राज्यातील ग्रामीण भागात बहुतांश नागरिकांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे संपूर्ण जीवन हे शेतीवर अवलंबून असते त्यामुळे राज्यातील शेतकरी दिवस रात्र मेहनत करून वादळ, पाऊस, वाऱ्याची पर्वा न करता शेती करतो परंतु चक्रीवादळ, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते याचा त्यांना आर्थिक फटका बसतो. शेतकरी आधीच कर्ज काढून शेती करत असतो व हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे असे एकाएकी नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाची रक्कम फेडण्याचा तसेच स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो व आर्थिक नुकसान सहन न करू शकल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो व जीवन संपवतो. सततच्या होणाऱ्या पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी शेती क्षेत्राकडे पाठ फिरवताना दिसून आला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्याच्या या सर्व समस्यांचा विचार करून केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला.
देशातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास नुकसानीची भरपाई देण्यात येते. या योजनेअंतर्गत शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येतो त्यामुळं शेतकऱ्यांना केवळ 1/- रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश आग, वीज पडणे, पूर, भूस्खलन, रोगराई, स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान, चक्रीवादळ, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांच्या नुकसानीसाठी आर्थिक सहाय्य करणे.
पिक विमा योजना म्हणजे काय?
शेतकरी स्वतःजवळील दागिने, घर, जमीन गहाण ठेवून शेतात काबाड कष्ट करतो व शेती करतो परंतु अतिवृष्टी, वादळ, पूर, गारपीट यांमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो त्यामुळे ज्या शेती पिकावर ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे संपूर्ण जीवन अवलंबून असते त्याचे अशा प्रकारे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना होणाऱ्या या सर्व समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी तसेच त्यांना आर्थिक हातभार देण्यासाठी राज्य शासन पीक विमा योजना जाहीर करते. ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई दिली जाते.
योजनेचे नाव | पीक विमा योजना माहिती |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेची सुरुवात | एप्रिल 2016 |
विभाग | कृषी विभाग |
लाभ | शेत पिकाच्या नुकसानीची आर्थिक भरपाई दिली जाते |
उद्देश्य | शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे |
लाभार्थी | राज्यातील सर्व जाती धर्माचे शेतकरी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन/ऑफलाईन |
योजनेचा उद्दिष्ट
- नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
- राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
- पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
- राज्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखणे.

