प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी : देशातील नागरिकांना अपघातात आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरु करण्यात आलेली आहे.
या योजनेअंतर्गत विमा धारकाच्या अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाखांची आर्थिक मदत केली जाते. तसेच अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 2 लाख व आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाखाची आर्थिक मदत केली जाते.
देशातील बहुतांश नोकरदार वर्ग हा आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे त्यामुळे स्वतःचा किंवा कुटुंबाचा विमा काढून विम्याच्या हफ्त्याची रक्कम भरणे त्यांना शक्य नसते व अशा वेळी एखाद्या नागरिकाचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा त्याला कायमस्वरूपी किंवा आंशिक अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबावर आर्थिक संकट निर्माण होते. त्यामुळे देशातील नागरिकांना विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने 2015 साली देशात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरु करण्याच्या एक महत्वपूर्ण असा निर्णय घेतला.
योजनेचे नाव | Pmsby Scheme Details In Marathi |
योजनेचे लाभार्थी | देशातील नागरिक |
लाभ | 2 लाखांपर्यंत विमा संरक्षण |
योजनेचा उद्देश्य | नागरिकांना विमा संरक्षण देणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन (बँक व पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून) |
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी चे उद्दिष्ट
- देशातील नागरिकांना विमा सुरक्षा प्रदान करणे हा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- एखाद्या नागरिकाचा अपघात मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- एखाद्या व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास औषोधोपचारासाठी आवश्यक पैशांसाठी त्याच्या कुटुंबाला कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये तसेच कोणाकडून व्याजाने पैसे घेण्याची गरज भासू नये.
योजनेचे वैशिष्ट्य:
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही भारत सरकारद्वारे पुरस्कृत अपघात विमा योजना आहे.
- योजनेअंतर्गत विमा धारकाच्या मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास विम्याची राशी विमा धारकाच्या वारसाच्या बँक खात्यात जमा केली जाते.
- सदर योजना हि केंद्र सरकार द्वारे सुरु करण्यात आलेली आहे त्यामुळे यावर केंद्र शासनाचे संपूर्ण लक्ष असते त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार होत नाही तसेच विम्याची रक्कम देखील विमा धारकाच्या वारसाच्या बँक खात्यात त्वरित जमा केली जाते.
- देशातील सर्व नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चा लाभ मिळवता यावा यासाठी कमी प्रिमिअम रक्कम ठेवण्यात आलेली आहे.
- तांत्रिक अडचणीमुळे बंद झालेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येईल.
योजनेचे लाभार्थी:
- देशातील सर्व जाती धर्मातील नागरिक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
योजनेचा फायदा:
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत देशातील नागरिकांना वर्षाला फक्त 20/- रुपये विमा हफ्ता भरून 2 लाखांचा विमा मिळवता येतो त्यामुळे आर्थिक दृष्ट्या गरीब व्यक्ती सुद्धा या योजनेअंतर्गत स्वतःचा विमा काढू शकेल.
- विमाधारकाला अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास 2 लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळते.
- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या एकाएकी जाण्याने कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ येणार नाही.
योजनेचा लाभ:
- कायमस्वरुपी आंशिक अपंगत्वाच्या बाबतीत मिळणारा लाभ:
- विमाधारकाने जर एका डोळ्याची दृष्टी गमावली किंवा एक हात किंवा पाय गमावला तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांची रक्कम दिली जाईल.
- मृत्यू किंवा कायमस्वरुपी पूर्ण अपंगत्वाच्या बाबतीत लाभ:
- जर एखाद्या अपघातामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्याला 2 लाख रुपये मिळतील.
- जर अपघातामुळे दोन्ही हात, पाय किंवा दोन्ही डोळ्यांचे नुकसान झाले तर 2 लाख रुपये मिळतील.
- जर अपघातामुळे एका डोळ्याची दृष्टी गमावल्यास आणि हात किंवा पायाला नुकसान झाले तरी देखील 2 लाख रुपयांची रक्कम दिली जाईल.
- कायमस्वरुपी आंशिक अपंगत्व आल्यास दिला जाणारा लाभ:
- जर विमाधारकाने एका डोळ्याची दृष्टी गमावली किंवा एक हात किंवा पाय गमावला तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत 1 लाख रुपयांची रक्कम मिळेल.
योजनेचा कालावधी:
- योजनेचा कालावधी दरवर्षी 1 जून ते 31 मे असा राहील.
योजनेअंतर्गत आकारण्यात येणारे प्रिमिअम:
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत वर्षाला 20/- रुपये + (सेवाकर) प्रिमिअम रक्कम आकारण्यात येते.
योजनेअंतर्गत दिले जाणारे विमा संरक्षण:
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत 2 लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जाते.
