माझी कन्या भाग्यश्री योजना : Mazi Kanya Bhagyashree Yojana

महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात देखील करत असते.
आज आपण महाराष्ट्रात राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबातील मुलींच्या सामाजिक, आर्थिक तसेच शैक्षणिक विकासासाठी सुरु करण्यात आलेल्या अशाच एका योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत ज्या योजनेचे नाव माझी कन्या भाग्यश्री योजना आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना हि पहिली मुलगी योजना किंवा दोन मुलींसाठी योजना या नावाने देखील ओळखली जाते.

Table of Contents

या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींच्या जन्मापासून तिचे इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक सहाय्य केले जाते जेणेकरून मुलींना स्वतःच्या शिक्षणासाठी पैशांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश कुटुंबे हि दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात तसेच त्यांच्याजवळ उत्पन्नाचे व रोजगाराचे कोठल्याच प्रकारचे स्थायी साधन उपलब्ध नसल्या कारणामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करता येत नाहीत तसेच ता आपल्या मुलींना शिक्षण देण्यासाठी असमर्थ असतात त्यामुळे काही कुटुंबे एखादी वस्तू, स्वतःचे घर किंवा शेतजमीन गहाण ठेवून साहुकाराकडून जास्त व्याज दराने कर्ज घेतात व मुलींना शिक्षण देतात परंतु घेतलेले कर्ज वेळेवर न फेडू शकल्यामुळे त्यांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो व गहाण ठेवलेली वस्तू, जमीन, घर हे गमवावे लागते.

आज सुद्धा समाजात मुलींना कमी महत्व दिले जाते त्यामुळे मुलींना मुलांच्या तुलनेत कमी शिक्षण दिले जाते त्यामुळे मुलींना शिकण्याची इच्छा असून सुद्धा त्या आपले शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतात त्यामुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबाचा तसेच त्या कुटुंबातील मुलीच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने नव वर्षाचा मुहूर्त साधून 1 जानेवारी 2014 रोजी राज्यात माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी टप्प्या टप्प्याने आर्थिक सहाय्य्य देणे जेणेकरून मुली आर्थिक अडचणीशिवाय स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील व स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवून स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील.

वाचकांना विनंती

आम्हीमाझी कन्या भाग्यश्री योजना बद्दल माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात असे कोणी आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ मिळवून स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.

योजनेचे नावमाझी कन्या भाग्यश्री योजना
विभागबाल विकास विभाग
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली
लाभशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य
उद्देशआर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीचे भविष्य सुरक्षित करणे
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा उद्देश

mazi kanya bhagyashree yojana purpose

 • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण, आरोग्य तसेच त्यांचा सामाजिक विकास करण्याच्या उद्देशाने राज्य सरकार ने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु केली आहे.
 • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीचे जीवनमान सुधारणे.
 • दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या कुटुंबातील मुलींना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
 • राज्यातील मुलींचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
 • महाराष्ट्रात राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे.
 • राज्यात बालिका भ्रूणहत्या थांबविणे.
 • मुलींच्या जन्माबाबत समाजात असलेले नकारात्मक विचार नष्ट करून सकारात्मक विचार आणणे.
 • राज्यातील बालविवाह रोखणे.
 • राज्यात मुलानं इतकाच मुलींचा जन्मदर वाढविणे.
 • मुलींना शिक्षणासाठी आर्थिकदृष्टया बळकट करणे.
 • माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या सहाय्याने मुलींना समाजात एक मानाचे स्थान उपलब्ध करून देणे.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये तसेच कोणाकडून जास्त व्याजदराने पैसे उधार घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु केली गेली आहे.
 • या योजनेअंतर्गत मुलींचा आरोग्याचा दर्जा उंचावणे
 • मुलींना त्यांच्या पुढील जीवनाच्या सुरक्षेबद्दल खात्री निर्माण करून देणे
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
mazi kanya bhagyashree yojana

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र वैशिष्ट्य

majhi kanya bhagyashree yojana features

 • महाराष्ट्र शासनाच्या बाल विकास विभागाद्वारे राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीच्या आरोग्यासाठी तसेच त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली माझी कन्या भाग्यश्री योजना एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
 • या योजनेची सुरुवात  1 जानेवारी 2014 रोजी नववर्षाचा शुभ मुहूर्त साधून केली गेली.
 • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी हि योजना महत्वाची भूमिका बजावणार आहे.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलींना दिली जाणारी लाभाची राशी तिच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाईल.
 • माझी कन्या भाग्यश्री योजनेची अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आली आहे जेणेकरून अर्जदाराला अर्ज करताना कुठल्याच समस्येचा सामना करावा लागणार नाही.
 • या योजनेची महत्वाची गोष्ट हि आहे कि या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील सर्व जातीच्या मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो म्हणजेच या योजनेअंतर्गत जातीची कोणतीच अट नाही.
 • राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो.
 • बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत प्रेरणा घेऊनच माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
 • संपूर्ण राज्यात हि योजना राबविली जात आहे.
 • मुलीच्या नावे मुदत ठेव रक्कम जमा झाल्यावर लाभार्थ्यास बँकेकडून गुंतवणूक प्रमाणपत्र  देण्यात येईल.
 • राज्यातील 65 वर्षावरील नागरिकांना सरकार देत आहे दर महिना 1500/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा श्रावणबाळ योजना
 • सरकार गटई कामगारांना देत आहे मोफत पत्र्याचे स्टॉल त्यासाठी वाचा गटई स्टॉल योजना

मुलींसाठी सरकारी योजना महाराष्ट्र 2022 लाभार्थी

majhi kanya bhagyashree yojana 2023 bebeficiary

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत २ प्रकार च्या लाभार्थ्यांना लाभ दिला जातो

पहिल्या प्रकारचे लाभार्थी

 • कुटुंबात फक्त एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे.

दुसऱ्या प्रकारचे लाभार्थी

 • कुटुंबात एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना लाभ देण्यात येतो परंतु कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी असल्यास अशी परिस्थिती त्या मुलीला लाभ दिला जाणार नाही.

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य

bhagyashree yojana aarthik sahayy

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभार्थी मुलीला टप्प्या टप्प्याने खालील प्रकारे आर्थिक सहाय्य दिले जाते.

टप्पा 1 : मुलीच्या जन्माच्या वेळी

हेतू: मुलीचा जन्म साजरा करण्यासाठी
अट: मुलीची जन्म नोंदणी करणे आवश्यक

लाभ:

 • पहिल्या मुलींसाठी: 5000/- रुपये
 • दुसऱ्या मुलींसाठी: 2500/- रुपये
 • योजनेअंतर्गत मुलगी व तिची आई यांच्या नावाने संयुक्त बचत खाते उघडण्यात येईल. त्यामुळे 1 लाख रुपये अपघात विमा व 5000/- रुपये पर्यंत ओव्हर ड्राफ्टचा लाभ घेता येईल.
 • मुलीच्या नावावर शासनामार्फत एल.आय.सी. कडे 21,200/- रुपये चा विमा उतरविण्यात येईल. तसेच मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात येईल.
 • आयुर्विमा महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेअंतर्गत सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रक्कमेतून ( 21200/-रुपये ) नाममात्र रुपये 100/- रुपये प्रतिवर्षी इतका हप्ता जमा करुन मुलीच्या कमवित्या पालकांचा विमा उतरविला जाईल. ज्यात मुलीच्या पालकांचा अपघात/मृत्यू झाल्यास खालीलप्रमाणे लाभ अनुज्ञेय राहतील.

