महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारावे यासाठी वेळोवेळी विविध योजना राबवित असते आणि त्यासाठी सरकार दरवर्षी बजेट तयार करते आज आपण राज्यातील मच्छीमारांच्या आर्थिक विकासासाठी सरकार द्वारे सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव मासेमार संकट निवारण निधी योजना आहे.
मासेमारी करताना मच्छीमारांचा अपघाती मृत्यू/बेपत्ता झाल्यास त्यांच्या वारसांना मासेमार संकट निवारण निधी योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
मच्छीमार वादळ-वाऱ्याची पर्वा न करता समुद्रात मासेमारी करायला जातात परंतु काही वेळेस त्यांच्या बोटीला अपघात होऊन त्यांचा मृत्यू होतो किंवा ते समुद्रात बेपत्ता होतात त्यामुळे कुटुंबातील कर्ता पुरुषाच्या एकाएकी जाण्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ येते व त्यांना जीवन जगण्यासाठी खूप सार्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील मच्छीमारांच्या या सर्व समस्येचा विचार करून राज्यात मासेमार संकट निवारण निधी योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
योजनेचे नाव | मासेमार संकट निवारण निधी योजना |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | मत्स्यव्यवसाय विभाग |
उद्देश | मच्छीमारांना आर्थिक सहाय्य करणे |
लाभ | 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य |
लाभार्थी | राज्यातील मच्छीमार |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन/ऑनलाईन |
मासेमार संकट निवारण निधी योजनेचे उद्दिष्ट
- मासेमारी करताना मच्छीमारांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा बेपत्ता झाल्यास त्यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाला सामोरे जाता कामा नये या उद्देशाने मासेमार संकट निवारण निधी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील मच्छीमारांना मत्स्यव्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित तसेच आकर्षित करणे.

योजनेची वैशिष्ट्ये:
- या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची राशी लाभार्थी वारसाच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
योजनेचे लाभार्थी:
- महाराष्ट्र राज्यातील मच्छीमार व त्यांचे कुटुंब मासेमार संकट निवारण निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
- मासेमारी करताना मच्छीमारांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा तो बेपत्ता झाल्यास त्याच्या वारसदारांना मासेमार संकट निवारण निधी योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
योजनेचा फायदा:
- मासेमारी करताना मच्छीमारांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा बेपत्ता झाल्यास त्याच्या वारसांना 1 लाखाचे आर्थिक सहाय्य देण्यात येते जेणेकरून त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.
- राज्यातील मच्छीमारांना पाठबळ मिळेल.
- मच्छीमारांच्या मुलांसाठी शैक्षणिक आणि प्रशिक्षणासाठी आर्थिक मदत
- वरिष्ठ मच्छीमारांसाठी पेंशन योजना
- मच्छीमार विधवांसाठी पुनर्विवाह प्रोत्साहन योजना
- मच्छीमारांसाठी विमा योजना
आवश्यक पात्रता आणि अटी:
- अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील मच्छीमारांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मच्छीमारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त मच्छीमार बांधवांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- मच्छीमारांचा मृत्यू झाल्यास किंवा तो बेपत्ता झाला तरच या योजनेअंतर्गत लाभ लाभ दिला जाईल.
- मच्छीमारांची संस्थेमध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- वारासदारांचे आधारकार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- क्रियाशील मच्छीमार असल्याचे संस्थेचे प्रमाणपत्र
- शव विच्छेदन अहवाल
- पोलीस एफ.आय.आर.
- ग्रामपंचायत/पोलीस पाटील यांचे वारस प्रमाणपत्र
- संस्थेचे शिफारस पत्र
- मोबाईल नंबर
योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कार्यालयात मस्त्यव्यवसाय विभागात जाऊन मासेमार संकट निवारण निधी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची मासेमार संकट निवारण निधी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या महालाभार्थी पोर्टलवर जाऊन नवीन अर्जदार नोंदणी करावी लागेल.
- नवीन अर्जदार नोंदणी केल्यावर तुमच्या युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर मासेमार संकट निवारण निधी योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील.
- सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची मासेमार संकट निवारण निधी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join |
Masemar Sankat Nivaran Nidhi Yojana Official Website | Click Here |