योजनेअंतर्गत राज्यातील प्रति शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते. यामध्ये केंद्र सरकारचा 50 टक्के वाट असतो आणि राज्य सरकार चा 50 टक्के वाट असतो. म्हणजेच केंद्र सरकार चे 6,000/- आणि राज्य शासनाचे 6,000/- असतात.
राज्यातील बहुतांश शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब आहे त्यामुळे शेतीसाठी लागणारी औजारे, कीटक नाशके, बियाणे यांच्या खरेदीसाठी त्यांच्याजवळ पुरेशे पैसे उपलब्ध नसतात त्यामुळे शेतकरी शेती करण्यासाठी स्वतःचे घर, दागिने किंवा शेतजमीन गहाण ठेवून व्याजाने पैसे घेतात. परंतु अवकाळी पाऊस,वादळ,गारपीट,दुष्काळ यांमुळे हाथा तोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान नुकसान झाल्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो व शेतकऱ्यांचे संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून असते त्यामुळे कर्जाची रक्कम वेळेवर न फेडू शकल्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात.त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ची सुरुवात करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.
राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य देऊन त्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे व राज्यातील इतर नागरिकांना शेती करण्यासाठी आकर्षित करणे हा प्रमुख उद्देश्य आहे.
या योजनेचा लाभ राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना होणार आहे ज्याच्यासाठी राज्य सरकार कडून 6 हजार 900 कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले गेले आहे.
योजनेचे नाव | नमो शेतकरी योजना महाराष्ट्र |
उद्देश | शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे. |
लाभार्थी | राज्यातील शेतकरी |
लाभ | शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
योजनेचे उद्दिष्ट
- शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे.
- शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे तसेच राज्यातील इतर शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
- राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- या योजनेचा लाभ राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकऱ्यांना होणार आहे ज्याच्यासाठी राज्य सरकार कडून 6 हजार 900 कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले गेले आहे.
- या योजनेअंतर्गत शेती पीक विम्याची रक्कम राज्य शासनाद्वारे अदा करण्यात येईल.
- नमो शेतकरी महा सम्मान निधि योजना हि केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या एकत्रितकरणाने सुरु करण्यात आलेली एक योजना आहे.
- या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक सहाय्याची राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व जाती-धर्मातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी योग्य भाव दिला जाईल.
योजनेचे लाभार्थी:
- महाराष्ट्र राज्यातील शेतकरी लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना होणारा फायदा:
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळेल.
- राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या जातील.
- शेतकरी शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती व्यवसाय करण्यासाठी आकर्षित होतील.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेचे नियम व अटी:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
- नमो शेतकरी सन्माननिधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच दिला जाईल.
- शासकीय सेवेत काम करत असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- उत्पन्नाचा दाखला
- बँक खात्याचा तपशील
- जमिनीचे कागदपत्रे 7/12 व 8अ
- पासपोर्ट आकाराचे फोटो
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जावे लागेल.
- कृषी विभागातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जमा करावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
पहिला टप्पा
- अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला अर्जदाराची विचारलेली सर्व माहिती (अर्जदाराचे संपूर्ण नाव, वय) भरावी लागेल.
- सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
दुसरा टप्पा
- होम पेज वर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेवर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (अर्जदाराचे संपूर्ण नाव,पत्ता,आधार कार्ड नंबर,बँक खात्याचा तपशील,इत्यादी) भरावी लागेल. सर्व माहिती भरून झाल्यावर योग्य ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
लाभार्थी यादी बघण्याची पद्धत:
- अर्जदार शेतकऱ्याला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर नमो शेतकरी सन्मान निधी योजना लाभार्थी यादी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर नमो शेतकरी सन्मान निधी योजना लाभार्थी यादी उघडेल.
Telegram Group | Join |