अ) नैसर्गिक मृत्यू : 30000/- रुपये

आ) अपघातामुळे मृत्यू: 75000/- रुपये

इ) दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास: 75000/- रुपये

ई) एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास : 37500/- रुपये

उ) आम आदमी विमा योजनांतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेंतर्गत सदर मुलीला 600/- रुपये शिष्यवृत्ती प्रती 6 महिने, इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावी मध्ये मुलगी शिकत असतांना दिली जाईल.

टप्पा 2: मुलगी 5 वर्षे वयाची होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी

हेतू: दर्जेदार पोषण देण्यासाठी दर दिवशी 1 अंडे किंवा दर दिवशी 200 मी.ली. दूध दिले जाईल
अट: मुलगी जन्मल्यापासून अंगणवाडीतून लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

लाभ:

 • पहिल्या मुलींसाठी: प्रतिवर्षी 200/- रुपयांप्रमाणे प्रमाणे 5 वर्षांकरिता एकूण 10,000/- रुपये
 • दुसऱ्या मुलींसाठी: दोन्ही मुलींना प्रतिवर्षी 1000/- रुपयांप्रमाणे 5 वर्षांकरिता 10,000/- रुपये

टप्पा ३: प्राथमिक शाळेत प्रवेश (इयत्ता 1 ली ते 5वी)

हेतू: गुणवत्तापूर्वक पोषण आहार व इतर खर्चाकरिता
अट: मुलीच्या शाळा प्रवेशाबाबत प्रमाणपत्र तसेच संबंधित शाळेकडून उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक

लाभ:

 • पहिल्या मुलींसाठी: प्रतिवर्षी 2500/- रुपयांप्रमाणे 5 वर्षांकरिता एकूण 12,500/- रुपये
 • दुसऱ्या मुलींसाठी: दोन्ही मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी 1500/- रुपयांप्रमाणे 5 वर्षांकरिता 15,000/- रुपये

टप्पा ४: माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रवेश (इयत्ता 6वी ते 12वी)

हेतू: गुणवत्तापूर्वक पोषण आहार व इतर खर्चांकरिता
अट: मुलीच्या शाळा प्रवेशाबाबत प्रमाणपत्र तसेच संबंधित शाळेकडून उपस्थिती प्रमाणपत्र आवश्यक

लाभ:

 • पहिल्या मुलींसाठी: प्रतिवर्षी 3000/- रुपयांप्रमाणे 7 वर्षांकरिता एकूण 21,000/- रुपये
 • दुसऱ्या मुलींसाठी: दोन्ही मुलींना प्रतिवर्षी प्रत्येकी 2000/- रुपयांप्रमाणे 7 वर्षांकरिता 22,000/- रुपये

टप्पा 5: वयाच्या 18व्या वर्षी

हेतू: कौशल्य,विकास,उच्च शिक्षण आणि रोजगार मिळवण्यासाठी
अट: वयाची 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक व अविवाहित असल्याबाबतचे पालकांचे शपथपत्र
लाभ: विम्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रुपये देण्यात येतील त्यापैकी किमान 10,000/- रुपये मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे आवश्यक आहे.

टप्पा ६ : मुलीचा जन्म झाल्यानंतर

हेतू: आजी आजोबाला प्रोत्साहनपर भेट
अट: पहिल्या मुली नंतर मातेने कुटुंब नियोजन करणे आवश्यक

लाभ:

 • पहिल्या मुलींसाठी : सोन्याचे नाणे देण्यात येईल. (5000/- रुपये कमाल मर्यादेपर्यंत व प्रमाणपत्र)
 • दुसऱ्या मुलींसाठी: लागू नाही

टप्पा ७: गावाचा गौरव

हेतू: मुलामुलींचे विषम असलेले गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त असण्यासाठी प्रोत्साहनपर
अट: जिल्हाधिकारी यांचे लिंग गुणोत्तराबाबतचे प्रमाणपत्र तसेच सदरची रक्कम गावातील मुलींच्या विकासासाठी खर्च करणे आवश्यक राहील.
लाभ: ग्रामपंचायतीस 5 लाख इतके पारितोषिक मा. मंत्री, महिला व बाल विकास यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

