मनोधैर्य योजना महाराष्ट्र 2024 | Manodhairya Scheme In Marathi

मनोधैर्य योजना: आज आपण केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या एकत्रितकरणाने सुरु करण्यात आलेल्या मनोधैर्य योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
या योजनेअंतर्गत बलात्कार, बालकांवरील लैगिंक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी किमान 1 लाख ते 10 लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाते. तसेच पिडीतांचे आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक असा निवारा, समुपमदेशन, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत, शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.

राज्यात बलात्कार, ऍसिड हल्ला तसेच बालकांवरील लैगिंक अत्याचार यांमुळे त्यांना मानसिक आघात होतो व नाहक त्रास सहन करावा लागतो व त्यांना खूप साऱ्या समस्यांचा सामना देखील सहन करावा लागतो त्यामुले राज्यातील बलात्कार आणि ऍसिड हल्ला पिडीतांना झालेल्या मानसिक आघातातून सावरणे सर्वात महत्वाचे असते. त्याच बरोबरीने त्यांना निवारा, आर्थिक मदत, वैद्यकीय आणि कायदेशीर मदत तसेच समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणे महत्वाचे असते. या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य शासनाच्या महिला व बाळ विकास विभागाने राज्यात मनोधैर्य योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.

Table of Contents

राज्यातील बलात्कार आणि ऍसिड हल्ल्यातील  पीडित महिला व बालके  यांच्या पुनर्वसनसाठी  आर्थिक सहाय्य पुरविणे हा मनोधैर्य योजनेचा मुख्य उद्देश आहे. [मनोधैर्य योजना]

वाचकांना विनंती

आम्ही Manodhairya Yojana ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात अशा कोणी पीडित महिला व पीडित बालके असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा हि माहिती त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवू शकतील.

योजनेचे नावमनोधैर्य योजना मराठी माहिती
उद्देशपीडित महिला व बालकांना मानसिक अपघातातून सावरणे
लाभार्थीपीडित महिला व बालके
लाभपुनर्वसन करण्यासाठी 10 लाखापर्यंत आर्थिक मदत
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

मनोधैर्य योजना चे उद्दिष्ट

 • अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित महिला व बालकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
 • अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित महिला व बालकांना प्रतिष्ठा व आत्मविेशास पुन्हा मिळवून देणे.
 • महिला व बालकांना शारीरिक आणि मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे
 • महिला व बालकांना समुपदेशन, निवारा, वैद्यकीय व कायदेशीर मदत इत्यादी आधारसेवा तत्परतेने उपलब्ध करुन त्यांचे पुनर्वसन करणे.
 • बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला, बालके व त्यांच्या वारसदारांना तातडीने आर्थिक मदत आणि मानसोपचार तज्ज्ञाची सेवा उपलब्ध करुन देणे
 • पीडित महिला व बालकांचे जीवनमान सुधारणे व त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
 • बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला, बालके व त्यांच्या वारसदारांना गरजांनुसार निवारा, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य, शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण यासारख्या आधार सेवा उपलब्ध करुन देणे.
 • महिला आणि मुलांवरील हिंसाचाराच्या मुद्द्यांबद्दल जागरूकता वाढवणे हे मनोधैर्य योजनेचा उद्देश आहे.
मनोधैर्य योजना

मनोधैर्य योजना महाराष्ट्र ची वैशिष्ट्ये

 • महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
 • मनोधैर्य योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या देखरेखेखाली केली जाते
 • या योजनेअंतर्गत 50 टक्के तरदूत हि केंद्र सरकार ची व 50 टक्के तरतूद राज्य शासनाची आहे.
 • या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यात आलेली आहे.
 • या योजनेमध्ये पीडित महिला व बालकांची ओळख गुप्त ठेवण्यात येईल.
 • मनोधैर्य योजना पीडित महिला व बालकांना पुन्हा आत्मविश्वास मिळविण्यासाठी आणि सामान्य जीवन जगण्यास सक्षम करते.
 • आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना राज्य सरकार देत आहे 3 लाखांची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना
 • सरकार निराधार, अनाथ, बेघर मुला-मुलींना पर्यायी कुटूंब उपलब्ध करुन देत आहे त्यासाठी वाचा बालसंगोपन योजना

