Pandit Dindayal Yojana: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेली महत्वपूर्ण अशी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण तसेच निवास भत्ता उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांना 60 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
काही वेळा विद्यार्थ्यांच्या राहत्या ठिकाणी शिक्षणाची योग्य सोय उपलब्ध नसल्यामुळे त्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या राहत्या घरापासून तसेच स्वतःच्या शहरापासून दूर दुसऱ्या शहरात जावे लागते.
राज्यातील बहुतांश युवक हे दारिद्र्य रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे ते आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतात व त्यामुळे त्यांना दुसऱ्या शहरात राहण्याचा तसेच भोजनासाठी लागणारा खर्च परवडण्यासारखा नसतो व परिणामी बहुतांश युवक हे पैशाअभावी त्यांचे उच्च शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतात.
त्यामुळे राज्यातील विध्यार्थ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने राज्यात Pandit Dindayal Upadhyay Swayam Yojana सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण असा निर्णय घेतला.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी भोजन भत्ता, निवास भत्ता तसेच निर्वाह भत्ता यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आहे.
योजनेचे नाव | पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना |
लाभार्थी | राज्यातील विद्यार्थी |
लाभ | 60,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य |
उद्देश्य | शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन |
थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) अनुषंगाने शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतलेल्या/घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावयाची खबरदारी.
- वसतिगृह योजना शैक्षणिक वर्ष २०२४-२५, अभ्यासक्रमस्तर नुसार अर्ज स्वीकारणे आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे बाबत वेळापत्रक. https://drive.google.com/file/d/1PP4dJDq1U8s5g8jIpetwTKsFFczzK3oy/view?usp=sharing
- शैक्षणिक वर्ष २०२४-२५, वस्तीगृह योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सर्व अभ्यासक्रम स्तरासाठी स्वीकारले जात आहेत. वस्तीगृह योजनेसाठी निवड झाली नाही तर पात्र विद्यार्थी अर्ज अर्जातील दिलेल्या मंजुरी प्रमाणे स्वयंम योजनेसाठी वर्ग केले जातील. पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी नुतनीकरण ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत.
- वसतिगृह, पंडित दीनदयाल स्वयंम योजना संबंधित चौकशी साठी टोल फ्री क्रमांक नंबर 1800 267 0007.
- विद्यार्थ्यांसाठी तक्रारी प्रकल्प कार्यालय येथे नोंदविण्यासाठी ई-मेल आणि संपर्क नंबर , मार्गदर्शक सुचना तसेच अधिक माहितीसाठी लिंक वापरा. (Gmail Login अनिवार्य आहे.) https://drive.google.com/drive/folders/1XP3C0hm_JIE69IHTy6NEnbzE7SQVahbh?usp=sharing
- खासबाब प्रवेशाबाबतच्या लोकप्रतिनिधी शिफारशी दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंतच आयुक्तालयास प्रकल्प कार्यालय मार्फत सादर कराव्यात .
- Upload clear scan copy of original documents. विद्यार्थ्यांनी कागतपत्रांची स्वच्छ प्रत संकेत स्थळा मार्फत सादर(Upload ) करावी.
- विद्यार्थ्यांनी अर्जामध्ये स्वत:चाच मोबाईल क्रमांक नोंद (entry) करावा.
- मोबाईल क्रमांकाची नोंद करताना सदर मोबाईल क्रमांक आधार क्रमांकासोबत registered असावा. आधार संलग्न मोबाईल क्रमांकाचा वापर केल्यामुळे विद्यार्थी पडताळणी करणे सोपे होईल.
- सायकल ४ आणि ५ साठी शिफारस करण्यासाठी शैक्षणिक वर्षाचे परीक्षा वेळापत्रक महाविद्यालय मार्फत वेळेत प्रकल्प कार्यालयात सादर करावेत.
- वसतीगृह प्रवेशासाठी/स्वयम् योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी आधार क्रमांकाची नोंद (entry) करताना त्यांचा आधार क्रमांक suspend झाला नसल्याची खात्री करून घेणे तसेच आधार क्रमांक suspend झाला असल्यास तो कार्यरत करून मगच त्याची नोंद करणे अनिवार्य आहे.
- विद्यार्थ्यांनी त्यांचा बँक खाते क्रमांक नोंद (entry) करण्यापूर्वी सदर बँक खाते कार्यरत असल्याची खात्री करावी. बँक खाते कार्यरत नसल्यास योजनेंतर्गत लाभ देताना अडचणी येतात. तसेच सदर बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केलेले असावे. बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसल्यास संबंधित बँक शाखेत जाऊन ते आधार संलग्न करून घ्यावे.
- ऑनलाईन अर्ज करताना अभ्यासक्रम/शिक्षण संस्था उपलब्ध नसल्यास/दिसत नसल्यास याबाबत अशा प्रकरणी संबंधित प्रकल्प कार्यालयात भेट देऊन ही बाब संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावी. प्रवेश प्रक्रीये संदर्भात अर्ज स्थिती संकेत स्थळावर वेळो वेळी भेट देऊन जाणून घेणे हि विद्यार्थ्यांची जबाबदारी असेल, या बाबत आपणास स्वतंत्रपणे कळवले जाणार नाही.
- अर्ज करताना अर्जात चुकीची माहिती सादर केल्यास, जर अर्ज रद्द झाला किंवा लाभ मिळण्यास विलंब अथवा लाभ रद्द झाल्यास त्यास सर्वस्वी अर्जदार जबाबदार राहील.
योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये उत्तीर्ण होऊन विविध पदवी ,पदव्युत्तर पदवी घेण्याकरिता ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तिगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सोय आणि निर्वाह भत्ता उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / अल्पसंख्याक व मागासवर्गियांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- शैक्षणिक तसेच निवासी खर्चाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बैंक खात्यात जमा केली जाणारी आदिवासी विभागातील ही पहिली योजना आहे.
- लाभाची राशी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
- योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्याला त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभ दिला जाईल.
- आदिवासी जमातीच्या किंवा अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रथम प्राधान्य दिले जाईल.
विद्यार्थ्यांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य:
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत खालील 3 प्रकारे वर्गीकरण केलेल्या शहरांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या तथापि शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेण्याकरिता वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यात येते.
खर्चाची बाब | मुंबई शहर,मुंबई उपनगर, नवी मुंबई,ठाणे,पुणे, पिंपरी-चिंचवड,नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम | इतर महसूल विभागीय मुख्यालय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम | इतर जिल्ह्यांचे ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम |
भोजन भत्ता | 32,000/- रुपये | 28,000/- रुपये | 25,000/- रुपये |
निवास भत्ता | 20,000/- रुपये | 15,000/- रुपये | 12,000/- रुपये |
निर्वाह भत्ता | 8,000/- रुपये | 8,000/- रुपये | 6,000/- रुपये |
प्रति विद्यार्थीं एकूण संभाव्य वार्षिक खर्च | 60,000/- रुपये | 51,000/- रुपये | 43,000/- रुपये |
वरील रक्कम व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपये व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 2000/- रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी रोख स्वरूपात देण्यात येईल.
महत्वाच्या तारखा:
- पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरुवात तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख अधिकृत पोर्टल च्या होम पेज वर दिली जाते.
योजनेचे लाभार्थी:
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच अल्पसंख्यांक व मागास वर्गातील विद्यार्थी
योजनेचा फायदा:
- योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी भोजन भत्ता, निवास भत्ता तसेच निर्वाह भत्ता उपलब्ध करून दिला जातो आणि त्यासाठी सरकार विद्यार्थ्यांना 60 हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते.
- विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहणार नाही. विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करू शकतील.
योजनेअंतर्गत समाविष्ट शैक्षणिक अभ्यासक्रम:
- वैद्यकीय महाविद्यालये
- उच्च महाविद्यालये
- आय.टी.आय.
- तंत्रनिकेतन
- अभियांत्रिकी महाविद्यालये
- अप्लमुदतीचे कौशल्यवरील आधारित अभ्यासक्रम
योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:
- अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थी हा अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / ओबीएस जमाती आणि आदिवासी जमातीचा असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही फक्त अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल.
- विद्यार्थ्यांना अर्जासोबत जात पडताळणी पत्र सादर करणे आवश्यक असेल.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
- या योजनेअंतर्गत लाभ मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित शहरामध्ये राहणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याने एखाद्या कारणामुळे मध्येच शिक्षण सोडल्यास दिली गेलेली लाभाची राशी वसूल केली जाईल.
- विद्यार्थी त्याच्या शहरात शिक्षण घेत असता कामा नये.
- एका विद्यार्थ्यास फक्त 7 वर्षे या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. व 7 वर्षानंतर त्या विद्यार्थ्याला वसतिगृहात प्रवेश दिला जाणार नाही.
- विद्यार्थी स्वतःच्या शहरापासून दूर शिक्षण घेत असावा.
- अर्ज करताना अर्जात चुकीची माहिती सादर केल्यास, जर अर्ज रद्द झाला किंवा लाभ मिळण्यास विलंब अथवा लाभ रद्द झाल्यास त्यास सर्वस्वी अर्जदार जबाबदार राहील.
- विद्यार्थ्यांने इयत्ता 12वी नंतर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असावा.
- पोस्ट मॅट्रिक शिक्षणासाठीच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- केंद्र सरकारच्या पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती करता निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच सदर योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल,
- 2 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
- योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची निवड करताना त्यांच्या गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.
- एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. तसेच प्रथम पदवी पूर्ण न करता दुसऱ्या पदवीसाठी प्रवेश मिळाल्यास सुद्धा लाभ घेता येणार नाही.
- विद्यार्थ्याची संस्था किंवा महाविद्यालयात 80 टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती असणे बंधनकारक आहे.
- एखादा विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासक्रमा दरम्यान अनुत्तीर्ण झाला, तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थ्या मागील वर्षात 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याने सरकारच्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी नोकरी किंवा व्यवसाय करत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- विद्यार्थी ज्या शहरात राहतो त्याच शहरातील शिक्षण संस्थेत जर विद्यार्थ्याने प्रवेश घेतला असेल तर त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे वय 28 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्यामुळे 28 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना शासनाच्या अधिकृत पोर्टल वर अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्जदार विद्यार्थी इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- योजनेअंतर्गत तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार नाही.
योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- जात प्रमाणपत्र
- जन्माचा दाखला
- कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- मोबाईल क्रमांक
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो
- विद्यार्थी अपंग असल्यास अपंगाचे प्रमाणपत्र
- बँक खात्याची माहिती
- डोमिसाईल सर्टिफिकेट
- बोनाफाईड
- इयत्ता 10वी व इयत्ता 12वी उत्तीर्ण मार्कशीट
अर्ज करण्याची पद्धत:
पहिला टप्पा
- अर्जदाराला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर Registration वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन Registration पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती (आधार कार्ड, नाव, जन्म तारीख, मोबाईल नंबर इत्यादी) भरून Save बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची Registration प्रक्रिया पूर्ण होईल.
दुसरा टप्पा
- अर्जदाराला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर तुम्हाला तुमचा Login Id आणि Password टाकून लॉगिन बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील व Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
लॉगिन करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर तुम्हाला तुमचा Login Id आणि Password टाकून लॉगिन बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.
पासवर्ड विसरल्यास:
- अर्जदाराला सर्वात प्रथम या योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल.
- होम पेज वर तुम्हाला Forgot Password बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल यामध्ये तुम्हाला तुमचा Username किंवा मोबाईल नंबर टाकावा लागेल व Generate OTP बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल तो भरून Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला तुमचा password बदलायचा पर्यंत दिसेल.
- तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड टाकावा लागेल.
Telegram Group | Join |
Pandit Dindayal Swayam Yojana Apply Online | Click Here |
Pandit Dindayal Swayam Yojana Helpline Number | 0253-2992946 |
Pandit Dindayal Swayam Yojana Email ID | tddswayamhostelhelp[at]gmail[dot]com |
pandit dindayal yojana online form maharashtra | Click Here |
पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अन्य उप–योजना:
- पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना:
- ग्रामीण भागातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देणे.
- रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणे.
- पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय आवास योजना:
- गरीब कुटुंबांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत पुरवणे.
- पक्के आणि सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे.
- पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना:
- ग्रामीण भागात वीजपुरवठा सुधारणे.
- प्रत्येक घरात वीज कनेक्शन उपलब्ध करून देणे.
- पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय शहरी आजीविका योजना: शहरी भागातील गरीब कुटुंबांना रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी मदत करते.
- पंडित दीनदयाळ उपाध्याय आयुष्मान भारत योजना: गरीब कुटुंबांना मोफत आरोग्य विमा प्रदान करते.
महत्त्वाचे मुद्दे:
- पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना ही भारतातील गरीब आणि वंचित समुदायांसाठी महत्त्वपूर्ण अशी एक योजना आहे.
- या योजनेमध्ये अनेक उप-योजनांचा समावेश आहे ज्या विविध प्रकारची मदत प्रदान करतात.
- प्रत्येक उप-योजनेनुसार पात्रता आणि अर्ज प्रक्रिया बदलते.
- अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित अधिकारी किंवा योजनेच्या अधिकृत वेबसाइटशी संपर्क साधा.