Post Matric Tuition Fee And Examination Fee (Freeship)

Post Matric Tuition Fee And Examination Fee (Freeship): राज्य शासन अनुसूचित जातीच्या तसेच नवबौद्ध विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप) उपलब्ध करून देत आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत. विद्यार्थ्यांमार्फत संस्थांना दिले जाणारे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क, जे अनिवार्य किंवा सक्तीचे देय आहे त्यांचा या योजनेत समाविष्ट आहे म्हणजे शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क राज्य शासन संस्थांना अदा करेल.

राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे परंतु कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यापासून वंचित राहतात त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे व शिक्षण पूर्ण करू स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवता यावी या उद्देशाने शासनाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

योजनेचे नावPost Matric Tuition Fee And Examination Fee (Freeship)
उद्देशविद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
लाभविद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर शुल्क, उपलब्ध करून देणे
लाभार्थीअनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध विद्यार्थी
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

Post Matric Tuition Fee And Examination Fee (Freeship) चा उद्देश

  • विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे.
  • उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
  • शिक्षण व्यवस्थेमध्ये विद्यार्थी गळती प्रमाण कमी करणे.
  • उच्च शिक्षणाद्वारे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे.
  • पैशाअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची आवश्यकता भासू नये.
Post Matric Tuition Fee And Examination Fee (Freeship)

योजनेची वैशिष्ट्ये:

  • या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.

योजनेचे लाभार्थी:

  • अनुसूचित जाती तसेच नवबौद्ध विद्याथी

योजनेचा फायदा:

  • अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे अनिवार्य शुल्क जसे की, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि इतर अनुज्ञेय शुल्क यांची शासनाकडून परतफेड प्रदान करण्यात येईल.
  • या योजनेअंतर्गत शिक्षण गळती कमी होण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील तसेच स्वतःचा एखाद उद्योग सुरु करू शकतील.
  • विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण होईल व ते पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी मिळेल.
  • राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.

आवश्यक पात्रता:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेचे नियम व अटी:

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील विद्याथ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • आई-वडिलांचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असता कामा नये.
  • विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा.
  • विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्यामुळे अर्जात कुटुंबातील इतर सदस्यांच्या बँक खात्याची माहिती ग्राह्य धरली जाणार नाही व लाभाची राशी दिली जाणार नाही.
  • विद्यार्थी शालांत परीक्षा किंवा इतर समकक्ष मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असावा.
  • विद्यार्थी ज्या संस्थेमध्ये शिकत असेल ती शासकीय मान्यताप्राप्त असलेली आणि महाराष्ट्रात स्थित असलेली संस्था असावी.
  • विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केवळ CAP माध्यमातून प्रवेश घेतलेला असावा.
  • संपूर्ण अभ्यासक्रम कालावधीत केवळ एकदा अनुत्तीर्ण ग्राह्य धरले जाईल.

आवश्यक कागदपत्रे:

  • विद्यार्थ्यांचे आधार कार्ड
  • रहिवाशी दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • जातीचा दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र (तहसीलदार यांनी प्रदान केलेले)
  • जात पडताळणी प्रमाणपत्र
  • गत वर्षीच्या परीक्षेची गुणपत्रिका
  • इयत्ता 10वी किंवा 12वी परीक्षेची गुणपत्रिका
  • वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • वसतिगृह प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • CAP फेरी वाटप पत्र

अर्ज रद्द होण्याची कारणे:

  • अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास.
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौध्द जातीचा नसल्यास.
  • संस्था महाराष्ट्र नसेल किंवा शासन मान्यताप्राप्त नसेल.
  • विद्यार्थी केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत असल्यास.
  • विद्यार्थी शिक्षण घेत नसल्यास.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास
  • विद्यार्थ्याने व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी CAP माध्यमातून प्रवेश घेतलेला नसल्यास

अर्ज करण्याची पद्धत:

पहिला टप्पा:

  • सर्वात प्रथम अर्जदार विद्यार्थ्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
  • होम पेज वर गेल्यावर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
post matric tuition fee and examination fee freeship maharashtra new registration

  • आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर Register वर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.

दुसरा टप्पा:

  • अर्जदाराला आपला Username आणि Password टाकून लॉगिन करावे लागेल.

तिसरा टप्पा:

  • अर्जदाराला होम पेज वर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती वर क्लिक करावे लागेल त्यानंतर Social Justice and Special Assistance Department वर क्लिक करून पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फी आणि परीक्षा फी (फ्रीशिप) वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर या शिष्यवृत्ती ची सर्व माहिती उघडेल ती वाचून खाली Apply For This Scheme वर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे अपलोड करून Register बटनावर क्लिक करावे लागेल.
  • अशा प्रकारे तुमची या शिष्यवृत्ती अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram GroupJoin
Post Matric Tuition Fee And Examination Fee (Freeship)
अधिकृत वेबसाईट
Click Here
Post Matric Tuition Fee And Examination Fee (Freeship)
हेल्पलाईन नंबर
1800-120-8040
022-49150800

Leave a Comment