राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबे जी स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी असमर्थ असतात अशा कुटुंबांना स्वतःचे पक्के घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या योजनेची सुरुवात 2015 साली करण्यात आली.
योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदाराला खालील नियम व अटींचे पालन करणे आवश्यक असते.
नियम व अटी
- फक्त महाराष्ट्र राज्यातील कुटुंबांना रमाई घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदाराने या आधी जर केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत अर्जदाला रमाई घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःचे पक्के घर नसावे.
- अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेत Joint Account असणे आवश्यक (नवरा बायको)
- अर्जदार कुटुंब हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असावे व कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असावी.
- अर्जदार शासकीय नोकरीत कार्यरत नसावा.
- अर्जदार आयकर दाता नसावा.
- अर्जदार कुटुंब अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच नव बौद्ध वर्गातील असणे आवश्यक आहे.
- अर्जदार ग्रामीण भागात राहत असल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार नगर परिषद क्षेत्रात राहत असल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार महानगर पालिका क्षेत्रात, राहत असल्यास त्याचे वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गातील असावा.
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे.
- अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्जदार हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
- लाभार्थी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 (SECC-२०११) प्राधान्य क्रम यादीच्या (Generated Priority List) निकषा बाहेरील असावा. कारण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) लाभार्थी निवडीसाठी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण 2011 (SECC-2011) प्राधान्य क्रम यादीतून (Generated Priority List) निवडण्यात येणार आहेत.
- या योजनेंतर्गत ग्रामीण भागामध्ये अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची निवड ग्राम सभेमार्फत करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे:
- जातीचे प्रमाणपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- बँकेचा तपशील
- मतदान ओळखपत्र
- पॅन कार्ड
- ८ अ चा उतारा
- लाईट बिल किंवा घरपट्टी
- इतर आवश्यक कागदपत्रे
अर्ज कसा करावा:
- जवळच्या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका कार्यालयातून अर्ज फॉर्म मिळवा.
- आवश्यक कागदपत्रे सोबत जमा करा.
- अर्ज तपासल्यानंतर आणि पात्रता निश्चित झाल्यास, लाभार्थ्यांना निवड यादीत समाविष्ट केले जाते.
- निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदानाचे टप्प्याटप्प्याने वितरण केले जाते.
महत्वाच्या बाबी:
- नवीन घर बांधणीसाठी 1,32,000/- रुपये ते 2.50 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळेल.
- अनुदान टप्प्याटप्प्याने दिले जाते.
- बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यात कामाची पूर्तता झाल्यावरच पुढील टप्प्यासाठी अनुदान दिले जाते.
योजनेच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा