महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी विहीर, नाला, शेततळे, बोअरवेल, नदी यामधून पाण्याचा उपसा करण्यासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तसेच इतर चांगले हेतू लक्षात घेऊन सुरु करण्यात आलेली अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी सौर कृषी पंप विकत घेण्यासाठी शासनाकडून 95 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते व लाभार्थीला स्वतःकडील फक्त 5 टक्के रक्कम भरण्याची आवश्यकता असते.
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपारीक तसेच प्राथमिक व्यवसाय आहे व ते विविध प्रकार च्या पिकांची शेती करतात त्यासाठी शेतकरी शेतीची औजारे, खते, कीटकनाशके यांसाठी स्वतःची शेतजमीन व घर गहाण ठेऊन साहुकार किंवा बँकांकडून जास्त व्याज दराने कर्ज घेतात व शेती करतात. तसेच शेती पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते त्यामुळे शेतकऱ्यांना विहीर, कालवा, नदी, शेततळे, बोअरवेल यांतून पाण्याचा उपसा करणे आवश्यक असते त्यासाठी शेतकरी विद्युत पंपाचा वापर करतो परंतु सतत होणाऱ्या लोडशेडिंगमुळे मोठ्या प्रमाणावर विजेची अनियमितता निर्माण होते त्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकासाठी पाण्याचा उपसा करण्यासाठी खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होते ज्याचा त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो व दिलेल्या वेळेत घेतलेले कर्ज न फेडू शकल्यामुळे त्यांना स्वतःचे घर व शेतजमिनीपासून मुकावे लागते व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो ज्याचा त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो व परिणामी शेतकरी आत्महत्या करतात.
सिंचना अभावी वारंवार होणारे पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी शेती क्षेत्राकडे पाठ फिरवताना दिसून आले आहे ज्याचा राज्याच्या औद्योगिक प्रगतीवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे जर शेतकरी शेती क्षेत्राकडे अशीच पाठ फिरवत राहिला तर काही वर्षात राज्यातील नागरिकांना अन्न धान्याच्या तुटवड्यासारख्या भीषण समस्येचा सामान करावा लागेल.
ग्रामीण भागात दिवस लोडशेडिंग करून रात्री वीज उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री काळोखातून शेतात जावे लागते व काळोखातून शेतात जाताना साप, विंचू शेतकऱ्यांना दंश करतात तसेच वन्य प्राणी काळोखाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांवर हल्ला करतात व जखमी करतात व काही वेळा तर शेतकऱ्यांना या वन्य प्राण्यांच्या हल्यात व साप, विंचू द्या दंश केल्याने स्वतःचा जीव सुद्धा गमवावा लागतो.
विद्युत पंपासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर विजेची आवश्यकता असते तसेच वाढत्या विद्युत दरामुळे मोठ्या प्रमाणावर विजेचे बिल येते. जे भरणे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नसते त्यामुळे शेतकरी शेतात डिझेल पंपाचा वापर करण्याकडे वळतो परंतु डिझेल पंपांच्या किमती विद्युत पंपाच्या तुलनेत जास्त असते तसेच दिवसेंदिवस डिझेल चा वाढता दर, आयात खर्च, परकीय चलनात द्यावी लागणारी किंमत तसेच डिझेल पंपामुळे होणारे वायू प्रदूषण यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात डिझेल पंप वापरणे खर्चाच्या दृष्टीने परवडण्यासारखे नसते त्यामुळे डिझेल पंपाच्या वापरासाठी सुद्धा शेतकऱ्यांना खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.
सौर कृषी पंप हे किमतीच्या तुलनेत विद्युत पंप व डिझेल पंपाच्या तुलनेत परवडण्यासारखे असतात तसेच सौर पंपाला मोठ्या प्रमाणावर विजेची आवश्यकता नसते व डिझेल ची सुद्धा गरज नसते तसेच सौर कृषी पंपामुळे वायू प्रदूषण सुद्धा होत नाही तसेच सौर कृषी पंपाचा देखभाल खर्च हा शून्य असतो कारण सौर कृषी पंप सूर्य प्रकाशापासून विजेची निर्मिती करून चालवला जातो त्यामुळे खर्चाच्या व देखभालीच्या तुलनेत सौर कृषी पंप हे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे असतात
जे शेतकरी शेतात विद्युत पंपाचा वापर करतात त्यांना मोठ्या प्रमाणावर विजेची आवश्यकता असते त्यासाठी शासनाकडून विद्युत रोहित्र उभारण्यात येतात व त्याच्या माध्यमातून कृषिपंपांना विजेचा पुरवठा करण्यात येतो परंतु नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक बिघाड, विद्युत चोरी या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांना विद्युत पंपासाठी विद्युत पुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होत नाही तसेच विद्युत मंडळाला देखभाल खर्च परवडण्यासारखा सुद्धा नसतो त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी विद्युत तसेच डिझेल पंपामुळे करावा लागणाऱ्या अडचणींपासून मुक्तता देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी सौर कृषी पंप विकत घेण्यासाठी 95 टक्के अनुदान उपलब्ध करून देणे व शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करणे.
योजनेचे नाव | सोलर पंप योजना महाराष्ट्र 2024 |
लाभार्थी | आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकरी |
लाभ | सौर कृषी पंपासाठी 95% अनुदान |
उद्देश | शेतकऱ्याचा सामाजिक व आर्थिक विकास करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचे उद्दिष्ट
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पिकांसाठी पाण्याचा उपसा करण्यासाठी 95% अनुदान तत्वावर आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना चा मुख्य उद्देश आहे.
- शेतकऱ्यांना विद्युत पंप तसेच डिझेल पंपापासून मुक्तता देणे.
- शेतकऱ्यांना विद्युत पंपांच्या बिलापासून व डिझेल पंपासाठी लागणाऱ्या डिझेल पंपापासून मुक्तता करणे.
- शेतकऱ्यांना दिवस सिंचन करणे शक्य व्हावे.
- पिकांसाठी पाण्याचा उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या अडचणींपासून सुटका करणे.
- डिझेल पंपाच्या वापरामुळे होणारे वायुप्रदूषण रोखणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- या योजनेच्या अंमलबजावणीची संपूर्ण जबाबदारी महावितरण कंपनीवर टाकण्यात आली आहे.
- राज्यातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल समजले जाते.
- सौर कृषी पंप योजनेला अटल सौर कृषी पंप योजनेच्या नावाने देखील ओळखले जाते.
- अति दुर्गम भागातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
- डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च लागेल.
योजनेचे लक्ष
- या योजनेअंतर्गत 1 लाख शेतकऱ्यांच्या शेतात 3 टप्यात सौर कृषी पंप वितरित करण्याचे लक्ष्य निर्धारित केले गेले आहे व सौर कृषी पंपाची मागणी वाढल्यास त्यात वाढ करण्यात येईल. त्यामध्ये पहिल्या टप्यात 25 हजार सौर कृषी पंप व दुसऱ्या टप्यात 50 हजार सौर कृषी पंप आणि तिसऱ्या टप्यात 25 हजार सौर कृषी पंपाचे वाटप करण्यात येणार आहे.
सौर कृषी पंपाचे करण्यात येणारे वाटप:
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत टप्या टप्याने सौर कृषी पंपाचे वाटप करण्यात येते तसेच वाढत्या मागणीचा विचार करून सौर कृषी पंपाची संख्या वाढविण्यात येईल.
पहिल्या टप्प्यात | 25 हजार सौर कृषी पंप |
दुसऱ्या टप्प्यात | 50 हजार सौर कृषी पंप |
तिसऱ्या टप्यात | 25 हजार सौर कृषी पंप |
योजनेचे लाभार्थी:
- शेतात सिंचनासाठी विद्युत पंप वापरणारे शेतकरी
- महाराष्ट्र राज्यातील शेतात डिझेल पंप वापरणारे शेतकरी
- ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विजेची जोडणी झाली नाही आहे असे शेतकरी
- दुर्गम, अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकरी
- महाराष्ट्र शासनाच्या सिंचन योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकरी
- धडक सिंचन योजना अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी
- महावितरणाकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरीअर्जदार.
- ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे आहे तसेच ज्याच्या शेताच्या शेजारी नदी, विहिर, बोअरवेल आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
- यापुर्वी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या कुठल्याही योजनेअंतर्गत कृषीपंपाचा लाभ न मिळवलेले शेतकरी
- वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विदयुतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी
- शेतात विद्युत पंप तसेच डिझेल पंप बसवण्यासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेले शेतकरी
योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदान राशी:
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला शेतात सौर कृषी पंप बसविण्यासाठी कृषी पंपाच्या किमतीच्या 95 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाते.
योजनेअंतर्गत लाभार्थ्याने भरावयाची रक्कम:
सौर पंप योजना महाराष्ट्र 2024 अंतर्गत सामान्य वर्गातील लाभार्थ्यांना सौर कृषी पंपाच्या किंमतीच्या 10 टक्के टक्कम भरावी लागेल व अनुसूचित जाती/जमातीच्या लाभार्थ्यांना सौर कृषी पंपाच्या किमतीच्या 5 टक्के रक्कम भरावी लागेल.
शासनाचे अनुदान | 95 टक्के |
सामान्य वर्गातील लाभार्थ्यांना भरावी लागणारी रक्कम | 10 टक्के |
अनुसूचित जाती/जमाती वर्गातील लाभार्थ्यांना भरावी लागणारी रक्कम | 5 टक्के |
योजनेअंतर्गत वर्गवारी निहाय लाभार्थी हिस्सा:
वर्गवारी | लाभार्थी हिस्सा | 3 HP लाभार्थी हिस्सा | 5 HP लाभार्थी हिस्सा | 7.5 HP लाभार्थी हिस्सा |
सर्वसाधारण | 10% | 16,560/- रुपये | 24,710/- रुपये | 33,455/- रुपये |
अनुसूचित जाती | 5% | 8,280/- रुपये | 12,355/- रुपये | 16,728/- रुपये |
अनुसूचित जमाती | 5% | 8,282/- रुपये | 12,355/- रुपये | 16,728/- रुपये |
भौतिक उद्दिष्टांचे वाटप व आर्थिक भार खालीलप्रमाणे आहे:
पंपाचा प्रकार | सर्वसाधारण गटाचे लाभार्थी | अनुसूचित जातीचे लाभार्थी | अनुसूचित जमातीचे लाभार्थी | एकूण नग | पंपाची आधारभूत किंमत (रुपये) | आर्थिक भार (रुपये कोटीत) |
3HPDC | 4928 | 738 | 584 | 6250 | 255000 | 159,375 |
5HPAC | 2957 | 443 | 350 | 3750 | 325000 | 121,875 |
5HPDC | 11826 | 1772 | 1402 | 15000 | 385000 | 577,500 |
एकूण | 19711 | 2953 | 2336 | 25000 | — | 858,75 |
योजनेचा फायदा:
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसविण्यासाठी राज्य शासनाकडून 95% अनुदान उपलब्ध करून दिले जाते
- या योजनेच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्यांना विद्युत पंपाच्या बिलापासून तसेच डिझेल पंपासाठी मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या डिझेलपासून मुक्तता मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
- राज्यातील शेतकऱ्यांना टप्या टप्याने 1 लाख सौर कृषी पंपाचे अनुदान तत्वावर वाटप करण्यात येईल तसेच वाढत्या मागणीचा विचार करून सौर कृषी पंपाच्या संख्येत वाढ करण्यात येईल.
- राज्यातील शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होईल तसेच इतर नागरिक शेती करण्यासाठी आकर्षित होइल.
- मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या सहाय्याने प्रत्येक शेतात सौर कृषी पंपाच्या वापरामुळे शासनावरील विजेचा अतिरिक्त भार कमी होईल व विजेची बचत होईल.तसेच डिझेल ची सुद्धा बचत होईल व डिझेल पंपामुळे होणारे वायुप्रदूषण टाळता येईल.
- ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे अशा शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याचा उपसा करण्यासाठी 3 HP सौर कृषी पंप उपलब्ध करून दिला जातो तसेच मोठी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 5 HP सौर कृषी पंप उपलब्ध करून दिला जातो.
- शेतातील जुने डिझेल पंप बदलून त्या जागी नवीन सौर कृषी पंप बसवण्यात येणार आहेत त्यामुळे राज्यातील वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
- लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सौर कृषी पंपासोबत दोन एलईडी डीसी बल्ब, एक डीसी पंखा व एक मोबाईल चार्जिंग सॉकेट समाविष्ट करण्यात आलेले आहे.
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत मिळणाऱ्या सौर पंपाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना दिवसा शेती सिंचन करणे शक्य होईल.
- सौर कृषी पंप योजनेच्या सहाय्याने औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रॉस सब्सिडी चा बोजा कमी होईल.
- या योजनेच्या सहाय्याने शेतकऱ्यांची वीज लोडशेडिंग पासून सुटका होईल व दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा शक्य होईल.
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त शेतकऱ्यांनाच सौर कृषी पंपाचा लाभ दिला जाईल.
- राज्यातील ज्या शेजाऱ्यांच्या शेतात आधीच वीज जोडणी केली गेली आहे व ते विद्युत कृषी पंपाचा वापर करत आहेत त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाईल.
- एका शेतकऱ्याला फक्त एकदाच आणि एकाच सौर कृषी पंपाचा लाभ दिला जाईल.
- शेतात सौर कृषी पंप बसविल्यानंतर त्या पंपाची दैनंदिन सुरक्षितता करण्याची जबाबदारी संबंधित लाभार्थीची राहील.शासनाकडून कुठल्याच प्रकारचा देखभाल खर्च दिला जाणार नाही.
- योजनेची अंमलबजावणी करताना अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात विहिर, बोअरवेल, नदी, कालवा, शेततळे इत्यादी शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे याची महावितरणाद्वारे खात्री केली जाईल त्यानंतरच लाभार्थ्यांची निवड केली जाईल.
- जर अर्जदार शेतकऱ्याने केंद्र सरकार किंवा राज्य शासनाद्वारे सुरु केलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत सौर कृषी पंपाचा लाभ मिळवला असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार शेतकरी ज्या शेतात सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवण्यास अर्ज करत असेल आणि त्या जमिनीत सह हिस्सेदार असतील तर अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्यांना सह हिस्सेदाराचे सहमती पत्र/ना हरकत प्रमाण पत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना महाराष्ट्र अंतर्गत सौर कृषी पंपासाठी शासनाकडून 95% अनुदान राशी दिली जाते व उर्वरित रक्कम हि सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून 10 टक्के व अनुसूचित जातीच्या / अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून 5 टक्के घेतली जाते.
- जर अर्जदार शेतकऱ्याच्या शेतात कुठल्याच प्रकारचा पाण्याचा स्रोत उपलब्ध नसेल तर अशा शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषीत आणि अंशतः शोषीत क्षेत्रामधील (गावांमधील) विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही.
- अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षीत पाणालोट क्षेत्रांची उपशाची स्थिती (stage of extraction) 60 टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र असतील
- खडकाचे क्षेत्रात खोदल्या जाणाऱ्या विंधन विहीरी हे शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे विंधन विहीरींमध्ये (Bore Well), नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय आसणार नाही. मात्र गाळाचे क्षेत्रामध्ये खोदल्या जाणाऱ्या कूप नलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षीत क्षेत्रामधील कूपनलीकांमध्ये (Tube Well) नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार आहे.
- कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये 60 मी. पेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र नाही.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक खात्याचा तपशील
- जमिनीचा 7/12 उतारा व 8अ
- जमिनीत सह हिस्सेदार असल्यास हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाण पत्र
- शपथ पत्र
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर अर्ज करा मध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार (3/5/7 अश्वशक्ती) सौर पंपाची निवड करायची आहे.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत व सम्पुर्ण माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करायचं आहे.
- अशा प्रकारे तुमची मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
अर्जाची स्थिती बघण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर अर्जाची स्थिती मध्ये अर्जाची सद्यस्थिती वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक टाकून शोधा बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या स्क्रीन वर तुमच्या अर्जाची सर्व स्थिती दिसेल.
- अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता.
देयकाची रक्कम भरणा करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होमी पेज वर अर्जाची स्थिती मध्ये देयकाची रक्कम भरणा करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक टाकून शोधा बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला भरणा करायचा आहे.
- अशा प्रकारे तुम्हाला मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत देयकाची रक्कम भरणा करता येईल.
पुरवठादाराची यादी बघण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होमी पेज वर अर्जाची स्थिती मध्ये पुरवठादार यादी मध्ये सूचिबद्ध केलेल्या पुरवठादाराची यादी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या क्षेत्राची माहिती निवडायची आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यावर शोधा बटनावर क्लिक करायचं आहे.
- आता तुमच्या स्क्रीन वर तुमच्या क्षेत्रातील पुरवठादारांची यादी दिसेल.
Telegram Group | Click Here |
Saur Krushi Pump Yojana Official Portal | Click Here |
Saur Krushi Pump Yojana Address | हॉंगकॉंग बँक बिल्डींग, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई – 400 001 |
Saur Krushi Pump Yojana Contact Number | 1800-212-3435 1800-233-3435 |
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अर्ज 2024 | Click Here |