Manodhairya Scheme अंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य

 • या योजनेंतर्गत बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी किमान 2 लाख रुपये  देण्यात येते.
 • गंभीर व क्रुर स्वरुपाच्या बलात्काराच्या घटनेमध्ये पीडित महिला व बालक यांना किंवा यथास्थिती त्यांच्या वारसदारांना 3 लाख रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येईल.
 • अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकांस त्यांचा चेहरा विद्रुप झाल्यास अथवा त्यांना कायमचे अपंगत्व आल्यास 3 लाख रुपये आणि अ‍ॅसिड हल्ल्यात इतर जखमा झालेल्या महिला व बालकांना 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाईल.
 • भूलथापा देवून, फसवून, लग्नाचे वा इतर आमिष दाखवून केलेले बलात्कार प्रथम खबरी अहवाल दाखल झाल्यानंतर 2 लाख रुपयांच्या 50 टक्के रक्कम धनादेशाद्वारे अदा केली जाईल आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यावर उर्वरित 50 टक्के अर्थसहाय्य जिल्हा महामंडळाद्वारे अदा करण्यात येईल.
 • या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्याव्यतिरिक्त बलात्कार, लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ल्यात पीडित महिला व बालक यांना वैद्यकीय उपचार, प्रवास व इतर खर्चासाठी प्रत्येक प्रकरणात 50 हजार रुपयांपर्यत अर्थसहाय्य देण्यात येईल.

Manodhairya Scheme In Marathi अंतर्गत पीडितांना मंजूर करावयाच्या अर्थसहाय्याचा तपशील

योजनेअंतर्गत जमा केलेल्या रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम ही Fixed Deposit मध्ये किमान 3 वर्षासाठी ठेवण्यात येईल व उर्वरित 25 टक्के रक्कम पीडित व्यक्ती, पालक यांना खर्च करता येईल.

परंतु अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांना 75 टक्के रक्कम खर्च करता येईल व उर्वरित 25 टक्के रक्कम 3 वर्षासाठी Fixed Deposit मध्ये ठेवण्यात येईल. पीडित व्यक्ती ही, अज्ञान असेल, तर अशा प्रकरणांत अज्ञान बालकाच्या उत्तम हितासाठी व तिच्या कल्याणासाठी निधीचा योग्य वापर होण्यास मदत होईल. या विषयी जिल्हा मंडळाचे समाधान झाल्यानंतर, रक्कम तिच्या Minor बँक खात्यामध्ये 75 टक्के रक्कम Fixed Deposit मध्ये ठेवण्यात येईल व ती रक्कम बालक 18 वर्षाचा झाल्यावर त्यास मिळू शकेल व उर्वरित 25 टक्के रक्कम बालकाच्या हितासाठी खर्च करता येईल. परंतु किमान 3 वर्ष सदर रक्कम बँकेतून काढता येणार नाही. तथापि, विवक्षित प्रकरणी शैक्षणिक व वैद्यकीय कारणासाठी सदर रक्कम जिल्हा मंडळाच्या मान्यतेने काढता येईल. सदर रक्कमेवरील व्याज बँकेमार्फत पीडित, पालक यांच्या बचत खात्यात दरमहा जमा करण्यात येईल.

घटनेचे विवरणअर्थ सहय्यशेरा
बलात्कार
अ) घटनेचा परिणाम स्वरुप मानसिक धक्का बसून महिलेस
कायमचे मतिमंदत्व / शारीरिक अपंगत्व आले असेल तर
10 लाख रुपयेमंजूर रक्कमेपैकी 75% रक्कम
10 वर्षे पीडितांच्या नावे बँकेत
मुदतठेव म्हणून ठेवण्यात येईल.
तर 25% रक्कमेचा धनादेश पिडीतास
तात्काळ अदा करण्यात येईल.
(यामध्ये वैद्यकीय खर्चासाठी
30 हजार रुपये इतक्या रक्कमेचा समावेश आहे.)
आ) सामुहिक बलात्कार व अशा प्रकरणी महिलेस
गंभीर व तीव्र स्वरुपाची शारीरिक इजा झाली असेल तर
10 लाख रुपयेवरीलप्रमाणे
इ) बलात्काराच्या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास

१) मयत महिला कमावती कुटुंबातील महिला असेल तर
२) मयत झालेली महिला कुटुंबातील कमावती महिला नसेल तर
10 लाख रुपयेवरीलप्रमाणे
ई) बलात्काराच्या गुन्ह्यातील अन्य घटनांमधील पीडित महिला असेल तर3 लाख रुपयेवरीलप्रमाणे
POCSO अंतर्गत बालकांवरील लैंगिक अत्याचार
अ) घटनेमध्ये पीडित बालकास लिंगभेद न करता कायमस्वरुपी मतिमंदत्व किंवा अपंगत्व आल्यास10 लाख रुपयेवरीलप्रमाणे
आ) बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील
अन्य घटनांमधील पीडित महिला असेल तर
3 लाख रुपयेवरीलप्रमाणे
अँसिड हल्ला
अ) घटनेमध्ये पिडित महिला / बालकाचा चेहरा विद्रुप झाल्यास, शरिराच्या कोणत्याही
दृष्य भागाची हानी झाल्यास, कायमचे अपंगत्व आल्यास
10 लाख रुपयेवरीलप्रमाणे
आ) असिड हल्ल्याच्या गुन्ह्यातील अन्य घटनांमधील पीडित महिला असेल तर3 लाख रुपयेवरीलप्रमाणे