 • मुलींचे आरोग्य, शिक्षण, मुलीचे लग्न तसेच मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक साहाय्य त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना
 • सरकार महिलांना स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत आहे त्यासाठी वाचा महिला बचत गट कर्ज योजना
 • गर्भवती महिलांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकार देते आहे रोख रक्कम त्यासाठी वाचा जननी सुरक्षा योजना

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे फायदे

mazi kanya bhagyashree yojana bebefits

 • महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षण, आरोग्य तसेच त्यांचा सामाजिक विकास करण्याच्या उद्देशाने टप्प्या टप्याने आर्थिक सहाय्य केले जाते.
 • माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मुलींचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
 • या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींचे जीवनमान सुधारेल.
 • माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलीचे भविष्य उज्वल बनेल.
 • राज्यात बालिका भ्रूणहत्या थांबेल.
 • मुलींबद्दल समाजात असलेले नकारात्मक विचार बदलतील व सकारात्मक विचार निर्माण होतील.
 • राज्यात बालविवाह रोखले जातील.
 • या योजनेच्या सहाय्याने आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिकदृष्टया बळकटी मिळेल.
 • आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही तसेच कोणाकडून जास्त व्याज दराने कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
 • या योजनेच्या सहाय्याने समाजात मुलींचा दर्जा उंचावेल.
 • माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मुलींच्या पुढील शिक्षणासाठी खात्री निर्माण होईल.
 • या योजनेच्या सहाय्याने आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील एक सुद्धा मुलगी तिचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहणार नाहीत व सर्व मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
 • आई वडील आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चापासून चिंतामुक्त होतील.
 • मुली शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील.
 • मुली स्वतःच्या शिशक्षणासाठी स्वावलंबी बनतील व स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील.
 • माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या सहाय्याने मुली स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एक चांगली नोकरी मिळवू शकतील व स्वतःचे तसेच स्वतःच्या परिवाराचा सांभाळ करू शकतील.
 • माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मुलीच्या वयाच्या 18 वर्षानंतर LIC कडून जे 1 लाख रुपये मिळणार आहेत त्यापैकी किमान 10000/- रुपये तरी मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे बंधनकारक राहील जेणेकरून या कौशल्याच्या मदतीने मुलीला रोजगार मिळून कायमस्वरूपी उत्पन्न मिळेल.

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक पात्रता

2 muli yojana eligibility

 • अर्जदार कुटुंब महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अटी व शर्ती

