याज दराने कर्ज उपलब्ध होईल.
- महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे उत्पादन, प्रक्रिया, मूल्य आधारित उद्योगांकरीता बँकांमार्फत मंजूर करण्यात आलेल्या 5 लाख ते 10 लाखापर्यंतच्या कर्ज रक्कमेवरील 12 टक्के व्याजाच्या मर्यादेत व्याज परतावा महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत उपलब्ध करुन देण्यात येईल.
- सदर योजना व्याज परतावा योजना म्हणून देखील ओळखली जाते.