महाराष्ट्र शासन राज्यातील विद्याथ्यांच्या शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्ती योजनांची सुरुवात करत असते त्यामुळे राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या आणि व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहामध्ये राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राज्य शासन देखभाल भत्ता प्रदान करत आहेत त्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हे आहे जेणेकरून विद्यार्थी या योजनेच्या सहाय्याने स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःचा सामाजिक विकास करू शकतील.
योजनेचे नाव | व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
उद्देश | विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे. |
लाभ | विद्यार्थ्यांना देखभाल भत्ता प्रदान केला जातो |
लाभार्थी | व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणारे आणि व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
- विद्याथ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
- विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची रुची निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मनिर्भर बनविणे.
- अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे.
- कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये.
- पैशाअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची गरज भासू नये.

योजनेची वैशिष्ट्ये:
- या योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे:
- अनुसूचित जातीतील विद्यार्थी
योजनेअंतर्गत दिले जाणारे अर्थसहाय्य:
देखभाल भत्त्याद्वारे अर्जदारास व्यावसायिक अभ्यासक्रम पुस्तके, स्टेशनरी, निवास आणि अन्न यासाठीचा निधी खालीलप्रमाणे मिळवता येईल. (वसतिगृहात प्रवेश घेतल्यापासून ते परीक्षेपर्यंत किंवा अधिकतम 10 महिन्यांसाठी)
सरकारी वसतिगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी:
अभ्यासक्रम कालावधी | आर्थिक सहाय्य |
4 ते 5 वर्षे | दरमहा 700/ – रुपये (7000/- रुपये) |
2 ते 3 वर्षे | दरमहा 500/- रुपये (5000/- रुपये) |
2 वर्षे | दरमहा 500/- रुपये (5000/- रुपये) |
शासकीय वसतिगृहासाठी पात्र ठरलेल्या परंतु शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी
अभ्यासक्रम कालावधी | आर्थिक सहाय्य |
4 ते 5 वर्षे | दरमहा 1000/ – रुपये (10000/- रुपये) |
2 ते 3 वर्षे | दरमहा 700/ – रुपये (7000/- रुपये) |
2 वर्षे | दरमहा 500/ – रुपये (5000/- रुपये) |
योजनेचे लाभार्थी:
- व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणारे आणि व्यावसायिक महाविद्यालयांशी संलग्न वसतिगृहामध्ये राहणारे विद्यार्थी
विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता योजनेचा लाभ:
- या योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यास देखभाल भत्ता, व्यावसायिक अभ्यासक्रम पुस्तके, स्टेशनरी, निवास आणि अन्न यासाठीचा निधी देण्यात येतो.
- राज्यातील विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारेल.
- विद्यार्थी या योजनेअंतर्गत स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- विद्यार्थ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल
- स्वतःचे शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील किंवा स्वतःचा एखादा उद्योग सुरु करून स्वतःच्या कुटुंबाला सांभाळू शकतील व इतर नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करू शकतील.
- राज्यात शिक्षणाचे प्रमाण वाढेल.
- कुटुंबाला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पैशासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची सुद्धा आवश्यकता भासणार नाही.
- विद्यार्थी शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित होतील व त्यांच्यामध्ये शिक्षणाची रुची निर्माण होईल.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थी अनुसूचित जातीचा असणे आवश्यक आहे.
- व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेले विद्यार्थी.या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
- विद्यार्थी भारत सरकारचे शिष्यवृत्ती धारक असावेत.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
- व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेले आणि वसतिगृहात राहत असलेले विद्यार्थी पात्र असतील (शासकीय किंवा संस्थेच्या वसतिगृहात किंवा बाहेर राहणारे).
- विद्यार्थ्याकडे स्वतःच्या नावाने बँक खाते असणे गरजेचे आहे कुटुंबातील इतर व्यक्तीचे बँक खाते मान्य केले जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे.
- अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत असता कामा नये.
- विद्यार्थ्यांना शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्जदाराने अर्जात चुकीची माहिती भरली असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
महत्त्वाच्या तारखा:
- देखभाल भत्त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत असते.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- जात प्रमाणपत्र
- पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र
- महाविद्यालय प्रवेश पावती
- वॉर्डन पत्र (जर विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश मिळत नसेल)
- भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेतील त्याचा / तिचा नोंदणी / अर्ज आयडी
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
पहिला टप्पा:
- सर्वात प्रथम अर्जदार विद्यार्थ्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर गेल्यावर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.

- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरून झाल्यावर Register वर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
दुसरा टप्पा:
- अर्जदाराला आपला Username आणि Password टाकून लॉगिन करावे लागेल.
तिसरा टप्पा:
- अर्जदाराला होम पेज वर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती वर क्लिक करावे लागेल त्यानंतर Social Justice and Special Assistance Department वर क्लिक करून व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या शिष्यवृत्ती ची सर्व माहिती उघडेल ती वाचून खाली Apply For This Scheme वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे अपलोड करून Register बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची या शिष्यवृत्ती अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join |
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता योजना अधिकृत वेबसाईट | Click Here |
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखभाल भत्ता योजना हेल्पलाईन नंबर | 1800-120-8040 |