मनोधैर्य योजना मराठी माहिती

 • सदर योजनेअंतर्गत पीडित महिला / बालकास सर्व शासकीय, निमशासकीय, नगरपालिका, महानगरपालिका, खाजगी रूग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात येईल.
 • सदर दुर्दैवी घटनांमधील HIV / AIDS बाधीत महिलांना / बालकांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपरोक्त शासकीय, निमशासकीय रूग्णालयात मोफत पुरविण्यात येतील.
 • सदर पीडित महिलेस वैद्यकीय व मानसिक आधार देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या प्रशिक्षित ट्रॉमा टीममार्फत त्यांना समुपदेशन / कायदेशीर इ. सेवा विनामुल्य पुरविण्यात येतील.
 • सदर पीडित महिलेस नोकरी / व्यावसायिक प्रशिक्षण देवून तिचे पुनर्वसन करण्यात येईल.
 • पीडितांच्या सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल व त्यांचे जीवनमान सुधारेल तसेच सशक्त व आत्मनिर्भर बनतील.

Manodhairya Yojana Maharashtra In Marathi अंतर्गत आवश्यक पात्रता

 • पीडित महिला व बालक महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

Manodhairya Yojana Maharashtra च्या अटी व शर्ती

 • फक्त महाराष्ट्र राज्यातील पीडित महिला व बालकांस लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील पीडित महिला व बालकांस लाभ दिला जाणार नाही.
 • राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत पीडित महिला व बालकांस अर्थसहाय्य देण्यात येईल त्यामुळे गृह विभागाच्या किंवा अन्य विभागाच्या योजनांमध्ये सदर पीडितांना अर्थसहाय्य देण्यात येणार नाही.
 • सदर योजनेअंतर्गत पिडीतास मंजूर करावयाच्या अर्थसाहाय्याच्या रकमेसाठी तिच्या स्वतःच्या नावे KYV norms असलेले बँक खाते उघडणे बंधनकारक आहे.
 • पीडित व्यक्ती अज्ञान असेल तर त्याच्या बाबतीत पालकत्व स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या नावे बँक खाते उघडण्यात यावे.

मनोधैर्य योजना मराठी अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

 • पीडित अर्जदारांना मनोधैर्य योजनेसाठी सुरु करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
 • होम पेज वर गेल्यावर तुम्हाला रेजिस्ट्रेशन करावे लागेल.
 • रेजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर तुम्हाला Username आणि Password मिळेल त्याने तुम्हाला Login करायचे आहे.
 • आता तुम्हाला मनोधैर्य योजना वर क्लिक करायचे आहे.
 • आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यकता कागदपत्रे जोडावी लागतील.
 • सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
 • अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
 • तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करून तुम्हाला लाभाचे वितरण केले जाईल.

Manodhairya Yojana In Marathi अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

अर्जदार पीडितेला आपल्या क्षेत्रातील महिला व बालविकास विभागात जाऊन मनोधैर्य योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज विभागात जमा करावा लागेल.
तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करून तुम्हाला लाभाचे वितरण केले जाईल.

 • गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते आहे 6000/- रोख रक्कम त्यासाठी वाचा जननी सुरक्षा योजना
 • सरकार महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे त्यासाठी वाचा महिला बचत गट कर्ज योजना
 • मुलींचे आरोग्य, शिक्षण, मुलीचे लग्न तसेच मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक साहाय्य त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना
 • किशोरवयीन मुलींना स्थानिक अंगणवाडी केंद्रांमध्ये 6 महिन्यांसाठी अध्यापन आणि प्रशिक्षण कार्यात समाविष्ट करून घेण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे किशोरी शक्ती योजना
Telegram GroupJoin
मनोधैर्य योजनेची अधिकृत वेबसाईटClick Here
Manodhairya Scheme PDFClick Here

मनोधर्य योजना अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

मनोधैर्य योजना अंतर्गत पीडितांना किती रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते?

योजनेअंतर्गत पीडित महिला व बालकांना 10 लाख रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.

मनोधैर्य योजनेचा उद्देश काय आहे?

राज्यातील पीडीत महिला व बालकांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे मनोबळ वाढविणे व समाजात त्यांना पुन्हा मानाचे स्थान मिळवून देणे.

मनोधैर्य योजनेअंतर्गत अर्ज कोठे करावा?

महिला व बाल विकास विभाग जाऊन अर्ज करावा.

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला मनोधैर्य योजना महाराष्ट्र ची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल.

Leave a Comment