वैशिष्ट्य:
- या योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना लाभ मिळवता येणार आहे.
- योजनेअंतर्गत लाभाची राशी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
- खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळांसाठी सुद्धा ही योजना खुली ठेवण्यात आलेली आहे.
- स्थानिक जोखीम आणि कापणीपश्चात हानी यांचा या योजनेमध्ये समावेश आहे.
पिक विमा यादी:
खरीप हंगामातील 14 पिकांसाठी शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येणार आहे.
- भात
- ज्वारी
- बाजरी
- नाचणी
- मूग
- उडीद
- तूर
- मका
- भुईमूग
- कारळे
- तीळ
- सोयाबीन
- कापूस
- खरीप कांदा
योजनेअंतर्गत जिल्ह्यानुसार विमा कंपनी:
इन्शुरन्स कंपनी | जिल्हा |
ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. | अहमदनगर, नाशिक, सोलापूर, जळगाव, सातारा |
आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि. | परभणी, वर्धा आणि नागपूर |
युनिव्हर्सल सोम्पो जनरल कंपनी लि. | जालना, गोंदिया व कोल्हापूर |
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. | नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदूर्ग |
चोलामंडलम एम.एस. जनरल इं.कंपनी लि. | औरंगाबाद, भंडारा, पालघर व रायगड |
भारतीय कृषि विमा कंपनी | वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदूरबार व बीड |
एचडीएफसी जनरल इन्शुरन्स.कं.लि. | हिंगोली,अकोला, धुळे, पुणे व उस्मानाबाद |
रिलायन्स जनरल इन्शुरन्स | यवतमाळ, अमरावती व गडचिरोली |
एस.बी.आय. जनरल इन्शुरन्स कं. लि. | लातूर |
पीक विमा योजना महाराष्ट्र अंतर्गत पुढील कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाईल.
1. पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात नैसर्गिक आपत्ती व कीड रोग यामुळे येणारी घट.
2. पीक पेरणीपूर्व, लावणीपूर्व नुकसान भरपाई– अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे अधिसूचित मुख्य पिकांची अधिसूचित क्षेत्रात व्यापक प्रमाणावर पेरणी, लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी (सदरची पेरणी, लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्के पेक्षा जास्त असावे.)
3. हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई – हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत उदा. पूर,पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या पन्नास टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाई देण्यात येईल.
4. काढणी पश्चात नुकसान – चक्रीवादळ, अवकाळी पाऊस यामुळे कापणी, काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.
सदरचे नुकसान काढणी, कापणी झाल्यानंतर जास्तीत जास्त 14 दिवस नुकसान भरपाईस पात्र राहील.
योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतला आहे त्या संबंधित वित्तीय संस्थेस किंवा संबंधित विमा कंपनीस कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून 48 तासांचे आत नुकसानग्रस्त अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. Pm Pik Vima Yojana Information In Marathi
5. स्थानिक नैसर्गिक आपत्ती– या योजनेअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीस नुकसान भरपाई वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येतील.
प्रधान मंत्री पीक विमा योजना (PMFBY) अपवाद
- द्वेषयुक्त नुकसान
- प्रतिबंधित जोखीम
- युद्ध आणि परमाणु जोखीमींमुळे उद्भवणारे नुकसान
पिकांचे नुकसान झाल्यावर पंतप्रधान पीक विमा योजना महाराष्ट्र अंतर्गत शेतकऱ्यांनी करावयाची प्राथमिक बाब
पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत याबाबतची सुचना विमा कपनी, संबधीत बँक, कृषि / महसूल विभाग यांना देणे आवश्यक आहे.
पिक विमा हेक्टरी किती सबसिडी?
हंगाम | पिके | शेतकऱ्याद्वारे जास्तीत जास्त देय इन्श्युरन्स शुल्क |
खरीप | सर्व कडधान्ये आणि तेलबिया पिके | 2% |
रब्बी | सर्व कडधान्ये आणि तेलबिया पिके | 1.5% |
खरीप आणि रब्बी | वार्षिक व्यावसायिक/वार्षिक बागायती पिके बारमाही बागायती पिके (प्रायोगिक तत्त्वावर) | 5% |
पीक विमा योजना महाराष्ट्र योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?
- सर्व कर्जदार, बिगर कर्जदार शेतकरी
- कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी
- सर्व जाती धर्माचे शेतकरी
योजनेअंतर्गत सहकार्यांना होणारा फायदा:
- राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे चक्रीवादळ, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस, कीटकांचा प्रादुर्भाव तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास अशा शेतकऱ्यांना त्याच्या पिकाचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात येईल.
- या योजनेनंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल व शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी शेती करण्यासाठी प्रोत्साहित होतील तसेच इतर नागरिक शेती क्षेत्राकडे आकर्षित होतील.
- पिकाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील.
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे शेती क्षेत्राचा विकास होईल.
- महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्माचे शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळवू शकतात.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
योजनेचे नियम व अटी:
- अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे.
- फक्त शेती क्षेत्रात होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जातील व इतर क्षेत्रात होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जाणार नाही.
- शेत पिकाच्या नुकसानीची आर्थिक भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- शेतात पिकांची पेरणी झालेली आहे याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे त्यामुळे पिक पेरणीच्या पुराव्यासाठी शेतकरी तलाठी, सरपंच तथा ग्रामसेवकांचे पत्र सादर करू शकतो.
- जर शेतकऱ्याने शेत कसायला घेतले असेल व पीक पेरणी झाली असेल तर जमिनीच्या मालकासोबत केलेल्या कराराची फोटोकॉपी अर्जासोबत जोडावी लागेल..
- प्रधानमंत्री पीक विमा योजना फक्त केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या पिकांसाठीच लागू असेल.
- केवळ नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य करण्यात येईल परंतु मानवनिर्मित आपत्ती उदा.आग लागणे, चोरी होणे या बाबतीत शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची नुकसान भरपाई दिली जाणार नाही.
- शेतकऱ्याने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्ग अर्ज करण्यापूर्वी केंद्र व राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एखाद्या पीक विमा योजनेचा लाभ मिळवला असता कामा नये.
- प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मोबाईल फोन चा वापर करून पिकांच्या नुकसानीचे मोजमाप केले जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे:
- विहित नमुन्यातील अर्ज
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- जमिनीचा 7/12 उतारा व 8अ दाखला
- पीक पेरणी दाखला म्हणून शेतकऱ्यांनी शेतात पिकाची पेरणी, लागवड केल्याबाबत स्वयंघोषणापत्र
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- शपधपत्र
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर शेतकऱ्याचा अर्ज वर क्लिक करावे लागेल.

- आता तुमच्यासमोर प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील व सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज करावयाचा आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात जावे लागेल.
- जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज कृषी विभागात किंवा आपल्या जवळच्या बँक शाखेत जाऊन जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Pm Bima Yojana Application Status In Marathi:
- अर्जदाराला सर्वात प्रथम प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर पॉलिसी ची स्थिती वर क्लिक करावे लागेल.

- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला Reciept Number टाकून Check Status बटनावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल.
Telegram Group | Join |
प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिकृत वेबसाईट | Click Here |
पिक विमा कंपनी फोन नंबर | 1800-209-5959 |
प्रधानमंत्री पीक विमा योजना अर्ज | Click Here |