महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी स्थानिक बँकांद्वारे 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
राज्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब आहे त्यामुळे त्यांना शेतीसाठी स्वतःचे घर तसेच दागिना व एखादी किमती वस्तू जास्त व्याज दराने गहाण घेऊन कर्ज घेतो व शेती करतो. शेती मधून येणारे उत्पन्न फारसे नसते त्यामुळे त्याने घेतलेल्या कर्जाच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी त्याला खूप साऱ्या समस्यांचा सामान करावा लागतो राज्यातील शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी Pik Karj 2024 सुरु करण्याचा महत्वपूर्ण असा निर्णय घेतला.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर उपलब्ध करून देणे आहे जेणेकरून त्यांना व्याजाच्या बोजाखाली स्वतःचे जीवन व्यथित करण्याची गरज भासू नये.
योजनेचे नाव | Pik Karj Yojana Maharashtra 2024 |
योजनेचे लाभार्थी | राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी |
लाभ | 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज |
योजनेचा उद्देश्य | शेतीसाठी प्रोत्साहित करणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
पीक कर्ज योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे.
- राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
- शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा व्याजाचा बोजा कमी करणे.
योजनेचे वैशिष्ट्य:
- या योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या क्षेत्रातील उपलब्ध बँकेद्वारे बिनव्याज कर्ज उपलब्ध करून दिले जाते आहे व त्यावर शासनाची देखरेख असेल.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी कर्जाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जाणारे कर्ज:
- पीक कर्ज योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखाचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
योजनेअंतर्गत पीक कर्ज व्याजदर:
- पीक कर्ज योजना अंतर्गत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर उपलब्ध करून दिले जाते व व्याजाची रक्कम महाराष्ट्र शेणाच्या कृषी विभागाद्वारे भरण्यात येते.
कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी:
- पीक कर्ज योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची परतफेड करण्याचा कालावधी हा पिकांच्या उत्पादनावर निर्धारित केला गेला आहे.
योजनेचे लाभार्थी:
- महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी पीक कर्ज विमा योजना अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत. [पीक कर्ज माहिती]
योजनेचा फायदा:
- योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे त्यांच्या डोक्यावरचा व्याजाचा बोजा कमी होईल त्यामुळे बळीराजा सुखावेल.
- राज्यातील शेतकरी शेतीसाठी प्रोत्साहित होतील.
- राज्यातील इतर नागरिक शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील.
- योजनेअंतर्गत व्याजाची रक्कम राज्य शासनाद्वारे बँक / वित्त संस्थांना अदा केली जाते.
- पीक कर्ज योजनेच्या सहाय्याने शेतकरी शेतीसाठी आवश्यक बियाणे, खते, यंत्र, अवजारे खरेदी करू शकतील.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे अत्यंत आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच पीक कर्ज योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सामील केले जाणार नाही.
- अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे तसेच त्याच्याजवळ शेतीसाठी स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
- पीक कर्ज योजना अंतर्गत प्राप्त केलेले कर्ज शेतकऱ्याला शेती कार्यासाठीच वापराने बंधनकारक आहे त्यामुळे त्याला वैयक्तिक कार्यासाठी पैशांचा वापर करता येणार नाही.
- अर्जदार शेतकरी बँक / वित्त संस्थेचा थकबाकीदार असता कामा नये.
- एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला पीक कर्ज योजनेचा लाभ दिला जाईल.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- 7/ 2 दाखला व 8अ
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- शपथ पत्र किंवा स्वघोषणापत्र
- रेशन कार्ड
- ना हरकत प्रमाण पत्र (आवश्यक असल्यास)
- बँक खात्याचा तपशील
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
अर्जदार दोन प्रकारे पीक कर्ज योजना अंतर्गत अर्ज करू शकतो.
1. आपल्या क्षेत्रातील बँकेत जाऊन. 2. शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर अर्ज करून
बँकेत जाऊन अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील उपलब्ध बँकेत जाऊन पीक कर्ज योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज बँक कर्मचाऱ्यांजवळ जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची बँकेद्वारे पीक कर्ज योजना अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Maharashtra Pik Karj Online Application
- अर्जदाराला पीक कर्ज योजना या शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर पीक कर्ज योजना वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला नवीन कर्जासाठी येथे क्लिक करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल तसेच आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. सर्व माहिती भरून झाल्यावर जतन करा वर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेअंतर्गत कर्ज वितरण पद्धत:
- अर्जदाराने अर्ज केल्यावर त्याच्या अर्जाची व सोबत जोडलेल्या कागदपत्रांची बँक कर्मचाऱ्यांद्वारे तपासणी केली जाईल. जर शेतकरी कर्जासाठी पात्र ठरत असल्यास कर्जाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
- आणि जर शेतकरी अपात्र ठरल्यास त्याला SMS च्या माध्यमातून किंवा शासनाच्या अधिकृत पोर्टल द्वारे कळविण्यात येईल.
योजनेअंतर्गत अर्जाची स्थिती बघण्याची पद्धत:
- अर्जदाराला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर अर्जाची सध्यास्तीथी पाहण्यासाठी येथे क्लिक करा वर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या Username आणि Password टाकून लॉगिन करावे लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती स्क्रीन वर दिसेल.
Telegram Group | Join |
Pik Karj Yojana Online Application | Click Here |