भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना: महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निरंतर प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात देखील करत असते आज आपण राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला-मुलींनी उच्च शिक्षण घेणे, त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन उच्चविद्याविभुषित होणे, हा उद्देश ठेऊन अनुसूचीत जाती (नवबौध्दासह) विद्यार्थ्याकरीता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना सन १९५९-६० पासून राबविण्यात येत आहे.
योजनेचे नाव | पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
उद्देश | शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभ | या योजने अंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता उपलब्ध करून दिले जाते. |
लाभार्थी | अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
भारत सरकार पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेचे उद्दिष्ट
- राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे.
- शिक्षण गळती कमी करणे.
- विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे
योजनेचे वैशिष्ट्य:
- केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या एकत्रित करणाने सदर योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- पारदर्शकता, समन्वय तसेच शिष्यवृत्ती साठी लागणारा विलंब टाळण्यासाठी सदर योजना महत्वाची ठरणार आहे.
- या योजनेअंतर्गत केंद्र शासनाचा हिंसा 60 टक्के तर राज्य शासनाचा हिस्सा 40 टक्के आहे.
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
योजनेचे लाभार्थी:
- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध विद्यार्थी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
योजनेअंतर्गत दिले जाणार आर्थिक सहाय्य:
या योजनेअंतर्गत प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत नवबौध्द / अनुसूचित जातीतील पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे लाभ मिळतील.
डे स्कॉलर
गट 1 | देखभाल भत्ता | 550/- रुपये (दरमहा) |
गट 2 | देखभाल भत्ता | 530/- रुपये (दरमहा) |
गट 3 | देखभाल भत्ता | 300/- रुपये (दरमहा) |
गट 4 | देखभाल भत्ता | 230/- रुपये (दरमहा) |
होस्टेलर
गट 1 | देखभाल भत्ता | 1200/- रुपये (दरमहा) |
गट 2 | देखभाल भत्ता | 820/- रुपये (दरमहा) |
गट 3 | देखभाल भत्ता | 570/- रुपये (दरमहा) |
गट 4 | देखभाल भत्ता | 380/- रुपये (दरमहा) |
दिव्यांग (अपंगत्व प्रकार) असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त भत्ते पुढीलप्रमाणे
अपंगत्वाचे प्रकार | ||
गट 1 | अंधत्व / कमी दृष्टी | 150/- रुपये (दरमहा) |
गट 2 | अंधत्व / कमी दृष्टी | 150/- रुपये (दरमहा) |
गट 3 | अंधत्व / कमी दृष्टी | 125/- रुपये (दरमहा) |
गट 4 | अंधत्व / कमी दृष्टी | 100/- रुपये (दरमहा) |
अतिरिक्त भत्ते कुष्ठरोग निवारण झालेले सर्व गटांसाठी
वाहतूक भत्ता | 100/- रुपये पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
स्कॉर्ट भत्ता | 100/- रुपये |
वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता | 100/- रुपये |
अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी) प्रमाणे कर्णबधीर सर्व गटांसाठी.
वाहतूक भत्ता | 100/- रुपये पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
अतिरिक्त भत्ते लोकोमोटर अपंगत्व सर्व गटांसाठी
वाहतूक भत्ता | 100/- रुपये पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
अतिरिक्त भत्ते मानसिक दुर्बलता / मानसिक आजार सर्व गटांसाठी
वाहतूक भत्ता | 100/- रुपये पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
एस्कॉर्ट भत्ता | 100/- रुपये |
वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता | 100/- रुपये |
अतिरिक्त प्रशिक्षण भत्ता | 150/- रुपये |
अतिरिक्त भत्ते शासन निर्णयातील (बी, सी, डी, इ) प्रमाणे ऑर्थोपेडिक अपंगत्व सर्व गटांसाठी
वाहतूक भत्ता | 100/- रुपये पर्यंत (वसतिगृहाबाहेर राहणारे विद्यार्थी) |
एस्कॉर्ट भत्ता | 100/- रुपये |
वसतिगृहातील कर्मचा-यांना काळजी घेणारे म्हणून विशेष वेतन भत्ता | 100/- रुपये |
विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिल्या जाणाऱ्या देखभाल भत्ता व्यतिरिक्त सर्व अनिवार्य शुल्क / अनिवार्य देय शुल्क अर्थात वित्तपुरवठा (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क) इ. या योजनेखाली समाविष्ट केले आहे.
योजनेचा फायदा:
- या योजने अंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जातो.
- या योजनेअंतर्गत शिक्षण गळती कमी होण्यास मदत होईल.
- विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण होईल व ते पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी मिळेल.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार विद्यार्थ्यी महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा.
- विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जाईल.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 /- पेक्षा जास्त नसावे.
- अयशस्वी : विद्यार्थी प्रथम वर्षी नापास झाला तरी त्याला परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता अनुज्ञेय राहील, एकाच वर्गात दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला / तिला कोणताही भत्ता मिळणार नाही. आणि दोन प्रयत्नानंतर विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेल्यास लाभ अनुज्ञेय राहतील.
- महाराष्ट्राबाहेर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा भारतसरकारच्या नियमानुसार समान नियम अनुज्ञेय राहतील.
- फक्त २ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सदर योजनेचा लाभ दिला जाईल.
- अर्जदार विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असल्यास त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळवत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार द्वारे प्रदान)
- जात प्रमाणपत्र
- गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
- इयत्ता 10वी किंवा 12वी परीक्षेची गुणपत्रिका
- वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- शिक्षणातील खंड बाबतचे आणि स्व:घोषणापत्र (आवश्यक असल्यास)
- वसतिगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
- पतिचे उत्पन्न प्रमाणपत्र (अर्जदार जर स्त्री आहे आणि विवाहीत असल्यास)
योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
पहिला टप्पा:
- सर्वात प्रथम अर्जदार विद्यार्थ्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर गेल्यावर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरून झाल्यावर Register वर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
दुसरा टप्पा:
- अर्जदाराला आपला Username आणि Password टाकून लॉगिन करावे लागेल.
तिसरा टप्पा:
- अर्जदाराला होम पेज वर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती वर क्लिक करावे लागेल त्यानंतर Social Justice and Special Assistance Department वर क्लिक करून भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या शिष्यवृत्ती ची सर्व माहिती उघडेल ती वाचून खाली Apply For This Scheme वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या पोस्ट-मॅट्रीक शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे अपलोड करून Register बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची या शिष्यवृत्ती अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join |
Post Matric Scholarship For SC Students In Maharashtra Official Website | Click Here |
Post Matric Scholarship For SC Students In Maharashtra Helpline Number | 022-49150800 |