मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसकल्प 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिलांना आधार मिळणार आहे
राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची महत्वपूर्ण योजना.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे उद्दिष्ट:
- राज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
- राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
- त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
- राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे.
- महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- योजनेअंतर्गत 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची राशी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- सर्व जातीतील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
- या योजनेत आर्थिक व दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपये देण्यात येणार आहे.
योजनेचे लाभार्थी:
- आर्थिक व दुर्बल घटकातील महिला
- 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि निराधार महिला
महत्वाच्या तारखा:
- लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात येणार आहे.
योजनेचा फायदा:
- या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
योजनेच्या अटी व शर्ती
- महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- महिला आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
- महिलेच्या कुटुंबाचे वर्षी उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
- महिला 21 ते 60 वयोगटातील असणे गरजेचे आहे
आवश्यक कागदपत्रे:
- विहित नमुन्यातील अर्ज
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्नाचा दाखला
- पासपोर्ट आकाराचे फोटो
अर्ज करण्याची पद्धत:
- ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत: लवकरच या संबधी पोर्टल सुरु करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही वेळोवेळी आमच्या वेबसाईट ला भेट द्या
- ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत: आपण आपल्या क्षेत्रातील महानगर पालिका कार्यालय / जिल्हा अधिकारी कार्यालय / ग्रामपंचायत मध्ये जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्या आणि अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि अर्ज जमा करा.
लाभाच्या रक्कमेचे वितरण:
प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल.