मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना 2024

आज आपण राज्यातील मच्छीमार बांधवांसाठी राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत राज्यातील मच्छीमार बांधवांना सुत व जाळी खरेदीवर अर्थसहाय्य केले जाते.

महाराष्ट्र राज्यातील किनारपट्टीवर राहणाऱ्या बहुतांश नागरिकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असतो व त्यासाठी त्यांना मासेमारी करण्यासाठी मासेमार साधनांची आवश्यकता असते परंतु मच्छीमार बांधव हे आर्थिक दृष्ट्या गरीब असतात त्यामुळे त्यांना मासेमारीसाठी लागणारी साधन सामग्री खरेदी करणे शक्य नसते त्यामुळे त्यांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे राज्यातील मच्छीमार बांधवांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने मच्छीमार बांधवाना त्यांच्या व्यवसाय संबंधित साधनांच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य योजना सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

Table of Contents

मासेमारी व्यवसायामध्ये मच्छिमारांना विविध साधनसामुग्रीचा उपयोग करावा लागतो. यामध्ये प्रामुख्याने जाळी, होडया, बिगर यांत्रिक नौका इ. चा समावेश आहे. भूजल क्षेत्रातील जाळी व होड्या वेगवेगळया पध्दतीच्या असून सागरी क्षेत्रात मात्र बिगर यांत्रिकी नौका व भिन्न प्रकारची जाळी वापरली जातात.भूजल व सागरी क्षेत्रातील मच्छिमारांना मासेमारी करण्यासाठी तयार मासेमारी जाळी खरेदी करता यावी यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.

सागरी क्षेत्रामध्ये परंपरागत पद्धतीने मासेमारी करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या अत्यंत दुर्बल असलेल्या लहान मच्छिमारांना व रांपणकाराना त्यांच्या मत्स्योत्पादनात वाढ व्हावी व त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी या हेतूने 10 टना पर्यंत बिगर यांत्रिक नौका बांधणीसाठी किंवा अशी तयार नौका खरेदी करण्यासाठी 1 लाख अनुदान देण्यात येते.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील मच्छीमारांना मच्छीमार व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे आहे त्यासाठी त्यांना मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य देण्यात येते.

वाचकांना विनंती

आम्ही मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात कोणी मच्छीमार बांधव असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा ही माहिती त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवू शकतील.

योजनेचे नावमासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागमत्स्यव्यवसाय विभाग
उद्देशमच्छीमार बांधवांना मत्स्यव्यवसायासाठी प्रोत्साहन देणे
लाभार्थीराज्यातील मच्छीमार
लाभ15 टक्के ते 100 टक्के अनुदान
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना उद्देश

 • राज्यातील मच्छीमार बांधवांना मत्स्यव्यवसायासाठी प्रोत्साहन देणे.
 • राज्यातील मच्छीमारांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
 • मच्छीमार बांधवांना मासेमारी व्यवसायाशी संबंधित साधन सामग्री विकत घेण्यासाठी सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
 • मच्छीमार बांधवांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित साधन सामग्री विकत घेण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज भासू नये.
Masemari Sadhana Chya Kharedivar Anudan Yojana

मासेमार साधनांवर अर्थसहाय्य योजना वैशिष्ट्ये

 • महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
 • राज्यातील मच्छीमारांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी व त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यासाठी सदर योजना महत्वाची ठरणार आहे.
 • या योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची राशी लाभार्थी मच्छीमारांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
 • या योजनेची अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून अर्जदाराला अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागू नये.
 • आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना राज्य सरकार देत आहे 3 लाखांची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना लाभार्थी

 • मत्स्य व्यवसायिक

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान

अ) सुत व जाळी खरेदीवर अर्थसहाय्य

मासेमारी साठी लागणारी जाळी व सुत मच्छिमारांना सवलतीचे दरामधे उपलबध करुन देण्यासाठी मच्छिमार सहकारी संस्थां मार्फत संस्थेच्या सभासदांना सुत व जाळी खरेदीवर अनुदान देण्यात येते.