mazi kanya bhagyashree yojana maharashtra terms & condition

 • फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभ दिला जातील.
 • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • या योजनेचा लाभ फक्त 1 ऑगस्ट 2017 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या मुलींसाठीच असेल व 1 ऑगस्ट 2017 पूर्वी जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत कुटुंबातील फक्त 2 मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
 • माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी मातेने / पित्याने कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वी अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे.
 • दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर, 6 महिन्याच्या आत मुलीच्या आई-वडिलांना कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
 • जर एखाद्या कुटुंबात पहिले अपत्य मुलगी व दुसरे अपत्य मुलगी असेल आणि जर तिसरे अपत्य मुलगी झाली असेल तर त्या तिसऱ्या मुलीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही उलट पहिल्या व दुसऱ्या मुलींना या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ रद्द करण्यात येईल.
 • जर एखाद्या कुटुंबात पहिली मुलगी असेल व दुसरा मुलगा असेल किंवा पहिला मुलगा व दुसरी मुलगी असेल आणि मुलीचा जन्म जरी 1 ऑगस्ट 2017 नंतर झाला असेल तरी त्या मुलीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
 • या योजनेतील मुदत ठेव रक्कम व त्यावरील जमा व्याजाची रक्कम मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच काढता येईल परंतु लाभार्थी मुलगी इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच ती अविवाहित असणे आवश्यक आहे.
 • दुसऱ्या प्रसुती वेळेस जर मातेने जुळ्या मुलींना जन्म दिला तर त्या दोन्ही जुळ्या मुली सदर योजनेसाठी पात्र असतील.
 • या योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या मुलीचा मृत्यू जर एखाद्या नैसर्गिक कारणामुळे झाल्यास मुलीच्या नावावरील पूर्ण रक्कम मुदत संपल्यानंतर पालकांना देण्यात येईल.
 • बालगृहातील अनाथ मुली तसेच दत्तक घेतलेल्या मुली देखील सदर योजनेसाठी पात्र असतील.
 • जर एखाद्या कुटुंबाने एखादी मुलगी दत्तक घेतली असेल तर ती मुलगी देखील सदर योजनेचा लाभ घेऊ शकेल परंतु दत्तक घेतलेल्या मुलीचे वय 0 ते 6 वर्षे इतके असावे तसेच दत्तक घेतलेल्या मुलीच्या पालकांना देखील सदर योजनेचे नियम व अटी लागू असतील.
 • अर्जदार मुलीचे आधार कार्ड तिच्या बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.
 • पहिल्या मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत आई-वडिलांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे या योजनेअंतर्गत बंधनकारक राहील जर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया 1 वर्षानंतर केल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • मुदतीपूर्वी म्हणजेच मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण होण्याअगोदरच जर मुलीचे लग्न झाले किंवा मुलगी इयत्ता 10वी मध्ये नापास झाली किंवा एखाद्या कारणामुळे मुलीचे नाव शाळेमधून काढून टाकण्यात आले तर अशा परिस्थितीत सदर योजनेचा लाभ लाभार्थ्यांस घेता येणार नाही.
 • या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी मुलींसाठी शासनाद्वारे स्वतंत्र खाते बँकेत उघडण्यात येईल.
 • मुदत ठेव पद्धतीवरील व्याज बँकेच्या दरानुसार देण्यात येईल.
 • अर्जदार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
 • जर वैयक्तिक मुलीच्या नांवे असलेल्या एकत्रित निधी (Corpus) 1 लाख रुपयांपेक्षा अधिक झाल्यास जादाची रक्कम या खात्यात जमा होईल.
 • माझी कन्या भाग्यश्री योजना सर्व गटातील दारिद्रय रेषेखालील (BPL) तसेच दारिद्रय रेषेच्यावरील (APL) (पांढरे रेशनकार्डधारक) कुटुंबात जन्मणाच्या अपत्यांपैकी दोन मुलींना लागू असेल.
 • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतांना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहील.
 • या योजनेअंतर्गत लाभार्थी मुलीचा मुदतीपूर्वी विवाह अथवा मृत्यू झाल्यास मुलीच्या नावांवरील रक्कम एकत्रित निधी (Corpus) फंडात जमा करण्यात येईल.

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे

mazi kanya bhagyashree yojana documents

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड
 • रहिवाशी दाखला
 • ई-मेल आयडी
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट साईज फोटो
 • मुलीचा जन्माचा दाखला
 • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दाखला
 • बँक खात्त्याचा तपशील
 • सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
 • शपथ पत्र
 • मागील शैक्षणिक वर्ष उत्तीर्ण केल्याचे मार्कशीट
 • अर्जदार कुटुंबाने जर पहिल्या मुलीसाठी अर्ज केला असेल तर मुलीच्या जन्माच्या 1 वर्षाच्या आत आई / वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.
 • अर्जदार कुटुंबाने जर दुसऱ्या मुलीसाठी अर्ज केला असेल तर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 6 महिन्यांच्या आत आई-वडिलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केल्याचा दाखला जोडणे आवश्यक

