पंचायत समिती योजना 2024

पंचायत समिती योजना: अंतर्गत विविध विभागांद्वारे राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. ज्यामध्ये पशुसंवर्धन विभाग,  महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग, समाजकल्याण विभाग इत्यादींचा समावेश आहे.

राज्य शासन राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठीच राज्य शासन वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात देखील करत असते. परंतु खूप साऱ्या नागरिकांना राज्य शासनाद्वारे त्यांच्या तालुका व जिल्ह्यासाठी सुरु करण्यात येणाऱ्या योजनांची माहिती मिळत नाही व ते या योजनांचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे राज्यातील नागरिकांना त्यांच्या तालुका व जिल्हास्तरावर विविध विभागांच्या माध्यमातून सुरु करण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती मिळावी यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे.

Table of Contents

आज आपण या लेखाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागाद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील नागरिकांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करून देणे.

वाचकांना विनंती

आम्ही पंचायत समिती योजनांची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व पंचायत समितीद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरातील नागरिकांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनांचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावपंचायत समिती योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
लाभार्थीराज्यातील नागरिक
लाभविविध योजनांचा लाभ
उद्देश्यनागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

पंचायत समिती योजना 2024 उद्देश

  • राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे व त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • राज्यातील नागरिकांना शासनाद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे.
  • शेती क्षेत्राला प्रोत्साहन देणे तसेच इतर नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
  • महिला सशक्तीकरणाला चालना देणे.
  • विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे.
पंचायत समिती योजना

पंचायत समिती योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये

  • पंचायत समिती योजनेअंतर्गत राज्यातील विविध विभागाद्वारे सुरु करण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ दिला जातो.
  • योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे.
  • योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदान राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
  • शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होईल.
  • एकाच पोर्टल वर विविध योजनांची माहिती मिळाल्यामुळे नागरिकांना शासनाच्या वेगवेगळी पोर्टल वर जाण्याची गरज भासणार नाही.
  • आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना राज्य सरकार देत आहे 3 लाखांची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना
  • महाराष्ट्र शासन मुलींच्या शिक्षणासाठी देत आहे 98 हजारांचे आर्थिक सहाय्य्य त्यासाठी वाचा लेक लाडकी योजना

पंचायत समिती योजना अंतर्गत विविध विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना

पंचायत समिती  पशुसंवर्धन विभाग योजना

  • पशुपालकास बैलजोडी खरेदी करण्यासाठी एकूण रकमेच्या 75 टक्के अनुदान देणे.
  • जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत किमान 10 रबर मॅट खरेदीसाठी 15000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देणे.
  • मैत्रीण योजनेअंतर्गत महिलांना 1 म्हैस किंवा गाय खरेदी करण्यासाठी एकूण रकमेच्या 50 टक्के अनुदान देणे.
  • शेतकरी तसेच पशुपालकांना मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत 15000/- रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देणे.
  • मिल्किंग मशीन खरेदीसाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत 15000/- रुपयांचे अनुदान देणे.
  • 15 मेट्रिक टन क्षमतेचे मुरघास युनिट तयार करण्यासाठी जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेअंतर्गत 15000/- रुपयांचे अनुदान देणे.

पंचायत समिती महिला बालकल्याण विभाग योजना

  • ग्रामीण भागातील 18 वर्षे पूर्ण महिलांना चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण तसेच परवाना मिळण्यासाठी 3000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.
  • दिव्यांग व्यक्तीसाठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान
  • MS-CIT प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या मुलींच्या खात्यावर 3500/- रुपये रक्कम जमा केली जाते.
  • ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी 12500/- रुपयांचे असून देण्यात येते किंवा घरगुती पीठ गिरणी खरेदीसाठी एकूण रकमेच्या 90 टक्के अनुदान देण्यात येते.
  • ग्रामीण भागातील महिलांना व्यावसायिक तसेच जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी 12500/- रुपयांचे असून देण्यात येते किंवा शिलाई मशीन खरेदीसाठी एकूण रकमेच्या 90 टक्के अनुदान देण्यात येते.
  • ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता 5वी च्या विद्यार्थ्यांना सायकल खरेदीसाठी 4500/- रुपये अनुदान दिले जाते.

पंचायत समिती कृषी विभाग योजना

  • शेतकऱ्यांना 20 किलो क्षमतेचे प्लास्टिक क्रेट खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य.
  • शेतकऱ्यांना प्लास्टिक ताडपत्री खरेदीसाठी आर्थिक सहाय्य.
  • शेतकऱ्यांना शेतात २.5 इंची पीव्हीसी पाईप खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य.
  • शेतकऱ्यांना ३.0 इंची पीव्हीसी पाईप खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य.
  • शेतकऱ्यांना ट्रॅक्टर चलित दोनफाळी सरी रीजर खरेदी करण्याकरिता आर्थिक अनुदान.
  • शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप खरेदी करण्याकरिता आर्थिक अनुदान.
  • शेतकऱ्यांना हॉरिझॉन्टल ट्रिपल पिस्टन स्प्रेपंप खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य.
  • 3 एच.पी. ओपनवेल विद्युत मोटार पंपसंच खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य.
  • 5 एच. पी. ओपनवेल विद्युत मोटार पंपसंच खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य.
  • इलेक्ट्रिक कडबाकुट्टी यंत्र मोटारसह खरेदी करण्याकरिता आर्थिक सहाय्य.
  • गिर, थारपारकर किंवा साहिवाल जातीच्या गाईच्या किमतीच्या75% किंवा 45000/- यांपैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान स्वरूपात देण्यात येईल.
  • सेंद्रिय शेतीस तसेच नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी 10 *3 * 2 फूटाच्या गांडूळ खत निर्मिती संयंत्रासाठी आर्थिक सहाय्य.
  • नैसर्गिक सेंद्रिय शेतीस तसेच नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी जैविक खते आणि जैविक कीडनाशकांसाठी अर्थसहाय्य.
  • नैसर्गिक सेंद्रिय शेतीस तसेच नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी बायोडायनामिक खत युनिटसाठी प्रोत्साहनपर अनुदान.
  • नैसर्गिक सेंद्रिय शेतीस तसेच नैसर्गिक शेतीबाबत प्रोत्साहन मिळावे यासाठी सेंद्रिय शेतीमाल उत्पादन प्रमाणीकरण करण्यासाठी अनुदान.
  • हिरवळीच्या खतांसाठी अनुदान देईल.
  • 200 लिटर क्षमतेच्या सोलर वॉटर हिटर खरेदीसाठी 50% अनुदान दिले जाते.

पंचायत समिती योजनेचे लाभार्थी

  • राज्यातील नागरिक पंचायत समिती योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.

पंचायत समिती योजनेचे फायदे

  • योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाईल.
  • राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
  • राज्यातील नागरिकांची जीवनशैली सुधारेल.
  • नागरिकांचा या योजनेच्या सहाय्याने सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
  • राज्यातील नागरिक सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
  • शेती क्षेत्रातील आधुनिक यंत्र सामग्रीच्या खरेदीसाठी राज्य सरकार देत आहे 80 टक्के अनुदान त्यासाठी वाचा कृषी यांत्रिकीकरण योजना

पंचायत समिती योजना अंतर्गत आवश्यक पात्रता

  • अर्जदार नागरिक महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे

पंचायत समिती योजना अटी व शर्ती

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना पंचायत समितीच्या माध्यमातून सुरु करण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनांचा लाभ दिला जाणार नाही.
  • योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे व 60 वर्षापेक्षा कमी असावे याबाबतचे सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला घेणे आवश्यक.
  • अर्जदाराने जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील 3 वर्षात कुठल्याच योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदाराचे आधार कार्ड हे बॅक अकाऊंट सोबत सलग्न असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 50,000/- रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे तसा तहसिलदार दाखला/ दारिद्रय रेषेचे कार्ड.
  • 5 एच.पी. विद्युत मोटार पंपाकरीता जलसिंचनाची सुविधा असल्याबाबतचे प्रमाणपत्र.

पंचायत समिती योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • बँक खात्याचा तपशील
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • जमिनीचा 7/12 दाखला व 8अ
  • वयाचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • अपंग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • हमीपत्र

पंचायत समिती योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत

  • अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्ज घ्यावा लागेल किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज डाउनलोड करावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
  • भरलेला अर्ज कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल.
  • अशा प्रकारे तुमची पंचायत समिती योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

पंचायत समिती योजना अंतर्गत अर्जाची स्थितीत बघण्याची पद्धत

  • अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर Generate Report वर क्लिक करावे लागेल.
Panchayat Samiti Yojana Home Page

  • आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला आपल्या महाराष्ट्र राज्यावर क्लिक करायचे आहे.
Panchayat Samiti Yojana State List

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला वर्ष, जिल्हा, तालुका आणि तुमच्या गावाची निवड करायची आहे व Proceed बटनावर क्लिक करायचे आहे.
Panchayat Samiti Yojana Choose Village

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला List Of Work वर क्लिक करावे लागेल.
Panchayat Samiti Yojana List Of Work

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला कामाचा वर्ग (All), तालुका (All), आणि वर्ष यांची निवड करायची आहे.
  • आता तुमच्या कॉम्पुटर स्क्रीन वर पंचायत समिती योजनेची लाभार्थी यादी दिसेल.
Panchayat Samiti Yojana Beneficiary List

Telegram GroupClick Here
पंचायत समिती योजना अंतर्गत अर्जाची स्थिती बघण्यासाठीClick Here
पंचायत समिती योजना अर्जClick Here

पंचायत समिती योजनेचा उद्देश काय आहे?

राज्यातील नागरीकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे.

पंचायत समिती योजनेअंतर्गत कोणते लाभ दिले जातात?

पंचायत समिती योजनेअंतर्गत कृषी विभाग, महिला विकास विभाग, सामाजिक कल्याण विभाग इत्यादी विभागांचे लाभ दिले जातात.

पंचायत समिती योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

राज्यातील नागरिक

पंचायत समिती योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे?

अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील पंचायत समिती मध्ये जाऊन ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

सारांश

आम्ही आशा करतो कि तुम्हाला पंचायत समिती योजनेची संपूर्ण माहिती मिळाली आहे तरी सुद्धा तुमचे पंचायत समिती योजनेसंबंधी काही प्रश्न असल्यास आम्हाला कंमेंट्स किंवा ई-मेल द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर 24 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि आमचे हे आर्टिकल फेसबुक तसेच इतर सोशल मीडिया वर शेयर करा जेणेकरून सर्वांपर्यंत हि माहिती पोहचेल.

Leave a Comment