मासेमारी साधनावर अर्थसहाय्य

ब) रांपणकारांना रापणीच्या सुतावर अर्थसहाय्य

मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य

क) बिगर यांत्रिक नौका बांधण्यासाठी लहान मच्छिमारांना अर्थसहाय्य

1. सागरी मच्छिमार :- लहान आर्थिकदृष्ट्या कमकूवत मच्छिमारांना 10 टनापर्यंतची नौका बांधण्यास किंतीच्या 50 % किंवा 60,000/- रुपये या पैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते. विहित मुदतित कर्ज फेडल्यास वित्तिय संस्थेचा व्याज दर व 4 % या मधिल फरकाची रक्कम व्याज अनुदान म्हणून मिळते.

2. भूजल मच्छिमार :- आर्थिकदृष्ट्या कमकूवत मच्छिमारांना लहान नौका बांधण्यास किंमतीच्या 50 % किंवा 3000/- रुपये या पैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते.

ड) सागरी मत्स्यव्यवसाय

I) तयार मासेमारी जाळी खरेदीवर अनुदान
सागरी क्षेत्रातील मासेमारी नौकांवर वापरण्यात येणार नायलॉन व मोनोफिलामेंट तयार जाळी खरेदीवर खालील प्रमाणे अनुदान देण्यात येईल.

तयार मासेमारी जाळी खरेदीवर अनुदान

II) बिगर यांत्रिक नौका

1. लहान मच्छिमारांना किंवा रापणकारांना 10 टनापर्यंतची, लाकडी/फायबर नौका, बांधणी/तयार नौका खरेदी करण्यासाठी सध्याच्या प्रचलित दराने 1 लाख रुपये पर्यंतच्या देण्यात येणाऱ्या अनुदानाची मर्यादा वाढवून रुपये 2.5 लाख पर्यंत करण्यात येत आहे.

2. लहान मच्छिमारांना किंवा रापणकारांना 10 टनापर्यंतची, लाकडी / फायबर नौका, बांधणी/ तयार नौका खरेदी करण्यासाठी प्रकल्प किंमत लाख रुपये पर्यंत खर्चाच्या 50 टक्के अथवा 2.5 लाख रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान अनुज्ञेय राहील.

इ) भूजल मत्स्यव्यवसाय

I) तयार मासेमारी जाळी खरेदीवर अनुदान

भूजल मत्स्यव्यवसाय

II) बिगर यांत्रिकी नौका
भूजल क्षेत्रात लहान आकाराच्या होड्या वापरल्या जातात. बिगर यांत्रिकी नौकेसाठी खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येईल.

बिगर यांत्रिकी नौका

नौकेचे आयुर्मान खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

अ.क्र.नौकेचा प्रकारसरासरी आयुर्मान
1लाकडी नौका15 वर्षे
2पत्रा नौका5 वर्षे
3फायबर नौका15 वर्षे
 • महाराष्ट्र शासन मुलींच्या शिक्षणासाठी देत आहे 98 हजारांचे आर्थिक सहाय्य्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना
 • स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते आहे त्यासाठी वाचा प्रशिक्षण योजना

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना लाभ

 • राज्यातील मत्स्य व्यावसायीक मच्छीमार व्यवसायासाठी प्रोत्साहित होतील.
 • राज्यातील मत्स्य व्यावसायिकांचे जीवनमान सुधारेल.
 • राज्यातील मत्स्य व्यावसायिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल तसेच ते सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • मत्स्य व्यवसायिकांना मासेमार साधनांच्या खरेदीसाठी आवश्यक पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तसेच कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज भासणार नाही.
 • सागरी मत्स्यव्यवसायासाठी तयार मासेमारी जाळी खरेदीवर अनुदान दिले जाईल.
 • बिगर यांत्रिकी नौकांना अनुदान दिले जाईल.