अपघातात मृत्यू झाल्यास | 2 लाख रुपये |
दोन्ही डोळ्यांची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी / दोन्ही हात किंवा दोन्ही पाय निकामी होणे / एक डोळा आणि एका हात किंवा एक पाय निकामी होणे | 2 लाख रुपये |
एका डोळ्याची संपूर्ण आणि बरी न होणारी हानी किंवा एक हात किंवा एक पाय निकामी होणे | 1 लाख रुपये |
टोल फ्री नंबर:
आवश्यक पात्रता:
- अर्जदार व्यक्ती भारताचा मूळ नागरिक असणे आवश्यक आहे.
योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त देशातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- देशाबाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त 18 ते 70 वयोगटातील नागरिकांनाच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत अर्ज करता येईल.
- 18 वर्षापेक्षा कमी आणि 70 वर्षापेक्षा जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवता येणार नाही.
- अर्जदार व्यक्तीचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- विमाधारक सदस्यास अपघात होऊन दावा उद्भवल्यानंतर 30 दिवसांच्या आत सादर करणे आवश्यक आहे.
- विमा धारकाला दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
- विकाधारक व्यक्तीला वर्षाला 20/- रुपये + (सेवाकर) रक्कम भरणे आवश्यक आहे.
- विमाधारकाने विम्याची रक्कम न भरल्यास त्या कालावधीमध्ये विमा धारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास विम्याची रक्कम दिली जाणार नाही.
- विमा धारकाला बँकेत Auto Debit पर्याय सुरु ठेवणे आवश्यक आहे.
- प्रत्येक व्यक्ती केवळ एकाच पॉलिसीसाठी पात्र आहे.
योजनेच्या कव्हरेजची समाप्ती:
खालीलपैकी कोणत्याही घटनेमध्ये सदस्याला विमा संरक्षण मिळणार नाही आणि त्या अंतर्गत कोणतेही लाभ मिळणार नाहीत
- 70 वर्षे पूर्ण झाल्यानंतर (जवळच्या जन्मदिवशीचे वय)
- बँकेतील / पोस्ट ऑफिसमधील खाते बंद केल्यास किंवा विमा चालू ठेवण्यासाठी आवश्यक पुरेशी रक्कम खात्यात नसल्यास.
- जर एखादा सदस्य एकापेक्षा अधिक खात्यांद्वारे विमा संरक्षित केला गेला, आणि विमा कंपनीद्वारे नजरचुकीने विमा हप्ता घेतला गेला, तर विमा संरक्षण हे एका बँकेच्या / पोस्टाच्या खात्यापुरतेच मर्यादित राहील आणि दुसऱ्या विम्यांसाठी भरलेला विमा हप्ता जप्त केला जाईल.
- जर कोणत्याही तांत्रिक कारणांनी जसे देय तारखेस अपुरी रक्कम असणे किंवा कोणत्याही प्रशासनिक कारणांमुळे विमा संरक्षण थांबविले गेल्यास, ते विमा संरक्षण लावल्या गेलेल्या अटींच्या अधीन राहून संपूर्ण वार्षिक विमा हप्ता भरुन पुन्हा बहाल केले जाईल. या कालावधी दरम्यान जोखीम संरक्षण निलंबित केले जाईल आणि जोखीम संरक्षण पुन: स्थापित करणे हे विमा कंपनीच्या विवेकाधिकारावर अवलंबून राहील.
आवश्यक कागदपत्रे:
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अर्ज
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक खात्याचा तपशील
- वारसाच्या बँक खात्याचा तपशील
बँकेच्या माध्यमातून अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम त्यांचे खाते असलेल्या बँकेत जायचे आहे.
- बँकेत जाऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज बँकेत जमा करायचा आहे.
- बँक कर्मचारी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करेल व तुमच्या बँक खात्यामधून विम्याच्या प्रिमिअम ची 20/- रुपये रक्कम वजा केली जाईल.
पोस्टाच्या माध्यमातून अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील पोस्ट ऑफिस मध्ये जायचे आहे.
- पोस्टात जाऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा अर्ज घ्यायचा आहे.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज पोस्टात जमा करायचा आहे.
- पोस्ट कर्मचारी तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करेल व तुमच्या पोस्ट खात्यामधून विम्याच्या प्रिमिअम ची 20/- रुपये रक्कम वजा केली जाईल.
दावा:
- विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास, नामांकित व्यक्तीने विमा कंपनीला दावा करावा.
- दाव्यासाठी, मृत्यूचा दाखला, अपंगत्व प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि बँक खाते पासबुक सारखे आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील.
Telegram Group | Join |
PMSBY Portal | Click Here |
PMSBY Application Form | Click Here |
PMSBY Claim Form | Click Here |
PMSBY Maharashtra Toll Free | 1800 102 2636 |
PMSBY All Indian Toll Free | 1800 180 1111 / 1800 110 001 |