Rajshree Shahu Maharaj Scholarship: राज्यातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी एक योजना आहे.
या योजनेअंतर्गत शालांत परीक्षेत 75 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या आणि इयत्ता 11वी मध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी दरमहा 300/- रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. (10 महिने प्रत्येकी 11वी आणि 12वी इयत्तेसाठी) ही शिष्यवृत्ती भारत सरकारच्या शिष्यवृत्ती आणि Freeship व्यतिरिक्त दिली जाते.
योजनेचे नाव | Rajashree Shahu Maharaj Scholarship |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग |
उद्देश | विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे. |
लाभ | प्रतिमहिना 300/- रुपये अर्थसहाय्य |
लाभार्थी | इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
Rajshree Shahu Maharaj Scholarship चे उद्दिष्ट
- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल रुची निर्माण करणे.
- शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य्य उपलब्ध करणे.
- अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे.
- पैशाअभावी विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची आवश्यकता भासू नये.
योजनेचे वैशिष्ट्य:
- या योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा केली जाते.
- राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैशांसाठी आत्मनिर्भर राहण्यासाठी सदर योजना महत्वाची ठरणार आहे.
Rajarshi Shahu Maharaj Scholarship Amount:
योजनेअंतर्गत बिगर व्यावसायिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमांसाठी दिले जाणारे अर्थसहाय्य:
ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्प भूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजूर नाहीत, परंतु ज्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबाचे (दोन्ही पालकांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना प्रचलित व नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱ्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसह बिगर व्यावसायिक आणि उच्च माध्यमिक (इयत्ता 11वी / 12वी) अभ्यासक्रमांसाठी, शैक्षणिक वर्षातील दहा महिन्याकरीता प्रतिमाह खालील नमूद दराप्रमाणे निर्वाह भत्ता अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
अभ्यासक्रम | निर्वाह भत्ता |
व्यावसायिक अभ्यासक्रम (अल्प भूधारक शेतकरी / नोंदणीकृत मजुरांचे पाल्य वगळून) | 3,000/- रुपये |
बिगर व्यावसायिक | 2,000/- रुपये |
उच्च माध्यमिक (इयत्ता 11वी / 12वी) | 1,000/- रुपये |
Chhatrapati Shahu Maharaj Scholarship Last Date:
- राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ची शेवट ची तारीख निश्चित केली जात नाही ती प्रत्येक वर्षी वेगवेगळी असते त्यामुळे आम्ही अर्ज भरण्यास सुरवात झाल्यावर शेवट ची तारीख काय आहे याची नोंद करू.
योजनेचा फायदा:
- या योजनेअंतर्गत शिक्षण गळती कमी होण्यास मदत होईल.
- या योजनेच्या सहाय्याने विद्यार्थी स्वतःचे शिक्षण पूर्ण करून स्वतःसाठी एखादी चांगली नोकरी मिळवू शकतील तसेच स्वतःचा एखाद उद्योग सुरु करू शकतील.
- विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण होईल व ते पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित होतील.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी मिळेल.
- राज्यात साक्षरतेचे प्रमाण वाढेल.
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव:
- सदर योजना बिगर आरक्षित प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहील.
आवश्यक पात्रता:
- अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा.
- विद्यार्थी अनुसूचित जाती श्रेणी अंतर्गत असावा.
- विद्यार्थी इयत्ता 11वी किंवा 12वी वर्गात शिकणारा असावा.
- विद्यार्थी शालांत परीक्षा 75% किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण असावा.
योजनेचे नियम व अटी:
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. तथापि महाराष्ट्र कर्नाटक राज्य सीमा भागातील विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
- केवळ अनुसूचित जातीतील विद्यार्थी गुणवत्तेनुसार या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात.
- अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- एका कुटुंबातील फक्त दोन मुलांना या योजनेचा लाभ देय राहील.
- विद्यार्थ्यांची वर्गात 50 टक्के हजेरी असणे बंधनकारक आहे तरच त्याला या योजनेचा लाभ दिला जाईल.
- अर्जदाराने केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- या योजनेचा लाभ दूरस्थ पध्दतीने (Open / Distance /Virtual Learning) अथवा अर्धवेळ (Part- Time) स्वरुपात चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
- शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांपैकी केवळ कोणत्याही एकाच योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास संबंधित विद्यार्थी पात्र असेल.
- योजेनच्या लाभाकरीता अनुज्ञेय असलेला अभ्यासक्रम सुरु करण्यास शासनाची व संबंधित सक्षम संस्थाची (AICTE/PCI / COA / MCI/NCTE, विद्यापीठ / शिक्षण मंडळ, इ.) पूर्व मान्यता व संलग्नता असणे आवश्यक आहे. अर्जदार विद्यार्थ्यास प्रत्येक सत्र अथवा वर्षाची परीक्षा देणे आवश्यक राहिल. मागील वर्षी सदर शिष्यवृत्ती चा लाभ घेतलेले विद्यार्थी शिष्यवृत्ती च्या नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात.
- अर्जदार विद्यार्थ्यास प्रत्येक सत्र अथवा वर्षाची परीक्षा देणे आवश्यक राहिल. केवळ विशिष्ट परिस्थितीत विशेषतः आजारपणाच्या कारणास्तव परीक्षा देणे शक्य झाले नसल्यास तसे विद्यार्थी व शैक्षणिक संस्थेने शिफारस केल्यानंतर संबंधीत प्रशासकीय विभागाच्या अखत्यारितील उपसंचालक / सहसंचालक वा सक्षम अधिकारी यांनी प्रमाणित करणे आवश्यक राहिल.
- पात्र लाभार्थी विद्यार्थी अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतल्यानंतर एखादया सत्राची (सेमिस्टरची) परीक्षा दिली नसल्यास अथवा एखादया शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्याने त्या वर्षासाठी प्रवेश मिळाला नसल्यास पुढील वर्षाकारीता या योजनेंतर्गत सदर विद्यार्थी लाभ मिळण्यास अपात्र राहिल. तथापि, तद्नंतर पुनश्चः त्या सत्रात / वर्षात परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अथवा अंशत: उत्तीर्ण ( ATKT) झाल्याने त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाल्यास सदर योजनेतील लाभासाठी पुन्हा पात्र ठरेल. परंतु असे पात्र लाभार्थी विद्यार्थी अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या एकूण कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळी पूर्णत: अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाला नसल्यास संबंधित विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या उर्वरित कालावधीसाठी सदर योजनेंतर्गत लाभाकरीता कायमस्वरुपी अपात्र ठरेल.
- संबंधित विद्यार्थी स्वत:च्या चुकीच्या वर्तनामुळे समाधानकारक शैक्षणिक प्रगती करीत नसल्याबाबत किंवा संबंधित प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय अनियमित असणे अथवा गैरहजर राहणे इत्यादी स्वरुपाचे गैरवर्तन करत असल्याबाबत संबंधित शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाने निदर्शनास आणले तर अशा विद्यार्थ्याची शुल्क शिष्यवृत्ती थांबविण्यात किंवा रद्द करण्यात येईल.
- ज्या अभ्यासक्रमांकरीता पात्र लाभार्थी विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे तो अभ्यासक्रम संबंधित विद्यार्थ्याने मध्येच सोडला तर अशा विद्यार्थ्यास प्रदान केलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम राज्य शासनास योग्य वाटल्यास त्याच्या/तिच्याकडून वसूल केली जाईल.
- लाभार्थी विद्यार्थी व संबंधित शिक्षण संस्था यांनी सदर योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी सादर केलेल्या अर्जात चूकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती सादर केल्यास त्यास उर्वरित अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी लाभ देण्यात येणार नाही. तसेच, त्या विद्यार्थ्याला/संस्थेला त्यांनी सादर केलेल्या चूकीच्या माहितीच्या आधारे त्यापूर्वी मिळालेल्या लाभाच्या संपूर्ण रकमेची व्याजासह वसूली करण्यात येईल व कोणत्याही अन्य योजनेंतर्गत संबंधित विद्यार्थ्यास लाभ मिळण्यास प्रतिबंधित केले जाईल.
- विद्यार्थ्यांना शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्याकडे स्वतःच्या नावाने बँक खाते असणे गरजेचे आहे कुटुंबातील इतर व्यक्तीचे बँक खाते मान्य केले जाणार नाही.
- अर्जदार विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला
- इयत्ता 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- जात प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- इयत्ता 11वी प्रवेश पावती
योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:
पहिला टप्पा:
- सर्वात प्रथम अर्जदार विद्यार्थ्याला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर गेल्यावर नवीन अर्जदार नोंदणी वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
- सर्व माहिती भरून झाल्यावर Register वर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची नवीन अर्जदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
दुसरा टप्पा:
- अर्जदाराला आपला Username आणि Password टाकून लॉगिन करावे लागेल.
तिसरा टप्पा:
- अर्जदाराला होम पेज वर पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती वर क्लिक करावे लागेल त्यानंतर Social Justice and Special Assistance Department वर क्लिक करून राजर्षि छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या शिष्यवृत्ती ची सर्व माहिती उघडेल ती वाचून खाली Apply For This Scheme वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे अपलोड करून Register बटनावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची या शिष्यवृत्ती अंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
Telegram Group | Join |
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अधिकृत वेबसाईट | Click Here |
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अर्ज | Click Here |
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना हेल्पलाईन | 1800-120-8040 |
मला हि स्कौलरशिप घ्यायची आहे
त्यासाठी तुम्हाला अर्ज करणे आवश्यक आहे.