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना आवश्यक पात्रता

 • अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना अटी व शर्ती

 • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • अर्जदार व्यक्ती मत्स्य व्यवसायिक असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार व्यक्ती दारिद्र्य रेषेखालिल किंवा अल्प उत्पन्न गटातील असावा.
 • अनुदान प्राप्त बिगर यांत्रिक नौका अनुदान दिल्यापासून 7 वर्षांच्या कालावधीत हस्तांतरीत अथवा विकता येणार नाहीत.
 • अर्जदार 18 ते 50 वयोगटातील क्रियाशिल मच्छिमार असावा.
 • अर्जदार व्यक्ती मच्छिमार सहकारी संस्थेचा सभासद असावा.
 • नौकेवर खलाशांच्या संख्येनुसार जीवरक्षक साधने उपलब्ध असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार व्यक्ती मच्छिमार सहकारी संस्थेने पुरस्कृत केलेला असावा.
 • अनुदानाच्या मर्यादेत मच्छीमारांनी बांधलेल्या/ विकत घेतलेल्या नौकेचे यांत्रिकीकरण करावयाचे झाल्यास त्यासाठी शासनाची परवानगी घेणे आवश्यक असेल.
 • अर्जदार व्यक्ती बँक/वित्त संस्थेचा थकबाकीदार नसावा.
 • मच्छिमारांनी नौकेसाठी आवश्यक मासेमारी परवाना नौका नोंदणी प्रमाणपत्र, विमापत्र इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
 • नोंदणी क्रमांक सदरहू नौकेवर लिहिल्यानंतर अनुदान अनुज्ञेय राहील.
 • अर्जदार व्यक्तीने या पूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थ सहाय्याचा लाभ मिळवलेला नसावा.
 • नौकेचा आयुर्मान कालावधी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी नवीन नौकेसाठी प्रस्ताव सादर करण्यास पात्र राहील.
 • अर्जदारांनी पूर्वी यांत्रिक नौकांसाठी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा, असल्यास त्याच्या हिश्श्याची अनुदानाची रक्कम परत करावी. तसेच अर्जदाराने मत्स्यव्यवसाय विभागाकडून घेतलेले सर्व कर्ज व्याजासह चुकते केलेले असावे.

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • बँक पासबुक
 • संबंधित नौका, जाळीचे दरपत्रक
 • क्रियाशील मच्छीमार असल्याचे संस्थेचे प्रमाणपत्र
 • उत्पन्नाचा दाखला
 • पासपोर्ट आकाराचे फोटो
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल आयडी
 • सरकार महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे त्यासाठी वाचा महिला बचत गट कर्ज योजना

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

 • अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील मत्स्यव्यवसाय विभागात जाऊन मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • अर्जात
 • अर्जात नौका व अन्य साधनांसाठी किती रक्कम लागणार आहे व कर्ज कोणत्या बँकेकडून घेणार, याचा तपशिल द्यावा लागेल तसेच
  अ) संस्थेचा सभासद व मच्छिमार असल्यासंबंधीचा संस्थेचा दाखला
  ब) नौका बांधणीचा करारनामा
  क) शीड, वल्ही, नांगर, दोर यांच्या जी.एस.टी. नमुद असलेल्या पावत्या
 • इत्यादी कागदपत्रे जोडून अर्ज सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांचेकडे जमा करावा लागेल
 • अर्जदारांच्या अर्जाची संबधित सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, आवक दिनांकानुसार नोद घेतील. जिल्हा कार्यालय अधिकारी, उपलब्ध निधी, अर्जाचा प्राथम्य क्रम, तसेच तो थकबा कीदार नाही, इत्यादी गोष्टी लक्षात घेवून अर्जदारांची क्रमवारी निश्चित करतील.

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अनुदानाचे वितरण

 • अनुदानाची संपूर्ण रक्कम नौकेची नोंदणी व मासेमारी परवाना प्राप्त झाल्यावर अदा करण्यात येईल.
Join Telegram GroupJoin
Official WebsiteClick Here
मासेमारी साधनांचे खरेदीवर अर्थसहाय्य शासन निर्णयClick Here

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते?

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 100 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अर्ज कोठे करावा?

आपल्या क्षेत्रातील मत्स्यव्यवसाय विभागात जाऊन अर्ज करावा.

मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील मत्स्य व्यवसायिक

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना ची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे मासेमार साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजना संबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल.

Leave a Comment