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्ग अर्ज भरल्यानंतर केली जाणारी कार्यवाही

mazi kanya bhagyashree yojana

 • अर्ज भरल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडून सदर अर्जाची तसेच जोडलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाते
 • अर्ज तपासणी मधील पात्र अर्ज अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका/मुख्यसेविका कडे सादर करतात.
  अंगणवाडी पर्यवेक्षिका/मुख्यसेविका सदर अर्जाची व प्रमाणत्रांची तपासणी करुन प्रत्येक नागरी प्रकल्पाबाबत बाल विकास प्रकल्प अधिकायांना व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद यांना मान्यतेसाठी सादर करतात.
 • मुलीचा जन्म झाल्यावर तिचे नांव नोंदविल्यावर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविका/मुख्य सेविका/बाल विकास प्रकल्प अधिकारी महिला व बाल विकास विभागांतर्गत संस्थांच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचेकडे अज करता येईल. उपरोक्त योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण), जिल्हा परिषद, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) यांचे कार्यालयात विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत. अर्जदारांनी संपूर्ण तपशीलासह भरून दिलेले अर्ज कागदपत्रासह वर नमूद केलेल्या संबंधित अधिकाच्यांनी मुलीच्या जन्माच्या एका वर्षांच्या विहित मुदतीपर्यंत स्वीकारावेत. दत्तक मुलींच्या बाबतीत ६ वर्षांपर्यंतच्या विहित मुदतीपर्यंत स्वीकारावेत. अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह नसल्यास अर्ज मिळाल्यापासून १५ दिवसाच्या आत अर्जदारास कळवावे. अर्जदारांनी अपूर्ण भरलेले अर्ज किंवा आवश्यक ती कागदपत्रे जोडलेली नसल्यास अशा अर्जदारांना वरील मुदती व्यतिरिक्त वाढीव एक महिन्याची मुदत देण्यात येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोणताही अर्ज २ महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही.
 • मुलीला एल.आय.सी. योजनेचे लाभ देण्याकरिता संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) यांच्या मान्यतेनंतर मुलीचे पालक जनधन योजनेअंतर्गत बॅक बचत खाते उघडतील आणि त्याबाबतचा तपशिल संबंधित बाल विकास प्रकल्प कार्यालयास कळवतील. सदर अज प्राप्त झाल्यावर ३० दिवसांच्या आत/ अपवादात्मक परिस्थितीत ६० दिवसांच्या आत पडताळणी करुन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी / बाल विकास प्रकल्प अधिकारी / उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) हे संबंधित विभागातील आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयाशी (P&GS Unit) सोबत जोडलेल्या प्रपत्र – ‘क’ येथील विहित नमुन्यात माहिती भरून संपर्क साधतील.

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

mazi kanya bhagyashree yojana application process

 • माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) जिल्हा परिषद किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किंवा विभागीय उपायुक्त (महिला बाल विकास) किंवा ग्रामपंचायत कार्यालय किंवा अंगणवाडी केंद्रात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
 • अर्जात विचारलेली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.
 • अशा प्रकारे तुमची माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupClick Here
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्जClick Here
बालगृहे, शिशुगृहे किंवा महिला व बालविकास विभागाअंतर्गत इतर निवासी संस्था
येथील अधिकारी व जिल्हा बालविकास अधिकारी
यांच्याकडे करावयाचा अर्ज
Click Here
पालकांचे स्वयंघोषणापत्र / हमीपत्रClick Here

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्ग विचारले जाणारे प्रश्न

माझी कन्या भाग्यश्री योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुली माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे लाभ काय आहेत?

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभार्थी मुलीला तिचे इयत्ता 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत टप्प्या टप्प्याने आर्थिक लाभ दिला जातो.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा उद्देश काय आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्टया गरीब कुटुंबातील मुलीचे भविष्य सुरक्षित करणे.

माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला माझी कन्या भाग्यश्री योजनेची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे माझी कन्या भाग्यश्री योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल.

Leave a Comment