राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना 2024

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना घरातून शाळेत येण्या-जाण्यासाठी  मोफत सायकलींचे वाटप करण्यात येते.

महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणा बरोबरच माध्यमिक शाळांचा विकास व विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे मूलभूत साधन असल्यामुळे सुरूवातीपासूनच राज्यात स्त्री शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने शासन महिलांसाठी विविध योजना राबविते. मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याकरीता व मुलींना शिक्षणाकडे आकर्षित करून घेण्याच्या दृष्टीने या धोरणांतर्गतच माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील इयत्ता 8वी च्या मुलींसाठी मोफत लेडीज सायकलीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजना’ सुरू करण्यास शासनाची निर्णय घेतला.

या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे तसेच त्यांना शिक्षणासाठी आकर्षित करणे आहे. [राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना]

योजनेचे नावराजमाता जिजाऊ सायकल वाटप योजना
उद्देशमुलींना शिक्षणासाठी आकर्षित करणे
लाभार्थीइयत्ता 8वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी
लाभमोफत सायकलीचा लाभ
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचे उद्दिष्ट

  • मुलींच्या शिक्षणाला चालना देणे.
  • ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करणे.
  • मुलींना शिक्षणाकडे आकर्षित करणे.
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना

योजनेचे वैशिष्ट्य:

  • या योजनेसाठी राज्य शासनाकडून दरवर्षी 20 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येतो.

योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ:

  • लाभार्थी मुलीला सायकल खरेदी करण्यासाठी 5 हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाते. लाभाची राशी मुलीच्या किंवा तिच्या पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

योजनेअंतर्गत दिला जाणारा प्राधान्यक्रम:

  • लाभार्थी मुलीची निवड करताना दुर्गम/अतिदुर्गम ग्रामीण भाग तसेच शहरी भागातील झोपडपट्टी/गलिच्छ वस्तीतील मुलींना प्राधान्य देण्यात येईल.

योजनेचे लाभार्थी:

  • ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील इयत्ता 8वी च्या वर्गातील विद्यार्थिनी

योजनेचा फायदा:

  • राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजना अंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये इयत्ता 8वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात येते.
  • मुलींना उन्हात, पावसात मैलोनमैल शाळेत चालत जाण्याची गरज भासणार नाही.
  • शाळेत मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी होईल.
  • मुली शिक्षणाकडे आकर्षित होतील.
  • मुलींचा शाळेत येणा जाण्याचा महत्वाचा वेळ वाचेल व त्या वेळेचा उपयोग त्या अभ्यास करण्यासाठी वापरू शकतील.

योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता:

  • अर्जदार मुलगी महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी असणे गरजेचे आहे.

योजनेच्या अटी व शर्ती:

  • लाभार्थी मुलीला शाळेमध्ये सायकल खरेदी केल्याचे बिल जमा करणे आवश्यक आहे.
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • इयत्ता 8वी तील दारिद्र्य रेषेखालील मुली या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील,
  • मुलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • फक्त ग्रामीण व नगरपरिषद क्षेत्रातील शाळांनाच सदर योजना लागू राहील.
  • अर्जदार विद्यार्थिनीचे घर आणि शाळा यांमधील अंतर किमान 2 किलोमीटर असणे आवश्यक आहे.
  • केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनांमधून अर्जदार मुलीने सायकलीचा लाभ घेतला असल्यास तिला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार मुलीला इयत्ता 7वी मध्ये कमीत कमी 75 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार मुलगी हि शासन मान्यता प्राप्त अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असावी.
  • अर्जदार मुलीचे आई किंवा वडील किंवा घरातील इतर कोणी सदस्य शासकीय कार्यालयात नोकरी करत असता कामा नये.
  • शहरी भागातील शाळांमधील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. [राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना]

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र.
  • रहिवाशी दाखला (वीज बिल, रेशन कार्ड)
  • शाळेचा दाखला.
  • शाळेत शिकत असल्याचा पुरावा
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदार विद्यार्थिनीला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात शालेय शिक्षण व क्रीडा विभागात जाऊन राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल.
  • अधिकाऱ्यांकडून अर्ज व कागदपत्रांची तपासणी करून लाभ दिला जाईल. [राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना]

किंवा

  • विद्यार्थिनीला आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांकडून राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज मुख्याध्यापकांकडे जमा करावा लागेल.
  • मुख्याध्यापक जमा अर्ज शालेय शिक्षण व क्रीडा विभागात जमा करतील.
  • शिक्षण अधिकारी जमा अर्ज व कागदपत्रांची तपासणी करून लाभ देतील. [राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना]
Telegram GroupJoin
राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना GRClick Here

Leave a Comment